प्रश्न मधमाश्या आणि मिपा मोहोळ

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
7 May 2016 - 10:07 am

अनुभव आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा

"नाही नाही ही कुठलीही प्रश्न मंजुषा नाही की सैराट बद्दल महाचर्चासाठी काढ्लेला धागा नाही. सांगतो अगदी शिस्तीने सांगतो,आधी दुसरी गोष्ट शिरस्तयाप्रमाणे सांगतो नंतर पहिली आणि शीर्षकातली गोष्ट सांगतो.

त्याचे असे झाले काल कंपनीतून घरी जाताना,मुलाला त्याचे १०वी च्या क्लासवरून घरी घेऊन जात होतो,मार्ग वल्लींचा परिसर ते मोरे नाट्यगृह मार्गे चिंचवड.मुलगा गाडीवर मागे होताच (नाही आम्ही आलटून पालटून चालवित नव्हतो माझी स्कूटी) नेमका मोरे नाट्यगृहापाशी आल्यावर मुलानेच सांगीतले."बाबा आम्बा महोस्तव दिसतोय इथे लागलेला अत्ताच बोर्ड वाचला, जाऊयात ना."

अश्या प्रसंगी आम्हाला सावध ऐक पुढलया हाका (कधी कधी सुनिल शेट्टीला हेराफेरीमध्ये धोक्याचे वेळी ऐकू येणारे अंतर्नाद) असे होऊ लागते.४-५ वर्षांपुर्वीचा महोत्सवातला कटु अनुभव आणि त्यापुर्वी २ वर्षामागे घेतलेला सुखद अनुभव यांच्या जोरावर शिल्लक शून्य ठेऊन गाडी बाजूला व्यवस्थीत (अधिकृत पार्कींगमध्ये) लावली.आणि महोत्सवाला भेट दिली.

अता आत गेल्यावर लक्ष्यात आले की हा महोत्स्व मनपाने भरविला नसून भावी-की माजी नगरसेवकाने बचत गटाचे माध्यमातून भरविला आहे , मिपावरील धाग्यांचे परंपरेनुसार फलक ही लक्ष्यवेधी होता "कोकणचा हापुस पायरी टकाटक , कशाला हवा कर्नाटक" कोकणातील आंबा उत्पादकांनी स्वतः शेतातील आंबा तुमच्यासाठी आणलाय असा. प्रत्येक विक्रीकेंद्रावर नाव फोन न आणि ठिअकाण देवगड्,रत्नागीरी ई होतेच.

मुलाने आनि मी सगळ्या विक्रीकेंद्रावर चक्कर मारली (खच्चून १०-१२) आणि इतर कुल्फीचा एक, एक मांडेबनविणार्याचा,एक कोकणातील पापड ई उत्पादनाचा,आणि इतर एक कसल्या तरी कोकम ई उत्पादनाचा,असावा.

तर काय सांगत होतो "आप्ल्याला थेट शेतकर्याकडून आंबा मिळणार चार पैसे त्याला रास्त मिळणार चार पैसे आपले वाचणार अश्या विचाराने भारावलो होतो.(बच्चमजी मारे नेहमी सांगतोस शेतकर्यांनी थेट विकला पाहिजे शहरात आणून्,मधली दलाली तरी बसणार नाही ग्राहकांच्या बोकांडी, अता कुठे गेला तुझा धर्म राधासुता तेच आमचे हलक्ट अंतर्मन)

शेवटी मजल दरमजल करीत "नानीवडेकर" नामक विक्रीकेंन्द्रावर मोर्चा वळविला.मी स्वतः अक्षयतृतीया झालयाखेराज आंबा खात नसल्याने, चवीसाठी दिलेला आंबा टवका मुलाला दिला मला वासावरून लक्ष्यात आले की हा हापुस आहे.
रुजवात करून दोन डझन आंबे घेतले.घेताना मी निवडत असताना विक्री केंद्र मालकीण बाईंनी तुम्ही फक्त सांगा मी भरते मोजतानाच पिशवीत. ते सांगून अगदी भराभर त्या बाइसाहेब स्वतःच आंबे निवडून टाकू लागल्या.त्या वेळीच एक्दोन खराब आंबे (एक अक्षरशः पुर्ण छिद्र पडलेला० त्यात घेऊ नका म्हणून मी बाजूला ठेवायला लावला.तरीही त्या बाईसाहेबांनी काहीतरी हातच्लाखी केलीच (जी मला घरी आल्यावर पिशवीतून सगळे आंबे काढून ठेवताना कळाली)

आप्ल्याकडून थेट शेती उत्पादकाला (खरेदी करून) कृतकृत्य झाल्याचा भ्रमाचा भोपळा फुटला. घरी आंबे काढताना जे मी खराब आहेत म्हणून आवर्जून बाजुला काढले होते तेच आंबे किमान २ आणि विक्रेतीनी स्वतः निवडलेले ३ असे पाच अतिषय खराब आंबे दिले होते.

मराठी बाण्याला जागून मी कपडे न बदलताच (कंपणी गणवेषावर तसाच्,उगा खयाली पुलाव पकवू नये) महोत्स्वात डेरेदाखल झालो.तिथे रीत्सर तक्रार करताच हे आंबे खराब नाहीत इथ पासून ते मी हे निवडलेच नाहीत तुम्हीच दिले असतील इथपर्यंत दावा केला गेला. मग मीही जरा आवाज चढ्विताच (आणखी दोन संभाव्य गिर्हाईके साशंक होताच) ठीक आहे नजरचुकीने झाले असेल (त्याच वेळी तुम्ही खराब निघाला तर बदलून देईन असे म्हणाला होतात याचे खणखणीत नाणे वाजविले,खोटे कशाला बोला मनात पिरा तै कश्या तावातावात मुद्दा मांडतेत तोच विचार आला ) बाईनी महत नाईलाजाने ते आंबे बदलून दिले आणि आम्ही संमिश्र भावनेने घरी आलो.

अता याणंतर शीर्षक विषयः
१.आम्ही हा अनुभव लिहिल्यानंअतर "अच्च झालं तर " या कुजकट प्रश्नाच्या भीतीपोटी मिपावर टाकण्यात चूक केली काय?
२.आंबे देताना फसवणूक झाली (खराब फळे शिताफीने गळ्यात मारली० )म्हणून तिथे गुमान बसून, इथे मिपावर आपल्यावर झालेल्या अन्याय्याबाबत मिपाकराने जागरूक राहायला पाहिजे असे बाणेदार प्रतिसाद टंकन्धन्यता मानायला पाहिजे होती काय?
३.आंबे बदलण्याची क्रुती योग्य की अयोग्य (वरील संदर्भासकट)
४.मी अनुभव लिहिल्याने समस्त कोकणवासीयांच्या अस्मिता दुखाव्लया जाऊ शकतील काय?
५.मिपावरील कोकण वासीय त्याबद्दल माझ्यावर नाराज्/रुष्ठ होतील काय?
६.जे मिपाकर कोकणवासी नाहीत पण आंबा प्रेमी आहेत त्यांना नक्की काय वाटेल.
७.जे मिपाकर आंबा उत्पादकही आहेत आणि थेट विक्री करणारे आहेत त्याना याबाबत काय वाटेल.
८.तेही हा प्र्शन अनुत्तराने बाजूल टाकतील काय?
९.कोकणी मिपाकरांनी निषेढ मोर्चा काढला तर चिमण नक्की कुठल्या बाजूला असेल मोर्च्याच्या का माझ्या?
१०.हाच अनुभव जर मिपाकरांपैकी सर्व श्री रा रा पिरा तै,संक्षी,डांगे अण्णा,पुरोहित साहेब्,आणि संस्कृती रक्षक काका यांना आला असता तर काय झाले असते.
११. तुमच्या चार रुपड्यांसाठी इथे धागा का टाकला अश्या शेर्यांच्या भीतीपोटी मी या विषयाची भ्रूणहत्या करायची होती काय?
१२.वेगवेगळ्या आंबामहोत्स्वातील अनुभव निर्पेक्षपणे कुणी टंकेल काय?

तूर्त दोन आम्ब्यास एक प्रश्न या वेगाने प्र्श्न मधमाश्या डसतायत ,आणी या एक दोन दिवसात मनोबाला भेटणार आहेच तेव्हा प्र्शन्संख्येत वाढ होऊ शकते (अजून बारा शिल्लक आहेत्),ते वेळेप्र्संगी धागा प्रतिसादात टाकीन्च.धागा तेवत ठेवण्याचा हुकुमी उपाय कम बेगमी म्हणून त्याकडे पाहू नये असे नाही.

आप्लाच समयोपरान्त भीड बाळगणारा ग्राहक नाखु

मुक्तकसमाजजीवनमानअर्थव्यवहारशिक्षणअनुभवमत

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

7 May 2016 - 11:06 am | उगा काहितरीच

बाकी सगळं सोडा... आंबे आहेत का संपले ते सांगा .

सुखी's picture

7 May 2016 - 11:21 am | सुखी

नाखु काका, पुण्यामधे खात्रीशीर आंबे हवे असतील तर,
१. डामरी आंबेवाले (देवगड हापुस व पायरी)
२. शिवमोहन आंबेवाले (रत्नांगिरी हापुस व पायरी)

थेट कोकणातुन आंबे येतात आणि नैसर्गिक रित्या पिकवले जातात.
दुकानाची जागा व संपर्क क्रमांका साठी व्यनी करा.

ही जाहिरात नाही, मी स्वता: त्याच्याकडुन खरेदी करतो. चांगला अनुभव आलाय म्हणुन शेअर करतोय.

महासंग्राम's picture

7 May 2016 - 11:27 am | महासंग्राम

पत्ता द्या कि

संजय पाटिल's picture

7 May 2016 - 12:09 pm | संजय पाटिल

इथेच टाकाकी... सगळ्यांना फायदा होइल.

सुखी साहेब, पत्ता द्या आणि इतरांनाही सुखी करा.

सुखी's picture

8 May 2016 - 9:14 am | सुखी

१. डामरी आंबेवाले (देवगड हापुस व पायरी)
टिळक स्मारक मंदीर,
टिळक रोड च्या समोर व्हाईट हाउस म्हणुन बिल्डींग आहे तिथेच.
९४२०१३९९२७

२. शिवमोहन आंबेवाले (रत्नांगिरी हापुस व पायरी)
स्रुष्टी सोसाईटी, कोथरुड पुणे.
९८५०९५६६८१

प्रचेतस's picture

7 May 2016 - 12:23 pm | प्रचेतस

तुम्ही तुमच्या नेहमीच्या आंबेवाल्याकडून आंबे घ्यायचे सोडून तिकडे गेलातच का?
नाखुनअंकल, तुम्हारा चुक्याच.

नाखु's picture

7 May 2016 - 12:28 pm | नाखु

शेती उत्पादकाचा अणभव विकत घ्यायची ईच्छा दुसरे काय?

पुढील आंबे नेहमीच्या आंबेवाल्याकडून...

अति. अवाम्तर : मनोबा कुठे आहे पुढची प्र्श्नपत्रीका तयार करायची आहे

नाखुनअंकल, तुम्हारा चुक्याच

होय मान्य आहे.

अंगठे धरलेला नाखु

प्रचेतस's picture

7 May 2016 - 12:31 pm | प्रचेतस

मणोबा घरी असेल कामे करत.
बाकी कालच दापोलीच्या मित्राच्या बागेतल्या आंब्यांची पेटी घरी आणली. ५ डझन १५०० रु. :)

नाखु's picture

7 May 2016 - 12:33 pm | नाखु

करा आणि सूदुर पुर्व+उत्तर दिशेस २ थेंब नक्की टाका?

हिरवे-पारवे कंपनी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2016 - 12:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखुन काका "आम" आदमी पक्षाचे सदश्य आहेत म्हणे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2016 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

फसवणूक झाल्याने आम्(बूस) झालेला नाखूसाहेबांचा चेहरा ड्वॉळ्यास्मोर आला :) ;)

दापोलीचा पत्ता जि रत्नागिरी असला तरी रत्नांग्रीची चव येत नाही.बाकी तीनशे रु डझन भाव चांगला आहे.

पिलीयन रायडर's picture

7 May 2016 - 2:15 pm | पिलीयन रायडर

मी तुमच्याजागी असते तर.. "सैराट आवडला नाही.. गाणी तर भिकार आहेत अगदी.." असं ती आंबेवाली बाई म्हणत होती बुवा.. असं तजोंना जाऊन सांगितलं असतं.. आख्खा स्टॉल तुमच्यानावे करुन त्या बाई संन्यास घ्यायला गेल्या असत्या!!

ह.घ्या हो तजो!!

प्रचेतस's picture

7 May 2016 - 2:18 pm | प्रचेतस

पिक्चर पाहिला नाही म्हणून त्याबद्दल मत नाही पण गाणी ऐकलीत आणि ती भिकार आहेत असे मी देखील म्हणतो.

बाकी आंब्याच्या धाग्यावर पण सैराट आलंच असं म्हणून मी अता नाखुकाकांच्या हाती बॅटन देतो.

नीलमोहर's picture

7 May 2016 - 2:27 pm | नीलमोहर

चित्रपटाचे माहित नाही, पण गाणी सुरेख, श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहेत की, तुम्हास गोग्गोड प्रेमगीते आवडत नाहीत का?

प्रचेतस's picture

7 May 2016 - 2:38 pm | प्रचेतस

आम्हाला मुळात अगदी ठराविक सोडून (उदा, गीतरामायण, राज कपूरचा सुवर्णकाळ वगळता) गाणीच आवडत नाहीत. त्यात सैराटमधली खरंच डोक्याला ताप देणारी वाटली.

तुम्ही त्यांना असेही म्हणू शकला असता की पैसे घेतांना व्यवस्थित मोजून घेता ना, एक-दोन नोटा कुणी खराब, फाटलेल्या दिल्या तर गुपचूप घेतले असते का, मग आम्हीही रीतसर भावाने पैसे देऊन वस्तू घेतो त्यातही खराब का म्हणून घ्यावी ?

कालच केक घेतले होते, त्यांना चक्क बुरशी लागली होती, मग फक्त वीस रूपये किंमतीचे केकही बदलून घेतले (अर्थात बदलून दुसरी वस्तू घेतली, केक नको म्हटलं आता :)

धनंजय माने's picture

7 May 2016 - 3:08 pm | धनंजय माने

धागा उगाच पाल्हाळीक वाटला. टी आर पी मिळवण्याची क्षीण धडपड.

भंकस बाबा's picture

7 May 2016 - 3:58 pm | भंकस बाबा

एक मोलाचा सल्ला देतो. देवगड़ हापुस म्हणुन मार्च एप्रिल मधे कोणी पुण्यामुंबईत आंबा विकत असेल तर 99% त्याच्याकडे संशयाने बघा. ह्या वेळेला हां सर्व आंबा मध्यपूर्वेला जातो. तुमच्या गळ्यात चिपळूण, रत्नागिरिचा हापुस मारला जातो. रत्नागिरीवाले सहमत नाही होणार कदाचित् पण जो जगप्रसिद्ध देवगड़ हापुस आहे तो फ़क्त आणि फ़क्त देवगड़मधे कातळावर उगवलेला असतो. ह्या असली आंब्याची चव जो चाखेल तो पुन्हा दुसऱ्या आंब्याकडे सहसा बघत नाही.
तुम्ही एखादा खात्रीचा माणूस पकड़ा, थोड़े पैसे जास्त जातील पण अमृततुल्य चव मिळेल.

आपला मिपाकर काव्यसम्राट श्री श्री श्री लिलाध्राला सांगून बघा.तो कोकणातून खात्रीचे आंबे घरपोच देण्याची व्यवस्था करुन देतो.पण चार डझन घ्यावे लागतात.मला तितके नको असल्याने घेता घेता राहिले परवा :(

कॉलिंग लीलाधर! त्वरेने हजर व्हावे!

कानडाऊ योगेशु's picture

8 May 2016 - 12:02 am | कानडाऊ योगेशु

इथे बेंगलोरमध्ये ही हातगाड्यावरच्या फळविक्रेत्यांकडुन असा अनुभव आला होता.त्यामुळे आजकाल मॉलमधुनच फळे वगैरे आणतो भले चार पैसे जास्त जातात पण प्रत्येक फळ निवडुन तर घेता येते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 May 2016 - 9:48 am | कैलासवासी सोन्याबापु

मुळात मला हापुसच ओवररेटेड वाटतो प्रकार वैयक्तिक दृष्ट्या, नो ऑफेंस टु एनी वन एंड एस्पेशली टु नाखु काका. अव्वाच्या सव्वा भाव देऊन खाण्यालायक हापुस मधे काही आहे असे मला तरी वाटत नाही. चवी आपण निपजलो वाढलो त्या जागेच्या भुगोल अन ऋतुमानाप्रमाणे डेवलप होतात त्यामुळे कोणाला हापुस उत्तम वाटू शकतो कोणाला ओवररेटेड.

ही माझी वैयक्तिक मते आहेत अन नाखु काका तुमचे नाव अन धागा पाहून हक्काने मांडलेली आहेत, धन्यवाद.

भक्त प्रल्हाद's picture

8 May 2016 - 10:09 am | भक्त प्रल्हाद

अहो शेवटी आवड आपली आपली.
कुनाला प्राजु आवडेल तर कुनाला आर्ची...

प्रचेतस's picture

8 May 2016 - 10:32 am | प्रचेतस

प्राजु कोण?

सतिश गावडे's picture

8 May 2016 - 7:11 pm | सतिश गावडे

asdf

हे पहा दगडू आणि प्राजु.

मृत्युन्जय's picture

17 May 2016 - 4:25 pm | मृत्युन्जय

मुळात मला हापुसच ओवररेटेड वाटतो

साष्टांग नमस्कार घ्यावा. असहमती. तीव्र असहमती. अगदीच तीव्र असहमती. :)

भक्त प्रल्हाद's picture

8 May 2016 - 10:00 am | भक्त प्रल्हाद

देवगड हापुस ऑनलाईन पण मिलतो.
मी मागच्या ३ वर्शापसुन इथुनच आंबे घेत आहे.
http://devgadhapoos.com/index.php?route=common/home/

आनन्दा's picture

8 May 2016 - 10:29 am | आनन्दा

माझी झैरात करू का?
www.shreemango.com
जरा डिलिव्हरीला उशीर होतो, पण मी वाकडला माझे सेंटर सुरू केले आहे.

भक्त प्रल्हाद's picture

8 May 2016 - 11:03 am | भक्त प्रल्हाद

praju mhanjech shirodakar...

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 May 2016 - 12:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

ही आंबे विकणारे लोक विशेषत: अस्सल रत्नागिरी वैगेरे म्हणत गळ्यात पडणारे लोक लैच डोक्यात जातात. एकतर कुत्र्याच्या छत्री सारखे ते अचानक उगवतात आणि ते लोक स्वत:ला लैच ग्रेट सेल्समन आणि घेणार्याला बावळट समजतात.

असल्या लोकांना टाळण्यासाठी आंबा मोहोत्सव सारख्या ठिकाणी अजिबात जाऊ नये. त्या पेक्षा आपला जो नेहमीचा फळवला असेल त्याच्या कडुनच मुकाट पणे आंबे घ्यावे.

पैजारबुवा,

ही आंबे विकणारे लोक विशेषत: अस्सल रत्नागिरी वैगेरे म्हणत गळ्यात पडणारे लोक लैच डोक्यात जातात. एकतर कुत्र्याच्या छत्री सारखे ते अचानक उगवतात आणि ते लोक स्वत:ला लैच ग्रेट सेल्समन आणि घेणार्याला बावळट समजतात.

यातला एक उपप्रकार म्हणजे आंब्याचा सीझनल बिजनेस करणारे ओळखीतले काका/काकू.

अभ्या..'s picture

8 May 2016 - 6:43 pm | अभ्या..

नाखुन्स आमच्या इथल्या महोत्सवात कार्बाइडच्या पुड्या ठेवलेल्या आंब्याच्या पेट्या सापडल्या. त्याचे फोटो पण आले पेपरात. रीतसर चौकशीअंती काहीच नाही असे निष्पन्न पण झाले.
लहानपणी तोतापुरी कापून खायला आवडायचा पण सध्या आप्ल्याला कुठ्लाच आंबा आवडत नाही, हापूस म्हणून एकदा खाल्ला एकाकडे तेंव्हापासून जी तिडीक बसलीय बास्स. चुकुन माकून कधी स्लाइस पिईन तेवढेच.

जव्हेरगंज's picture

8 May 2016 - 7:07 pm | जव्हेरगंज

पेटेक्स लेख!
लै आवाडला !!

तुमच्या 'अजब' विडंबणांपेक्षा (जी कायम डोक्यावरुन जातात) हा लेख किमान समजला तरी! मस्त मिश्किली !!

आंबे ही पिकणारी गोष्ट आहे! असो!

टवाळ कार्टा's picture

8 May 2016 - 8:30 pm | टवाळ कार्टा

म्हणून आंबे नेहमी स्वतः हातात घेउन पसंत पडले तरच घ्यावे

जव्हेरगंज's picture

8 May 2016 - 8:32 pm | जव्हेरगंज

जमल्यास चाखून पण बघावेत

टवाळ कार्टा's picture

8 May 2016 - 8:36 pm | टवाळ कार्टा

अश्याने कधीकधी खराब माल गळ्यात पडू शकतो

सतिश गावडे's picture

8 May 2016 - 8:37 pm | सतिश गावडे

चाखण्यासाठी कापलेल्या आंब्याची चव नेहमीच गोड असते. आपण विकत घेतलेले आंबे आंबट निघतात. :)

मी-सौरभ's picture

17 May 2016 - 1:54 pm | मी-सौरभ

ज्याचे त्याचे नशीब,
हो की नाही रे टका.

आज अक्षय तृतीया चा आंबे खाऊन हा लेख वाचल्याचा प्रतिसाद देतो..

बाकी मोहळात दगड...

सुबोध खरे's picture

9 May 2016 - 10:20 am | सुबोध खरे

आंबे घेण्याची माझी पद्धत निराळी आहे.
मी जवळच्या विक्रेत्याकडून आंबे घेतो. तीन वर्षापूर्वी मोसमाच्या सुरुवातीला एका फळवाल्याकडे गेलो आणी त्याला सांगितले मी भाव करणार नाही पण माल खराब निघाला तर परत तुझ्या दुकानात पाऊल ठेवणार नाही. पहिल्या वर्षी त्याने उत्तम फळे दिली यानंतर पुढच्या वर्षी आणी या वर्षी तो स्वतः मला शोधत आला. साधारण बाजारात भाव करून मी पाहतो म्हणजे हा माणूस आपल्याला फसवत नाही हे समजून येते.
मला ५० रुपये डझनाला महाग मिळाले तरी चालतात परंतु फळ नेहमीच उत्कृष्ट असते हा माझा ३ वर्षाचा अनुभव आहे. यंदा पहिलाच आंबा खराब निघाला त्याने काही न बोलता दुसरा आंबा दिला यानंतर एकही फळ खराब निघालेले नाही. गेली तीन वर्षे मी सर्वात उत्तम फळ असलेले आंबे खात आलो आहे तेही जवळजवळ बाजार भावालाच.हाच ग्राहक आपल्याकडे परत परत येईल या विश्वासाची हि किंमत आहे.
तुम्ही फळ्वाल्याकडे पन्नास रुपयांनी भाव पाडून मागितला कि एखादा तरी आंबा हमखास खराब निघतो( तेवढी हातचलाखी त्यांनी शिकलेली असतेच). आंबा उत्सवातील माझा अनुभव अतिशय वाईट निघाला तेंव्हा आता तेथे जाणे नाही.
यातील एक "गणित" पण असे आहे
३ इंच व्यासाचा आंबा ३०० रूपये डझन
४ इंच व्यासाचा ४०० रुपये डझन आणि
५ इंच व्यासाचा ५०० रुपये डझन भावाने घेतला तर
प्रत्यक्षात मिळणार्या रसाचे गुणोत्तर २२ : ५० : १०१. ५ असे पडते
म्हणजे ६६% किमत जास्त मोजून तुम्हाला पाचपट जास्त गर/रस मिळतो.
यास्तव मी नेहमी ३०० रुपये डझनांनी आंबे घेण्यापेक्षा त्याच तीनशे रुपयात येणारे ७ आंबे ( पाचशे रुपये डझन वाले) घेईन पण मला त्यात रस अडीचपट जास्त मिळेल.
गणितज्ञानी हिशेब करून पाहावा.

आनन्दा's picture

9 May 2016 - 1:17 pm | आनन्दा

बाकी नाखुकाका,
ते नाव "वानिवडेकर" आहे. मी काल जाऊन बघून आलो. माझी बायको तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे
ह. घ्या,

अवांतर, या निमित्ताने आंब्याची इरसाल गिर्‍हाईके, या विषयावर एक जिलबी पाडावी म्हणतो. बघू जमते का ते.

नाखु's picture

9 May 2016 - 1:51 pm | नाखु

दोन्ही...ला सहमत.

अब्रुखोबरे नाखुस

नाखु's picture

16 May 2016 - 9:50 am | नाखु

प्रतिसादकर्त्यांचे आणि सुजाण वाचकांचे धन्यवाद.

कंपनीतील एक स्नेही गेली ५-६ वर्षे थेट खात्रीशीर देवगड हापुस कंपनीत आणून विकत आहे त्याचे कडून्च घेतला. आणि र्सा स्वाद करताना मुलांच्या चेहर्यावरील अतीव आनंद-तृप्ती पाहून आधिच्या फसवणुक-बोच-पताकातून मुक्त झालो.

वरील खरेदी ही त्याच मित्राने यावेळेला बराच उशीरा आंबे येतील असे सांगीतले, अक्षयतृतीयेला दुसरीकडून घ्या असे सांगीतले आणि आम्र महोत्स्वाचा अनुभव गाठीशी असाव म्हणून घेत्ला. (पुन्हा कधी घेईल असे कधी वाटत नाही)

आंबा महोत्स्वातील लोकांना आपण केलेल्या फसवणुकीने आपलेच नुकसान करून घेत आहे असे कधी वाटत नाही काय?

पुन्हा धन्य्वाद नाखु

चौकटराजा's picture

17 May 2016 - 3:26 pm | चौकटराजा

बाकी आपला जल्मच रत्नांग्रीचा . त्या आम्ब्याचे आम्हाला काय कवतिक ? पण जिथे कुठे र्थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री असते तिथे एक तरी वस्तू मंडईपेक्षा स्वस्त असते का....... ? एक तर शेतकरी व्यापार्‍या इतकाच लबाड आहे किंवा
अशी स्किम जिथे असेल ते शेतकरी नव्हे व्यापारीच असतात.. मग आंबा असो की मेथी फणस असो की कांदा.