एलियनायटीसेलिया भाग २

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
14 Sep 2008 - 3:53 pm

मागील भागः एलिनायटीसेलिया भाग १

{डिस्केमर}यातले बरेचसे फोटो मी माझ्या मित्रांच्या साईट्सवरून घेतले आहेत. विचार होताच फोटो टाकायचा आणि तशी मागणीही आल्यामुळे आता माझी हिंमत वाढली आहे (पाणी घालण्याची!).{डिस्क्लेमर संपलं}

विमानतळाबाहेर आले, त्याने वर्णन केलं होता तसा एक "सांताक्लॉज" दिसला; हातात एक कागद होता, त्यावर अत्यंत गचाळ अक्षरात लिहिलं होतं Jodrell Bank Observatory. त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे, मीच पुढ्यात उभी राहिले आणि म्हटलं, "तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी."

"हो, मीच तो. मँचेस्टरमधे आणि या देशातही मी तुझं स्वागत करतो.", इयन म्हणाला. इयन हा साधारण साठीच्या पुढचा, जवळजवळ ९९% केस पांढरे झालेला, पण तरिही अतिशय उत्साही, तरुण वाटला. ट्रॉली ढकलत तो मला स्वतःच्या गाडीकडे घेऊन गेला. गाडी विमानतळाच्या बाहेर आली आणि समोर आले भव्य, रुंद, स्वच्छ, नुकत्याच एखाद सरीने धुतले गेलेले रस्ते! समोरचं जंक्शन दाखवत इयन म्हणाला, "आपण इथून आता विल्मस्लोच्या दिशेने जाऊया. इथून मँचेस्टर उत्तरेला आहे आणि आपली ऑब्झर्व्हेटरी आहे दक्षिणेला, दोन्ही साधारण १५ मैलांवर!". एकदम डोक्यात प्रकाश पडला, सायबाच्या देशात अजूनही इंपीरियल युनिट्स वापरतात, मैल, यार्ड, दगड (स्टोन, वजन मोजायला), पाईंट (pint) वगैरे. अर्थात या पाईंटची गंमत असते, फक्त दूध आणि बियर या पाईंटमधे मोजतात, बाकी पेट्रोल आणि पाण्यासाठी लिटर्स... असो. इयन पुढे सांगत होता, "तुला आधी जसं इमेलमधे सांगितलं आहे तसं तिथे जवळपास काहीही मिळत नाही. तर आपण एखाद्या वाटेवरच्या दुकानात थांबूया आणि तुला काही, दूध, फळं, वगैरे घ्यायचं असेलच!" मी हो म्हटलं, आणि आठवलं, माझ्या जुन्या काही शिक्षकांनी त्याच्यासाठी "रिगार्ड्स" पाठवले होते, ते दिल्यावर तो लगेचच "थ्यँक्स" म्हणाला. त्या दोघा शिक्षकांची चौकशी झाली. तोपर्यंत आम्ही एका दुकानासमोर थांबलो. छोटसंच दुकान होतं, आणि शुक्रवार दुपार असल्यामुळे फारशी गर्दीही नव्हती. मी दुकानात शिरले.

आतमधे गेल्यावर मात्र मी चक्रावलेच. छोट्या, कमी प्रमाणात काही नाहीच. दूध घ्यायचं तर कमीतकमी ४ पाईंट होतं, २ लिटरपेक्षा जास्त, भाज्या आधीच प्लास्टीकमधे पॅक केलेल्या, मला एकटीला एक भाजी तीनदा होईल एवढी, फळांचीपण तीच गत! "एवढं सगळं घ्यायचं आणि अर्ध्यावर टाकून द्यायचं", या विचारानी पुन्हा वाईट वाटलं. शिवाय पौंडात खर्च होणार होता ती गोष्ट निराळीच! एक लिटर दूध साधारण ८० रुपयाला. आत्तातर खिशातले रुपयेच होते, रुपयातून विकत घेतलेले पौंड म्हणजे रुपयेच ना! पण घरी एवढं काही लोकांनी सांगितलं होतं "प्रत्येक वेळी रुपये मोजू नकोस, पौंड मोज", ते आठवलं, आणि साधारण पाचेक दिवस पुरेल एवढं सामान घेतलं आणि बाहेर आले. माझ्या हातातली एकमेव पिशवी बघून इयनला आश्चर्यच वाटलं, "हे काय? तुला हे एवढंच सामान लागणार? आत्तातर तुझ्याकडे काहीच नाही आहे खायला-प्यायला." मी म्हटलं, "जसं लागेल तसं तसं आणेन आणखी नंतर." ब्रिटीश लोकांना भारतीय पद्धतीचं जेवण फार आवडतं ही माहिती तेव्हा मला नव्हती. त्यामुळे आता ही आयती आली आहे तर नवीन काहीतरी खाता येईल, शिकून घेता येईल हा त्याचा डाव माझ्या लक्षात यायला बरेच दिवस गेले. इयन म्हणाला, "ते ही बरोबरच आहे. बरं तुला पहिले घरी जायचंय का ऑब्झर्व्हेटरीत?". मला पहिले ऑब्झर्व्हेटरीत जायचं होतं, इयननी गाडी त्या दिशेला नेली. "आपल्याला तो टेलिस्कोप दिसतोय ना, तिकडे जायचंय," इयननी गाडी चालवताना एकीकडे बोट दाखवलं, आणि ते पाहून माझं तोंड उघडंच राहिलं. प्रचंड मोठा (७६ मी. व्यास) टेलिस्कोप आकाशात एका दिशेला, क्षितिजाच्याजवळ बघत होता, शेजारी एक चिंटू त्या मोठ्याकडे पहातोय की काय असं वाटत होतं आणि त्या दोन टेलिस्कोप आणि आमच्या मधे एक विस्तीर्ण शेत, त्यात टर्फ "पिकवतात" अशी तत्पर माहिती इयनने दिली.

"सध्या संध्याकाळच्या वेळेस पल्सार्स बघितले जातात, आणि तो छोटा आहे ना तो मुलांना शिकवण्यासाठी आहे. बहि:शाल विभागाचे विद्यार्थी आले आहेत आत्ता तिकडे, ते लोक नक्की क्रॅब नेब्युला बघत असणार!" इयननी माझ्या माहितीत पुन्हा एकदा भर टाकली. बोलता बोलता आम्ही आतमधे पोहोचलो. "या मुख्य इमारतीत शिरताना कोड माहित असणं गरजेचं आहे," इयननी मला कोड सांगितला. अहो आश्चर्यम्, आमचा ठाण्याच्या घरच्या फोन नंबरचे शेवटचे आकडे आणि हे चार, सारखेच, तंतोतंत! मला लगेच जॉड्रल आवडायला लागली. "संध्याकाली चार ते साडेचार सगळे लोक चहा पितात आणि सकाळी अकरा ते साडेअकराचा कॉफिब्रेक असतो. आत्ताच लोक चहा पिऊन गेले असतील, पण नील असेल अजून कदाचित टी-रुममधे! तो पेपरातलं सुडोकू सोडवत होता. आता शुक्रवारी काय तो पाचनंतर काम करणार आहे?", असं इयन म्हणतच होता आणि मला घेऊन टी-रूममधे आला. समोरच एक प्रश्न आला. "हाय, तू संहिताच ना?"

क्रमशः

व्युत्पत्तीविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 3:57 pm | भडकमकर मास्तर

वा फ़ास्ट आला पुढचा भाग..मस्त..
फोटो छान...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 4:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेच्चा! हा भाग सगळ्यांना दिसायला लागला. :? मला रिबूट करायचं होतं म्हणून मी "अप्रकाशित ठेवा"वर टिचकी मारली होती आणि मगच प्रकाशित केला होता. (तसं काही चुकीचं नाही लिहिलेलं)
ठीक आहे, आत्ता आहे वेळ तर तिसरा भाग लिहायला घेतेच.

अदिती

ऋषिकेश's picture

14 Sep 2008 - 4:28 pm | ऋषिकेश

नमस्कार गं! हा भागही भन्नाट... मात्र कथावस्तु फारशी नसल्याने फक्त रुचकर मसाला वाटला ;)
चित्र मात्र पाहून तोंड उघडंच राहिलं.. प्रेषितमधला "सायक्लॉप्स" वाचताना असं काहिसं भव्यदिव्य डोळ्यासमोर होतं

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 4:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, अरे चुकून प्रकाशित झाल्यामुळे काही टाकता आलंच नाही. लिहिते दुसरा, खरंतर तिसरा, थोड्या वेळात!

अवलिया's picture

14 Sep 2008 - 4:40 pm | अवलिया

वाचत आहे

नाना

मन's picture

14 Sep 2008 - 6:14 pm | मन

दोन्ही भाग अगदि पटापट आले की.
(काहि का कारण असेना...)
आणि आवडाले.
पु ले शु.

आपलाच,
मनोबा

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2008 - 8:48 pm | प्रभाकर पेठकर

हा भाग बराच छोट्टासा वाटला. अजून तपशील येउ दे.

पण वाचतो आहे. (उत्सुकतेने)

मेघना भुस्कुटे's picture

14 Sep 2008 - 10:02 pm | मेघना भुस्कुटे

हा भाग अगदीच छोटा झाला आणि त्यात काहीच 'घडलं' नाही. पण तुझं तांत्रिक घोटाळ्याच्म स्पष्टीकरण वाचलं, आता येऊ दे तिसरा भाग. मजा येतेय.

आनंदयात्री's picture

14 Sep 2008 - 11:34 pm | आनंदयात्री

भाग फार छोटा झालाय !!

>>नील

भारतीय का ?

(एकता कपुर कडुन बरेच शिकण्यासारखे आहे, जसे भाग संपवतांना उत्कंठा ताणले जाईल असे काहीतरी ढँग करणे ! ;) )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 9:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही रे, नील भारतीय नाही आणि अनिता पण!

"आणि तो एकता कपूर टच" हे माझ्याकडून नाही, (बॉमस्फोट आणि अभिनंदन सम्राट) नाना चेंगटांनी सुचवलं शेवट थोडा बदलायला, तिसरा भाग येईपर्यंत!

अदिती

टारझन's picture

14 Sep 2008 - 10:59 pm | टारझन

यम्मी .. मस्त चालु आहे .. पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!!
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

आनंदयात्री's picture

15 Sep 2008 - 12:45 pm | आनंदयात्री

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!!

बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!!
नीट वाचा, ८० रुपये लिटर!
बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे
महिन्याला तेवढं लागणारंच ना, जिमची पावती वगैरे विसरलास का तू?

आनंदयात्री's picture

15 Sep 2008 - 12:56 pm | आनंदयात्री

तुला नाही टार्‍याला लागते ५० लि दुध !!
तु देवची तिर्थाची वाटीत पित असशील दुध .. नाहीतर बादशाहीतल्या तुपाच्या वाटीत ;)

आनंदयात्री's picture

15 Sep 2008 - 12:47 pm | आनंदयात्री

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!!

बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 12:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दोनदोनदा लिहिलं म्हणजे खरं होत नसतं! ;-)

वरचे उत्तर वाचणे! :-D

आनंदयात्री's picture

15 Sep 2008 - 12:50 pm | आनंदयात्री

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!!

बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)

मदनबाण's picture

15 Sep 2008 - 6:25 am | मदनबाण

व्वा..छान...पुढचा भागाची वाट पाहतोय..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

जैनाचं कार्ट's picture

15 Sep 2008 - 9:35 am | जैनाचं कार्ट (not verified)

छान.. दिन्ही भाग वाचले.. मस्त वाटत आहे वाचायला.. आमचा आवडता विषय आहे हा ;)

*****
साधारण साठीच्या पुढचा, जवळजवळ ९९% केस पांढरे झालेला, पण तरिही अतिशय उत्साही, तरुण वाटला

अरे वा ! म्हणजे मी अजून एकवीस वर्ष देखील पार केली नाहीत की =))

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

भाग्यश्री's picture

15 Sep 2008 - 9:46 am | भाग्यश्री

छान.. मजा येतीय वाचायला! लवकर येऊदेत भाग!
चित्र मस्तच !! छोटा चिंटू फारच आवडला! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

विजुभाऊ's picture

15 Sep 2008 - 10:39 am | विजुभाऊ

तो एलीयन केंव्हा येनाल यमी तै
त्याला लौकल आन ना
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो कालच आणणार होते ... पण आता जरा दम धरा! तुम्हाला काय एलियन्सचर रूपक लिहायचंय का काय?

अवांतर: जरा अजून एक शिंक द्या बघू!

सुनील's picture

15 Sep 2008 - 11:28 am | सुनील

लिहिलय छान पण फार लवकर संपतोय एकेक भाग. जरा जास्त लिहा ना!

अवांतर - लिखाणही एक शष्ठांश लिहायला पाहिजे असे नाही!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 11:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> लिहिलय छान पण फार लवकर संपतोय एकेक भाग. जरा जास्त लिहा ना!
:-) धन्यवाद सुनील.
पहिला भाग प्रतिसाद कसे येतील याची कल्पना घेण्यासाठी आवरता घेतला.
आणि दुसय्राचा जरा लफ्राच झाला.
तिसरा लिहिते मोठ्ठा!

>> अवांतर - लिखाणही एक शष्ठांश लिहायला पाहिजे असे नाही!!!
=))
आणखी एक अवांतरः माझा आधीचा बॉस, इयन, माझ्या थिसीस लेखनाबद्दल हेच म्हणायचा!

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2008 - 12:28 pm | स्वाती दिनेश

तांत्रिक कारण कळले ह्या भागात विशेष काही न घडण्याचे..पण ॠषिकेश म्हणतो तसा मसाला मस्त रुचकर झाला आहे..तेव्हा भाग ३ च्या प्रतीक्षेत,
स्वाती


खरे आहे...:)
बाकी हा भाग पण छान जमला आहे,
लवकर तिसरा भाग येऊ देत....

शितल's picture

15 Sep 2008 - 6:24 pm | शितल

पहिला आणि दुसरा दोन्ही भाग वाचले
पण प्रतिक्रीया एकत्रित देत आहे.
छान लिहीले आहेस. :)
वेळ मिळेल तसा तिसरा भाग ही लिही, पण हे भाग डोक्यातुन जायच्या आधी मात्र. ;)