आनंद - कार्लसन डाव ६

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
16 Nov 2013 - 3:02 pm

काल पहिला पाडाव झाला! आज काय होणार?
आधीच्या दोन्ही वेळा २०१० आणि २०१२ मधे एक डाव हारल्यावर ताबडतोब पुढच्या डावात आनंदने वचपा काढला होता. गेल्फंडला तर त्यने केवळ १७ खेळ्यात हरवले होते.
चमत्कार पुन्हा होईल का? विशेषतः कार्लसनला हरवणे हे कितपत कठिअण आहे? चला बघूया.

Play Online Chess[Event "FWCM 2013"][Site "Chennai"][Date "2013.11.16"][Round "6"][White "Anand, Viswanathan"][Black "Carlsen, Magnus"][Result "0-1"][WhiteELO "2775"][BlackELO "2870"]%Created by Caissa's Web PGN Editor1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. d3 Bc5 5. c3 O-O 6. O-O Re8 7. Re1 a6 8.Ba4 b5 9. Bb3 d6 10. Bg5 Be6 11. Nbd2 h6 12. Bh4 Bxb3 13. axb3 Nb8 14. h3Nbd7 15. Nh2 Qe7 16. Ndf1 Bb6 17. Ne3 Qe6 18. b4 a5 19. bxa5 Bxa5 20. Nhg4Bb6 21. Bxf6 Nxf6 22. Nxf6+ Qxf6 23. Qg4 Bxe3 24. fxe3 Qe7 25. Rf1 c5 26. Kh2c4 27. d4 Rxa1 28. Rxa1 Qb7 29. Rd1 Qc6 30. Qf5 exd4 31. Rxd4 Re5 32. Qf3 Qc733. Kh1 Qe7 34. Qg4 Kh7 35. Qf4 g6 36. Kh2 Kg7 37. Qf3 Re6 38. Qg3 Rxe4 39.Qxd6 Rxe3 40. Qxe7 Rxe7 41. Rd5 Rb7 42. Rd6 f6 43. h4 Kf7 44. h5 gxh5 45. Rd5Kg6 46. Kg3 Rb6 47. Rc5 f5 48. Kh4 Re6 49. Rxb5 Re4+ 50. Kh3 Kg5 51. Rb8 h452. Rg8+ Kh5 53. Rf8 Rf4 54. Rc8 Rg4 55. Rf8 Rg3+ 56. Kh2 Kg5 57. Rg8+ Kf458. Rc8 Ke3 59. Rxc4 f4 60. Ra4 h3 61. gxh3 Rg6 62. c4 f3 63. Ra3+ Ke2 64. b4f2 65. Ra2+ Kf3 66. Ra3+ Kf4 67. Ra8 Rg1 0-1document.getElementById("cwvpd_1384842031").value=document.getElementById("cwvpg_1384842031").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384842031").submit();

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

ई४ ने सुरुवात केली आनंदने. दोघांचे किल्लेकोट झालेत्.अजूनही थिअरीत आहे दोघे प्रत्येकी सहा खेळ्या झाल्यात.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:10 pm | चतुरंग

घालून उंट मागे हाकलला कार्लसनने आणि आता आनंदने उंट जी ५ अशी वेगळी खेळी केली आहे.
कार्लसन एच ६ खेळेल का?

भडकमकर मास्तर's picture

16 Nov 2013 - 3:17 pm | भडकमकर मास्तर

की अजून एक काउंटर पिन करणार?

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:20 pm | चतुरंग

असं दिसतंय.

आज निश्चित गंभीर वाटतोय. आनंद सुद्धा नक्कीच निश्चयाने उतरलाय मैदानात, शंकाच नाही!
जी५ वरच्या उंटाला मागे हाकलताना राजाच्या बाजूची प्यादी ढकलली की वजीर आनी राजा अशा दोन्ही बाजूला काळ्यासाठी प्याद्यांची रचना दुबळी होते. मॅग्नुस त्यासाठी जाईल का? त्याचा घोडा वजिराला पिन झालाय

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:19 pm | चतुरंग

मधल्या उंटावर आले तर बी ३ मधला उंट डि ५ मधे येऊ शकतो कारण जी ५ मधला उंट मारला तर सी ६ मधला घोडा पडतो आणि काळ्याचे हत्ती फोर्कमधे बसतात, आणि एक पडतो!

भडकमकर मास्तर's picture

16 Nov 2013 - 3:19 pm | भडकमकर मास्तर

अवांतर माहिती : आज तानिया नाही समालोचनाला... फ्यामिलीत लग्न आहे म्हणे... ८ तारखेला येणार आहे चेन्नैत परत...

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:22 pm | चतुरंग

मौलिक माहीतीबद्दल धन्यवाद मास्तर! :)
कुठे गेले ररा?

भडकमकर मास्तर's picture

16 Nov 2013 - 3:27 pm | भडकमकर मास्तर

सुझनतै पोल्गर यानी आज ट्विटर वर टाकलेला फोटो .. नो लूक हॅन्डशेक

भडकमकर मास्तर's picture

16 Nov 2013 - 3:27 pm | भडकमकर मास्तर
चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:35 pm | चतुरंग

दॅट टेल्स यू समथिंग!!!

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:34 pm | चतुरंग

आलाय! पांढर्‍या उंटाला आता काय करायला हवे?
सी ४ खेळेल का उंट डी ५ खेळेल?

उंट डी ५ बरी वाटतेय सध्या

रमताराम's picture

16 Nov 2013 - 3:38 pm | रमताराम

मधे ७ ते १७ वर्षांच्या सर्वांना बुद्धिबळ कम्पल्सरी सब्जेक्ट! बुद्धिबळासाठी चांगली पण बिचार्‍या विद्यार्थ्यांसाठी दु:खद बातमी. :)

नि३'s picture

16 Nov 2013 - 3:39 pm | नि३

नाईट डी २

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:41 pm | चतुरंग

आता मारामारी टाळली आनंदने. आता एच ६ प्यादे उंटावर आले. आनंदने इथे त्याचे इनिशिएटिव किंचित घालवले का? उंट मागे गेला एच ४ मधे

कार्ल्या ने तब्बल २० मिनीटे घेतली १० व्या मुव्ह साठी

सुहासदवन's picture

16 Nov 2013 - 3:45 pm | सुहासदवन

What BB3?

उंट मारामारी होणार बहुतेक

भडकमकर मास्तर's picture

16 Nov 2013 - 3:46 pm | भडकमकर मास्तर

उंट बी३ वरचा घेतला ... एक्स्चेन्ज

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:47 pm | चतुरंग

स्थिती काँप्लिकेटेड करुन आनंदने मॅग्नुसला पहिल्यांदा मारामारी करायला भाग पाडले. आता घोड्याने उंट मारला तर सी ५ वरचा उंट मागे घेणे भाग पडते किंवा ए प्याद्याने उंट मारुन ए स्तंभ हत्तीसाठी मोकळा करुन घेता येईल.

सुहासदवन's picture

16 Nov 2013 - 3:47 pm | सुहासदवन

आनंद सुरुवातीला आक्रमण करणार नाही हे आता पक्के डोक्यात बसल्याने आपण त्याची काही प्यादी सुरुवातीस घेतली तर कदाचित तो अधिक बचावाकडे लक्ष देईल आणि आक्रमण करणे सोपे होईल ही खेळी आहे कार्लसनची.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:51 pm | चतुरंग

परत गेला घोडा. एका खेळीचे इनीशिएटिव जाऊ दिले कार्लसनने.कारण त्याला तो डी७ वर आणायचा आहे आणि पिन झालेला घोडा सपोर्ट करयचा आहे मग वजीर बी १ किंवा सी मधे जायला मोकळा!

भडकमकर मास्तर's picture

16 Nov 2013 - 3:52 pm | भडकमकर मास्तर

दबलींग दा पॉ न ऑ न बी

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:56 pm | चतुरंग

खरेतर हा वीकनेस समजला जातो परंतु आत्ताच्या परिस्थितीत आनंदची मोहोरी चांगल्या जागा पकडून आहेत आणि शिवाय हत्तीला ए स्तंभ मोकळा मिळालाय काँपेन्सेशन म्हणून!

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 3:54 pm | चतुरंग

प्यादे टाकून ऊंटावर चाल करता येईल प्याद्यांची मारामारी झाली पुढल्या खेळीत ई४ वरचे प्यादे ई५ असे येऊन एफ ६ वरच्या घोड्याला अडचणीत आणू शकते!

भडकमकर मास्तर's picture

16 Nov 2013 - 3:56 pm | भडकमकर मास्तर

सुझनतै समालोचन करता करता ट्वीट सुद्धा करताहेत... :)

सुहासदवन's picture

16 Nov 2013 - 3:57 pm | सुहासदवन

KG4 का खेळला नाही कार्लसन

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:10 pm | चतुरंग

नाही समजले..

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:00 pm | चतुरंग

खेळून त्याचे इनीशिएटिव डाव जिंकण्यात बदलणे अत्यावश्यक आहे. आधीच्या दोन्हीवेळा थोडा डिफेन्सिव खेळून त्याने ते अ‍ॅडवांटेज ड्यूसमधे घालवले होतेन! त्याचा डाव अतिशय डायनामिक झालाय
एच ३ प्यादे पुढे टाकले. मॅग्नुसचा घोडा अंदाजाप्रमाणे घोडा डी७ मधे आला.

सुहासदवन's picture

16 Nov 2013 - 4:01 pm | सुहासदवन

तर BXE2 ने आता चेक दिला असता राजाला

सुहासदवन's picture

16 Nov 2013 - 4:02 pm | सुहासदवन

sorry BXF2

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:05 pm | चतुरंग

घोडा एच२ मधे आणला आता प्लॅन जी ४ मधे आणून एफ ६ घोड्यावर दुसरा जोर आणायचा आहे. मॅग्नुसने वजीर ई७ मधे घेतलाय.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:08 pm | चतुरंग

वजीर ई६ मधे येईल. वॉव आनंदने दुसरा घोडा एफ १ मधे आणलाय! काय प्लॅन आहे?

रमताराम's picture

16 Nov 2013 - 4:12 pm | रमताराम

ई-३ नि मग एफ-५ वजीरावर मोर्चेबांधणी. वजीर फारच संकुचित ठिकाणी अडकल्याने हा धोका ओळखून मॅग्नसला त्याचा विचार आताच करावा लागेल. त्यामुळे कदाचित त्याचा स्वतःचा प्लान एक खेळी पुढे ढकलावा लागेल.

पटावरची स्थिती इतकी क्रँप्ड वाटते आहे अन्यथा गडी जोरात असतो!

आनंद लांबवतो आहे. जितक्या खेळ्या त्या वजिराला बाहे पडायला लागतील तेवड्।ए आनंदची डेवलपमेंट आनी इनीशिएटिव वाढतत जाणार आहे! आता मॅग्नुसने उंट बी ६ मधे मागे घेतला.
या सामन्यात प्रथमच मॅग्नुस बॅकफुटवर गेल्यासारखा वाटतोय. पुढचा प्लॅन काय आहे मॅग्नुसचा?

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:24 pm | चतुरंग

ई३ मधे आणि अखेर मॅग्नुसचा वजीर अनपिन करुन घेतलान त्याने आता प्यादे बी ४ मस्त खेळी मॅग्नुसचा घोडा आता सी ५ वर येऊ शकत नाही!

रमताराम's picture

16 Nov 2013 - 4:26 pm | रमताराम

आड्यो स्ट्रीम बोम्बलली बहुतेक. कुणाला कामेंट्री ऐकू येते आहे का?

रमताराम's picture

16 Nov 2013 - 4:28 pm | रमताराम

चला झाला चालू

आता आनंदने अ‍ॅटॅक करायलाच हवा! डी४ खेळत येईल का? की आधी बी ४ करुन उंटाला मागे रेटावे?

प्रचेतस's picture

16 Nov 2013 - 4:36 pm | प्रचेतस

मजा येतेय समालोचन वाचायला.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:37 pm | चतुरंग

जी ४ सुद्धा अ‍ॅटॅकिंग आहे.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:38 pm | चतुरंग

रिअ‍ॅक्टिव मोडमधे जायला भाग पाडलेय आनंदने! येस आणि घोडा जी ४ खेळला आनंद!!

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:42 pm | चतुरंग

वजीर एफ ३ असेल असा अंदाज. मॅग्नुसने उंट मागे घेतलान बी६

रमताराम's picture

16 Nov 2013 - 4:47 pm | रमताराम

उंटाने अखेर तो घोडा (एफ-६) घेतला. मला तो घोड्याने घेतला जाईल असे वाटले होते. यामुळे मागून बाहेर येऊ पाहणार्‍या वजीराचा मार्गही मोकळा झाला असता.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:47 pm | चतुरंग

घोडा मारला एफ ६ वरचा आता घोड्याने मारावे लागते. मग दुसरा घोडा आणि मग वजीर.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:49 pm | चतुरंग

आता पुढची खेळी घोडा एफ ५ आणि एच ६ प्याद्यावर हल्ला! मग राजाला सरकावेच लागेल एच ७ मधे.

रमताराम's picture

16 Nov 2013 - 4:51 pm | रमताराम

वजीर जी-४? एफ-२ चे प्यादे नाजूक असल्याने आता घोडा हलत नाही. अशा वेळी वजीर दूर नेणे म्हणजे राजाच्या बाजूवर एफ-२ ला मोर्चे लावून बसलेले मॅग्नसचे उंट्+वजीर कॉम्बिनेशनला बळ देणे. नक्की काय विचार करतोय आनंद?

कॅलक्यूलेशन्स करताना आणि त्याचे अ‍ॅडवांटेज घालवून बसलाय.

रमताराम's picture

16 Nov 2013 - 5:07 pm | रमताराम

डाव्या बाजूने हल्ला करण्याची संधी असताना उजवीकडे घोड्यांच्या डेवलपमेंटमधे वेळ घालवला त्याने सगळं बिनसलं. (कालही डावीकडे राजाचा कोट करण्याच्या नादात मॅग्नसचा उजवीकडचा हत्ती मोकळा सोडला नि त्याने घात केला) घोडे नैसर्गिकरित्या जिथे बाहेर येतात त्याहून ऑकवर्ड पोजिशनला नेण्याच्या नादात काही खेळ्या वाया गेल्या.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 5:10 pm | चतुरंग

कारण घोडी जनरली बोर्डाच्या कडेला गेली की आता आणणे अवघड असतेच. त्यात अशी काँप्लिकेटेड पोझीशन असताना अधिकच अवघड. अनैसर्गिक खेळ्यांची किंमत त्याला मोजावी लागली!

रमताराम's picture

16 Nov 2013 - 6:15 pm | रमताराम

याच खेळीवर सगळ गाडं घसरलंय असं दिसतंय. मागचा ए पट्टीतला हत्ती नाजूक असल्याने दुसरा हत्ती कायम शेवटच्या फळीत ठेवावा लागत असल्याने वजीर पुढे काढण्याने उंट-घोड्याच्या अदलाबदलीतून कमकुवत झालेल्या एफ-२ प्याद्याला बाहेर खेचले मॅग्नसने आणि अचानक आनंदला राजाची काळजी करणे भाग पडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2013 - 4:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाहतोय आणि वाचतोय.

-दिलीप बिरुटे

आता हत्ती एफ १. पोझीशन एकद्म सिंपल झाली राव. डाव ड्रॉ काढणे आता सोपे झाले मॅग्नुसला असे वाटते.

रमताराम's picture

16 Nov 2013 - 4:55 pm | रमताराम

झटपट ड्रॉ होणार आज असं दिसतंय. हत्ती एफ-१ केव्हाही निष्प्रभ करू शकतो मॅग्नस. ए पट्टीतल हत्ती केव्हाही उचलता येतोय त्याला. आनंदला दुसर्‍या हत्तीने बरोबरी करण्याखेरीज पर्याय नाही. त्याचा सगळा प्लान उधळतोय. आनंद डिसपॉईंट्स मी. :(

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 4:59 pm | चतुरंग

कार्लसनला हरवणे अतिशय अवघड आहे. आनंद का असे खेळला राव?

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 5:04 pm | चतुरंग

मॅग्नुस डिझर्वज चँपिअनशिप!!

अग्निकोल्हा's picture

16 Nov 2013 - 5:06 pm | अग्निकोल्हा

आतापर्यंतचा खेळ पुस्तकी वाटला, त्यात दोघांचे वजिरही अजुन जागे त्यामुळे केल्क्युलेश्न्स करताना मेंदू हेंग होतोय. डाव कोणाकडे सरक्तोय कोणी समजावेल काय?

असे दिसते. आनंदने त्याचे अ‍ॅडवांटेज घालवले आहे.

रमताराम's picture

16 Nov 2013 - 5:10 pm | रमताराम

डॉ सीएनआर राव आणि आपला लाडका तेंडल्या यांना 'भारतरत्न' जाहीर. ये धत्तड तत्तड.....

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 5:14 pm | चतुरंग

तेंडल्याची बातमी चेपुवर वाचली होती डॉ. रावांबद्दल आत्ताच समजले. दोघांचे अभिनंदन. तेंडल्याला योग्यवेळी दिले म्हणायचे, औचित्यपूर्ण!

असा हत्ती खेळण्यापेक्षा राजापुढची पॉन् आनंदने खेळायला हवी होतीत का?

जेपी's picture

16 Nov 2013 - 5:13 pm | जेपी

कुठल्या sport channel वर हा गेम चालु आहे का?

संगणक नसल्यामुळे पाहता येत नाही .

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 5:14 pm | चतुरंग

थेट दाखवताहेत.

arunjoshi123's picture

16 Nov 2013 - 5:32 pm | arunjoshi123

आनंद जी ४

अग्निकोल्हा's picture

16 Nov 2013 - 5:36 pm | अग्निकोल्हा

. पोरगं वार्मप करायला लागलय!

भडकमकर मास्तर's picture

16 Nov 2013 - 6:05 pm | भडकमकर मास्तर

अरेरे काय झालं हे?
( चेस पाहताना असं कधेीहेी लिहिलं तरेी चालतं )

आतिवास's picture

16 Nov 2013 - 6:12 pm | आतिवास

खरंय :-)
हा प्रतिसाद कंसासाठी आहे :-)

उशीरा आलेय इथं - तोवर बोर्ड बराच हलला आहे - आता समजून घेते तो आधी :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2013 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय होईल आता ?

रमताराम's picture

16 Nov 2013 - 6:28 pm | रमताराम

आनंद जिंकत नाही एवढं नक्की. ड्रॉ करू शकला तरी लै झालं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2013 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या तरी समान संधी आहे ड्रा साठी असेच की कोणी चान्स घेऊ शकतो जिंकण्यासाठी ?

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 6:34 pm | चतुरंग

एकूण नूर बघता तो ड्रॉसाठी तयार व्हायची शक्यता नाही, तो जिंकायसाठीच जाईल! आनंदला फार त्रास पडणार आहे ड्रॉ काढायला सुद्धा!!

विश्वास बसत नाही!! एका उत्तम पोझीशनमधून डाव कसा घसरवत न्यावा याचे उत्तम उदाहरण म्हणावे का?
मला वाटते आनंद्ने फार प्रेशर घेतले आहे. त्याने मुक्त, नैसर्गिक खेळ केलान तरच सामना जिंकता येईल!!

आतिवास's picture

16 Nov 2013 - 6:35 pm | आतिवास

हं! कालुचं कौतुक वाटतंय - आनंद जिंकावा असं वाटत असूनही!

रमताराम's picture

16 Nov 2013 - 6:42 pm | रमताराम

सुरवातीला त्या घोड्यांच्या खेळ्यादेखील थोड्या वेळकाढू झाल्या असा माझा समज झालाय. घोड्यांसाठी योग्य जागा शोधण्यात काही खेळ्या खर्ची पडल्या नि तेवढ्यात मॅग्नसला त्याचा उंट सुरक्षित मागे नेता आला.

अग्निकोल्हा's picture

16 Nov 2013 - 6:51 pm | अग्निकोल्हा

असाच हत्ती दिला ? का मी झोपेत आहे ?

अग्निकोल्हा's picture

16 Nov 2013 - 6:53 pm | अग्निकोल्हा

मोबाइल उल्टा पकडला होता सॉरी.

रमताराम's picture

16 Nov 2013 - 7:07 pm | रमताराम

LOL. 'Downside' of technology. ;)

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 7:13 pm | चतुरंग

खतरनाक! उल्टा पुल्टा

रंगा भट्टी ;)

कालु आक्रमक मोडमध्ये आहे - त्याला जिंकायची शक्यता दिसत नाहीये. पण काल तो जे खेळला, त्यावरुन आजही काही सांगता येत नाही.

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 7:17 pm | चतुरंग

चांगला डिफेंड करतोय, मला वाटलं नव्हतं असं काही होत राहील!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2013 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनन्दच भारी खेळतोय आणि पण आनंदकड़े वेळ कमी आहे

रमताराम's picture

16 Nov 2013 - 7:32 pm | रमताराम

आता काही प्रॉब्लेम नाही. दोन मूव्जसाठी अर्धा तास आहे. त्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटे वाढवून मिळतील. तेव्हा वेळेचा प्रश्न आता उरलाच नाहीये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2013 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

F वरची प्यांदी मीळवावी आनंदने
आता कसं जमतं ते पाहावे लागेल

चतुरंग's picture

16 Nov 2013 - 7:34 pm | चतुरंग

त्याने एच पॉन बळी देऊन जो काऊंटरप्ले जनरेट केलाय तो जबराट आहे! त्याने प्यादे खाल्ले सी ४ वरचे. आता पुन्हा डाव नेलबायटिंग अवस्थेत गेलाय!!

रमताराम's picture

16 Nov 2013 - 7:37 pm | रमताराम

हुदिनी -१.५ देतोय मॅग्नसच्या बाजूने. :(

रमताराम's picture

16 Nov 2013 - 7:39 pm | रमताराम

आनंदची हार निश्चित म्हणतोय. (नखं खाणारी स्मायली कुठे आहे?)