"खरा"सावरकर(भाषण) -श्री.शेषराव मोरे..
लेखनप्रकार (Writing Type)
दिनांक २ फेब्रुवारी २०१४ ... ठिकाण:- सिंहगड रोड..सनसिटी जवळील एक ग्राऊंड.. वेळः-संध्याकाळी साडेसहाची, आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे... मोरे सरांचं सावरकर या विषयावरील भाषण. माझ्या सारख्यासाठी हा क्षण आयुष्यातील मोलाच्या क्षणांपैकी एक. का म्हणता?
आमचे सावरकर प्रेम? = नाही
त्यांच्या बुद्धीवादाचे वेड = अजिबात नाही
मग उरलं काय? त्यांचा हिंदुत्ववाद ? = तत्वतः होय . अता तत्वतः होय.. असे का? याचे कारण सावरकरांनी हिंदुत्ववाद मांडला तसा शिवाजी सारख्या काही माणसांनी तो जगला जागवला आणि आमच्या पर्यंत पोहोचेल एव्हढी ऊर्जाही निर्माण करून ठेवली. असेच श्रेय भारतमातेच्या अनेक क्रांतिविरांना ,समाजसुधारकांनाही देता येइल. हे सगळं झाल्यावर उरलच काय मग??? आता उरला तो मोरे सरांनी दाखवलेला बव्हंशी अप्रीय सावरकर...म्हणजेच त्यांच्या भाषेत-"खरा" सावरकर! त्याचे आंम्हाला मात्र भरपूर वेड.. होय अजून तरी वेडच! झालय असं की सावरकरांना गांधिजिंप्रमाणे अनेक संघटनांनी,नेत्यांनी,जेत्यांनी,व्यक्तिंनी एव्हढच कशाला त्यांच्या समर्थक/विरोधकांनीही हवे तसे वापरले/राबवले आहे.
प....ण
सावरकरां सारखी,एखादी अशी व्यक्ति आणि तिचा जीवनकलह याचा नक्की..खरा अर्थ काय? बीज काय? मार्ग कोणता? ध्येय्यवाद कोणता? अंतिम दिशा कोणती? याचं उत्तर शोधायचं असेल तर त्या व्यक्तिच्या या जीवनकलहाचं प्रत्येकबाजुनी(म्हणजे एकही बाजू राहू न देता) अभ्यास,परिक्षण,मूल्यमापन करायला लागत. आणि त्याचा पाया "जसे आहे तसे" त्या व्यक्तिला मांडणे.म्हणजेच मला काय वाटतं??? या विचारसरणीला फाटा देऊन त्या व्यक्ति/विचाराचं काय म्हणणं आहे??? हे पहाणे आणि जास्तीत जास्त निर्दोष पद्धतीनी त्याची मांडणी करणे. पुढे काळाच्या ओघात त्यातील चुका/दोष कुणी सप्रमाण पुराव्यानी दाखवून दिले,तर तसा पुन्हा त्यात बदल करणे. अता या भुमीकेकडे एकंदर पाहिलं तर ही भूमीका विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची भूमीका आहे. जास्तीत जास्त सत्य .. शोधण्यासाठी स्वतःचा अहंकार..वैयक्तिक विचारसरणी बाजूला ठेऊन बुद्धीविवेकानी सत्य शोधणे.. मांडणे, हा या शोधनाचा पाया आहे. ही पद्धती श्री.शेषराव मोरे यांची केवळ अभ्यासाची पद्धती नसून त्यांची स्वतःची जीवनपद्धतीही आहे,जीवनमूल्यही आहे. हे मी स्वतः आजवर पाहिलं अनुभवलं आहे. एखादा माणूस समाजासाठी स्वतःचे अर्धे आयुष्य खर्च करुन काही विषयांच्या अभ्यासात स्वतःला वाहून घेतो. ही गोष्ट नेहमीच फार दुर्मिळ असते..आणि असणारही!मोरेंचं सावरकरांच्या बाबतीतलं वेगळेपण,,नेमकं इथेच आहे!मोरे सर त्यांच्या पुस्तका/भाषणांमधून सावरकारांच्या हिंदुत्ववादाची बाजू सांगतात त्याची गरज अधोरेखित करतात..ही जशी एक,अनेकांना प्रीय असणारी गोष्ट आहे,तशीच मोरे सर सावरकारांचे समाजकारण (समाजसुधारक सावरकर) त्यांची विज्ञान निष्ठा-हा एक मनुष्यत्व आणि त्यांच्या हिंदुत्वाकडे जाणारा एक अत्यावश्यक आचरणीय मार्ग आहे, ही दुसरी अनेकांना अप्रीय असणारी बाजूही सांगतात. कारण पहिल्या बाजुकडे जाऊ इच्छिणार्यांची ही दुसरी बाजू समजाऊन घेऊन आचरणं .. ही पूर्वअट आहे... हेच आजपर्यंत अंधारात राहिलेलं आहे. ही दुसरी महत्वाची बाजु सोडून उरलेला सावरकर आहे..तोच लोकगंगेत प्रीय आहे.अनेक संघटनांना हवा आहे. म्हणून तोच जास्त मांडला गेला आहे.आणि त्यामुळे सावरकरांवर अनाठाई हेतुपुरस्सर टीका तसेच त्यांच्या व्यक्तित्वाचे हनन करण्याची संधी अनेक सावरकर विरोधकांना मिळालेली आहे. आज आपण हे दोन्ही सावरकर,मोरे सरांच्या भाषणात ऐकणार आहोत. सदर भाषण इथे मी ध्वनीफीत-रूपानी (लिंकमधे) लावत आहे. आपण ते ऐकावे.या भाषणात जे काहि आहे, ते व्यापक रूपानी मोरे सरांच्या दोन पुस्तकांमधे यापूर्वीच येऊन गेलेले आहे. १) सावरकरांचे समाजकारण-सत्य आणि विपर्यास २) सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंन्दुत्ववाद पुस्तकात हे सर्व येऊन गेलेलं असलं,तरिही या भाषणातील त्याचं वेगळेपण म्हणजे- या सार्याची मांडणी मुख्यत्वे आजच्या काळातील सावरकर विरोधकांना डोळ्यासमोर ठेऊन केलेली आहे. भाषणाचे तीन टप्पे आहेत..प्रथम मोरेसरांनी सावरकरांचा त्यांच्या आयुष्यात "प्रवेश" कसा झाला? हे थोडक्यात मांडलं आहे. पुढे त्यांच्या बुद्धीवादाचा परिचय..आणि महाराष्ट्रातल्या अनेक खोडसाळ व धूर्त (शासन पुरस्कृत) सावरकर विरोधकांचा समाचार घेतलेला आहे,त्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्यांचा (आपल्या पर्यंत विशेषत्वानी न पोहोचलेला) हिंन्दुत्ववाद..त्यातील प्रमुख मुद्दे आणि सावरकरांच्या भाषणांच्या उद्धृतांसह आलेला आहे. भाषणाची शैली ही तेजस्वी तशीच मार्मिकही आहे. त्यामुळे काहि ठिकाणी आपलं मन दुखावलं तरी मेंदू सुखावेल अशी काहिशी अवस्था भाषण ऐकताना होते.
प्रतिक्रिया
सुरेख. अतिशय योग्य व्यक्तिच्या भाषणाचे कौतुक होतय.
रोचक
जबरदस्त .....
@आणि कधीही फोन करा. माणूस
लेख आणि प्रतिसाद आवडला.
ऐकतोय
सुरेख प्रास्तविक केलंय
मोरे सरांचं भाषण! ऐकायलाच हवं
...
निरर्थक आरोप करू नका.
या बाबत अगदी सहमत आहे. आणि
सर तेवढं कराच
येस... नक्कीच!
अआसाहेब, दुव्याबद्दल आभार.
धन्यवाद बुवा!
...
@पळशीकरांबद्दलची माहिती
बुवा