"खरा"सावरकर(भाषण) -श्री.शेषराव मोरे..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
5 Mar 2014 - 7:07 pm

दिनांक २ फेब्रुवारी २०१४ ... ठिकाण:- सिंहगड रोड..सनसिटी जवळील एक ग्राऊंड.. वेळः-संध्याकाळी साडेसहाची, आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे... मोरे सरांचं सावरकर या विषयावरील भाषण. माझ्या सारख्यासाठी हा क्षण आयुष्यातील मोलाच्या क्षणांपैकी एक. का म्हणता?
आमचे सावरकर प्रेम? = नाही

त्यांच्या बुद्धीवादाचे वेड = अजिबात नाही

मग उरलं काय? त्यांचा हिंदुत्ववाद ? = तत्वतः होय . अता तत्वतः होय.. असे का? याचे कारण सावरकरांनी हिंदुत्ववाद मांडला तसा शिवाजी सारख्या काही माणसांनी तो जगला जागवला आणि आमच्या पर्यंत पोहोचेल एव्हढी ऊर्जाही निर्माण करून ठेवली. असेच श्रेय भारतमातेच्या अनेक क्रांतिविरांना ,समाजसुधारकांनाही देता येइल. हे सगळं झाल्यावर उरलच काय मग??? आता उरला तो मोरे सरांनी दाखवलेला बव्हंशी अप्रीय सावरकर...म्हणजेच त्यांच्या भाषेत-"खरा" सावरकर! त्याचे आंम्हाला मात्र भरपूर वेड.. होय अजून तरी वेडच! झालय असं की सावरकरांना गांधिजिंप्रमाणे अनेक संघटनांनी,नेत्यांनी,जेत्यांनी,व्यक्तिंनी एव्हढच कशाला त्यांच्या समर्थक/विरोधकांनीही हवे तसे वापरले/राबवले आहे.

प....ण

सावरकरां सारखी,एखादी अशी व्यक्ति आणि तिचा जीवनकलह याचा नक्की..खरा अर्थ काय? बीज काय? मार्ग कोणता? ध्येय्यवाद कोणता? अंतिम दिशा कोणती? याचं उत्तर शोधायचं असेल तर त्या व्यक्तिच्या या जीवनकलहाचं प्रत्येकबाजुनी(म्हणजे एकही बाजू राहू न देता) अभ्यास,परिक्षण,मूल्यमापन करायला लागत. आणि त्याचा पाया "जसे आहे तसे" त्या व्यक्तिला मांडणे.म्हणजेच मला काय वाटतं??? या विचारसरणीला फाटा देऊन त्या व्यक्ति/विचाराचं काय म्हणणं आहे??? हे पहाणे आणि जास्तीत जास्त निर्दोष पद्धतीनी त्याची मांडणी करणे. पुढे काळाच्या ओघात त्यातील चुका/दोष कुणी सप्रमाण पुराव्यानी दाखवून दिले,तर तसा पुन्हा त्यात बदल करणे. अता या भुमीकेकडे एकंदर पाहिलं तर ही भूमीका विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची भूमीका आहे. जास्तीत जास्त सत्य .. शोधण्यासाठी स्वतःचा अहंकार..वैयक्तिक विचारसरणी बाजूला ठेऊन बुद्धीविवेकानी सत्य शोधणे.. मांडणे, हा या शोधनाचा पाया आहे. ही पद्धती श्री.शेषराव मोरे यांची केवळ अभ्यासाची पद्धती नसून त्यांची स्वतःची जीवनपद्धतीही आहे,जीवनमूल्यही आहे. हे मी स्वतः आजवर पाहिलं अनुभवलं आहे. एखादा माणूस समाजासाठी स्वतःचे अर्धे आयुष्य खर्च करुन काही विषयांच्या अभ्यासात स्वतःला वाहून घेतो. ही गोष्ट नेहमीच फार दुर्मिळ असते..आणि असणारही!

मोरेंचं सावरकरांच्या बाबतीतलं वेगळेपण,,नेमकं इथेच आहे!

मोरे सर त्यांच्या पुस्तका/भाषणांमधून सावरकारांच्या हिंदुत्ववादाची बाजू सांगतात त्याची गरज अधोरेखित करतात..ही जशी एक,अनेकांना प्रीय असणारी गोष्ट आहे,तशीच मोरे सर सावरकारांचे समाजकारण (समाजसुधारक सावरकर) त्यांची विज्ञान निष्ठा-हा एक मनुष्यत्व आणि त्यांच्या हिंदुत्वाकडे जाणारा एक अत्यावश्यक आचरणीय मार्ग आहे, ही दुसरी अनेकांना अप्रीय असणारी बाजूही सांगतात. कारण पहिल्या बाजुकडे जाऊ इच्छिणार्‍यांची ही दुसरी बाजू समजाऊन घेऊन आचरणं .. ही पूर्वअट आहे... हेच आजपर्यंत अंधारात राहिलेलं आहे. ही दुसरी महत्वाची बाजु सोडून उरलेला सावरकर आहे..तोच लोकगंगेत प्रीय आहे.अनेक संघटनांना हवा आहे. म्हणून तोच जास्त मांडला गेला आहे.आणि त्यामुळे सावरकरांवर अनाठाई हेतुपुरस्सर टीका तसेच त्यांच्या व्यक्तित्वाचे हनन करण्याची संधी अनेक सावरकर विरोधकांना मिळालेली आहे.

आज आपण हे दोन्ही सावरकर,मोरे सरांच्या भाषणात ऐकणार आहोत. सदर भाषण इथे मी ध्वनीफीत-रूपानी (लिंकमधे) लावत आहे. आपण ते ऐकावे.या भाषणात जे काहि आहे, ते व्यापक रूपानी मोरे सरांच्या दोन पुस्तकांमधे यापूर्वीच येऊन गेलेले आहे.

१) सावरकरांचे समाजकारण-सत्य आणि विपर्यास

२) सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंन्दुत्ववाद

पुस्तकात हे सर्व येऊन गेलेलं असलं,तरिही या भाषणातील त्याचं वेगळेपण म्हणजे- या सार्‍याची मांडणी मुख्यत्वे आजच्या काळातील सावरकर विरोधकांना डोळ्यासमोर ठेऊन केलेली आहे.

भाषणाचे तीन टप्पे आहेत..प्रथम मोरेसरांनी सावरकरांचा त्यांच्या आयुष्यात "प्रवेश" कसा झाला? हे थोडक्यात मांडलं आहे. पुढे त्यांच्या बुद्धीवादाचा परिचय..आणि महाराष्ट्रातल्या अनेक खोडसाळ व धूर्त (शासन पुरस्कृत) सावरकर विरोधकांचा समाचार घेतलेला आहे,त्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्यांचा (आपल्या पर्यंत विशेषत्वानी न पोहोचलेला) हिंन्दुत्ववाद..त्यातील प्रमुख मुद्दे आणि सावरकरांच्या भाषणांच्या उद्धृतांसह आलेला आहे. भाषणाची शैली ही तेजस्वी तशीच मार्मिकही आहे. त्यामुळे काहि ठिकाणी आपलं मन दुखावलं तरी मेंदू सुखावेल अशी काहिशी अवस्था भाषण ऐकताना होते.

चला तर मग...(खालील लिंकवर) ऐकू या..मोरे सरांचं भाषण

http://www.mediafire.com/listen/ki4h6ig1xnz1542/sheshrav_more_-khara_sav...
========================================================
@ सदर भाषण इथे लावण्यासाठी मोरे सरांची परवानगी घेतलेली आहे. :)
(भाषणाला-"खरा"सावरकर-हे नाव मी दिलेलं नसून ते मोरे सरांच्या मनातलं असं नाव आहे. मी ते इथे मांडणीच्या सोइखातर डकवलेलं आहे. )

संस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

विकास's picture

5 Mar 2014 - 7:58 pm | विकास

भाषण ऐकायला आत्ता जमणार नाही, पण उत्सुक आहे. लवकरच ऐकेन आणि टंकेन.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2014 - 10:58 pm | मुक्त विहारि

श्री.शेषराव मोरे, यांचे एकच पुस्तक (गांधींनी आणि काँग्रेसने, फाळणी का स्वीकारली?) गेले १ वर्ष वाचतो आहे आणि अद्याप ते अर्धे पण झाले नाही.

जबरदस्त ताकदीचे आणि अतिशय अभ्यास करून ग्रंथ लिहीतात.

आणि कधीही फोन करा. माणूस एकदम विनम्रतेने बोलणार.आपल्या शंकांची आणि कुशंकांची माहीतीपुर्ण उत्तरे देवून शंका निरसन करणार.

@ अ.आ.

मस्त धागा काढलास.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2014 - 1:34 am | अत्रुप्त आत्मा

@आणि कधीही फोन करा. माणूस एकदम विनम्रतेने बोलणार.आपल्या शंकांची आणि कुशंकांची माहीतीपुर्ण उत्तरे देवून शंका निरसन करणार.>>> हेच कारण आहे माझं या माणसावर जीव जडायचं. इतका मोठ्ठा अभ्यासू व्यासंगी माणूस! पण व्यक्तिमत्व कसं? अतीशय समरस होणारं.समोरच्याशी बोलता बोलता असे एकदम मिसळतात,की त्या माणासाला, "आज आपली पहिल्यांदा भेट होतीये" हे सत्य भ्रमासारखं वाटावं. एकदम टाळी काय देतील. गळ्यात हात टाकून बोलायला काय लागतील.आपल्या विनोदावर ठसका लागेपर्यंत हसतील काय? आणि तसाच ठसका लागेपर्यंतचा विनोद बोलता बोलता स्वतःही करतील.

अतिशय मनमोकळा माणूस. आपल्याच त्यांच्यासमोर बोलताना अगदी कसं बोलू?कसं बोलू? होतं आणि मोरे.. "अरे काय मोठ्ठा झाला का?" म्हणून आपली विकेट काढून आपल्याला बोलतंही करतील. त्यामुळे माझ्या साठी हा माणूस लेखनासाठी एक आणि परिचित म्हणून दुसरा असा निराळाच झालेला आहे.

मला ते २००४ साली कर्वेनगरमधे अभिनव निर्माण प्रतिष्ठानच्या मिटिंगमधे भेटले. ती एक छोटेखानी चर्चा-सभाच होती. तेंव्हा नुकतच "मुस्लिम मनाचा शोध" प्रकाशित झालेलं होतं. ओळख परेडमधे आमच्या मित्रानी, माझी ओळख--"हे एक भटजी आहेत.........आणि तरी सुद्धा आपल्यात आहेत!" अशी करून दिली. (इथे पहिला हशा आला!) याच्यावरती मोरे सरांनी मला उद्देशून-- "ते त्यांच्या मांडी घालायच्या (पारंपारिक) ष्टाइल वरनच आंम्ही ओळखलं!" असं बोलून माझी नक्कल अशी पटकन केली.की पुढे आलेला चहा विसरून सगळे हशा'तच बुडाले! असा एक नंबर इरसाल माणूस आहे.

अनेक ठिकाणी लोकं भाषणांना बोलावतात. मान/अपमान वगैरे सर्व होतात. ते काहि प्रसंग ऐकले की (खरोखरच) जीवाची पर्वा न करता हा माणूस असा का गावोगाव भटकतो,,आणि त्यासाठी एव्हढी ऊर्जा कुठून मिळवतो ते कळत नाही असं वाटायला लागतं पण त्याचं गमक दडलय ते त्यांच्या स्वच्छंद समरस आणि काहिश्या इरसाल व्यक्तिमत्वात!
================================
वरील भाषणानंतर मोरे सरांचे घेतलेले काहि फोटो...
https://lh5.googleusercontent.com/-BjdxhoZs62g/Uxd7yMkBNNI/AAAAAAAACpw/Lu6sQ3_WLOI/s512/more%2520sir%25202.jpg

https://lh6.googleusercontent.com/-VQmQDcGcXEA/Uxd9Mtv4QkI/AAAAAAAACp8/F2Nk1ROW5MI/s512/more%2520sir%25203.jpg

https://lh4.googleusercontent.com/-m8UtW7cCnbM/Uxd7P335tjI/AAAAAAAACps/RhczIGeRqcU/s512/more%2520sir%25201.jpg

https://lh5.googleusercontent.com/-eUfUDx1UP1g/UxeBULNFtlI/AAAAAAAACqI/hL6wiBJWwbg/s512/more%2520sir%25204.jpg
वरील फोटोत :- हिमानीताई सावरकर... अप्रीय सावरकर ऐकून काहिश्या अस्वस्थ झाल्या..तो क्षण!

सौंदाळा's picture

6 Mar 2014 - 10:52 am | सौंदाळा

लेख आणि प्रतिसाद आवडला.
काही वर्षांपुर्वी (कदाचित सवर्ण्-दलित या विषयावरुन) मोरेंचा लेख रविवार सकाळमधे आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणुन दुसर्‍या आठवड्यात अजुन एक लेख आला होता (कोणाचा ते आठवत नाही आता :( ) पुढच्या रविवारी परत मोरेंनी त्याला उत्तर दिले. साधारण २ महीने दर रविवारच्या पुरवण्यांमधुन हे युध्द चालु होते आणि शेवटी संपादकांनी या विषयावरील चर्चा आता समाप्त करीत आहोत असे सांगितले होते याची आठवण झाली.

खटपट्या's picture

6 Mar 2014 - 2:22 am | खटपट्या

ऐकतोय

प्रचेतस's picture

6 Mar 2014 - 10:00 am | प्रचेतस

सुरेख प्रास्तविक केलंय आत्मुदा.
मोरे सरांची काही पुस्तके वाचलेली असल्याने त्यांच्या लेखनाविषयी परिचय आहेच. प्रखर बुद्धिवादी माणूस. सखोल अभ्यासाशिवाय काहिही लिहिणार नाही.
भाषण यथावकाश ऐकेनच.

मोरे सरांचं भाषण! ऐकायलाच हवं!

या कामाबद्दल अनेक आभार!! तुमचा हा दुवा तुम्हाला किती दुवे मिळवून देणार आहे!

आशु जोग's picture

6 Mar 2014 - 1:29 pm | आशु जोग

शेषराव मोरेसरांचे मला एका गोष्टीसाठी कौतुक वाटते ते म्हणजे त्यांनी निवडलेले विषय...
अनेक ग्रंथ पालथे घालून, संदर्भ तपासून ते आपले पुस्तक सिद्ध करतात....

पण
पण
पण

त्यांच्या भाषणात किंवा लिखाणात स्वतःचे काहीच भाष्य न करता संदर्भातले उतारे वाचून दाखवत बसतात त्यामुळे भाषण रटाळ, बोजड होवू लागते. इतरांचे संदर्भ द्यायला काहीच हरकत नाही. पण जे असेल ते स्वतःच्या भाषेत मांडा. एखादा मुद्दा सांगताना दोन वाक्य झाल्याबरोबर चिट्ठीचपाटी काढून वाचायला सुरुवात.... सारखे कोर्टातल्यासारखे पुरावे दाखवणे सुरु असते

वास्ताविक पुरावे दाखवले नाहीत म्हणून मोरेसरांवर कुणी अविश्वास दाखवणार नाही. शंका आलीच तर संदर्भ सूची द्या ती पाहू...

अकारण अनेक ग्रंथाची अनेक पाने चिकटवून मोरेसर स्वतःचे पुस्तक फार फार...

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2014 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा

निरर्थक आरोप करू नका.
आपण "जे" काही म्हणता, तसे मोरेंन्नी करण्यामागचे कारण माहित करुन घ्या. सदर धाग्यातील भाषण आपण ऐकले आहे काय? असल्यास .. त्यात आपण म्हणता तसे- कुठे कुठे घडले आहे? ते क्रुपया सांगा? :)

मारकुटे's picture

15 Mar 2014 - 6:57 pm | मारकुटे

या बाबत अगदी सहमत आहे. आणि मधुन मधुन हे मी नाही म्हणत सगळ्याचा पुरावा आहे असं बजावून सांगतात. मात्र एक नक्की माणुस फार अभ्यासु आणि साधा आहे. हल्ली अशी जमात दुर्मिळ आहे.

प्रमोद देर्देकर's picture

6 Mar 2014 - 3:13 pm | प्रमोद देर्देकर

आत्मुदा ती भाषणाची फाईल मला मेल करा ना. मला ते डाऊनलोड करायचं आहे. मला इथं ऑफिस मध्ये ऐकता येत नाही आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2014 - 3:36 pm | अत्रुप्त आत्मा

येस... नक्कीच! :)

अआसाहेब, दुव्याबद्दल आभार. मोऱ्यांचे 'मुस्लीम मनाचा शोध' वाचले आहे. अतिशय आवडलेले पुस्तक.

पैसा's picture

10 Mar 2014 - 4:27 pm | पैसा

एका उत्तम विषयावरच्या भाषणाच्या दुव्यासाठी धन्यवाद बुवा! सावरकर हे त्यांच्या विरोधकांना आणि पाठिराख्यांना दोघांनाही न पेलवलेले व्यक्तिमत्त्व! दोघेही त्यांच्याबद्दल आपल्या सोयीचे मुद्दे अर्धवट उचलून गैरसमज पसरवायचं काम इमाने इतबारे करत असतात. या दोन्हीच्या पलिकडच्या खर्‍या सावरकरांना शब्दात पकडायचा प्रयत्न आवडला.

आशु जोग's picture

10 Mar 2014 - 10:00 pm | आशु जोग

आत्मुबाबा पळशीकरांबद्दलची माहिती मोरेसरांमुळेच कळाली

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2014 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

@पळशीकरांबद्दलची माहिती मोरेसरांमुळेच कळाली>>> हम्म्म...भाषणात तर त्याच्या लबाडीबद्दलचे सर्व उल्लेख आलेलेच आहेत. पण मूळ ग्रंथात(सत्य आणि विपर्यास मधे..) मोरे सरांनी पळशीकरांना वैचारीक गुन्हेगार हा किताब दिलेला आहे. तो सार्थ आहे. आणि मोरे सरांची अशी प्रामाणिक इच्छा आहे,की अश्या प्रकारच्या गुन्हेगारीला कायद्यानी शिक्षा असली पाहिजे. मी तर पळशीकरांसारख्यांना एकाचवेळी शारीरीक व मानसीक यातना होतील इतकी भयंकर शिक्षा कायद्यात असावी असं इच्छितो. कारण माणसाच्या जातीतल्या प्रामाणिक आणि नैतिक मूल्यांवर जाणिवपूर्वक बलात्कार कराणारी ही जमात आहे. असं माझं तरी मत आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Mar 2014 - 2:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

भाषणाच्या लिंक बद्दल अनेक अनेक धन्यवाद.
सावरकरांबद्दल वाटणारा आदर या भाषणामुळे वृध्दिंगत झाला.
मोरे सरांच्या व्यासंगाचे आणि निष्ठेचे कौतुक वाटले.
मोरे सरांना मनापासुन नमस्कार.

भाषणात उल्लेख केलेली पुस्तके मिळवुन वाचायचा नक्की प्रयत्न करेन.