नुतन वर्षाभिनंदन (काही नववर्ष अवतरणे)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
1 Jan 2008 - 3:01 am

नवीन वर्षा संबंधी काही अवतरणे वाचनात आली त्यांचे मुक्त भाषांतरः"तारुण्य म्हणजे नव्यावर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जागणे, आणि प्रौढत्व म्हणजे रात्रभर जागे राहावे लागणे""एक हितदर्शी (ऑप्टिमिस्ट) नवीन वर्षाची रात्र पुढील वर्षाचं स्वागत करण्यासाठी जागतो आणि अहितदर्शी (पेसिमिस्ट) जुने वर्ष गेल्याची खात्री करायला""अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात... त्यांना जुन्या सवयी नव्याने चालू करायच्या असतात ना!""नुतनवर्षाच्या मध्यरात्री निसर्गात वेगळे काहीच घडत नाही. पृथ्वी क्षणभरही थांबत नाही. थांबतात ते.. तो क्षण अनुभवणार्‍यांचे श्वास!""ही रात्र जरी इतर कोणत्याही रात्रीसारखी असली तरी या रात्री प्रत्येकाच्या डोक्यातील विचारांची तुलना मात्र अन्य कोणत्याही रात्रीशी करता येणार नाही""नूतनवर्षाभिनंदन!!.... हे पाहा आपल्या चुका सुधारण्यासाठी अजून एक नवे वर्ष मिळाले आहे ..... दरवर्षीप्रमाणेच""नववर्षाआधीचा पूर्ण महिना तुम्ही नशेत असता. नववर्षसंध्येला ही नशा इतकी चढते की तुम्ही चक्क तुमच्या लग्नाच्या बायकोचे चुंबन घेता.""...हे घ्या आणखी एक नवं पण कोरं पुस्तक. यातील दुसर्‍या प्रकरणापासून प्रत्येक प्रकरण आपणच लिहिणार आहोत. पहिलं प्रकरण मात्र आहे "नुतनवर्षाचे स्वागत!"""मी लोकांना ख्रिसमसपासून नववर्षापर्यंत काय आणि किती खाल्लं याची काळजी करताना पाहतो. खरंतर त्यांनी नववर्षापासून ख्रिसमसपर्यंत किती खाल्लं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे""येतं वर्ष नवीन वाटलंच नसतं जर तुम्ही आदल्या वर्षी चुकाच केल्या नसत्या.""तुमची दु:ख, यातना तुमच्या नववर्षाच्या संकल्पाइतकीच टिकोत.""खरंतर सांगण्यासारखं बरंच आहे पण तूर्तास "नूतनवर्षाभिनंदन!!!!""-(स्वैर भाषांतर) ऋषिकेश

समाजजीवनमानमौजमजाविचारअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

1 Jan 2008 - 5:31 pm | स्वाती राजेश

भाषांतर आवडले.

"नूतनवर्षाभिनंदन!!.... हे पाहा आपल्या चुका सुधारण्यासाठी अजून एक नवे वर्ष मिळाले आहे ..... दरवर्षीप्रमाणेच"

हे वाक्य छान आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2008 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"नूतनवर्षाभिनंदन!!.... हे पाहा आपल्या चुका सुधारण्यासाठी अजून एक नवे वर्ष मिळाले आहे ..... दरवर्षीप्रमाणेच"

आम्हालाही हेच वाक्य आवडले !!!

विसोबा खेचर's picture

2 Jan 2008 - 6:40 pm | विसोबा खेचर

चांगले भाषांतर, अवतरणेही आवडली! :)

तात्या.