आला रे आला कोरोना आला

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
16 Mar 2020 - 6:06 pm

आला रे आला कोरोना आला

कुठे राहिला तो आंदोलनवाला

दंगली साऱ्या हवेत विरल्या

देश आपसूक शांत झाला

यापूर्वी कधीही असा कुणी

घेतला नव्हता धसका

दंगेखोरांना कोरोनाने येऊन

दाखवलाय चांगलाच हिसका

रस्त्यावर उतरून साले

नाचत होते नंगानाच

कोरोनाच्या भीतीने ठेवलीय

त्यांच्या मानगुटीवर टाच

जीव घेणाऱ्याच्याच आता

पोटात गोळा आला

शांतप्रिय लोकांच्या मात्र

जीवात जीव आला

आला रे आला ,,कोरोना आला

कोरोनाच्या येण्याने मात्र भारत प्रकाशात आला

"गो कॅरोना गो कॅरोना" असं आठवले त्याला बोलला

जगभरात प्रसिद्ध झाली त्याची हरिमुखीं लाईन

कोरोना आलाय देशात खरा पण बाकी सर्व फाईन

रस्त्यावरून जरी खोकला कुणी तरी फाटते वीतभर

करोनाच्या भीतीने केलंय सर्वांच्याच मनात घर

खपले सारे कशे केव्हा याचा करा नीट अभ्यास

सूचना पाळा वैद्यांच्या , धरा मनी ध्यास

आलाय तसा जाईल तो , उगाच टेन्शन नको

ऊन आलंय आता डोक्यावरती होऊ सर्व पास

=================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

नमस्कार , मी डॉ सिद्धेश्वर विलास पाटणकर , कुणीही घाबरून जाऊ नये कोरोनामुळे हि सर्वप्रथम नम्र विनंती .. स्वतः आपली आणि आपल्या घरातील व्यक्तींची काळजी घेणे जेणेकरून देश आपोआप कोरोनमुक्त होईल .. कुणाला कोरडा खोकला असेल तर त्याने मात्र त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा हि नम्र विनंती . अंगावर काढू नये आणि बाहेर फिरू नये .. तसा हा उन्हाळा जसा वाढत जाईल , हा कोरोना लवकरच हद्दपार होईल .. एक मात्र आहे , हा कोरोना आता आलाय या पृथ्वीतलावर तर त्याला झेलायलाच हवं .. कारण पुढल्या खेपेला तो म्यूटेट होऊन पलटवार करण्याची शक्यता नाकारता येत नाही ... तर आपण स्वतःला जपा , आणि डाएट प्रोग्रॅम टाळा , सकस आहार घ्या , गरम पाणी थोडीशी हळद टाकून घेतले तर एकदम उत्तम .. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा

समाजजीवनमानडावी बाजूदेशांतरराहती जागाव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Mar 2020 - 8:37 am | ज्ञानोबाचे पैजार

आला तसा जाईल, हे खरं असले तरी जाताजाता किती जणांना घेउन जाईल?

आणि त्या जाणार्‍यात आपण असलो तर? ही खरी भिती आहे.

पैजारबुवा,

कुठे राहिला तो आंदोलनवाला....दंगली साऱ्या हवेत विरल्या....देश आपसूक शांत झाला

... हे तितकेसे खरे नाही. दीडशे सशस्त्र पोलिसांची एक, अशा अनेक पोलिस तुकड्या दंगाग्रस्त भागात रात्रंदिवस पहारा देत आहेत, ही वस्तुस्थिती त्या पोलिसांपैकीच एका इन्स्पेक्टर मित्राकडून समजली आहे.

कोरोनाच्या निमित्ताने खिलजी पुन्हा लिहीते झाले, याचा आनंद वाटला.

खिलजि's picture

18 Mar 2020 - 4:56 pm | खिलजि

@ पैंबुकाका

अहो काही नाही होणार आपल्याला ..तुम्ही आम्हाला हवे आहात ,, मिपाचे शीघ्र विडंबन सम्राट म्हणून .. आपल्याला सुखी , निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो , हीच प्रार्थना .
वाटोळे वाटोळे होईल त्या कोरोनाचे ( मानवनिर्मित विषाणू , दुसरं काय ) आणि त्याला जन्म देणाऱ्याचे ..

@ चित्रगुप्त काका

आपण फारच दिवसांनी दिसला आहात. असो आपला प्रतिसाद आला आणि खुशालीही .. धन्यवाद