अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर
अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)
न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर
थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर
इसीजी नका करू तुम्ही
पल्सही नका पाहू कोणी
लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर
काढा की माझे वेंटीलेटर
पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले
काळजी घेण्या नर्स नाही मग तुम्ही का दुर?
इकडे या अन ऐका पलंगाची कुरकुर
काढा की माझे वेंटीलेटर
अहो काढाना!
(सदरचे उपचार आमच्या खाजगी रुग्णालयात हिंदीतही उपलब्ध आहेत. रुग्णांनी लाभ घ्यावा.)
- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९
प्रतिक्रिया
7 Dec 2019 - 11:09 am | मुक्त विहारि
असो. ..
7 Dec 2019 - 12:15 pm | जॉनविक्क
पाभे पाअभे paaaaaaaaa भे
11 Dec 2019 - 6:15 pm | खिलजि
पाभे हि दुसऱ्या वळणाची वाटतेय .. बरोबर ना .. मी तरी तशीच वाचलीय.. शेमटूशेम जुळतेय .. ओळ अन अर्थही
11 Dec 2019 - 6:50 pm | पाषाणभेद
याला काय अर्थ ये राव?
म्हंजे पेशंट रिकव्हर होतो आहे. चांगला उड्या मारून पलंगाची कुरकुर ऐकायला डॉक्टरला बोलावतो आहे. लॅब टेस्ट न करता आपल्या शरीराची नासाडी अन पैसे वाचवायचं बघत आहे तर तुम्हाला दुसरंच सुचतंय.
हे म्हंजे आम्ही कान्हेगावला जायचं म्हणतो अन तुम्ही कोपरगावच्या गाडीत बशवीता व्हय.
याला काय अर्थ ये राव?
11 Dec 2019 - 6:53 pm | खिलजि
या पलंगावरच्या उद्यानींच तर गुदगुल्या केल्या , कविता वाचताना ...
11 Dec 2019 - 6:53 pm | खिलजि
उड्यानीच
11 Dec 2019 - 8:25 pm | वयस्क
अशा लिखाणला काय कविता म्हणायचे?