पुराणासाठी वांगी

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
19 Apr 2015 - 9:19 am

जोशी सायेबांनी 'भरीता'ची आठवण करून दिली म्हणुन थोडे वांगे आणून देतो. करा काय करायचं ते, चीमायभईन...

१. आपली चिंचोके, कवळ्या, काचेचे तुकडे, क्रिकेटरचे फटूवाले कूपन ठेवायची जागा अपोजिट पार्टीला सांगतो म्हणून रावणाने बिबिषणाला ल्हानपणीच पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला होता पण ऐनवेळी आई आल्याने तो वाचला आणि पुढे हा मेला. कुंबकरनाने लय बोर्नव्हीटा एकदम पेली. तर तो एकदम म्होटा झाला. एकदम लय भूक लागली, एकदम जेवला, एकदम लय झोप आली. येकदम झोपला का उटाचं नाव नाय म्हाराज्या. डायरेक दुपारच्या टायमाले भाऊ हिडो गेम खेलते बगून उटून बसला. अन मी बी खेल्तो म्हनून मांगं लागला. पन अपोजिट पार्टीनं लवकर त्याचा गेम केला.

२. कृष्णाने अयोद्धेस सर्वप्रथम राममंदीर बांधले पण बाबर ला तेचे डिजाइन न आवडल्याने त्याची मर्जी पुरी केली. मर्जीचा अपभ्रंश बॅटमॅन यांच्या मते मर्जीत > मलजीत > मज्जीत > म्हशीत > मशीद असा झाला. वल्लींकडे मशीदीच्या भिंतीवर म्हशी शरयुच्या पाण्यात डुंबत असल्याच्या शिल्पाचा फटू हाये. त्यावरून शिद्ध होते की तिकडे कसल्यातरी भिंती होत्या.

३. सीतेचं बगून उर्मिलापन लक्ष्मणाला म्हणाली, 'मी बी येते तुमच्यासंगं हनिमूनला', ह्यावर लक्ष्मण म्हणाला, 'प्रिये, तु आई-बाबांची काळजी घे अन उपवास कर. आपल्याकडं पैकं नाय सद्या.' यावर क्रूद्द हून भरत आजोंबांकडे निघून गेला. शत्रूघ्न नंतर खासदार होऊन कुणीच खास नसलेल्या राजवाड्यात खामोश-खामोश करत हिंडत होता. त्याला खानसाम्याने खामोश हे व्यंजन बनवून दिले नव्हते. बंगाली साँदेस सारखे खामोश हे एक उंगाली पदार्थ आहे जो तोंडाजवळ नेताबरोबर त्याचा स्वाद खमंग येतो.

४. भगिरथाला खूप तहान लागल्याने त्याच्या गुरुने त्याला कमंडलूतलं गंगेचं प्रीझर्व्ड वॉटर दिलं. त्याला ते भारी आवडलं. त्याने आयडियाने गंगा धरतीवर आणून स्प्रींग वॉटर कंपनी सुरू करायची असे ठरवले. त्यासाठी देवाकडं 'पीतरास मोक्षप्राप्ती व्हईना म्हनुनशान वाईच गंगा हिकळं पाटवा मंजे कसं...' असा सांगावा धाडला. त्याच्या कपटाला भुलून देवलोकीची गंगा पुरुथवीतलावर अवतीर्न झाली. त्याच्या आदीच मंत्र्याला धंद्यात परसेंटेज देऊन शंकराने तीला आपल्या बॉटलींग प्लान्ट मधे आणून हिमालयन स्प्रींग वॉटर विकायला सुरुवात केली. पन शेवटी गंगेला धरतीवर आनायची कल्पक उद्योजकता भगिरथाने दाखवल्याबद्दल गंगेचे नाव भगिरथी करून तीला सन्मानित करण्यात आले.

५. गाईचं लेकरू आपल्या पोराच्या रथाखाली मेलं म्हणून आपलं पोरगं गायीच्या रथाखाली मारलं पाहिजे असं येका न्यावप्रीय व गायीला माता माननार्‍या राजास्नी वाटलं. म्हणून त्यानं कसायाकडे चाललेल्या गाईंनी भरलेला रथ पोराच्या अंगावरून जाऊ देल्ला ना बाप्पा. मनून मंतेत की गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू आलं तर आपल्याले तक्लीप होते की नाई. तो गायीचा रथ कुठे गेला हे तो विचारायचं विसरला.

६. आपल्या बापाने फॅमिली प्लाणींग केले असते तर आपल्याला हे एवढं मोठं राज्य आपल्या भावड्यांसाठी राखून ठेवायला इतकं युद्ध करावं लागलं नसतं असं दुर्योधनाने म्हटल्याचं दुर्योधन बत्तीशी या ग्रंथात भीमाने लिहून ठेवले. त्याकाळात लोकसंक्या कंट्रोल करायला युद्ध हाच एकमेव मार्ग आहे असे युधिष्टीरानी सांगीतल्याचं संजय गांधी यांनी धृतराष्ट्राला सांगीतले. आपल्याच गावात येवडी लोकसंक्या असतांना आपल्या भावाने भायेरची पोरगी बायकू म्हनून आनलीच कशी, त्याला आपल्याकडं बाय्कू भेटली नसती काय या गहन विचारात असतांना पुष्पकविमानाचे कंट्रोल्स सुटून त्यांचा त्या अपघातात मृत्यु झाला. गविंच्या म्हणण्यानुसार त्यांचे पुष्पकविमानाचे मागचे पंख अचानक बिघाड झाल्याने इंडीकेटर तुटल्यासारखे लटकत होते. तेवढ्यात पायलटची मनस्थिती ठीक नसल्याने गतिज उर्जा कमी पडून विमान क्षितीजाला समांतर र्‍हाण्याऐवजी जमीनीच्या हिरव्या भागाकडे रोख करून वेगात जात होते. अचानक हवेतच स्फोट होवून आकाशात भगवा प्रकाश पसरला आणि विरून गेला. जमिनीवरची हिरवळ वाचली आणि फोफावली.

७. शंकराचे तिसरे नेत्र हा अक्चुअलमदी सीसीटीवी कॅमेरा असुन आपले हिडो काडून इंद्रीयनेत्र नावाच्या राक्षसाच्या धमन्यांत भरतो. त्यात आपले चांगले फोटू येत नाय म्हणून पारबतीने अग्नीकुंडात उळी मारली. तीला होमातून काळून शंकर लयी गाव हिंडला. ज्याच्या त्याच्या डोक्याले लयी ताण देव लागला. पुळे त्याला लोक 'लय ताण देव राहिला बे' असं बोलू लागले. त्याचा अक्ख्या पंचक्रोषीत नुसता ताण्डव करतो म्हणून नाव खराब झाला. तो इंद्रीयनेत्र आज भयंकर वाड्ला असून अर्द्या पब्लीकले त्यानं बंदी बनोलं हाय. तो मोहीनी अवतार घेऊन माधुरी धकधकशीत आली, पन तेजाबायला, काहीच झाला नाय.

८. कुंतीचे पाचही पुत्र आपल्याला कुरूंसारखा वारसा नाही म्हणून सारखे तळमळत असत. मग त्यांनी धृतराष्ट्राचा दगडाचा पुतळा बनवला आणि त्येची पुजा करू लागले. तो आपलाच पुर्वज आहे म्हनून सांगू लागले. हे बगून कौरव खवळले. ते म्हनले आम्ही हे राज्य बनवन्यासाठी खूप मेहनत घेतली यावर तुमचा काय हक्क. ते पांडव म्हनायले की आता लोकशाई हाय बाबू, लोक शाई लावून तुमाले घरी पाटोतेत की नायी बग. पन शेवटी विजय लढायीच्या मैदानावरच झाला पाहिजे असं ठरलं, नाहीतर ते कृष्णबाबा आपली मन की बात कुठं सांगतील? इसीलिये मित्रों, मैं केहता हुं की ते अठरा अध्याय सांगन्यासाठीचा माहौल म्हणून ते चाळीस लाख मतदार जमा केले आन मारले. ते प्रवचनानेच मेले म्हनतात. कारण त्या प्रवचनात पाशुपातास्त्र, नारायणास्त्र वैगेरे अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा उल्लेख गिरीधराने केला. ते सर्व खरेच आहे असे वाटून भीतीन गारठून मेले मंतेत लोक.

९. एका धोब्याची बायको प्रियकराबरोबर पळून गेली. मग परत आली. तर तो तीला घरात घेईना. लोक बोल्ले, 'अबे असा काऊन करतं?' तर त्याने म्हटलं 'रामानं घेतली सीतेले घरात म्हणून मी पण घेऊ काय?' तर लोक विचारते झाले 'अरे पन हा राम कोन होय? त्यानं सीतेले काऊन घरात घेतलं?' तेव्हा पासून लोक विचारतात, की 'रामाची सीता कोन?" त्याचं उत्तर देता देता २४,००० श्लोकांचं एक ग्रंत झाला पन थे रामाची सीता कोन व्हय ते काय पत्ता लागत नायीय्ये बॉ. आता तर लोकं धोब्यालेच रामाची कता सांगतेत अन म्हणते बायको गेली तर एकांदं माकळ पाय कुटं भेटते काय ते. त्या धोब्याले गाडवाचा उपेग म्हाईत, हे माकळाचं बायकोशी काय संमंद ते काय त्याच्या डोक्यात घुसंना. त्याचा अर्थ समजून घ्यायाले तो किर्तनात बसू लागला. अन मग लोक अहिल्या प्रकरणावर तावातावाने चर्चा करु लागले. ते माकळाचा प्रश्न इचाराव काय किर्तनकार महाराजले असं म्हणून तो महाराजाकडं गेला. महारज म्हणले, "डाव्या अंगठयाचा ठसा दे, नाडीभविष्य बघून सांगतो."

या नऊही पदार्थांना निट कुटून शिजवून गरम गरमच संस्कृतीच्या वाटीत वाढा आणि चघळून संपेपर्यंत चर्चेचा चमचा ढवळत राहा. तो आमचा मसाला घालू नका. चव बिघडेल. शाकाहारी लोकांनी अंडं घालून करू नये. इतरांनी घातलीत तेवढी पुरे.

पाकक्रियाप्रकटनमाहितीसंदर्भचौकशीवादविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 9:31 am | श्रीरंग_जोशी

निर्वाण पावलो आहे.
__/\__ __/\__ __/\__ वंदन.

इचिभैन या जोशी सायेबांच्या तर वांग्यात बियाच पडो हजारो...

सुबोध खरे's picture

19 Apr 2015 - 9:34 am | सुबोध खरे

वान्ग किडक निघाल नैका

विवेकपटाईत's picture

19 Apr 2015 - 9:50 am | विवेकपटाईत

पुराण्यातल्या वांग्यानी शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही. वांग्मय शेतीतून वांगे विकत घ्यावे. आजकाल राजकुमार शेतकरी बनले आहे.

पॉइंट ब्लँक's picture

19 Apr 2015 - 9:54 am | पॉइंट ब्लँक

एवढं वांग खावून वाचकांचा कुंभकर्ण हुनार ! :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2015 - 2:07 am | अत्रुप्त आत्मा

अत्यंत खत्तरनाक लिवलसा हो ! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif काहिकाहि ठिकाणी तर,वारंवार वारलो..वाचता वाचता. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

http://www.freesmileys.org/smileys/smiley-matrix/matrix-smiley-013.gif

ग्रेटथिंकर's picture

19 Apr 2015 - 11:41 am | ग्रेटथिंकर

पुराणातील वांगी हा शब्दप्रयोग चुकिचा आहे .वानगी ,असा तो शब्द आहे. वानगी म्हंणजे उदाहरण.

हा हा हा, सहीच ओ! खतरा पञ्चेस जमलेत एकेक. वेल्कम टु विडंबक क्लब!

पैसा's picture

19 Apr 2015 - 2:37 pm | पैसा

=)) =)) =))

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 6:16 pm | श्रीरंग_जोशी

दोडका किसून टाकला असेल.

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2015 - 6:57 pm | टवाळ कार्टा

दोडक्याला किसतात? मज्जाय बुआ ;)

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 7:30 pm | श्रीरंग_जोशी

किस बाई किस, दोडका किस...

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2015 - 9:12 pm | अत्रुप्त आत्मा

पुराणातले माझे सर्वात आवडते वांङगमय! http://www.freesmileys.org/smileys/smiley-matrix/matrix-smiley-007.gif

https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xfp1/v/t1.0-9/11009995_809442445808710_2957924231043725732_n.jpg?oh=df53eff6319b8b0458ec3c9740b037c8&oe=55DE39A0&__gda__=1440851241_0382d783db28498a714e8a325e826a5c

विवेकपटाईत's picture

20 Apr 2015 - 8:06 pm | विवेकपटाईत

या फोटोतले वांगे पाहून दोन बाबी लक्ष्यात आल्या. वान्ग्यांवर पाण्याचे थेंब स्थिर स्वरूपात आहे, अर्थात आधी वांगी तेल मिश्रित पाण्यातून काढलेली आहे. बहुधा वान्ग्यांवर चकाकी दिसावी म्हणून. दुसरा निष्कर्ष- वांगे दुकानात येऊन २४ तासांच्या वर होऊन गेले आहे, म्हणून आज सकाळी दुकानदाराने, पाण्यात तेल टाकून वांगे बुडवून काढली आहे.

इरसाल's picture

15 Jul 2015 - 2:21 pm | इरसाल

ह्यात टिप्पी कल खानदेशी काटेरी हिरवे वांगे दिसत नाही ते ?

आतिवास's picture

19 Apr 2015 - 5:55 pm | आतिवास

:-)

जेपी's picture

19 Apr 2015 - 6:08 pm | जेपी

लेख आवडला.

मनीषा's picture

19 Apr 2015 - 7:46 pm | मनीषा

पुराणातली वांगी , कलीयुगातसुद्धा पुरून उरतायत :)

खटपट्या's picture

20 Apr 2015 - 12:26 am | खटपट्या

मस्त झालंय भरीत...

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2015 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे

ही... ही... ही... (अरे कुठे नेऊन ठेवल्यात स्मायल्या मिपाच्या !?)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2015 - 8:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जब्राट लिहिलयं !!! :)

नाखु's picture

20 Apr 2015 - 10:23 am | नाखु

वांगे वांगे पे लिख्खा है डांगे डांगे का नाम !

हे भरीत जबराट आहे.

मृत्युन्जय's picture

20 Apr 2015 - 11:10 am | मृत्युन्जय

वाङ्मय जमले आहे :)

मूळ धाग्याची लिंक मिळेल का?

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 9:25 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या मते सदर लेखन कुठल्या एका धाग्यावर नसून पुराणातल्या वांग्यांना आजही भाजत बसण्याच्या प्रवृत्तीवर केलेलें भाष्य आहे.

मिपावर शोधावे, अनेक धागे मिळतील.

मितान's picture

20 Apr 2015 - 5:26 pm | मितान

भलते चविष्ट वांगमय :))

संदीप डांगे's picture

7 Jul 2015 - 2:51 pm | संदीप डांगे

सर्व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार!

धन्यवाद!!!

होबासराव's picture

7 Jul 2015 - 9:17 pm | होबासराव

अचानक हवेतच स्फोट होवून आकाशात भगवा प्रकाश पसरला आणि विरून गेला. जमिनीवरची हिरवळ वाचली आणि फोफावली.

अविनाश पांढरकर's picture

8 Jul 2015 - 5:24 pm | अविनाश पांढरकर

भलते चविष्ट वांगमय :))

पातळी सोडून लिहिलेला भिकार लेख .

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 5:40 pm | संदीप डांगे

मक्काय्तर. अहो सात भिकार आहे... (प्रेरणा: पु.ल.)

पाटीलअमित's picture

8 Jul 2015 - 7:21 pm | पाटीलअमित

पातळी धरून एक भिकार लेख येऊ द्या
( अत्रे )

बॅटमॅन's picture

9 Jul 2015 - 2:33 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) (हशा)

पाटीलअमित's picture

8 Jul 2015 - 7:20 pm | पाटीलअमित

भयानक
अप्रतिम
अजून येऊ द्या

उगा काहितरीच's picture

8 Jul 2015 - 9:23 pm | उगा काहितरीच

नाय आवडला !

अमोल मेंढे's picture

9 Jul 2015 - 2:27 pm | अमोल मेंढे

आवडला बरंका

तुडतुडी's picture

9 Jul 2015 - 3:21 pm | तुडतुडी

त्यातून लेखकाची भिकार मानसिकता दिसते

संदीप डांगे's picture

9 Jul 2015 - 3:48 pm | संदीप डांगे

अगदी सहमत.

त्यामुळेच हुच्च हाभिरूची असणार्‍यांनी असल्या लेखांपासून दूरच राहिलेलं बरं.

बॅटमॅन's picture

9 Jul 2015 - 6:15 pm | बॅटमॅन

ऊऽऽ, अच्चं दिश्लं का ते? मालतो हां लेखकाला! ढिशुम ढिशुम....

पाटीलअमित's picture

9 Jul 2015 - 6:24 pm | पाटीलअमित

ढिशुम ढिशुम तो peposodant का काम हैन

नाव आडनाव's picture

9 Jul 2015 - 6:32 pm | नाव आडनाव

कै रॉ / तै,
तुम्ही एकाच लेखाला भिकार म्हणायला रोज येता का काय ? :)

ट्यार्पी वाढवण्यासाठी डांगे अण्णांना मदत करत असतील तुडतुडी दादा! ;)

आबा's picture

9 Jul 2015 - 8:04 pm | आबा

तुड्तुडींच्या भावना दुखावल्या,
डांगेभाई, सॉरी बोला तुडतुडींना

पाटीलअमित's picture

9 Jul 2015 - 8:42 pm | पाटीलअमित

भिकार कॉम्मेंत
( हलक्यात घ्या )

आबा's picture

9 Jul 2015 - 8:05 pm | आबा

जबर्दस्त !! :)

तुडतुडी's picture

13 Jul 2015 - 2:33 pm | तुडतुडी

सतीचं जाळून घेणं , भगीरथाने गंगेला आणण ह्या गोष्टींची टिंगल करणारे मिड ब्रेन activation चा मात्र अभ्यास करायला निघालेत

संदीप डांगे's picture

13 Jul 2015 - 2:45 pm | संदीप डांगे

कुंभपर्वावर मालिका लिहितोय... आपले बरेच गैरसमज दूर होतिल...

(प्रस्तुत लेखाकडे विनोदबुद्धीने पहा असे सांगण्याची गरज पडते यात लेखकाचे अपयश आहे)

कुंभपर्वावर मालिका लिहितोय.आपले बरेच गैरसमज दूर होतिल.>>>
कसले गैरसमज ? माझा कुंभ मेळ्याला पाठींबा आहे असा तर तुमचा गैरसमज झाला नाही ना ?जे बरोबर आहे ते बरोबरच आहे . जे चूक आहे ते चूक आहे . लाखातला एखादाच अध्यात्मिक उंची गाठणारा . बाकी सगळे भोंदू गांजेकस. आयुष्यात दुसरं काही जमत नाही , कोणी कुत्र विचारात नाही म्हणून साधूचा वेष घेवून फिरणारे . आणि मग गोदावरीत स्नान करून पापाचं परिमार्जन करणारे . अरे त्या गोदावरीच पावित्र्य ठेवलाय का लोकांनी ? गटार करून टाकलय नुस्त

संदीप डांगे's picture

15 Jul 2015 - 2:51 pm | संदीप डांगे

हेच ते गैरसमज.

तुडतुडी's picture

15 Jul 2015 - 3:56 pm | तुडतुडी

बरं . मालिका तर लिहा आधी मग बघू

संदीप डांगे's picture

15 Jul 2015 - 4:01 pm | संदीप डांगे

हेच अपेक्षित होते.... धन्यवाद

संजय पाटिल's picture

15 Jul 2015 - 4:45 pm | संजय पाटिल

संपलं का ??

प्यारे१'s picture

15 Jul 2015 - 5:08 pm | प्यारे१

हो.
चला धरा. सतरंजीला बरोबर मध्ये धरा. मधोमध उचला. आता हळूच झटका दया. पडली ना खाली घाण सगळी? आता आणखी एक उभी घड़ी एक डावीकडून एक उजवीकडून. आता पुढुन निम्म्यात्. बास!
आता उचला आणि कार्यालयाच्या हॉपिस् मधे नेऊन ठेवा.