३. गेले आठशे आले आठशे - हरवले ते गवसले का?

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 5:00 pm

भाग 3 किस्सा कानपुरचा.
गेले आठशे आले आठशे

‘कानपूर में पंगा नही लेनेका’

पोस्टींगला पोहोचायच्या आधीच मिळालेला संवैधानिक इशारा ऐकून मी हवाईदलाच्या कानपूर स्टेशनात शिरलो. सिव्हीलियनची युनियन बाजी, सटक्यात सुरे काढून भोसका भोसकीचे प्रकार नेहमीचेच. दारूची सोय लावायला मेडिकलची खोटी बिले भरून लाखो रुपयांची लूट करायला इथल्या कामगार नेत्यांची फूस व खासदाराचा वरदहस्त वगैरे मुळे कानपूर करामाती स्टेशन म्हणून अजुनही मानतात. नटोरियस कानपुरात तीन वर्षे काढणे म्हणजे दिव्य होते.
एका शनिवारी मी उन्हाळ्याच्या गर्मीतील दुपारच्या वेळी बाकी सगळ्यांनी पॅक अप केल्यावर घाम गाळत पैसे टॅली करत होतो. फार तफावत होती. मी व कॅश अकौंटचा कॉपल शिवन पैशाचा मेळ लावायला पुन्हा पुन्हा व्हावचर्स व उरलेले पैसे मोजत होतो. आठशेचा फरक होता. सुटीच्या आदल्या दिवशी लाख भराची ट्रंक भरूनची बिले, कोणी पैसे घेऊन एव्हाना विमानात, तर कोणी स्टेशनवर पोहोचलेले, आता काय करणार हताश होऊन मी सेफ बंद केली अन आपल्या बँक अकौंटमधे किती बॅलन्स असेल असा विचार करत शिवन म्हणालो, ‘सोमवार को देखा जाएगा’.
सोमवार उजाडला. परेड करून आम्ही ऑफिसमधे आलो. माझा अकाऊंट्स ब्रांचकोर्समेट चहा घेत घेत मला म्हणाला, ‘काय रे पैसे टॅली झाले?
मी म्हणालो, 'तुझे क्या पडी है? ‘ऐसे ही पूछा’ तो म्हणाला. ‘नही यार, परसों से टॅली नहीं हो रहे है! पण तुला का विचारावेसे वाटले? तो हसला व मला म्हणाला, ‘मुझे पता है...किती कमी आहेत?’
कोर्समेटला काय लपवाचे? मी म्हणालो, ‘आठशे.
हे घे’ म्हणून त्याने खिशातून काढून दिले व म्हणाला, ‘साले, अब तेरेसे एक पार्टी बनती है!’
‘क्यों नही?’ म्हणून मी हुरळलेल्या चेहऱ्याने म्हणत सेफ उघडून पैसे आत टाकले व चहा तसाच टाकून शिवनला पैसे मिळावल्याचे सांगितले.
काय झाले? कसे झाले? सांगताना तो म्हणाला, ‘माझा बॉस शनिवारी तुझ्याकडून सुटीचा एडव्हान्स व आणखी काही टीए-डीए बिले मिळून पैसे घेऊन गेला. पत्नीला घेऊन संध्याकाळी खरेदीला बाहेर पडला काही खर्च झाले. सर्व पैसे तिच्या पर्समधे ठेवायला दिले होते. लखनौला घरी परतल्यावर हिशोब करता करताना त्याला वाटू लागले की इतके पैसे कसे उरतायत. म्हणून त्याने माझ्या मित्राला फोनवरून सांगितले जरा विचार ओकला मला काही पैसे जास्त आले असे वाटते. त्याला जितके कमी पडत असतील तेवढे दे. माझ्या मित्राने नंतर ते पैसे त्याचा बॉसकडून सुटीवरून परतल्यावर घेतले.
एकादा एक सार्जंटने मला 250 रुपयांची मनिऑर्डर केलीन. म्हणाला, ‘सर मैं तो खडे एयर क्राफ्ट में बैठकर पैसै गिनने लगा. मुझे आपके वॉरंट अफसरने पैसे जादा दिये है. वो लौटा रहा हूं. देरी के लिए माफ करना.'

‘माझ्या हवाईदलातील आठवणी’ लेखमालेत कानपूरचे पोस्टींग प्रकरण रंगतदार आहे. इथेच मी एका सिव्हीलियन ऑफिसरला खोटी बिले सादर केली म्हणून नोकरीतून बाहेर काढला. बोगस मेडिकल बिलांचा खूप मोठी एन्क्वायरी झाली. प्रत्येकाचा कट असल्यामुळे त्याला राजकीय रंग ही होता. त्यांना आळा घालायला काही कु़डबुड्या डॉक्टरांना जेलची हवा खायला लागली. सेक्शन मधील एकाला रेडहॅंडेड हेरी फेरी करताना पकडला. त्याची तात्काळ बदली केली गेली. मला नाटकाचा अचानक शौक लागला. वैवाहिक जीवनाची सुरवात. पत्नीसह हरिद्वार-ऋषिकेशच्या बसच्या सहलीत दिल्ली ते कानपूर बसने यायला आठ ऐवजी वीस तास लागले. दसऱ्याच्या दिवशी रावण जाळण्याच्या गर्दीमुळे ड्रायव्हर रस्ता चुकला. वाटेत डकैतांच्या भितीने रात्री वाहनांना रहदारी बंद केलेल्या रस्त्याच्या डंड्याला वरकरून आम्ही कसे सटकलो असे अनेक नाटकीय ढंगाचे किस्से घडत वर्षे कशी लोटली कळले नाही व एक दिवशी माझी पोस्टींग पुन्हा चंदीगढला आली.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 5:09 pm | आत्मशून्य

बातें भुल जाते है... यांदे... याद आती है.

थोडे विस्तृत लिहा. इतरांसोबत काहीही शेअर करताना आठवणी न्हवे तर त्यातील रंगत शेअर करायची असते, व तो परीणाम साधायला लिखाणात रंग भरायची मो़कळीक आपणास आहेच.

शशिकांत ओक's picture

7 Apr 2014 - 10:39 pm | शशिकांत ओक

मित्रा, नमुन्या दाखल एखादा आपला अनुभव सादर करावा ही विनंती.

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 10:54 pm | आत्मशून्य

ततपप होते... आणी तुम्ही मले धागा लिवायला सागुं र्‍हायले ?

शशिकांत ओक's picture

10 Apr 2014 - 1:34 am | शशिकांत ओक

बाळंत वेदना होतात पण बाळाचे कर्ण मधुर ट्यांहा... ऐकले की आधीचे कष्ट व त्रास विसरायला होतात. तशी आपल्याला धाग्याला सुई लावायची सवय आहेच. तेंव्हा पहा प्रयत्न करून.... जमेल.

माझी स्तुती करताय क़ी हटाई काहीच पत्ता नाही लागू राहिला ;)