आनंद - कार्लसन डाव ९

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
21 Nov 2013 - 3:01 pm

डाव ९. अतिशय महत्त्वाचा डाव. एक दिवसाची विश्रांती, आनंदची पांढरी मोहोरी आणि ५-३ अशी पिछाडी.
काय खेळणार आनंद?
पहिली मूव कोणती?
ई४ का?

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

सिद्धेश महजन's picture

26 Nov 2013 - 6:59 pm | सिद्धेश महजन

आय मिन हा मोग्नुस कोणत्या चालिने खेळला हा डाव? आक्रामक कि थोडा बचावात्मक?
बाकि कोणि हि चाल सान्गु शकेल का कि ज्यात राजा आणि हत्ति परस्पर आपलि जागा बदलतात? या चालिला काय म्हणतात? ति केव्हा खेळलि जाते. नियम?

हा धागा वाचच... http://misalpav.com/node/26130

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2014 - 9:17 pm | प्रसाद गोडबोले

कॅन्डीडेट्स टुर्नामेन्ट मधे आपला आनंद जिंकला रे !!
अरोनियन , क्रॅमनिक सारख्या दिग्गज लोकांना हरवुन जिंकला :)

आता मॅग्नस ला परत लढत देईल .... बघुया काय होते ते !!

आत्मशून्य's picture

4 Apr 2014 - 10:52 pm | आत्मशून्य

अर्थातच यावेळी मॅग्नुस ८०% पराभुत होइल. मागच्यावेळी आनंद ओव्हर काँफिडन्समधे होता, मी कीती वर्ष खेळतोय, मी सिनीअर आहे, मला काय तयारीची गरज, वगैरे वगैरे भांगडभ्रमामधे तो असल्याने त्याचा घात होणे अटळ होते. आणी मुख्य म्हणजे त्याच्या कंपुने त्याचा घात केला मॅग्नुसच्या तयारीची कल्पनाच तेथे कोणाला आली नाही. यावेळी आनंद विल रॉक.

प्रसाद१९७१'s picture

7 Apr 2014 - 6:59 pm | प्रसाद१९७१

मागच्यावेळी आनंद ओव्हर काँफिडन्समधे होता

मला नाही वाटत आनंद ओव्हर कोंन्फिडन्स मधे असेल असे. तश्या स्वभावाचा तो वाटत नाही.
खरे तर त्याची तयारी निट नाहीये असेच वाटत होते पहिल्यापासुन.

बॅटमॅन's picture

7 Apr 2014 - 6:33 pm | बॅटमॅन

ऐला जब्रीच!!!!

आता पाहू काय होते ते, मॅग्नुसला आनंद कडवी झुंज देईल हे नक्की!!!

हे थोडेसे धाडसी विधान आहे. गेल्यावेळी पण असेच वाटत होते. बघुया आता आनंद कशी तयारी करतो ते.