====================================
"सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा....
°°°°
झुडपात जाऊन तोंडाला
लय फासलाय साबण
चाललू हिरीत मुटका मारायला
तर आरची म्हणली " हु म्हागं"
- लंगडा प्रदीप
°°°°°°
केळीच्या बागा तुडवून
पाय दुखतात सारखे
आसं काय करती येड्यावणी
"घरची उठत्याल की आरचे"
- परश्या
==================================
"सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !! तुम्हाला?
•••••••••
तू
तू वर्गात
मी सर्गात
तू गैरहजर
मी नर्कात
तू हसलीस
माझा सुकाळ
तू रुसलीस
माझा दुष्काळ
माझ्या जीवनात
आता फक्त तू
फक्त तू फक्त तू..
- प्रदीप बनसोडे (कवी)
(एफ.वाय.बी.ए.)
•••••••••
मुके पैजण
एकटेपणाचे हे जीवेघेणे तट
तू आता भराभर ढासळून टाक
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी
फाटलेल्या आभाळाला
टाके घालून सांधण्यासाठी
कारण
आता मी माझ्याकडचा रस्ता
झाडून पुसून साफ केलाय
तुझ्या पायातल्या
मुक्या पैजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी !
- प्रशांत काळे
(एफ.वाय.बी.ए.)
====================================
हे झालं पहिल्या भागाविषयी! दुसरा भाग पाहूनही एक कविता मनात आली, ती खाली देतोय !
•••••••••••••••••••
आज पुन्हा हरायचंय
जीवाला सावरायचंय
दोन अश्रू ओघळले तरी
थोडं अजून जगायचंय
एका गोधडीचा संसार माझा
भुईवरच मांडायचाय
साजणाच्या संगतीत आता
धुळीतच स्वर्ग शोधायचाय
तांदूळ, डाळ, गोधडी, खाट
सोललेल्या लसणाच्या पाकळ्या
एक झाडू, भर्रर स्टो, ढेकणाचं औषध
अन बरंच काही....
बस्स,
थोडं अजून जगायचंय
- एक होती आरची
====================================
प्रतिक्रिया
11 May 2016 - 8:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला भित्तिपत्रकं आणि त्याची तिच्यापर्यन्त पोहोचण्याची आयडिया आवडली. सालं मी इतक्या कविता केल्या आमची आर्ची कधी वाचेल काय माहिती. ;)
आर्ची नुसती भेटायला बोलावती, नुसतं भेटायला बोलून काय उपयोग ? जेव्हा बघावं वाटायचं तेव्हा तुझ्या गल्लीत नुसता तुला कितीदा तरी पाहुन गेलोय. आज मी नाराज हाय आर्चे.
तुझमेँ और मुझमे फर्क है सिर्फ इतना,
तेरा कुछ कुछ हूँ मै और मेरा सब कुछ है तू
परशा बिरुटे :)
11 May 2016 - 8:36 pm | तर्राट जोकर
व्व्व्वा! ही खरी दाद.
11 May 2016 - 8:39 pm | shvinayakruti
मस्त
11 May 2016 - 8:41 pm | सायकलस्वार
तुमची काव्यांजली तर आमची श्रद्धांजली
***
एक होता गावठी पंटर
त्याला दिसली ॲम्बॅसिडर
खिडकी खोलली कारची
तर आतमंदी हुती आर्ची
झटक्यात गेला आत
दोगंबी आली रंगात
पाटील आला अंगणात
लाथ बसली .............
12 May 2016 - 8:42 am | जव्हेरगंज
खिक्क!
15 May 2016 - 6:12 pm | संजय पाटिल
ते रिकाम्या जागा भरा की राव.. यमक जुळवून!!
11 May 2016 - 9:13 pm | viraj thale
मना कल्पना धीट सैराट धांवे
11 May 2016 - 9:24 pm | रातराणी
छान आहेत!
11 May 2016 - 10:53 pm | खटपट्या
आर्ची मोड ऑन
ऐ पोराव, बस करा कवीता, गप गुमान आप्ली कामं करा,
मर्टीत सांगीतल्यालं कळत नाय, इंग्लीश मदी सांगू ??
आर्ची मोड ऑफ..
12 May 2016 - 8:41 am | जव्हेरगंज
प्रिन्स मोड ऑन करून 'काहीतरी' उत्तर द्यायची इच्छा होतेय..
पण आवरती घेतोय ;)
11 May 2016 - 10:59 pm | कानडाऊ योगेशु
सैराट...सुस्साट..मोकाट...
आवडेश जव्हेरभाऊ!
12 May 2016 - 9:44 pm | विवेकपटाईत
माझी हि एक
शिकायच्या जागी , प्रेम करायचं
सैराट पाळायच, आणि उपाशी मरायचं
12 May 2016 - 10:24 pm | जव्हेरगंज
सैराट -2
आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो
त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात
त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो
Interval
आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात
The End
( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं )
पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला
( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )
12 May 2016 - 11:28 pm | रातराणी
अर्र्र नात्यांत लग्नाला माझा विरोध आहे. कुणाला काही पडलं नाही पण तरी.. :)
- विलन रातराणी
13 May 2016 - 3:08 am | मुक्तछन्द
मामाची मुलगी चालती ना वाटत॔॓ लग्नाला ?
की तुमचा आपला वैयक्तिक विरोध आहे? :)
13 May 2016 - 4:47 pm | उडन खटोला
सैराट -2
आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो
त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात
त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो
Interval
आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात
The End
( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं )
पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला
( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )
लेखक-
वाचून झाल्यावर ताबडतोब share करा हा पण खुप कमाई करेल
15 May 2016 - 4:03 pm | जव्हेरगंज
एका मुलाखतीत नागराजने म्हटलेल्या दोन कविता खाली देत आहेत! (नागराज मंजुळे लिखित)
•••••••••
आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय
एकच स्वप्न
घेऊन जगणारे
पुढे,
त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली
•••••••••
उजाडताना मी
माझ्यावर कवितेनं धरली सावली
कुणास ठाऊक,
कशी मनात अंकुरली कविता
पृथ्वीला कशी सुचली झाडे?