जी २ असा प्यादं पुढे घेऊन उंट कर्णात घ्यायची तयारी आनंदची. घोडा सी ६. मॅग्नुस लगोलग खेळला. वेळ घालवत नाहीये. कॅसल करेल असे वाटले होते.
मॅग्नुस दरवेळी आनंदला निर्णय घ्यायला भाग पाडतोय. आणि त्यानुसार खेळी करतोय.
आनंद जीई४ खेळलाय!
मॅग्नुस बराच वेळ घेतो़य. कॅसल केलाय. छोटा कॅसल. तो आधी लांबवायला बघत होता पण शेवटी आनंदने त्याला निर्णय घ्यायला भाग पाडले असे दिसते. अपेक्षेप्रमाणे आनंदचा पांढरा उंट कर्णात येऊन बसला जी २!
आनंदने राजाच्या बाजूने दुय्यम कर्णाला मोकळा केलाय. मॅग्नसचा काळा उंट आधीच पडलेला असल्याने त्याला वजीरानेच हल्ला करता येईल. हा काहीसा सापळा लावलाय का आनंदने?
आणि बी ४ खेळला मॅग्नुस.वजिराच्या बाजूला काउंटर प्ले जनरेट करायचा प्रयत्न आहे.
आनंद राजाच्या बाजूला मेटिंग नेट लावतोय. त्याला ते यशस्वी करायलाच हवे, नाहीतर वजिराच्या बाजूची प्यादी रोखणे अवघड होऊन बसेल!
आनंदकडून एफ प्यादे पुढे जाण्याचीच अपेक्षा आहे. ई, एफ आणि जी प्याद्यांच्या रोलर्कोस्टर पुढे काळ्याला चिरडून टाकणे हेच गरजेचे आहे. या महत्त्वाच्या क्षणी वजिराच्या बाजूला आनंदने त्याचे मोहोरे वळवू नयेत.
ए-४ कसे काय चालेल हे पाहणे आवडेल मला. यामुळे मॅग्नसच्या घोड्याला बी पट्टीत येण्यापासून रोखता येईल आणि त्याचे ए पट्टीतले प्यादेही निष्प्रभ होईल. आणि मॅग्नसचे बी प्यादे सरळ पुढे जाऊन हत्तीला त्रास देईल तरी हत्ती बी-२ मधे येऊन त्याला रोखता येईल. उलट त्या प्याद्याने आनंदचे सी प्यादे मारले तरी आनंदला लगेच काही करण्याची आवश्यकता नाही कारण तिथे वजीर नि हत्ती दोघेही त्याची पुढची पट्टी रोखून बसले आहेत.
घोड्याची बी-५ ही जागाच नेमकी ते प्यादे अडवून धरत होते. डी-५ वर आधीच मॅग्नसचे प्यादे असल्याने तो घोडा सी पट्टीतच अडकून पडला असता. एनिवे. शेवटी आनंदने तिकडचा सगळा हल्लाच मोडून काढला. आता मॅग्नसला फक्त बी प्यादयावर अवलंबून रहावे लागणार आहे.
वजिराच्या बाजूला त्याचा रेटा चालू ठेवणार का?
त्याची राजाची बाजू अगदी नाजूक झाली आहे. एफ प्यादे सहाव्या घरात आले तर अवघड आहे.
कदाचित तो सी३ वरचे प्यादे घेऊन घोडा बी ४ मधे आणून ते प्यादे पुढे रेटेल! म्हणजे आनंदला काहीवेळ तरी वजिराच्या बाजूला लक्ष देणे भाग पडावे.
घड्याळात चांगलाच मागे पडलाय २७ मिनिटे कमी आहेत आनंदपेक्षा! हे क्रिटिकल ठरु शकते कारण डाव ओपन पोझीशन नाहीये. काँप्लिकेटेड असल्याने प्रत्येक मूवला मॅग्नुसला विचार करणे भागच आहे.
मॅग्नसकाका लैच टाईम घालवताहेत. आता अठरा खेळ्यांना सुमारे ३५ मिनिटे आहेत. कदाचित पुढच्या चार-पाच खेळ्या महत्त्वाच्या असाव्यात. त्यांत त्याला सुटकेचा मार्ग सापडला तरच... म्हणून बहुधा तो चार-पाच खे़ळ्या अतिशय काळजीपूर्वक करेल असेल दिसते.
मॅग्नुस खेळलाच ती खेळी! तसा सोडणार नाहीच तो. आता आनंदची पुढची खेळी काय?
पुढे वजीर ए५ मधे आणून प्यादे रेटायचे आणि आनंदचा हत्ती मागेच अडकवून ठेवायचा अशी अटकळ आहे.
त्याला काहीही करुन आनंदचा वजीर एफ ४ आणि नंतर एच ४ असा जाऊ देणे परवडणारे नाही!
आता अचूक कॅलक्यूलेशन्स महत्त्वाची.
खेळून मॅग्नसने आपला घोडा निष्प्रभ झाल्याचे मान्यच केले आहे असे दिसते. जर बी आणि सी प्याद्यांची मारामारी झाली असती तर त्याला पुढे घुसायला संधी होती. आनंदने एफ पट्टीतील प्यादे आधी दामटल्याने त्याचे बी प्यादे घेणार नाही हे निश्चित झाल्याने मॅग्नसने ती आशा सोडून देऊन प्याद्याच्या प्रमोशनवर लक्ष केंद्रित केलेले दिसते. लवकरच त्याचा वजीर बी०६ मधे येऊन त्या प्याद्याला पाठिंबा देईल असा अंदाज आहे. याच वेळी तो आनंदच्या पुढे सरकू पाहणार्या प्याद्यांवर लक्ष ठेवून शकेल.
पण ए-५ हा दुसरा पर्यायही तितकाच त्रासाचा कारण मग उजव्या कोपर्यातील घडामोडींपासून वजीर किमान एक खेळी मागे पडतोय. ते अधिक धोकादायक ठरेल मॅग्नसला. कारण घोडा तसाही खेळाबाहेर आहे त्याचा. एका उंटाच्या बळावर राजाची बाजू सांभाळणे फारच तापदायक होते मग.
मला चेसमधले शष्प कळत नाही. पण लोकांचे प्रतिसाद बघुन वाटतयं
पांड्या, पांड्या, लेका ग्रँडमास्टर का नाही झालास. (पांड्या, पांड्या, लेका बालिष्टर का नाही झालास च्या चालीवर वाचावे)
असो. क्रिकेटमधे आम्हीपण फक्त तोंड्पाटीलकीच करतो म्हणा :)
गेले ९ डाव तुम्हा सर्वांच समालोचन वाचत होतो, चेस मधी खूप काळात नाही त्यामुळे वाचनमात्र सहभाग होता.
पण आज तुम्हा सर्वांप्रमाणे वाटत होते ( पट पाहून तर खात्रीच होती) कि विश्या जिंकेल :)
जिंकायला ६.५ / १२ पॉईट्स पाहिजेत .... आणि चेस मेंदुचा खेळ आहे ना ... कधी कोणाला नॉव्हेल्ती सुचेल सांगता येणार नाही ... पुढचे तीन्ही डाव आनंद जिंकायची शक्यता १२.५ % आहेच ना !!
दहाव्या डावाचा धागा न काढल्याबद्दल मनापासून माफी मागतो. :(
परंतु सामन्यातली आनंदची ऑलमोस्ट हरायला आलेली स्थिती आणि झोपेची कमतरता या दोन्ही गोष्टींनी माझ्या निश्चयावर शेवटी मात केली आणि मी उठू शकलोच नाही. असो, डाव बरोबरीत सुटला आणि मॅग्नुस निर्विवाद नवा विजेता म्हणून घोषितही झाला. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन.
९ नोवेंबरपासूनचे आधीचे नऊही डाव तुम्ही मिपाकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन माझ्या चालत्या समालोचनाला जो काही हातभार लावलेला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे! अन्यथा रात्री १.२० ला गजर लावून उठणे त्यापुढे दीड वाजल्यापासून ५.३० - ६.३० पर्यंत समालोचन करणे आणि पुढे ऑफिसला जाणे ही कसरत मला शक्य झाली असती असे वाटत नाही. परंतु तुमचा उत्साहच एवढा दांडगा होता आणि खेळातला रस अगदी भरभरुन दिसत होता त्यामुळे मी हे करु शकलो. सर्व सहभागी मेंबरांचे अनेक आभार. असाच लोभ असू द्या.
धन्यवाद रंगाशेठ.
समालोचनामुळे जबरदस्त मजा आली.
तुमच्याबरोबरच रमताराम, गिरीजा, अग्निकोल्हा इत्यादींनी अगदी उत्साहाने सहभाग घेतला त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद.
आनंद नेमका कुठे कमी पडला ह्याचे विश्लेषण करणारा एखादा धागा अवश्य येउ द्यात.
या संपूर्ण वर्ल्ड चँपियनशिपचे इतके सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण करणार्या या धाग्यावरील सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. काही कारणाने एखादा डाव बघता येणार नसेल तर मी केवळ मिसळपाववरील चर्चांवर अवलंबून असायचे. बुद्धिबळातील थरार कोणत्याही शारीरिक खेळापेक्षा कमी नाही याचा अनुभव घेता आला. :)
प्रतिक्रिया
21 Nov 2013 - 3:02 pm | चतुरंग
वजिराच्या प्याद्याने सुरुवात केली आहे.
21 Nov 2013 - 3:19 pm | अग्निकोल्हा
डि4 ओपनिंग असेल तर आज डाव विशिच्या बाजूने
21 Nov 2013 - 3:04 pm | ऋषिकेश
वाटच पाहत होतो धाग्याची.. दोन डावांपेक्षा वेगळी सुरवात
21 Nov 2013 - 3:07 pm | प्रसाद गोडबोले
पुढच्या चार डावात ३.५ पॉईंट पाहिजेत जिंकायला .... कमॉन आनंद
21 Nov 2013 - 3:10 pm | ऋषिकेश
चारातले दोन जिंकून + २ ड्रॉ असे ३ पॉइंही चालतील रे.. टायब्रेकरमध्ये बघु
कमॉन .. आज जिंकच
21 Nov 2013 - 3:11 pm | चतुरंग
एका प्याद्याची मारामारी झाली आहे. सी ४ प्यादे खेळून मॅग्नुसने आनंदचा उंट डी ३ मधे येणार नाही याची काळजी घेतली आहे.
21 Nov 2013 - 3:15 pm | चतुरंग
जी २ असा प्यादं पुढे घेऊन उंट कर्णात घ्यायची तयारी आनंदची. घोडा सी ६. मॅग्नुस लगोलग खेळला. वेळ घालवत नाहीये. कॅसल करेल असे वाटले होते.
मॅग्नुस दरवेळी आनंदला निर्णय घ्यायला भाग पाडतोय. आणि त्यानुसार खेळी करतोय.
आनंद जीई४ खेळलाय!
21 Nov 2013 - 3:21 pm | ऋषिकेश
मॅग्नस एवढा काय विचार करतोय? ही पोझिशन नवी नसावी
21 Nov 2013 - 3:21 pm | चतुरंग
विडो स्ट्रीम बोंबलतोय राव मधूनच. :(
21 Nov 2013 - 3:29 pm | चतुरंग
मॅग्नुस बराच वेळ घेतो़य. कॅसल केलाय. छोटा कॅसल. तो आधी लांबवायला बघत होता पण शेवटी आनंदने त्याला निर्णय घ्यायला भाग पाडले असे दिसते. अपेक्षेप्रमाणे आनंदचा पांढरा उंट कर्णात येऊन बसला जी २!
21 Nov 2013 - 3:30 pm | रमताराम
आनंदने राजाच्या बाजूने दुय्यम कर्णाला मोकळा केलाय. मॅग्नसचा काळा उंट आधीच पडलेला असल्याने त्याला वजीरानेच हल्ला करता येईल. हा काहीसा सापळा लावलाय का आनंदने?
21 Nov 2013 - 3:34 pm | चतुरंग
एवढा विचारात पडलेला दिसतोय. त्याची २१ मिनिटे झाली आहेत आणि आनंदची फक्त साडेनऊ!
21 Nov 2013 - 3:35 pm | रमताराम
दोघांच्या भूमिका बदललेल्या दिसताहेत. आनंद पटापट खेळ्या करतोय तर मॅग्नस प्रत्येक खेळीला वेळ घेतोय.
21 Nov 2013 - 3:57 pm | ऋषिकेश
पुन्हा घोडा नी उंटाचं एक्सचेंज का करत नाहिये मॅग्नस?
21 Nov 2013 - 4:00 pm | sagarpdy
var cbeOptions = { layout: "2", room: "2013-wcc", game: "09-Anand_Viswanathan-Carlsen_Magnus", annotations: true };
Live chess broadcast powered by ChessBomb and Chessdom
21 Nov 2013 - 4:06 pm | आनंद
आज काहितरी जबरदस्त बघायला मिळणार आहे अस वाटतय.
21 Nov 2013 - 4:07 pm | चतुरंग
इथेच डाव टाकलाय ते छान केलेत.
मध्यंतरी नेट तब्बल दहा मिंटे बोंबलल्याने काहीच दिसत नव्हते.
21 Nov 2013 - 4:09 pm | चतुरंग
पुढे काढून राजाच्या बाजूला आणायचा आहे. घोडा आणि उंट मारामारी झाली आणि मॅग्नुसने हत्ती आणला ए६ मधे.
21 Nov 2013 - 4:10 pm | चतुरंग
पुढे काढून राजाच्या बाजूला आणायचा आहे. घोडा आणि उंट मारामारी झाली आणि मॅग्नुसने हत्ती आणला ए६ मधे.
21 Nov 2013 - 4:10 pm | ऋषिकेश
एक्सचेंज नंतर पुढे काही चाल्लेय का? हाफिसात लिंक गंडलिये :(
21 Nov 2013 - 4:27 pm | ऋषिकेश
शक्यता अनेक आहेत. पण हे दोघेही ताकही इतके फुंकून पिताहेत..
आम्ही मधल्यामधे आशेवर टागलेलो!
काहितरी भन्नाट बघायला मिळेलसं वाट्टंय >> +१
21 Nov 2013 - 4:34 pm | चतुरंग
बहुतेक जी६ खेळेल. कारण राजाच्या बाजूचा हल्ला थोपवणे गरजेचे आहे.
21 Nov 2013 - 4:40 pm | ऋषिकेश
+१ असेच वाट्टेय
पण मग ही मंडळी इतका वेळ का घेतायत का नेटवर्क गंडलंय?
21 Nov 2013 - 4:42 pm | चतुरंग
मॅग्नुस खरंच अवघड परिस्थितीत जाऊ शकेल अशी शक्यता आहे.
21 Nov 2013 - 4:37 pm | चतुरंग
करण्यात आनंद ला अजूनतरी यश आलेले आहे. मॅग्नुस घड्याळातही आनंदपेक्षा २० मिनिटे मागे पडलाय.
एरवीचा तंगड्या पसरून बसणारा मॅग्नुस आज दिसत नाहीये! :)
21 Nov 2013 - 4:44 pm | चतुरंग
आणून आता मॅग्नुसची बी ५ अशी खेळायची धमकी आहे. प्याद्यांची मारामारी आणि नंतर हत्तींची मारामारी झाली तर घोडा ए६ मधे येऊन बी प्याद्याला सपोर्ट करु शकतो.
21 Nov 2013 - 4:48 pm | चतुरंग
आणि बी ४ खेळला मॅग्नुस.वजिराच्या बाजूला काउंटर प्ले जनरेट करायचा प्रयत्न आहे.
आनंद राजाच्या बाजूला मेटिंग नेट लावतोय. त्याला ते यशस्वी करायलाच हवे, नाहीतर वजिराच्या बाजूची प्यादी रोखणे अवघड होऊन बसेल!
21 Nov 2013 - 4:51 pm | चतुरंग
आनंदकडून एफ प्यादे पुढे जाण्याचीच अपेक्षा आहे. ई, एफ आणि जी प्याद्यांच्या रोलर्कोस्टर पुढे काळ्याला चिरडून टाकणे हेच गरजेचे आहे. या महत्त्वाच्या क्षणी वजिराच्या बाजूला आनंदने त्याचे मोहोरे वळवू नयेत.
21 Nov 2013 - 4:52 pm | रमताराम
ए-४ कसे काय चालेल हे पाहणे आवडेल मला. यामुळे मॅग्नसच्या घोड्याला बी पट्टीत येण्यापासून रोखता येईल आणि त्याचे ए पट्टीतले प्यादेही निष्प्रभ होईल. आणि मॅग्नसचे बी प्यादे सरळ पुढे जाऊन हत्तीला त्रास देईल तरी हत्ती बी-२ मधे येऊन त्याला रोखता येईल. उलट त्या प्याद्याने आनंदचे सी प्यादे मारले तरी आनंदला लगेच काही करण्याची आवश्यकता नाही कारण तिथे वजीर नि हत्ती दोघेही त्याची पुढची पट्टी रोखून बसले आहेत.
21 Nov 2013 - 5:01 pm | चतुरंग
कारण तिकडून घोडा येऊन प्याद्यांवरुन उडी मारुन घुसू शकतो आणि बीप्यादे उघड्या बी स्तंभातून हत्तीच्या मदतीने घुसू शकते.
21 Nov 2013 - 5:08 pm | रमताराम
घोड्याची बी-५ ही जागाच नेमकी ते प्यादे अडवून धरत होते. डी-५ वर आधीच मॅग्नसचे प्यादे असल्याने तो घोडा सी पट्टीतच अडकून पडला असता. एनिवे. शेवटी आनंदने तिकडचा सगळा हल्लाच मोडून काढला. आता मॅग्नसला फक्त बी प्यादयावर अवलंबून रहावे लागणार आहे.
21 Nov 2013 - 4:59 pm | चतुरंग
एक्सचेंज झाली! हत्तीही गेले. आता फुलबाज्या, भुईनळे दिसायला हरकत नाही!
21 Nov 2013 - 5:02 pm | चतुरंग
आनंद इज रिअली डिटरमिंड टुडे!!
एफ५ खेळलाय आनंद!! गोइंग ऑल सिलिंडर्स ऑन!!!
21 Nov 2013 - 5:09 pm | चतुरंग
वजिराच्या बाजूला त्याचा रेटा चालू ठेवणार का?
त्याची राजाची बाजू अगदी नाजूक झाली आहे. एफ प्यादे सहाव्या घरात आले तर अवघड आहे.
कदाचित तो सी३ वरचे प्यादे घेऊन घोडा बी ४ मधे आणून ते प्यादे पुढे रेटेल! म्हणजे आनंदला काहीवेळ तरी वजिराच्या बाजूला लक्ष देणे भाग पडावे.
21 Nov 2013 - 5:14 pm | चतुरंग
घड्याळात चांगलाच मागे पडलाय २७ मिनिटे कमी आहेत आनंदपेक्षा! हे क्रिटिकल ठरु शकते कारण डाव ओपन पोझीशन नाहीये. काँप्लिकेटेड असल्याने प्रत्येक मूवला मॅग्नुसला विचार करणे भागच आहे.
21 Nov 2013 - 5:17 pm | तिरकीट
हे कारलं झोपलं का काय?
21 Nov 2013 - 5:17 pm | रमताराम
मॅग्नसकाका लैच टाईम घालवताहेत. आता अठरा खेळ्यांना सुमारे ३५ मिनिटे आहेत. कदाचित पुढच्या चार-पाच खेळ्या महत्त्वाच्या असाव्यात. त्यांत त्याला सुटकेचा मार्ग सापडला तरच... म्हणून बहुधा तो चार-पाच खे़ळ्या अतिशय काळजीपूर्वक करेल असेल दिसते.
21 Nov 2013 - 5:21 pm | चतुरंग
मॅग्नुस खेळलाच ती खेळी! तसा सोडणार नाहीच तो. आता आनंदची पुढची खेळी काय?
पुढे वजीर ए५ मधे आणून प्यादे रेटायचे आणि आनंदचा हत्ती मागेच अडकवून ठेवायचा अशी अटकळ आहे.
त्याला काहीही करुन आनंदचा वजीर एफ ४ आणि नंतर एच ४ असा जाऊ देणे परवडणारे नाही!
आता अचूक कॅलक्यूलेशन्स महत्त्वाची.
21 Nov 2013 - 5:22 pm | चतुरंग
हत्ती एफ २ खेळेल म्हणजे बी२ ही रोखली जाईल आणि पुढच्या खेळीला वजीर एफ ४?
21 Nov 2013 - 5:24 pm | रमताराम
खेळून मॅग्नसने आपला घोडा निष्प्रभ झाल्याचे मान्यच केले आहे असे दिसते. जर बी आणि सी प्याद्यांची मारामारी झाली असती तर त्याला पुढे घुसायला संधी होती. आनंदने एफ पट्टीतील प्यादे आधी दामटल्याने त्याचे बी प्यादे घेणार नाही हे निश्चित झाल्याने मॅग्नसने ती आशा सोडून देऊन प्याद्याच्या प्रमोशनवर लक्ष केंद्रित केलेले दिसते. लवकरच त्याचा वजीर बी०६ मधे येऊन त्या प्याद्याला पाठिंबा देईल असा अंदाज आहे. याच वेळी तो आनंदच्या पुढे सरकू पाहणार्या प्याद्यांवर लक्ष ठेवून शकेल.
21 Nov 2013 - 5:32 pm | चतुरंग
बी प्याद्यामागे वजीर आणून ते रेटणे एवढेच मॅग्नुसच्या हातात आहे कारण घोडा डावातून बाहेर गेल्यातच जमा आहे, आत्तातरी.
21 Nov 2013 - 5:43 pm | चतुरंग
वजीर बी ६ मधे येणार नाही कारण मग पांढरा उंट डी ५ प्यादे मारुन आत घुसतो! तो आला तर ए५ .
21 Nov 2013 - 5:48 pm | रमताराम
पण ए-५ हा दुसरा पर्यायही तितकाच त्रासाचा कारण मग उजव्या कोपर्यातील घडामोडींपासून वजीर किमान एक खेळी मागे पडतोय. ते अधिक धोकादायक ठरेल मॅग्नसला. कारण घोडा तसाही खेळाबाहेर आहे त्याचा. एका उंटाच्या बळावर राजाची बाजू सांभाळणे फारच तापदायक होते मग.
21 Nov 2013 - 5:36 pm | चतुरंग
मला वाटते एच ४ असा अॅटॅक चालू शकेल का?
त्याला हल्ला थोडा रोखूनच धरावा लागेल असे दिसते कारण बी प्यादे डेंजरस आहे हे नक्की.
21 Nov 2013 - 5:47 pm | चतुरंग
घड्याळ बघावे लागणार. बराच वेळ घेतलाय आनंदने या खेळीला. जवळपास २३ मिनिटे!!
21 Nov 2013 - 5:52 pm | चतुरंग
आनंद जबरा विचारात पडलाय! मॅग्नुसने त्याचे टाईम प्रेशर आनंदवर ढकलण्यात यश मिळवले आहे.
21 Nov 2013 - 5:54 pm | रमताराम
परत ओवरथिंकिंग मधे अडकणार की काय? (नखं खाणारी स्मायली)
21 Nov 2013 - 5:58 pm | चतुरंग
मला तीच चिंता लागून राहिली आहे. कारण शेवटी वेळ कमी पडला तर चांगल्या खेळ्या न हुडकता आल्यामुळे डाव ड्रॉ झाला तर गेलेच की सगळे मुसळ केरात!
21 Nov 2013 - 5:56 pm | अग्निकोल्हा
बहुदा. त्याचा परीणाम संपायच्या आत चाली कर म्हणावे. यस यु कैन यस यु वील विन टुडे
21 Nov 2013 - 5:59 pm | रमताराम
येस यू कॅन.... येस यू कॅन... येस यू कॅन...
-रमता ओबामा.
21 Nov 2013 - 6:07 pm | अग्निकोल्हा
नॉट ओबामा.
यस ही कैन, यस हीवलिन !
21 Nov 2013 - 6:03 pm | चतुरंग
आनंद वजीर एफ ४ घुसला!! बी प्याद्याची थ्रेट आनंदने पॅरी केली असे दिसते!!
21 Nov 2013 - 6:03 pm | मालोजीराव
एफ ६
21 Nov 2013 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जिंक रे बाबा
21 Nov 2013 - 6:06 pm | चतुरंग
मॅग्नुसचा. घोडा सी७ मग ई८ आणि मग जी प्यादे सरकवून जी७ मधे आणायचा प्लॅन आहे.
वॉव प्यादे एफ ६!! फँटास्टिक मूव!! आनंद ईज ऑन द रोल!! कम ऑन विशी!!
21 Nov 2013 - 6:08 pm | चतुरंग
आनंदने बहुदा चेकमेट पर्यंतचे वेरिएशन कॅलक्यूलेट केलेले असणार त्याशिवाय आनंदने घेतलेला ३५ मिनिटांचा वेळ जस्टिफाय होत नाही!
21 Nov 2013 - 6:10 pm | चतुरंग
मॅग्नुसचा घोडा ई८ आता वजीर एच ६ आणि मग हत्ती एफ ४ आणि एच४ की संपला डाव!!
21 Nov 2013 - 6:12 pm | राजो
हा सुध्दा डाव बरोबरीतच सुटणार बहुदा
21 Nov 2013 - 6:12 pm | अग्निकोल्हा
अभिनंदन!
21 Nov 2013 - 6:15 pm | रमताराम
तुमचं टाईम मशीन. ;)
21 Nov 2013 - 6:41 pm | अग्निकोल्हा
जितकी आनंद ला चेकमेट ची घाई :( अक्षम्य घाई.
21 Nov 2013 - 6:13 pm | चतुरंग
काय विचार करतोय? मॅग्नुसचे प्यादे वजीर झाले तरी काही फरक पडत नाही!!
21 Nov 2013 - 6:13 pm | मृत्युन्जय
यावेळेसही ड्रॉ होणार. दुसरा चान्स असलाच तर वेळेमुळे आनंद हरण्याचाच आहे. आनंदची जिंकण्याची शक्यता फारच कमी वाटते आहे. पण सुंदर खेळला आनंद आज
21 Nov 2013 - 6:19 pm | चतुरंग
हत्ती एफ ४!! दुसरा वजीर झाला!! चेक आणि आता उंट मधे घातला.
विशी ब्लंडर्ड घोडा घातलान मधे!!!! डाव घालवला राव........
21 Nov 2013 - 6:20 pm | रमताराम
आनंद हॅज ब्लंडरड. टेरिबल ब्लंडर.
21 Nov 2013 - 6:20 pm | सुहासदवन
NF१ ही चाल कमजोर म्हणून दाखवतेय
21 Nov 2013 - 6:21 pm | चतुरंग
शिट!!!!!! आनंदने हात्तातला डाव घालवला ??????????????? टू बॅड.....
21 Nov 2013 - 6:23 pm | मालोजीराव
म्याग्णस भाऊ कार्लसन नवीन विश्वविजेता !
21 Nov 2013 - 6:24 pm | चतुरंग
चँपियन्शिप विशीची. डाव हाता होता रे का केलंस असं??/ लै वाईट वाटतंय राव!!
21 Nov 2013 - 6:34 pm | मृत्युन्जय
॑अर्रे उंट का नाही घातला मध्ये? चँपियनशिपला अशी चूक कशी रे केलीस आनंदा.
21 Nov 2013 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चेक बसल्यावर सर्वांना कळतंय घोड्याच्या ऐवजी उंट टाकून चेक मोडायला पाहिजे होता. आता त्या जर तरला काही अर्थ नाही.
जिंकणारा डाव आनंद हरला.
-दिलीप बिरुटे
22 Nov 2013 - 8:44 am | नि३
तुमच्या भावना समजु शकतो...पण उंट मधे घातला असता तरी जिंकण वाटते तेवढ सोप नाही आनंद साठी..
हा व्हीडीओ बघा , उंट खेळ्ल्यावर सुद्धा भरपुर व्हेरीएशन्स आहे..
http://www.youtube.com/watch?v=JotVgV-XeaQ
22 Nov 2013 - 9:07 am | अग्निकोल्हा
म्हणुनच त्याने बिनधास्त वजीर होऊ दिला. त्याचे चेकमेट्चे गणित फक्त एका चालीने मागे पडले
22 Nov 2013 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निथ्री.... दुव्याबद्दल थ्यांक्स....!
-दिलीप बिरुटे
21 Nov 2013 - 6:35 pm | सौंदाळा
मला चेसमधले शष्प कळत नाही. पण लोकांचे प्रतिसाद बघुन वाटतयं
पांड्या, पांड्या, लेका ग्रँडमास्टर का नाही झालास. (पांड्या, पांड्या, लेका बालिष्टर का नाही झालास च्या चालीवर वाचावे)
असो. क्रिकेटमधे आम्हीपण फक्त तोंड्पाटीलकीच करतो म्हणा :)
21 Nov 2013 - 6:51 pm | गजानन५९
गेले ९ डाव तुम्हा सर्वांच समालोचन वाचत होतो, चेस मधी खूप काळात नाही त्यामुळे वाचनमात्र सहभाग होता.
पण आज तुम्हा सर्वांप्रमाणे वाटत होते ( पट पाहून तर खात्रीच होती) कि विश्या जिंकेल :)
21 Nov 2013 - 7:16 pm | मी-सौरभ
आता पुढचे सामने होणार का??
21 Nov 2013 - 8:00 pm | प्रसाद गोडबोले
जिंकायला ६.५ / १२ पॉईट्स पाहिजेत .... आणि चेस मेंदुचा खेळ आहे ना ... कधी कोणाला नॉव्हेल्ती सुचेल सांगता येणार नाही ... पुढचे तीन्ही डाव आनंद जिंकायची शक्यता १२.५ % आहेच ना !!
21 Nov 2013 - 8:02 pm | प्रसाद गोडबोले
३.७०%
21 Nov 2013 - 8:14 pm | निशांत५
We need to understand change is constant, Magnus would be New Champ.
22 Nov 2013 - 3:21 pm | अग्निकोल्हा
?
22 Nov 2013 - 3:53 pm | अविनाश पांढरकर
मी पण वाट पाहतोय
22 Nov 2013 - 4:42 pm | संजय क्षीरसागर
सध्या इथे पाहा आनंदच्या २५व्या मूव्हच्या प्रतिक्षेत.
23 Nov 2013 - 11:53 am | चतुरंग
दहाव्या डावाचा धागा न काढल्याबद्दल मनापासून माफी मागतो. :(
परंतु सामन्यातली आनंदची ऑलमोस्ट हरायला आलेली स्थिती आणि झोपेची कमतरता या दोन्ही गोष्टींनी माझ्या निश्चयावर शेवटी मात केली आणि मी उठू शकलोच नाही. असो, डाव बरोबरीत सुटला आणि मॅग्नुस निर्विवाद नवा विजेता म्हणून घोषितही झाला. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन.
९ नोवेंबरपासूनचे आधीचे नऊही डाव तुम्ही मिपाकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन माझ्या चालत्या समालोचनाला जो काही हातभार लावलेला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे! अन्यथा रात्री १.२० ला गजर लावून उठणे त्यापुढे दीड वाजल्यापासून ५.३० - ६.३० पर्यंत समालोचन करणे आणि पुढे ऑफिसला जाणे ही कसरत मला शक्य झाली असती असे वाटत नाही. परंतु तुमचा उत्साहच एवढा दांडगा होता आणि खेळातला रस अगदी भरभरुन दिसत होता त्यामुळे मी हे करु शकलो. सर्व सहभागी मेंबरांचे अनेक आभार. असाच लोभ असू द्या.
(कृतज्ञ) रंगा
23 Nov 2013 - 12:10 pm | प्रचेतस
धन्यवाद रंगाशेठ.
समालोचनामुळे जबरदस्त मजा आली.
तुमच्याबरोबरच रमताराम, गिरीजा, अग्निकोल्हा इत्यादींनी अगदी उत्साहाने सहभाग घेतला त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद.
आनंद नेमका कुठे कमी पडला ह्याचे विश्लेषण करणारा एखादा धागा अवश्य येउ द्यात.
26 Nov 2013 - 10:12 am | अग्निकोल्हा
हे घ्या
23 Nov 2013 - 12:14 pm | पिशी अबोली
या संपूर्ण वर्ल्ड चँपियनशिपचे इतके सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण करणार्या या धाग्यावरील सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. काही कारणाने एखादा डाव बघता येणार नसेल तर मी केवळ मिसळपाववरील चर्चांवर अवलंबून असायचे. बुद्धिबळातील थरार कोणत्याही शारीरिक खेळापेक्षा कमी नाही याचा अनुभव घेता आला. :)
धन्यवाद.
26 Nov 2013 - 11:21 am | अविनाश पांढरकर
मी हा खेळ खेळणे सोडुन दिले होते, आता परत चालू केले आहे.
धन्यवाद!!!!!
26 Nov 2013 - 5:03 pm | प्रसाद गोडबोले
आता वाट पहायची कॅन्डीडेट टुर्नामेन्ट मार्च २०१४ !!
होप , आनन्द राइझेस लाईक फ्हिनिक्स :)
26 Nov 2013 - 6:51 pm | सिद्धेश महजन
मुन्गुस कोणति चाल असते?