एलियनायटीसेलिया भाग ७, भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १
तो माणूस त्याच्या तुटक्या-फुटक्या इंग्लीशमधे म्हणाला, "नाही, मी ना फ्रान्सचा, ना नेदरलंड्सवरून आलोय. मी इथला नाही, म्हणजे या ग्रहावरचाच नाही."
आमच्या घरात ('Cheshire Hunt'मधे) दोन तट होते, एक "आस्तिकां"चा आणि एक "नास्तिकां"चा! आस्तिक म्हणजे पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे आणि आपण त्यांना किंवा ते आपल्याला शोधतील असं मानणारे आणि नास्तिक म्हणजे ज्यांचा पृथ्वीबाहेर कुठेही जीवसृष्टी असेल यावर अजिबात विश्वास न ठेवणारे! मी दुसर्या गटात होते, आमचं बहुमत होतं आणि माईक विरोधी पक्ष नेता होता. आणि असे आम्ही काही ध्यानीमनी नसताना या विचित्र माणसाला भेटलो होतो.
"इथला नाहीत, तुम्ही पृथ्वीवरचे नाहीत?", माईक कसंबसं म्हणाला. त्या माणसाची उंची फारच कमी होती, त्यामानानी त्याची क्ष आणि य अक्षांवर फारच वाढ झालेली होती. उंचीचा विचार करुनही एवढा जाडा माणूस मी युकेतही पाहिला नव्हता. त्याचा चेहरापण फार विचित्र नाही पण अगदी दंडगोल होता, पण उभा नव्हता आडवा होता. हा "वेगळा" आहे एवढं जाणवण्याइतपत तर नक्कीच! मी आणि माईक आळीपाळीनी त्याच्याकडे आणि एकमेकांकडे बघत होतो. "तुम्ही खोटं बोलत आहात, काहीतरी प्रयोग चालला आहे ना तुमचा? तुम्ही कोणत्या विद्यापीठातले??", माझा नास्तिकपणा वर यायला लागला. "मी थोडीफार कल्पना करु शकतो की तुम्हाला परग्रहावरचे लोक "बाहेरचे" वाटणार नाहीत हे का ते; पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी सूर्यमालेतला नाही. आणि मी एकटाही नाही आलेलो इथे! तुम्ही हे ग्लायडर बघा, हे असं काही तुम्ही पाहिलं आहेत का आधी, प्रत्यक्षात? तुम्हाला मी आमचं यानही दाखवतो, चला माझ्याबरोबर तुम्ही दोघं!", त्याचे उच्चार थोडे विचित्र होते, पण त्याच्या आवाजात एक प्रकारचा विश्वास होता, ऋजुता होती, मैत्रीचा भाव होता. आम्ही दोघं भारल्यासारखे त्याच्याबरोबर चालायला लागलो. "एक मिनीट फक्त. मला थोडं बर्फ टाकू दे या ग्लायडरमधे, मग ते फिरायलाही वापरता येईल. पण आपल्या तिघांचं वजन नाही झेपणार याला. आपण यानापाशी चालत जाऊ या." त्याने थोडा बर्फ हातानीच गोळा केला आणि तो ग्लायडरच्या दिशेला गेला.
या गोलूलाही थंडी वाजत असणार थोडी, कारण अंगात एक बारिकसं का होईना जॅकेट होतं, मोजे घातले होते हातात आणि पायात बूट होते. तो बर्फावरून चालत गेला तेव्हा मी माईकला त्याच्या बूटाचे ठसे दाखवले. मगाशी घराच्या मागच्या बाजूला जे छोटे ठसे दिसले होते ते याचेच होते तर! म्हणजे काल रात्री .... "चला, आपण यानाकडे जाऊ या, मी तुम्हाला माझ्या सहप्रवाशांची ओळख करुन देतो," तो म्हणाला, "अरे हो, माझ्याबद्दलही सांगतो. माझं खरं नाव, जाऊ दे, तुम्हाला लक्षात राहील असं नाव सांगतो. माझं नाव "मिहीर". आमची वस्ती तुमच्यापासून फार लांब नाही आहे, फक्त साडेपाच प्रकाशवर्ष दूर आहे. आम्ही साधारण सव्वासहा वर्षांपूर्वी निघालो आणि परवा रात्री इथे उतरलो," तो चालता चालता आम्हाला सांगत होता. "पण तुम्हाला इंग्लीश कसं काय येतं?", माईकनी विचारलं. "मिहीर" उत्तर द्यायला सुरु करणार तेवढ्यात मलाही प्रश्न पडला, "आमच्याकडे, भारतातपण मिहीर असं नाव असतं; तुमच्याकडेही? तुम्ही कोणती भाषा बोलता?". "सांगतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, चला माझ्याबरोबर!" चालतचालत आम्ही झुडपांच्या एका राईत घुसलो. तिथेही आतमधे जागा मोकळी होती आणि तिथेच एक विचित्र आकाराची वस्तू उभी होती. "हे आमचं यान, यातून आम्ही आलो," मिहीर बोलतच होता, "क्वेड, लीला, जरा बाहेर येता का?", हे त्याचे सहकारी असणार!
हे यान म्हणजे साधारण आपल्या चित्रपटात दाखवतात तशी एक तबकडीच होती, पण बाहेरच्या बाजूला सौर पॅनल्ससारखं काहितरी होतं, आणि शिवाय दोन अवदी छोट्या रेडीओ टेलिस्कोपसारख्या डिशपण होत्या. क्वेड आणि लीला बाहेर येईपर्यंत आम्हाला निरीक्षणाकरता थोडा वेळ मिळाला. "त्यांना कल्पना नसेल एवढ्यात कोणी भेटायला येईल म्हणून, ते दोघंजण त्यांची भाषेची यंत्र शोधत असणार!" मिहीर पुन्हा बोलायला लागला. "भाषेची यंत्र, हे काय असतं?", "तुम्हाला कळलं नाही का मगाशी, आपण पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली तेव्हा मला काही नीटसं कळलं नाही तुम्ही काय बोलताय ते? हे जे यंत्र आहे ना त्यात तुम्ही जे इंग्लीश बोलता त्याचं भाषांतर होतं आणि आम्हाला आमच्या भाषेत ते ऐकू येतं. साधारण २.७२ मिलीसेकंदात ही प्रक्रिया सुरू होते; पण मेंदूला ते सर्व शब्द ऐकून विचार करुन, प्रतिक्रिया द्यायला एवढा वेळ लागतो की काही मिलीसेकंद खूपच कमी काळ वाटतो." "पण मग तुम्हाला इंग्लीश बोलता येतंय आणि समजत नाही असं कसं? आणि तुम्ही तर म्हणता, त्या दोघांनी मशीन लावलं नसणार, मग त्यांना कसं कळलं तुम्ही इंग्लीशमधून हाक मारली ते?", प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. आणि त्यातून नास्तिकता अजूनही शांत बसू देत नव्हती. अजूनही मला वाटत नव्हतं की हे लोक खरोखर "बाहेरचे" आहेत; मॅंचेस्टर विद्यापीठातलंच कोणीतरी प्रयोग करतंय असं मला ठामपणे वाटत होतं. मला या भाषेच्या मुद्द्यावर फारच संशय होता.
"मी समजू शकतो तुम्हाला असं का वाटतंय ते!", मिहीर पुन्हा उत्तरं द्यायला लागला, "त्या दोघांनाही इंग्लीश नीट समजत नाही, पण थोडं बोलता येतं, मला त्यांच्यापेक्षा बरंच जास्त येतं. पण त्यांना त्यांची नावंतर समजतात ना! त्यांचीही ही खरी नावं नाहीत क्वेड आणि लीला, पण ही नावं आधीच ठरवलेली आहेत ना! आणि भाषेचं असं आहे की आम्ही शिकलो तुमची भाषा; निरीक्षण करुन आम्ही तीन भाषा ठरवल्या, इंग्लिश, मँडरीन आणि स्पॅनिश, तुमच्या पृथ्वीवर या तीन भाषा सगळ्यात जास्त बोलल्या जातात ना? पण मग आम्ही इंग्लिश ठरवली कारण पृथ्वीवरच्या लोकांमधे सगळ्यात समजली जाणारी हीच भाषा आहे, तर तुम्हां लोकांशी संवाद साधायला दुसरी कोणती भाषा वापरणार? पण तरीही मी थोडंफार स्पॅनिश शिकलो, क्वेड मँडरीन शिकला आणि लीला हिंदी शिकली.", "हिंदी? मला हिंदीही येतं थोडंफार!", मला आता खरोखरच संशय यायला लागला की हे लोकं मँचेस्टर विद्यापीठातलेच आहेत आणि काहीतरी प्रयोग करत आहेत. मँचेस्टरमधे आणि संपूर्ण युकेमधेच एवढे पाकिस्तानी आणि चीनी आहेत, शिवाय सगळे ब्रिटीश लोक उठून स्पेनमधे सुट्टीवर जातात, यांना स्पॅनिशही येईल सहजच! नास्तिक उगाच नव्हते मी!! "तुम्ही खरं सांगा, तुम्ही मँचेस्टरवरून आला आहात ना?"
"नाही हो, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मी म्हणतो म्हणून खरं असं म्हणायची गरज नाही, मी तुम्हाला पुरावा दाखवतो." एवढ्यात लीला आणि क्वेड बाहेर आले. त्यांच्याही कानात तसलीच यंत्रं होती. तेही दोघंजण असेच बुटुकबैंगण होते, तसेच जाडगेले आणि चेहरेपण "आपल्या"पेक्षा थोडे वेगळे भासणारे! पण एकूण दिसायलातरी "आपली" शरीर उंचीनी कमी केली आणि त्याऐवजी जाडीला वाढवली तर कशी होतील तशी दिसत होती! "नमस्ते, मै लीला हूं, और ये क्वेड", लीलानी हात जोडून नमस्कार करुन ओळख करुन दिली. तिचं हिंदीपण मिहीरच्या इंग्लीशसारखं मोडकंच वाटलं. माईकला काहीही सुधरलं नाही, ते पाहून मी पुढे होऊन इंग्लीशमधे म्हणाले, "हाय लीला, क्वेड. हा माईक आणि मी संहिता! नाईस टू मीट यू. आणि माईकला हिंदी येत नाही", मी ओळखपरेड संपवली. लीलाचे गोबरे गाल थंडीमुळे लगेचच लाल झाले, तशी तिने स्वतःचे हात हातावर चोळून गाल थोडे गरम केले. "आपण आत जाऊन का बोलत नाही आहोत, इथे बाहेर खूप थंडी आहे ना? तुम्हाला लोकांना थंडी नाही वाजत आहे?", लीलानी आणखी मोडक्या इंग्लीशमधे विचारलं.
"चला आपण आतच जाऊ, तुम्हाला मी आमचं यानही दाखवतो. बाहेर थंडीही आहे ना!", मिहीर म्हणाला. आम्ही एकेक करुन आत गेलो. मध्यभागी एक मोठं डेस्क होतं,त्याखाली मोठा खोका होता. "हा आमचा संगणक, यातूनच सगळे कंट्रोल्स, डेटा अनॅलिसिस, सिग्नल प्रोसेसिंग करतो आम्ही.", त्यांचा मॉनीटर मात्र फारच छोटा होता, म्हणजे तसा बावीस इंची असेलच, पण पुठ्ठ्यापेक्षा बारिक वाटत होता. त्यावरून काही आकडे आणि काही "चित्र" वर पळत होती. "ही आमची लिपी,"मॉनिटरच्या अक्षरांकडे बोट दाखवून क्वेड म्हणाला. आणि कीबोर्डतर नव्हताच, टचस्क्रीनसारखं काहीतरी होतं. आणि त्याने त्या टचस्क्रीनवर काहीतरी दाबलं तसा कीबोर्ड दिसायला लागला. ते प्रकरण अंमळ झानटामॅटिक होतं. मला असं काही दिसेल याची अजिबात कल्पना नव्हती. आता माझा "एलियन थिअरी"वर थोडा विश्वास बसायला लागला. " या इकडे माझ्याबरोबर, या कोपर्यात आम्ही दिवाण आडवे करुन झोपतो. तीन चिंटू दिवाण यानाच्या कडेला अडकवलेले होते. "त्याचे कोन आम्हाला हवे तसे बदलून अगदी अंतराळातसुद्धा अडकवता येतात. आनि तिकडे आम्हाला ऊर्जा मिळण्याची सोय आहे, तुम्ही लोकां खाता ना तोंडानी अजूनही?" मिहीरनी प्रश्न विचारला. "म्हणजे? तुम्हाला भूक नाही लागत?", आता हे फारच चमत्कारिक होतं. "सांगतो सगळं सांगतो, पण आता विषय निघालाच आहे तर आम्हाला तुमचं अन्न बघायचंय, खायचंय, वास घ्यायचाय. आमच्या गेल्या सातशे पिढ्या होऊन गेल्या असतील, आम्हाला जेवायची गरज नाही. आम्ही शरीरात अन्न तयार करतो. आपण तुमच्या घरी जायचं? फार लांब नाही आहे ना इथून? आम्ही काल रात्री पाहिलं तुम्हाला! तुम्ही लोकं रात्र फारच जोरजोरात बोलता!"
"अच्छा, म्हणजे रात्री इथे अंधारात तुम्ही लपून छपून आमचा पाठलाग करत होतात का? आम्हाला वाटलंच काहीतरी वेगळं आहे तिकडे!", आम्हाला बोलण्याची संधी बर्याच वेळानी मिळाली. "हो, आम्हाला तुमची भाषा ऐकायची होती एकदातरी! पण आम्हाला त्या अन्नाबद्दल फारच उत्सुकता आहे. आम्ही आहोत इथे बर्याच लांबच्या मुक्कामासाठी, तेव्हा तुमच्या घरी जाऊ या का आपण?" हे परग्रहवासी आम्हा माणसांसमोर अजिबातच लाजत नव्हते. आणि का माहित नाही, कदाचित त्यांच्या बोलण्यातली आश्वासकता, चेहेर्यावरचे भाव यामुळे हे लोक आम्हाला काही त्रास देणार नाहीत असंही वाटत होतं. शिवाय आम्ही आमच्याच घरी त्यांना नेत होते, "खुद की गली में..." असल्यामुळे आम्ही त्यांना घरी न्यायला लगेचच तयार झालो. मला तेवढ्यात आठवलं मी निरुपमला कबूल केलं होतं की मी माझ्या सकाळी दहा वाजता स्काईपवर असेन. जवळजवळ दहा वाजले होतेच. त्यामुळे आम्ही बोलतबोलत घराच्या दिशेनी निघालो. रस्त्यात मिहीर आमच्याशी बोलत होता, "ते जे ग्लायडर तुम्ही पाहिलंत ते आम्ही पृथ्वीवर जवळच्या जवळ म्हणजे हजार किलोमीटरपर्यंत फिरायला वगैरे घेऊन आलो आहोत. हे यान कुठे नेणार शिवाय तुम्हा लोकांना ते पाहून भीती वाटली, आमच्यावर हल्ला चढवला तर त्या ग्लायडरमधे बसून आम्हाला जीव वाचवता येईल आणि मग पुढचं काय ते बघता येईल. पण तुम्ही लोकं तर फारच समजूतदार वाटलात. काल रात्रीपण तुम्ही लोक मोठ्याने बोलत होतात पण काही दुष्ट नाही वाटलात. आज तुमच्यापैकी कोणीतरी आम्हाला शोधेल याची आम्हाला खात्री होतीच. आम्ही बराच विचार केला आणि इथे उतरलो कारण इथे आम्हाला हा मोठा टेलिस्कोप दिसला त्यामुळे इथले लोक आम्हाला समजून घेतील असं क्वेडला वाटलं. क्वेड आमच्या मिशनचा प्रमुख आहे. पण त्याला इंग्लीश नीट येत नाही, त्याला मँडरीन येतं. तुमच्या इथे कोणी मँडरीन बोलणारं असेल तर त्याला फार आवडेल असं तो म्हणाला." "हो, आमच्याइथे डानडान म्हणून एक चीनी मुलगी आहे ना, तिची मँडरीनच मातृभाषा आहे.", माईकनी माहिती पुरवली. आता क्वेडचा चेहरा थोडा फुलला. तो आणि मिहीर कोणत्याशा भाषेत यंत्र काढून बोलले, लीला त्याला हसून मान डोलवत होती. मिहीर पुन्हा इंग्लीशमधे बोलायला लागला, "क्षमा करा, आम्ही जरा आमच्या भाषेत बोललो. क्वेडला इंग्लीश नीट बोलता येत नाही, त्यामुळे तो इंग्लीश बोलायला थोडा बिचकतोय. आता कोणी मँडरीन बोलणारं आहे म्हटल्यावर आता त्यालाही तुमच्यापैकी कुणाशी इथे राहूनच बोलता येईल याचा आनंद झालाय." एवढं बोलून होईस्तोवर आम्ही घरापर्यंत पोहोचलो होतोच. बाहेर लिसाचा आवाज ऐकू येत होता. ती स्वयंपाकघरात उभी राहून, हातवारे करत, तावातावानी कुणाशीतरी बोलत होती पण कुणाशी ते बाहेरून दिसत नाव्हती. कोणीतरी डायनिंग टेबलवर होतं एवढंच कळलं, पण कोण होती ती व्यक्ती आणि लिसा एवढी का तापली होती?
क्रमशः
प्रतिक्रिया
9 Oct 2008 - 7:18 pm | बिपिन कार्यकर्ते
हम्म्म...
आता ही लिसा कोण? पुढे काय होणार? गोष्ट झानटामॅटिकच आहे. आणि हे एलियन भलतेच मनमोकळे दिसताहेत.
बिपिन.
9 Oct 2008 - 8:45 pm | टारझन
बिपिनभौंसारखेच म्हणतो ...
लिसा .... अगं आजे ... जरा लिसा बद्दल लिही जास्त ... लिसा हे नाव अंमळ गुदगुल्या करून राहिलय :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
9 Oct 2008 - 9:09 pm | प्राजु
माझ्या कोल्हापूरमधल्या कुत्रीचे नाव लिसा आहे 8} ...झाल्या का गुदगुल्या??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Oct 2008 - 9:44 pm | टारझन
माझ्या कोल्हापूरमधल्या कुत्रीचे नाव लिसा आहे
आयला प्राजुतै .. मी का बरं तुझ्या कोल्हापुरच्या कुत्रीचा विचारकरू ? हा आता तिने पाय चाटले तर गुदगुल्या होतील हा भाग निराळा !!!
अवांतर उदाहरण :एखादी सुबक ठेंगणी हैबतराव या युवकावर फिदा असेल आणि तो आल्यावर तिला कसंसंच होत असेल .. आणि हैबत हा जर प्राजुच्याच कोल्हापुरातला बैल असेल, तरी तिला तसंच फिलींग यावं का ?
ता.क. वरिल उदाहरण केवळ दाखल्यादेखल दिलं आहे. आम्हाला लिसाची पुर्वकल्पना आतल्या गोटातुन कळाल्याने आम्हाला गंमतीने गुदगुल्या झाल्या आहेत. व्हर्चुअल क्रश नाही हे इथे नमुद करणे गरजेचं .. नाही तर उदाहरणवरून संदर्भ लावायचं पब्लिक. लिसाच्या आगमनाची प्रतिक्षा करा... गुदगुल्या मुलांना आणि मुलींनाही व्हाव्यात ..
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
9 Oct 2008 - 7:26 pm | ऋषिकेश
अंगावर एक मस्तपैकी शहारा आला.. :) भेटलीस तू एकदाची "त्या"ला..
अल वाटलं होती की त्याचं नाव आलोक ठेवशील म्हणून (प्रेषितमधला ;) )
आता तर प्रश्नच प्रश्न चोहिकडे झालंय.. उत्तरही मिळतीलच पुढील भागात..
तसे भागही पटापट येताहेत त्यामुळे मस्तच! .....लगे रहो!!!
-(आस्तिक) ऋषिकेश
9 Oct 2008 - 7:43 pm | स्वाती दिनेश
दसर्याला एलियनांचे सीमोल्लघंन झाले वाटतं..सलामी तर झाली.. पण एकदम मैत्रीखाते? आता पुढे काय काय आहे ते लिही लवकर..
स्वाती
9 Oct 2008 - 7:46 pm | शितल
आदिती
नेहमी प्रमाणेच हा भाग ही सुंदर झाला आहे.
:)
9 Oct 2008 - 7:50 pm | प्राजु
मग त्या एलियन साठी पुरणपोळीचा बेत का?? ;)
छान झालाय हा भाग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Oct 2008 - 7:52 pm | ब्रिटिश टिंग्या
एकदम झानटामाटिक बनलाय हा भाग!
पुढचा लवकर येउ देत!
(झानटामाटिक) टिंग्या ;)
अवांतर :
पण कोण होती ती व्यक्ती आणि लिसा एवढी का तापली होती?
ते तुलाच माहिती असेल ना! आम्हाला का विचारतेय ;)
9 Oct 2008 - 7:53 pm | मेघना भुस्कुटे
तुला असं नाही वाटतेय, की तुमच्यापैकी कुणालाच फारसा धक्का बिक्का नाही बसलाय, आणि तो बसायला हवा होता? कमॉन यार, आपण परग्रहवासीयांबद्दल बोलतोय नं? तुम्ही लोक तर असं वागताय, जसं काही पलीकडच्या बिल्डिंगमधले कुलकर्णीच आलेयत... जरा तरी अप्रूप असू दे यार बिचार्यांचं! :)
9 Oct 2008 - 7:55 pm | अनामिक
ह्या सगळ्यांनी 'कोई मिल गया' पाहिला होता... त्यामुळे धक्का बसला नसेल.
9 Oct 2008 - 8:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
असं वागताय, जसं काही पलीकडच्या बिल्डिंगमधले कुलकर्णीच आलेयत... जरा तरी अप्रूप असू दे यार बिचार्यांचं!
अगं ते बाजूचे कुलकर्णी आहेत असंच वाटतंय ना... ठीक आहे, पुढच्या भागात :O असा चेहेरा टाकते, खुष? आत्ता /:) आणि :W असा आहे! ;-)
9 Oct 2008 - 8:30 pm | अनामिक
तुझ्या शेजारचे कुलकर्णी बुटुकबैंगण आणि त्यांचा चेहरा आडवा दंडगोलाकार आहे का गं? (ह. घे) ...जरा जपुन ...ते कुलकर्णी पण मिपावर असायचे ;)
9 Oct 2008 - 8:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझ्या शेजारचे कुलकर्णी बुटुकबैंगण आणि त्यांचा चेहरा आडवा दंडगोलाकार आहे का गं? (ह. घे) ...जरा जपुन ...ते कुलकर्णी पण मिपावर असायचे
ते इंग्लंडमधले शेजारी असल्यामुळे ते नक्की स्मिथ असतील, कुलकर्णी नाही. त्यामुळे वाटत नाही मिपावर येतील असं!
9 Oct 2008 - 8:00 pm | अनामिक
अगदि झानटामाटिक झालाय हा भाग पण...
अनामिक
9 Oct 2008 - 9:26 pm | रेवती
:) भाग अंमळ झांटामॅटीक झालाय.
रेवती
9 Oct 2008 - 10:00 pm | आनंदयात्री
इंटरेस्टिंग आहेच .. मजा ही आली वाचायला :)
पण साय फाय पार्ट प्रेडिक्टेबल नको व्हायला ही अपेक्षा !
9 Oct 2008 - 10:15 pm | भाग्यश्री
मस्तच झालाय हा भाग!! फार आवडला..
घरी जाऊन आता काय गोंधळ घालणार सगळे अशी उत्सुकता लागली आहे!
10 Oct 2008 - 8:20 am | झकासराव
" लीला, जरा बाहेर येता का?", हे त्याचे सहकारी असणार!>>>>>
:X
दोघंजण असेच बुटुकबैंगण होते, तसेच जाडगेले आणि चेहरेपण "आपल्या"पेक्षा थोडे वेगळे भासणारे>>>>>>>> :S
एखादी झानटामॅटिक एलियनी नाही काय?? ;)
कथा एकदम झानटामॅटिक आहे. :)
(स्पेसिज मधल्या "सील"चा फॅन )
.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
10 Oct 2008 - 8:41 am | सहज
आता एलियन पृथ्वीवर आले म्हणजे काही तरी हेतु असेलच ना त्यांचा. सिक्रेट मिशन.
वाचत आहे.
स्वगत : पुढच्या भागात सिक्रेट मिशन कळावे. माय मनी इज ऑन शनि मंगळ युती कशी / कधी सुटेल व जमल्यास नाडीची पट्टी मिळते का पुढची अपाँट्मेंट. ;-)
10 Oct 2008 - 8:55 am | भिंगरि
खुप छान सुरु आहे कथा. एलियनस ना विद्रुप आणि किळसवाण दाखवल नाहि याबद्दल खुप धन्यवाद :). नेहमि मी विचार करते एलियनस अगदि किळसवाणे का असतात वेगळे म्हणजे वाइट्च का? हा ट्रेंड ब्रेक केल्याबद्दल अभिनंदन! लवकर टाक पुढचे भाग खुप उत्सुकता आहे.
10 Oct 2008 - 11:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खुप छान सुरु आहे कथा. एलियनस ना विद्रुप आणि किळसवाण दाखवल नाहि याबद्दल खुप धन्यवाद Smile. नेहमि मी विचार करते एलियनस अगदि किळसवाणे का असतात वेगळे म्हणजे वाइट्च का? हा ट्रेंड ब्रेक केल्याबद्दल अभिनंदन! लवकर टाक पुढचे भाग खुप उत्सुकता आहे.
धन्यवाद. मलाही विद्रुप एलियन्स अजिबात आवडत नाहीत. आणि ते असे बुटुकबैंगण का यावरही मी लिहेनच. आणि लवकरात लवकर पुढचे भागही टाकायचा प्रयत्न करते.
स्वगत : पुढच्या भागात सिक्रेट मिशन कळावे. माय मनी इज ऑन शनि मंगळ युती कशी / कधी सुटेल व जमल्यास नाडीची पट्टी मिळते का पुढची अपाँट्मेंट.
सहजराव, सिक्रेट मिशन वेगळं आहे. ज्या लोकांना मी आधीच ते सांगितलं आहे त्यांच्या कल्पनेच्या पलिकडचं मिशन होतं ते! आणि तुमच्या माहितीसाठी (या गोष्टीतल्या) एलियन लोकांना नाड्या, पट्ट्या, युत्या यांच्यात काहीही रस नसतो.
आणि हो कुणा "कौलारू" लोकांना इतरांची मतंही घ्यायची असतील तर घ्या, सिक्रेट मिशन बदलणार नाही पण मी पुढचा भाग टाकेपर्यंत, किंवा मिशन सांगेपर्यंत तुमचीही तेवढी करमणूक होईल, आणि कल्पनाविलास करुन घेता येतील! ;-)
शनी आणि मंगळ त्यांच्या ग्रहांवरुन कायमच एकत्र दिसणार त्यामुळे त्यांच्यासाठी युती नेहेमीचीच असणार!
(संपूर्ण विक्षिप्त) अदिती
10 Oct 2008 - 2:41 pm | टारझन
आणि हो कुणा "कौलारू" लोकांना इतरांची मतंही घ्यायची असतील तर घ्या,
=)) =)) =)) =)) मेलो
यमे .. तुझे एलियन्स जरा चांगली कामं करोत ... आणि हिमेश तसेच इतर पकाऊ मालाला घेउन जाउन देत =))
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
10 Oct 2008 - 9:08 am | ऋचा
मस्त भाग झालाय एकदम झान्टामाटीक :)
पुढचा भाग लवकर टाक....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
10 Oct 2008 - 9:48 am | विजुभाऊ
एलीयन मैत्रीपूर्ण दाखवले आहेत ते बरे झाले.
त्याना एवढ्या भाषा येत होत्या म्हणजे ते या पूर्वीही पृथ्वीवर येत जात असणार.
पण अजूनही आपण एलीयन्स ना कान नाक अडोळे हात पाय असतील असेच समजतो.
तसेच ते स्वरावर आधारीत भाषा समतात असेच समजतो
अवांतरः कल्पनेला सुद्धा मर्यादा असतात् .आपल्या ज्ञात सृष्टीच्या बाहेरचे आपण काहीच कल्पू शकत नाही
10 Oct 2008 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण अजूनही आपण एलीयन्स ना कान नाक अडोळे हात पाय असतील असेच समजतो.
तसेच ते स्वरावर आधारीत भाषा समतात असेच समजतो
अवांतरः कल्पनेला सुद्धा मर्यादा असतात् .आपल्या ज्ञात सृष्टीच्या बाहेरचे आपण काहीच कल्पू शकत नाही
इजाभौ, प्रश्नही तुम्हीच निर्माण करत आहात आणि उत्तरंही तुम्हीच देत आहात. तेव्हा मी फक्त गोष्ट लिहिते, कसं!
10 Oct 2008 - 10:25 am | वैशाली हसमनीस
अदिती,सगळे भाग वाचते आहे् .खूप सुंदर लिहीले आहेस्,वाचायला मजा येत आहे.
10 Oct 2008 - 11:12 am | अवलिया
नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन. या लेखात किंचित लेखनशैलीत बदल झाला आहे पण तो निश्चितच सुखावह आहे.
कल्पनाविश्वात नेतांना कुठेही धक्कातंत्र न वापरल्याने छातीत धडधड न होता गालावर किंचित स्मितच येत आहे. अर्थात तुमच्या मिपावरच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम न करता तुम्ही कदाचित पुढील भागात 'भौः' करुन दचकवणार नाहितच याची खात्री आज तरी मी देवु शकत नाही. असो.
पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे हे सांगायला नकोच.
अवांतर - मला भेटलात तर केवळ १ मिनिटांत आस्तिक व्हाल हे नक्की.
(परग्रहावरुन ५ कोटी ३ लाख वर्षांपुर्वी सायबेरियात उतरलेल्या मनुचा वंशज) नाना
10 Oct 2008 - 11:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> भागात 'भौः' करुन दचकवणार नाहितच याची खात्री आज तरी मी देवु शकत नाही. असो.
मलाही माहित नाही, तुम्ही कधी, कसे कुठे दचकता ते, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना धक्का एकत्रच बसेल! ;-)
>> अवांतर - मला भेटलात तर केवळ १ मिनिटांत आस्तिक व्हाल हे नक्की.
मला अलिकडेच "नास्तिक"ची नवी व्याख्या सुचली होती, किंवा मी माझ्या पद्धतीने अर्थ लावला होता, पण त्यावर पुन्हा केव्हातरी.
>> (परग्रहावरुन ५ कोटी ३ लाख वर्षांपुर्वी सायबेरियात उतरलेल्या मनुचा वंशज) नाना
)समुद्रात तयार झालेल्या एकपेशीय सजीवापासून उत्क्रांत होत गेलेल्या मनुष्यांपैकी एक) अदिती
10 Oct 2008 - 1:13 pm | बिपिन कार्यकर्ते
नाना...
अवांतर - मला भेटलात तर केवळ १ मिनिटांत आस्तिक व्हाल हे नक्की.
तैंकडे एवढा वेळ नाही. ३.१४ सेकंदात समजवू शकत असाल तर त्या भेटायची शक्यता आहे. :)
बिपिन.
10 Oct 2008 - 1:30 pm | अवलिया
३.१४ सेकंदात समजवू शकत असाल तर त्या भेटायची शक्यता आहे
अहो समजावुन द्यायला तर आम्हाला १/६ सेकंद पण पुरेसा आहे. पण चेंगटपणा अंगातला जात नाही अन १ मिनिट लागतोच ...
10 Oct 2008 - 2:18 pm | झकासराव
नंतर तुम्ही त्या एलियनला नाकेश सुरमियाची गाणी ऐकवली काय?? >:)
संदर्भ खालील चित्रांमध्ये आहे बघ.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
10 Oct 2008 - 3:33 pm | मनस्वी
काय गं.. भेटल्यावर मिहिरबरोबर गाणं गाउन नाचला नाहीत का?.. जादू जादू सारखं?
छान झालाय हा भाग पण.
मनस्वी
10 Oct 2008 - 3:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय गं.. भेटल्यावर मिहिरबरोबर गाणं गाउन नाचला नाहीत का?.. जादू जादू सारखं?
:-D
तू गाणं लिहून दे आणि नाच बसव, मग आपण सगळेच नाचू या! ;-)
10 Oct 2008 - 3:45 pm | मनस्वी
मी आणि गाणं लिहून देउ? 'इंस्टंट' गाणं कोणाकडून लिहून घे हे तुला मी सांगायला नको!
मनस्वी
10 Oct 2008 - 3:54 pm | बिपिन कार्यकर्ते
कोण बरंऽऽऽऽ?
:?
बिपिन.
10 Oct 2008 - 4:12 pm | टारझन
इंस्टंट' गाणं कोणाकडून लिहून घे
इंस्टंट गाणं कोणाकडून तरी पाडून घे ... असं हवं ..
शब्दसुधारक
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
10 Oct 2008 - 4:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शब्दसुधारक
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
ये बात कुछ हजम नही हुई! ;-)
टारू, आज फॉर्मात आहेस तू!
11 Oct 2008 - 1:02 am | धनंजय
मजा आहे!
(तुम्ही बरे त्यांच्या यानात गेलात. मोठ्यांच्या अनुभवातून शिकायचे नाही तुम्हाला - आणखी काय सांगावे... गोडगोड बोलून परग्रहप्रवासी मनुष्यांना त्यांच्या यानात नेतात, त्यांच्यावर प्रयोग करतात [सामान्य प्रयोग म्हणजे "प्रोब" करतात], आणि मगच त्यांना सोडतात. असो, पुढच्या वेळेला सावधान! ;-) )
11 Oct 2008 - 3:55 am | मृदुला
मिहीर, लीला आणि क्वेड!
एलियन्सनी भरपूर अभ्यास केलेला दिसतोय नावं ठरवायच्या आधी.