एक महत्वाची सूचना...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
22 Oct 2008 - 5:04 pm

मिसळपाव डॉट कॉमच्या (मिपा) सर्व सभासदांकरता एक महत्वाची सूचना -

मिपावर राजकीय अथवा सामाजिक परिस्थितीबाबत लिहीताना प्रक्षोभक, भडकावु, भावना उत्तेजीत करणारे,चिथावणीखोर, कुणाला पर्सनली टार्गेट करणारे शब्द ( जसे की बिनडोक, मेंटल, गुलछबु, षंढ ) वापरणे कटाक्षाने टाळावे. कायद्याच्या भाषेत ह्या गोष्टी गुन्ह्याच्या कक्षेत येतात. ह्यासाठी आपल्यावर "अब्रुनुकसानीचा गुन्हा, भावना भडाकवल्याचा, चिथावणी दिल्याचा गुन्हा " दाखल होऊ शकतो.

असे कुठलेही लेखन येथे आढळल्यास ते येथून त्वरीत उडवून लावले जाईल व संबंधित सदस्याचा आयडी व आयपी ऍड्रेस ब्लॉक केला जाईल. तरी सर्व सभासदांनी या सूचनेचे पालन करावे व सहकार्य करावे. त्याचप्रमाणे सर्व सभासदांना अशीही विनंती की असे कुठलेही लेखन येथे आढळल्यास त्याची सूचना मिपाचे संपादक,

सरपंच,
विसोबा खेचर,
नीलकांत,
विकास,
प्रियाली,
प्रा डॉ दिलीप बिरुटे,
चतुरंग,
केशवसुमार,
धोंडोपंत,

या पैकी कुणालाही लवकरात लवकर द्यावी व सहकार्य करावे..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नुकताच जामिन मंजूर झाला आहे. तूर्तास तरी या प्रकरणावर पडदा पडला आहे. सबब, या संबंधातील सर्व चर्चा व लेख या क्षणापासून अप्राकाशित करण्यात येत आहेत. यावर सभासदांची पुरेशी चर्चा झालेली आहे असे मिपा प्रशासनाला वाटते..

ही सूचना या क्षणापासून लागू करण्यात येत आहे. सर्व मिपाकरांकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा..

धन्यवाद,

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

हे ठिकाणधोरणसमाजजीवनमानराजकारणप्रकटनमाहिती

प्रतिक्रिया

अनामिका's picture

22 Oct 2008 - 5:21 pm | अनामिका

तात्या माझ्या लेखात आपणांस काही आक्षेपार्ह वाटत असेल तर खुशाल उडवा

"अनामिका"
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

अवलिया's picture

22 Oct 2008 - 5:23 pm | अवलिया

योग्य निर्णय

तात्या, खुशाल लेख उडवा. कारण काय बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे.

टारझन's picture

22 Oct 2008 - 6:02 pm | टारझन

तात्या, खुशाल लेख उडवा. कारण काय बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

टारझन's picture

22 Oct 2008 - 6:02 pm | टारझन

तात्या, खुशाल लेख उडवा. कारण काय बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

वल्लरी's picture

22 Oct 2008 - 5:27 pm | वल्लरी

पूर्ण सहकार्य
अगदी बरोबर निर्णय आहे मिपा प्रशासनाचा
-जया

अनिल हटेला's picture

22 Oct 2008 - 5:29 pm | अनिल हटेला

अगदी सहमत !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

छोटा डॉन's picture

22 Oct 2008 - 5:41 pm | छोटा डॉन

अतियश योग्यनिर्णय अगदी त्वरेने घेतल्याबद्दल धन्यवाद ...
तसेच सध्या न्यायालयात विचाराधिन असलेल्या खटल्याबद्दल आपण काही प्रतिक्रीया देणे योग्य ठरणार नाही, कायद्याची ह्याला परवानगी नाही.

असो. आम्ही सहमत आहोत ह्या निर्णयाला ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिरत भिरभि-या's picture

22 Oct 2008 - 5:46 pm | अभिरत भिरभि-या

तात्या,
मि.पा.वर पडणारा मीडीयाचा प्रकाशझोत आणि कालपासुन प्रकाशित झालेली जळजळित लेख पाह्ता आपण पालकत्वाची भुमिका घेतलेली दिसते.
पण असे काही होईल याची पूर्वकल्पना नसल्याने मी माझी मते वेगळि अशी सेव्ह केली नाहीत.

बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे असे काहींना वाटेल. मराठी अस्मिता असा दोन दिवस चघळायचा विषय हे मी मानत नाही.

माझी मते वैयक्तिक -रीत्या मला पाठवली तर फार फार बरे होईल. तसे ही त्यात आक्षेपार्ह नव्हते.
कृपया राग नसावा

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2008 - 6:15 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद आणि अभिनंदन, तात्यासाहेब.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

निर्णयाचे स्वागत असो.आमचे प्रतिसाद उडवायला आता हरकत नाही.
वेताळ

mina's picture

22 Oct 2008 - 7:05 pm | mina

तात्या तुमचा निर्णय एकदम मान्य..

आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

सुनील's picture

22 Oct 2008 - 7:40 pm | सुनील

काही अपरिहार्य कारणामुळे दोन दिवस मिपावर फारसे येता आले नव्हते. त्यामुळे चांगल्या "दणदणीत" चर्चा वाचायच्या राहूनच गेल्या म्हणायचे!!

असो, आता जो निर्णय घेतला गेला आहे तो चांगलाच आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शेखस्पिअर's picture

22 Oct 2008 - 9:00 pm | शेखस्पिअर

...निवडणूकीच्या काळात जनतेच्या विरोधात जाणे बरोबर नाही..
सशस्त्र माघार.
भावनेच्या ओघात काही कमी-जास्त लिहिले असल्यास जाहीर मुआफी...

देवाच्या काठीचा आवाज येत नाही..
कायद्याच्या बडग्याचा फक्त आवाजच येतो...

विकास's picture

22 Oct 2008 - 9:10 pm | विकास

तात्यांच्या या ऍक्शनशी पूर्ण सहमत.

याचा अर्थ मी अथवा कदाचीत तात्यापण राज ठाकर्‍यांच्या बाजूने अथवा विरोधात काहीच बोलत नाही आहोत हे समजावे. केवळ कायदेशीर मुद्दा म्हणून घेतलेला हा निर्णय चर्चेत हिरीहिरीने भाग घेतलेल्यांनी समजून घ्यावा असे वाटते.

रामदास's picture

22 Oct 2008 - 9:19 pm | रामदास

तात्या योग्य त्या वेळी येलो कार्ड दाखवल्याबद्दल.

मदनबाण's picture

23 Oct 2008 - 8:35 am | मदनबाण

योग्य निर्णय....

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

चटोरी वैशू's picture

23 Oct 2008 - 12:17 pm | चटोरी वैशू

आपल्या निण्रयाला पूर्न अनुमोदन आहे....

अभिज्ञ's picture

23 Oct 2008 - 12:54 pm | अभिज्ञ

तात्या,
मिसळपाव वरचि चर्चा उडवायची काय गरज आहे?
रेडिफ्.कॉम व टाइम्स सारख्या साईट्सवर जो काहि अतिशय खालच्या पातळिचा शिवीगाळ चालतो त्यावर आजपर्यंत कुठलीच कारवाई
झाल्याचे स्मरणात नाहि.
मिसळपाव वरील चर्चा ह्या अत्यंत दर्जेदार असतात व त्यात कुठलाहि शिवीगाळ नसतो असे माझे निरिक्षण आहे.
व्यवस्थापनास काहि शब्द अश्लील वाटत असल्यास ते जरुर उडवावेत,संपुर्ण चर्चाच उडवायची गरजच काय?

अभिज्ञ.

जैनाचं कार्ट's picture

23 Oct 2008 - 1:29 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हेच म्हणतो !

काही उडवायची गरज नव्हती !
Disclaimer तुम्ही दिलेलेच आहे त्यामुळे येथे चाललेल्या चर्चा व माहीतीपुर्ण प्रतिसादांसाठी तुम्ही जिम्मेदार नाही राहणार तेव्हा काळजी कसली ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

धोंडोपंत's picture

23 Oct 2008 - 2:24 pm | धोंडोपंत

रेडिफ आणि मिसळपाव यांची तुलना करू नये. रेडिफ एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कारभाराखाली आहे तर मिसळपाव ही मराठमोळ्या सर्वसामान्य माणसाने मराठी प्रेमींसाठी सुरू केलेले संकेतस्थळ आहे.

रेडिफकडे कोणत्याही कायदेशीर लढाया लढायला मुबलक पैसा आणि बळ आहे. ते बळ कोणत्याही वैयक्तिक संकेतस्थळाच्या मालकाकडे व संचालक मंडळाकडे असू शकत नाही.

प्रत्येकाला राजकीय मत असणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे पण त्या अधिकाराचा वापर मिपावर लेखन करतांना संयमाने करावा अशी अपेक्षा आहे.

सर्व मिपाकरांचे सहकार्य अपेक्षित आहे.

धोंडोपंत.

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

घाटावरचे भट's picture

23 Oct 2008 - 2:52 pm | घाटावरचे भट

+१

--ट्रोजन भटोबा

छोटा डॉन's picture

23 Oct 2008 - 3:15 pm | छोटा डॉन

रेडिफकडे कोणत्याही कायदेशीर लढाया लढायला मुबलक पैसा आणि बळ आहे. ते बळ कोणत्याही वैयक्तिक संकेतस्थळाच्या मालकाकडे व संचालक मंडळाकडे असू शकत नाही.

+१,
आम्ही ह्याच विचाराने ह्या सुचनेचा आग्रह केला.
हीच सत्य परिस्थीती आहे, भावना कितीही उत्कट असल्या तरीही ...

मिपा प्रशासन, धन्यवाद !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....