आज आत्ता मिसळपावचे मुखपृष्ठ दिसत नाहिये ! त्या जागी पान सापडले नाही असा मजकूर येत आहे. मात्र त्याच वेळी संकेतस्थळ योग्य पद्धतीने चाललेलं आहे.
असं होण्याचं कारण असं की मिसळपाव वर अचानक गर्दी वाढली की त्या सर्वांना सेवा देता यावी म्हणून मग जी जड पाने आहेत ती बाजूला ठेवलीजाऊन सर्वांना सेवा देता यावी हा या मागचा उद्देश्य आहे. पहिलं पान हे सर्वात जड असल्यामुळे आज ते दिसत नाहिये. मात्र थोड्या वेळाने ते आपसुक दिसायला लागेल.
जर का पुन्हा असं झालं तर आपल्याला वरच्या उजव्या मेन्युमधुन मिसळपाव वर सहज वावरता येईल. आज त्यात सदस्य प्रवेशाचा मेन्यु सुध्दा जोडला आहे. म्हणजे पहिलं पान नाही दिसलं तर काही अडचण येणार नाही.
आपल्या सूचनांचं स्वागत आहेच. :)