आनंद - कार्लसन डाव ७

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
18 Nov 2013 - 3:00 pm

४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी.

कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत. कदाचित क्रिकेट्पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे!
चला गेम बघूयात.

Play Online Chess[Event "FWCM 2013"][Site "Chennai"][Date "2013.11.18"][Round "7"][White "Anand, Viswanathan"][Black "Carlsen, Magnus"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2775"][BlackELO "2870"]%Created by Caissa's Web PGN Editor1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. d3 Bc5 5. Bxc6 dxc6 6. Nbd2 Bg4 7. h3 Bh58. Nf1 Nd7 9. Ng3 Bxf3 10. Qxf3 g6 11. Be3 Qe7 12. O-O-O O-O-O 13. Ne2 Rhe814. Kb1 b6 15. h4 Kb7 16. h5 Bxe3 17. Qxe3 Nc5 18. hxg6 hxg6 19. g3 a5 20.Rh7 Rh8 21. Rdh1 Rxh7 22. Rxh7 Qf6 23. f4 Rh8 24. Rxh8 Qxh8 25. fxe5 Qxe5 26.Qf3 f5 27. exf5 gxf5 28. c3 Ne6 29. Kc2 Ng5 30. Qf2 Ne6 31. Qf3 Ng5 32. Qf2Ne6 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384842384").value=document.getElementById("cwvpg_1384842384").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384842384").submit();

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:02 pm | चतुरंग

घोडा एफ ३, घोडा सी ६ मागल्या डावासारखीच सुरुवात रॉय लोपेझ

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 3:11 pm | मृत्युन्जय

परत रोय लोपेझ? का?

डावात खेचायला हवे. आक्रमक खेळल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण कार्लसनला काठावर बसून भागणार आहे!

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:09 pm | रमताराम

ही बरीचशी परिचित खेळी. आल्याआल्या उंटाला हुसकावून लावणे. अगदी नवीन नवीन बुद्धिबळ खेळायला लागलो तेव्हा 'उंट इतका जवळ येतो म्हणजे काय?' असं म्हणत त्याला ताबडतोब हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जाई त्याची आठवण झाली. :)

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:11 pm | चतुरंग

अगदी, अगदी!!
चल हाकल मागे असा आविर्भाव चेहेर्‍यावरती!! :)

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:09 pm | चतुरंग

सायकॉलॉजिकल लढाई जिंकण्याचा मार्ग. आनंद्ला वेगळ्या खेळ्या हुड्कल्याच पाहिजेत.
आतापर्यंतच्या सगळ्या डावात आनंदची प्यादे रचना दुबळी पडल्याने तो एंडगेमला अडचणीत आला होता. तो भाग त्याला यावेळी सांभाळावा लागेल.

कार्लसनने उंट जी३ मध्ये आणून आक्रमणाचा इरादा पुरेसा स्पष्ट केला आहे आजही.

अग्निकोल्हा's picture

18 Nov 2013 - 3:11 pm | अग्निकोल्हा

माग्नुस फ़ेवोरिट आहे पण हा डाव विशिने जिंकावा तरच चुरस राहिल!

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:12 pm | रमताराम

त्यांने उंट एच पट्टीत नेऊन पिन कायम राखला. आनंद इतक्यातच जी प्यादे पुढे आणणार नाही असा त्याचा - वाजवी - अंदाज आहे. कारण तसे केले तर त्याला उजवीकडे कॅसल-इन करण्याचा पर्याय जरा दुबळा होऊन जातो.

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:14 pm | रमताराम

वजीर पुढे सरकून राजाला पर्यायी जागा देत नाही तोवर मेट-थ्रेट (क्वीन ई-४ आणि नंतर क्वीन x एफ-२ ने येणार) वाचवण्यासाठी कॅसल हा पर्याय त्याला हाताशी ठेवावा लागेल.

आज आनंदला फायद्याचे आहे. कार्लसन ज्या प्रकारे बसलाय ते बघण्यासारखे आहे! इतका कॅज्युअल बसलाय तो की कुठल्याशा क्लबात कॉफीटेबल खेळ चालू असावा. आनंदला लक्ष फक्त पटावर ठेवायचे आहे. आणि जिंकायचे आहे.

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:16 pm | रमताराम

पुन्हा एकवार घो एफ-१? दुसर्‍या डावाप्रमाणे पुन्हा घोड्यांना जागा शोधण्यात आनंद वेळ घालवणार की काय?

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:21 pm | चतुरंग

कारण घोडी राजाच्या बाजूला हल्ला करुन नेणे महत्त्वाचे आहे. कार्लसनने घोडा मारला. तो डाव सोपा करायला बघतोय.
वजिराने घोडा घेतला. जी ६ प्यादे सरकले आता घोड्याच्या उड्या थांबवल्यान त्याने.

सुहासदवन's picture

18 Nov 2013 - 3:16 pm | सुहासदवन

आज कॅसलिंग पण करू देणार नाही बहुतेक कार्लसन

आनंदला घोडा जी ३ खेळून उंट मागे हाकलायला हवा. आज किल्लेकोट अजून टाळलेले आहेत. कदाचित आता काळा जी ६ खेळेल.

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2013 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले

आज जिंकायलाच हवे ....

अग्निकोल्हा's picture

18 Nov 2013 - 3:20 pm | अग्निकोल्हा

मस्तच चाल आहे विशिची! कालुचा अंदाज चुकायला सुरुवात समजायची काय ?

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2013 - 3:22 pm | प्रसाद गोडबोले

आज मी ऑफीसात आहे , कोणतीही स्पोर्ट साईट ओपन होत नाहीये :( कोणी तरी इथे खेळ्या टाकेल काय ? प्लीझ

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:34 pm | रमताराम

फक्त बोर्ड आहे, वीडिओ नाही. त्यामुळे बॅण्डविड्थ कमी असली तरी चालेल. http://www.chessdom.com/world-chess-championship-2013-live/

सुहासदवन's picture

18 Nov 2013 - 3:24 pm | सुहासदवन
प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2013 - 3:27 pm | प्रसाद गोडबोले

हे ही ओपन होत नाहीये :(

आजपासून मी बघतोय ना खेळ आणि हा धागा.. आता आनंद जिंकेल बघा ;)

बाकी रंगराव.. आभार

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:27 pm | चतुरंग

ऋष्या तुझ्या तोंडात हत्ती, उंट, घोडे पडोत!! ;)

मृत्युन्जय's picture

18 Nov 2013 - 3:29 pm | मृत्युन्जय

किती अश्लील ते

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:32 pm | चतुरंग

तोंडात साखर पडो च्या ऐवजी बुद्धीबळ खेळतोय म्हणून तसे म्हंटले. असो. मला डावात जास्त इंटरेस्ट आहे!

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:30 pm | रमताराम

तुला हव्या त्या ठिकाणी पोटभर मिसळ खाऊ घालेन. हत्तीवरून मिरवणूक काढेन तुझी. होऊ दे खरचं.

छोटा डॉन's picture

18 Nov 2013 - 3:24 pm | छोटा डॉन

मागच्या ३ सामन्यात असेच धावते समालोचन देऊन आम्हाला अगणित आनंद दिल्याबद्दल ररा, रंगाशेठ आणि इतर सर्वांचे आभार.
साला टिव्हीवरची कॉमेंट्री ऐकायला लै मज्जा येते.

- छोटा डॉन

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:26 pm | चतुरंग

जाम वाढलाय! विडिओ थांबतोय मधेमधे. उंट ई३? उंटांचे एक्सचेंज का करतोय आनंद? वजिराने मारुन मग एच ६ असे घुसायचा प्रयत्न आहे का?
वजीर जी ४ अशी जास्तडायनामिक होती. किंबहुना आज ओपनिंग सुद्धा दुसरे करायला हवे होते!

आतिवास's picture

18 Nov 2013 - 3:27 pm | आतिवास

1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. d3 Bc5 5. Bxc6 dxc6 6. Nbd2 Bg4 7. h3 Bh5 8. Nf1 Nd7 9. Ng3 Bxf3 10. Qxf3 g6 11. Be3 *

हा प्रतिसाद गिरीजा यांच्या प्रतिसादाला होता - तोवर मध्ये बरेच प्रतिसाद आले :-)

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2013 - 3:31 pm | प्रसाद गोडबोले

धन्यवाद धन्यवाद !!

खेळ्याबघुन बर्‍यापैकी बोर्ड इमॅजिन करता येतोय

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:29 pm | चतुरंग

असं दिसतंय कारण राजाच्या बाजूला प्यादी रेटायची असली तर ते सोयीचे पडेल.
आता बहुतेक ०-०-० आणि त्यानंतर एच४ असे प्यादे पुढे सरकेल असा अंदाज.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:35 pm | चतुरंग

आता कार्लसनला चॉइस करायचाय कॅसल कुठल्याबाजूला?
तोही बहुदा तेच करेल. येस! त्याचेही लाँग कॅसल.
मॅग्नुस त्या त्या खेळीसाठी जे आवश्यक आहे तेवढेच करतो आहे. जास्त लांबवर विचारकरुन डोके शिणवून घेत नाहीये!

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:38 pm | रमताराम

कॅसल्स. लांबणार डाव पहिल्या सहा प्रमाणेच. (बायली या वीडिओला काय होतंय. बंद पडतोय सारखा. आणि पुन्हा चालू होतो तेव्हा पुन्हा मागचेच संवाद ऐकू येतायत.)

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:39 pm | चतुरंग

मलाही असेच दिसतेय दोन खेळ्या मागची कॉमेंट्री!

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:38 pm | चतुरंग

जी प्यादे पुढे ढकलायची तयारी सुरु झाली बहुदा.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:40 pm | चतुरंग

ती खेळी आनंदसाठी महत्त्वाची आहे. पटाच्या मध्यात डाव कॉम्प्लिकेट करणे आवश्यक.

अग्निकोल्हा's picture

18 Nov 2013 - 3:40 pm | अग्निकोल्हा

.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:45 pm | चतुरंग

हत्ती आणणार ई८ मधे.

आणलाच की त्यानं....कारण कळलं नाही पण...

ई५ प्याद्याने ते मारायचे आणि मग ई४ वरचे आनंदचे प्यादे वजीर, हत्ती असे डबल जोरात येते

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:45 pm | रमताराम

हे हिडो बोंबललं की पार.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:51 pm | चतुरंग

रिफ्रेश करत राहा सारखं, मला ते करावे लागते आहे अधून मधून

रमताराम's picture

18 Nov 2013 - 3:54 pm | रमताराम

परत परत तीच कामेंट्री ऐकायला गावतेय. Grrrrrrrrrrrrrrrr

रमताराम's picture

18 Nov 2013 - 4:09 pm | रमताराम

आता झाले चालू.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:48 pm | चतुरंग

जी ४ असे प्यादे टाकेल का? कारण मोहोरी हलवण्यात काही मतलब दिसत नाहीये.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:50 pm | चतुरंग

राजा बी १ मधे गेला. ए२ मधले प्यादे सपोर्ट केले शिवाय पुढे मारामारी झाली तर राजा उघडा पडायला नको. मॅग्नुस बहुदा कॉपीकॅट स्टाईलने त्याचाही राजा हलवेल बी८ मधे.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 3:59 pm | चतुरंग

एच प्यादे सरकवले आनंदने. उत्तम. आता उंट जी ५ अशी धमकी.
कारण कार्लसन घोडा बी८ ला न्यायला बघत होता ती खेळी थांबली.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:06 pm | चतुरंग

प्यादे एच ५ आता हत्ती पुढे काढून ई४ प्याद्याला सपोर्ट करायचा इरादा दिसतोय.
मॅग्नुसने उंट मारला. पुढल्या २ खेळ्या चटचट झाल्यात. एच प्यादी पटावरुन गेलीत.
काळ्याचा डाव सॉलिड आहे. अजूनतरी काही वीकनेस नाही.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:11 pm | चतुरंग

फार हुषार आहे. डाव लाँग एंडगेमम्धे नेणे हे त्याचे उद्दिष्ट तो साध्य करतोय. आनंदला प्यादी सुद्धा सहज सरकवता येणार नाहीत. रुक एंडगेम तर आनंदसाठी चांगला नाहीच्.\जी ३ प्यादे सरकवले.

अग्निकोल्हा's picture

18 Nov 2013 - 4:21 pm | अग्निकोल्हा

...

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:24 pm | चतुरंग

मग डी ३ घर दुबळे होते. शिवाय एफ४ वरती मारामारी झाली तर घोडा मदतीला नाहीये.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:22 pm | चतुरंग

पहिल्यांदा मॅग्नुस विचारात पडलेला दिसतोय.
गुरुची विद्या गुरुला करण्याशिवाय आनंदकडे पर्याय दिसत नाही. तुला लाँग एंडगेम हवाय का घे मग आणि त्यातही मी जिंकून दाखवतो!

अन कार्लसन आज ती चुक करेल अशी चिन्हे आहेत.

आज त्याला चुक करावीच लागेल! आनंद आज जिंकणार आहे :)

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:29 pm | चतुरंग

या डावात अजून तरी तसे दिसले नाहीये..

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:28 pm | चतुरंग

या संपूर्ण सामन्यात कार्लसन आनंदला कोणत्याही डावात फार मोठे पोझीशनल अ‍ॅडवांटेज घेऊ देणार नाही त्यामुळे होम प्रिपरेशनचा फारसा उपयोग नाही. काय खेळायचे ते आत्ता इथे पटावर.
मॅग्नुस खेळलाय ए ५! नेहेमीप्रमाणेच अनपेक्षित खेळी. तो राजाच्या बाजूला प्याद्यांची मोर्चे बांधणी करतच नहिये. सध्या जागा बळकावणे आणि वेटिंग मूव, आनंदला आव्हान आहे तुझा प्लॅन दाखव!

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:34 pm | चतुरंग

आक्रमक खेळी हत्ती एच ७! आता हत्तींची मारामारी होणार का? दुसरा हत्ती एच स्तंभात आणून हत्तींची मारामारी झाली. आता वजीर एफ ६ असा घेणार मॅग्नुस.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:44 pm | चतुरंग

आता मॅग्नुस बहुदा हत्ती एच ८ आणि हत्तींचे एक्स्चेंज कारायला लावणार.

रमताराम's picture

18 Nov 2013 - 4:46 pm | रमताराम

हत्ती एक्स्चेंज करावेच लागणार. मॅग्नस ड्रॉ साठीच खेळतोय हे स्पष्ट झाले.

वजीर कोपच्यात! आता ए३ असे प्यादे खेळून राजाला जागा करुन घ्यायला हवी.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:48 pm | चतुरंग

आनंदने फक्त एक गोष्ट साध्य केली आहे की त्याची प्याद्यांची रचना उअत्तम आहे. आणि मॅग्नुसचे दी प्यादे डबल आहे. एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्याला विजय मिळवायचा आहे!!

रमताराम's picture

18 Nov 2013 - 4:53 pm | रमताराम

त्या डबल झालेल्या प्याद्यांनीच उत्तर कोट करून ठेवला आहे त्याच्या राजासाठी. याउलट आनंदचा राजा शेवटच्या पट्टीत असल्याने आणि पुढची तीनही प्यादी जागीच असल्याने लास्ट-फाईल चेक चा धोका कायम ध्यानात ठेवून चाल करावी लागते आहे. हे बंधन काहीसे परवाच्या एच पट्टीतला बंधनासारखे ठरू नये म्हणजे मिळवली.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:55 pm | चतुरंग

स्थितीत बरोबर आहे. परंतु एंडगेम मधे त्याचे भांडवल करणे महत्त्वाचे ठरणार आहे, आनंदसमोर दुसरा पर्याय नाहीच आहे!

रमताराम's picture

18 Nov 2013 - 4:50 pm | रमताराम

आनंदने ई प्यादे घेण्याची घाई का केली कोण जाणे. कोपर्‍यात गेलेला वजीर पुन्हा सक्रीय झाला मॅग्नसचा. शेवटच्या फळीतला मेट-थ्रेट वाचवायला इतर पर्याय होते. खरंतर घोडा पुरेसा आहे. आणि घोड्यासाठी वजीर अडकवून ठेवणे परवडले नसते मॅग्नसला. :(

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:53 pm | चतुरंग

दुसरा पर्याय तरी कुठे होता?

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:51 pm | चतुरंग

झपाट्याने ड्रॉकडे निघालाय असे दिसते. आता कार्लसन एफ ५ अशी धमकी देतोय. त्यामुळे एफ ३ मधे वजीर.

आनंद डी ४ का खेळ्ला नाहि?

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:58 pm | चतुरंग

घोड्याच्या जोरात वजिराने ई४ प्यादे पडले असते!

शिवोऽहम्'s picture

18 Nov 2013 - 5:01 pm | शिवोऽहम्

ई४ प्यादे कुठे आहे?

मोहन's picture

18 Nov 2013 - 5:05 pm | मोहन

धन्यवाद! आले लक्षात !

भडकमकर मास्तर's picture

18 Nov 2013 - 4:57 pm | भडकमकर मास्तर

आज फार दु:खी वाटत आहे... :(

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 4:59 pm | चतुरंग

अजून आनंद हारला नाहीये!

भडकमकर मास्तर's picture

18 Nov 2013 - 5:00 pm | भडकमकर मास्तर

एकूण वातावरण उदास वाटत आहे...

भडकमकर मास्तर's picture

18 Nov 2013 - 4:59 pm | भडकमकर मास्तर

डी ४ ने घोदा आणि वजीर एकत्र हल्ला का नाही केला आधी? गुप्ता भाऊ डी४ आउट ओफ क्वेस्चन आ म्हनाला?

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 5:06 pm | चतुरंग

आणि मग घोडा डी४ असे खेळया येईल आणि ड्रॉ झाला!!!!

घ्या तिच्या मारी ड्रो काय ?!

भडकमकर मास्तर's picture

18 Nov 2013 - 5:07 pm | भडकमकर मास्तर

ड्रॉ !!!!!!

तो मानसिक दृष्ट्या खचलेला वाटतोय. किंवा त्याला असे वाटत असावे की आत्ता बरोबरी तरी जमयेत का ते बघू जिंकायचे नंतर बघता येईल!!

रमताराम's picture

18 Nov 2013 - 5:09 pm | रमताराम

आज तो रुक-पॉन एन्डिंगचा बराच अभ्यास करून आला असावा आणि मॅग्नसने झटपट दोन्ही हत्ती पटाबाहेर काढून त्याचा डाव उधळून लावला असे दिसते. :)

रमताराम's picture

18 Nov 2013 - 5:11 pm | रमताराम

(हे रिकामे प्रतिसाद कसे पडतायत)
कदाचित असं असेल की आनंद आज रूक-पॉन एन्डिंगचा भरपूर अभ्यास करून आला असावा. पण दोन्ही हत्ती झटपट पटाबाहेर काढून मॅग्नसने त्याचा प्लान उधळून लावला असे दिसते.

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 5:18 pm | चतुरंग

कारण बर्‍याचदा या खेळी पटावरच्या स्थितीप्रमाणेच खेळाव्या लागतात फारसा अभ्यास करण्यासारखे नसावे. त्याने एनर्जी वाचवली. काळ्या मोहोर्‍यांकडून खेळण्याचे त्याने नक्की केले आहे. कारण आनंदकडे फार पर्याय आहेत असे वाटत नाही. कार्लसनला खेळी करु द्यायची आणि त्यावर उत्तम पर्याय शोधायचा हीच स्ट्रॅटेजी त्याला काही देऊ शकेल असा माझा अंदाज!

रमताराम's picture

18 Nov 2013 - 5:22 pm | रमताराम

तो रिकामा पडलेला प्रतिसाद कॉपी केला पण स्मायली कॉपी झाली नाही. आता टाक्तो घ्या. :)

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2013 - 5:08 pm | प्रसाद गोडबोले

ड्रॉ इज लाईक लॉस्स फॉर आनंद नौ :(

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 5:10 pm | चतुरंग

अजून ५ डाव बाकी आहेत परंतु आनंदला 'ब्लॅक मॅजिक' दाखवावी लागेल!! :)

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2013 - 5:39 pm | प्रसाद गोडबोले

पण ते खुप म्हणजे फारच म्हणजे लैच म्हणजे अतिचशय अवघड आहे !!
आणि ह्यात नशिबाचा काही भाग नाही ...

बाकी हीच गोष्ट आपल्याला चेस बाबत आवडते .... इट्स अ गेम विदाऊट चान्स !! पाऊस पडला म्हणुन डकवर्थ लुईस नाही की दव पडल म्हणुन स्पिनरला अ‍ॅडव्हान्टेज नाही .... नो लक फॅक्टर ...

प्रत्येक पॉईट हा झगडुनच मिळवावा लागेल !!

चतुरंग's picture

18 Nov 2013 - 5:09 pm | चतुरंग

काळी मोहोरी असणार आहेत याचा अर्थ आनंदचा प्लॅन बी काळ्या मोहोर्‍यांबरोबरच आहे हे नक्की!!