शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३
आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात!
कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे. कार्लसन कोणती मूव खेळणार?
प्रत्येक डावात वेगळी पहिली मूव खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे!
Play Online Chess[Event "Anand-Carlsen World Championship"][Site "1:08:33-1:22:33"][Date "2013.11.9"][Round "1"][White "Magnus Carlsen"][Black "Viswanathan Anand"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2870"][BlackELO "2775"]%Created by Caissa's Web PGN Editor1. Nf3 d5 2. g3 g6 3. Bg2 Bg7 4. d4 c6 5. O-O Nf6 6. b3 O-O 7. Bb2 Bf5 8. c4Nbd7 9. Nc3 dxc4 10. bxc4 Nb6 11. c5 Nc4 12. Bc1 Nd5 13. Qb3 Na5 14. Qa3 Nc415. Qb3 Na5 16. Qa3 Nc4 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384025473").value=document.getElementById("cwvpg_1384025473").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384025473").submit();
प्रतिक्रिया
9 Nov 2013 - 3:02 pm | चतुरंग
दोन्ही खेळाडूंनी एकमेकांकडे बघितलेले नाही. एफ एफ ३ - कार्लसनने रेटी ओपनिंग ने सुरुवात केली
डी ५ - आनंद
9 Nov 2013 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले
सी ६ !?
9 Nov 2013 - 3:08 pm | चतुरंग
असे लगेच दिसते आहे. खेळ्या बर्याच पटापट होताहेत.पहिल्या सहा खेळ्या झाल्या आहेत. दोघांचे उंट कर्णात आलेत.
सहाव्या खेळीला मॅग्नुस बी ३ खेळलाय.
9 Nov 2013 - 3:10 pm | आतिवास
तुमचं 'धावतं समालोचन' उत्सुकतेने वाचतेय.
कितपत समजतंय मला ते माहिती नाही :-)
9 Nov 2013 - 3:10 pm | चतुरंग
वातावरणातला ताण अजूनही सैलावला नाहीये,कार्लसन उठून गेला होता परत आल्यावर त्याने उंट बी २ मधे सरकवलाय
9 Nov 2013 - 3:14 pm | प्रसाद गोडबोले
http://www.youtube.com/watch?v=MH_5Ko7QCi8
9 Nov 2013 - 3:17 pm | चतुरंग
दुवा दिल्याबद्दल तुम्हाला दुवा! ;)
9 Nov 2013 - 3:15 pm | चतुरंग
आनंदची तयारी चांगली आहे तो सुद्धा फार वेळ घेत नाहीये. आनंदचा उंट एफ ५ मधे आला. डावाच्या मध्यातल्या चार चौकोनांवर ताबा मिळवण्याची धडपड सुरु आहे.
एक नक्की आहे की आधीच्या जगज्जेतेपदापेक्षा यावेळी भरपूर वेगवेगळी काँबिनेशन्स बघायला मिळतील.
9 Nov 2013 - 3:20 pm | प्रसाद गोडबोले
उंट एफ ५
>>> ही खेळी मला कळाली नाही , जरा डुबीयस आहे
9 Nov 2013 - 3:21 pm | रमताराम
http://chennai2013.fide.com/live-video-streaming-alternate-server/
http://www.geekosystem.com/2013-chess-championship-live/
फिडेचा (चेन्नै) दुवा मेलाय..
9 Nov 2013 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले
युट्युब वरची ती तानिया ची कॉमेन्ट्री डोक्याला शॉट लावतीये ...
9 Nov 2013 - 3:23 pm | रमताराम
http://www.chessdom.com/world-chess-championship-2013-live/
9 Nov 2013 - 3:34 pm | रमताराम
http://www.chess.com/tv
9 Nov 2013 - 3:37 pm | रमताराम
इथे ती बया नाही बक बक करायला. फक्त विडीओ नाही, बोर्ड लाईव पाहता येईल.
9 Nov 2013 - 3:22 pm | चतुरंग
नंतर काळ्याचा घोडा डी७ मधे आलाय. वजिराचा प्याद्याशी जोर तुटलाय. कार्लसनने डी ५ प्याद्यावर हल्ला चढवलाय.
आनंदने सी४ प्यादे घेतले.
9 Nov 2013 - 3:24 pm | चतुरंग
कडेचे प्यादे घेणे हे थोडे इन्फीरिअर असते कारण डावाच्या मध्याचे नियंत्रण कमी होते. परंतु विशीची मोहोरी चांगली विकसित आहेत त्यामुळे हा धोका बहुदा विशीने घेतला असावा.
9 Nov 2013 - 3:25 pm | चतुरंग
चांगले दिसते आहे
http://chennai2013.fide.com/anand-carsen-game-1-live-analysis-video/
9 Nov 2013 - 3:30 pm | रमताराम
त्या बयेचे तोंड बंद करण्याचा काही उपाय आहे का?
9 Nov 2013 - 3:32 pm | चतुरंग
स्पीकर म्यूटवर टाका!!
9 Nov 2013 - 3:31 pm | चतुरंग
बी ६ मधे हलवलाय. डावाच्या मध्यातलं नियंत्रण हा आता कळीचा मुद्दा आहे. कार्लसन कोणती खेळी करणार?
सी ५ खेळला तर घोडा डी५ मधे ताकदवान पोस्टवर येईल त्यामुळे ती शक्यता कमी आहे.
घोडा ई५ खेळेल का?
9 Nov 2013 - 3:36 pm | चतुरंग
नंतर आनंदचा घोडा बी४ वरती येऊन पाढर्याच्या काळ्या उंटावर आलाय
9 Nov 2013 - 3:38 pm | चतुरंग
दोघांच्या डोक्याचे एमाराय स्कॅन्स घ्यायला पाहिजेत!
मेंदू गरागरा फिरत असतील आतमधे!!
9 Nov 2013 - 3:41 pm | प्रसाद गोडबोले
वजीर ब ३ ला फोर्स्ड कॅन्सलेशन आहे ... आणि मग क्रॉस कलरड बिशप ड्रॉईश जाईल असे वाटते
9 Nov 2013 - 3:44 pm | चतुरंग
आनंद दोन उंटांचा खेळ ठेवायचा प्रयत्न करतोय. कारण जितका डाव ओपन तितकी उंटांची मोबिलिटी जास्त!
9 Nov 2013 - 3:42 pm | चतुरंग
डावाची सुरुवात आणि मध्य यातली सीमारेषा धूसर झालेली समजते आहे. अचानक अकराव्या खेळीलाच डाव मध्यात आलाय. मॅग्नुस काय खेळणार उंट मागे घेणार का?
9 Nov 2013 - 3:43 pm | प्रसाद गोडबोले
मलातरी वाटतय की मागेच घेईल ..
9 Nov 2013 - 3:48 pm | चतुरंग
आता आनंद बहुदा वजीर ए ५ खेळून घोड्यावर हल्ला करेल असे वाटते
9 Nov 2013 - 3:49 pm | प्रसाद गोडबोले
पण मग वजीर डावा बाहेर जाईल ना ?
मी ब्लॅक असेन तर ई ५ खेळेन
9 Nov 2013 - 3:45 pm | रमताराम
फायनली.... फायनली एक साईट सापडली जिथे शांतपणे गेम पाहता येईल.
http://chessbomb.com/site/
9 Nov 2013 - 3:49 pm | चतुरंग
बघा बघा शांतपणे बघा. ती तान्या सचदेव लै बडबड करते आहे.
9 Nov 2013 - 3:53 pm | चतुरंग
वजीर ए ५ का प्यादे ई ५?
वजिराची खेळी आक्रमक आहे. कारण त्यानंतर मॅग्नुसला वजीर सी२ वर किंवा बी३ वर घेऊन घोड्याला आधार द्यावा लागेल.
9 Nov 2013 - 3:58 pm | चतुरंग
घोडा डी५. आता ई५ असे पांढर्याला उचकवले आहे.
किंवा मॅग्नुस घोड्यांची मारामारी करेल का? मग प्यादे डी ५ वर येऊन घोडा सी४ मधे मस्त बसेल!
9 Nov 2013 - 3:59 pm | रमताराम
वजीर बी३ मधे येऊन बसेल बहुधा.
9 Nov 2013 - 4:10 pm | प्रसाद गोडबोले
मलाही असच वाटतय कारण कॅन्सलेशन केले तर पांढर्याच्या मध्यातील कन्ट्रोल बराच कमी होईल
9 Nov 2013 - 4:16 pm | रमताराम
B-3 it is.
9 Nov 2013 - 4:19 pm | प्रसाद गोडबोले
आता घोडा अ ५ ... प्रधानाला हकला
9 Nov 2013 - 3:59 pm | प्रसाद गोडबोले
ई५ ?
9 Nov 2013 - 4:01 pm | रमताराम
बाय तानिया. प्लीज डोन्ट कम बॅक.
9 Nov 2013 - 4:01 pm | चतुरंग
घञाळे बर्यापैकी तोलून आहेत. मॅगुस ९ मिनिटे मागे आहे परंतु फारसे काळजीचे कारण नसावे.
9 Nov 2013 - 4:03 pm | प्रसाद गोडबोले
सुझन कोण ? जुडीथची बहीण काय ?
9 Nov 2013 - 4:07 pm | अद्द्या
नुसतं वाचून काहीच समजत नाहीये
पण मजा येतीये वाचायला .
सामना संपला कि
समोर बोर्ड धरून शांतपणे बसेन .
कीप इट अप मंडळी
9 Nov 2013 - 4:10 pm | चतुरंग
रमतारामनी किंवा मी दिलेल्या दुव्यावरती. त्यावरुन बर्याच गोष्टी सुकर होतील. एकीकडे बोर्ड मांडून बसलात तरी चालेल!
9 Nov 2013 - 4:12 pm | अद्द्या
हापिसात आहे
9 Nov 2013 - 4:08 pm | चतुरंग
अशा दोन प्रकारे घोड्याला सपोर्ट करता येईल. पैकी बी ३ मधे वजीर आला तर काळा घोडा ए ५ मधे जाऊन वजिरावर हल्ला करु शकतो. त्यामुळे बहुदा सी २ मधेच.
9 Nov 2013 - 4:11 pm | प्रसाद गोडबोले
तिथे उंटाचा अटॅक आहे
9 Nov 2013 - 4:22 pm | चतुरंग
ब्लंडर!!
9 Nov 2013 - 4:13 pm | रमताराम
एफ-५ वरचा उंट आणि दोन घोडे यांच्या मदतीने आनंदने मॅग्नुसच्या क्षेत्रात बराच दबाव निर्माण केला आहे. सध्या तरी वजीर बी-३ ला पर्याय दिसत नाही.
एक वाईल्स गेसः वजीर ए-४ हा एक धोका पत्करणारा पर्याय म्हणून पाहता येईल. घोड्यांच्या एक्स्चेंज ऐवजी, एका बदल्यात दुसरा घोडा घेऊन दुसर्यावरही दबाव टाकता येऊ शकेल. पुढे काय काय घडेल हे तपासून पाहतोय.
9 Nov 2013 - 4:15 pm | रमताराम
आनंद घोडा बी-६ मधे आणून एकाच वेळी दुसर्या घोड्याला पाठिंबा नि मॅग्नुसच्या वजीराला धोका देऊ शकतो. परतीचा मार्ग धरण्याखेरीत मॅग्नुसला पर्याय नाही. पण आनंदचा घोडाही मागे फिरतो.
9 Nov 2013 - 4:17 pm | चतुरंग
वजिराच्या बाजूला घुसमट झाली आहे. घोडा अडचणीच्या जागी आहे आणि वजिराशिवाय मदतीला कोणी नाही. घोड्यांची मारामारी केली तर डाव सोपा होत जातो. तो वजीर बी ३ खेळला!
9 Nov 2013 - 4:23 pm | रमताराम
अपेक्षित खेळ्या.
9 Nov 2013 - 4:23 pm | प्रसाद गोडबोले
इथे ड्रॉ घेता येईल
9 Nov 2013 - 4:30 pm | प्रसाद गोडबोले
आणि ड्रॉ बाय रीपीटीशन !!
9 Nov 2013 - 4:25 pm | चतुरंग
घोडा ए ५ घेऊन. पांढरा वजीर ए ३ मधे.
दोनदा रिपीट झाली मूव. ड्रॉ कडे जाणार का??
9 Nov 2013 - 4:28 pm | प्रसाद गोडबोले
माझ्यामते आनंदला थोड्ड्सं अॅडव्हान्टेज आहे ... बी ५ खेळायला हरकत नाही
9 Nov 2013 - 4:29 pm | प्रसाद गोडबोले
सी ६ आयसोलेट होईल , एन्ड गेम मधे वीकनेस राहील ....
बघुया आनंद काय खेळतो ते ..
9 Nov 2013 - 4:31 pm | रमताराम
शक्यता तीच दिसते. अन्यथा पुढचा घोडा वाचवताना बरीच कसरत करावी लागेल आनंदला.
9 Nov 2013 - 4:30 pm | चतुरंग
सध्या तरी त्याची पोझीशन चांगली वाटते आहे (माझ्यामते जरा सरसच असावी).
अर्थात ड्रॉ झाला तरी चालेल कारण पुढल्या डावात त्याची पांढरी मोहोरी आहेत त्यामुळे तो एकप्रकारे आनंदसाठी मानसशास्त्रीय विजय असेल!
9 Nov 2013 - 4:30 pm | बोका
अॅन्ड्र्ाॅइड अॅप वर छान लाइव बोर्ड दिसत आहे
9 Nov 2013 - 6:58 pm | आदिजोशी
कोणते अॅप? लिंक द्या.
10 Nov 2013 - 10:12 am | बोका
9 Nov 2013 - 4:32 pm | चतुरंग
यांच्या खेळ्या रिपीट झाल्या! मॅच ड्रॉ!!
9 Nov 2013 - 4:33 pm | रमताराम
ड्रॉ. बोऽऽरिंग.
9 Nov 2013 - 4:35 pm | चतुरंग
फारच लवकर संपला डाव हे खरेच. परंतु पहिला डाव असल्याने दोघेही सावधपणे खेळले.
उद्या फुलबाज्या मिळाव्यात बाबा बघायला!!
9 Nov 2013 - 5:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे
सहमत. बुद्धीबळातले खूप कळते असे नाही. पण मला हा डाव फार खास नाही वाटला. ज्या प्रकारे draw झाला ते पाहून तर जगज्जेतेपदाची लढत पाहतोय असे अजिबात वाटले नाही. आता हा माझ्या अपुर्या ज्ञानाचा दोष असेल म्हणा.
9 Nov 2013 - 4:34 pm | चतुरंग
चांगले वाटते आहे. मारामारी डावात, बाकी कटिंग चहा मारायला तयार आहेत दोघे!! ;)
9 Nov 2013 - 4:36 pm | रमताराम
बाकी कटिंग चहा मारायला तयार आहेत दोघे!! >> खी: खी: खी: त्यापेक्षा सांऽबर बाऽत खायला जातील दोघे.
9 Nov 2013 - 4:38 pm | प्रसाद गोडबोले
चतुरंग , इथे फायनल डाव पटासह कसा देता तुम्ही ? तसा द्या ना ...
9 Nov 2013 - 4:40 pm | चतुरंग
मागल्यावेळी बर्याच खटपटीने जमले होते.
10 Nov 2013 - 12:24 pm | चतुरंग
खेळून बघता येईल!
9 Nov 2013 - 4:38 pm | चतुरंग
आनंदची सुरुवात काय असेल?
माझ्यामते ई ४.
9 Nov 2013 - 4:44 pm | प्रसाद गोडबोले
येस्स !!
मलाही तेच वाटते ... सिसिलियन नॅजडॉर्फ होईल असा माझा अंदाज आहे ....( ऑब्व्हियसली ;) )
पण पेटृऑफ किंव्वा बर्लिन डिफेन्स पहायला मिळाला तर मजा येईल !!
9 Nov 2013 - 4:52 pm | रमताराम
म्हणतोय की डाव अपेक्षेहून फारच वेगाने डेवलप झाला आणि दहा मूव्हज नंतर त्याला 'इमर्जन्सी ब्रेक्स' लावायची गरज वाटली.
9 Nov 2013 - 5:19 pm | चतुरंग
झाली मला वाटते अकराव्या खेळीला प्यादे रेटण्याऐवजी हत्ती ई१ असा हलवून ई४ ची तयारी करायला हवी होती, ते झाले असते तर आनंदच्या पांढर्या उंटाची वाट रोखली जाऊन मॅग्नुसचा वजीर जरा मोकळा झाला असता.
10 Nov 2013 - 10:44 am | सुहासदवन
http://www.rediff.com/sports/slide-show/slide-show-1-world-chess-champio...
10 Nov 2013 - 11:13 am | संजय क्षीरसागर
फर्स्ट गेम
10 Nov 2013 - 11:24 am | संजय क्षीरसागर
पण इंटरेस्टींग.
10 Nov 2013 - 12:20 pm | चतुरंग
जालावरती बर्याच ठिकाणी विश्लेषण आलेले आहे. हे चेस्.कॉम वरती आलेले विश्लेषण.
http://www.chess.com/news/its-on-carlsen-anand-game-1-4263
कालचा सामना, त्यानंतरची पत्रकार परिषद बघून आणि विश्लेषण बघून माझे मत पुढीलप्रमाणे -
कार्लसन अग्रेसिव खेळतो आणि मनाला येईल तशा ओपनिंगच्या चाली बदलत जातो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पहिल्या दोन खेळ्या बघून मी रेटी ओपनिंग समजलो परंतु ५ खेळींनंतर डाव फीयन्चेटो ग्रुन्फेल्ड डिफेन्सकडे सरकला. कर्णातले उंट हे त्या ओपनिंगचे वैशिष्ठ्य. त्यानंतर नवव्या खेळीला आनंदने सी४ चे प्यादे मारले. ही खेळीदेखील कार्लसनला लगेच अपेक्षित नसावी. कारण त्याने लगेच प्याद्याने आनंदने प्यादे मारले नाही तो थोडा विचारात पडलेला दिसला. त्याला अपेक्षित असणार्या लाईनपासून खेळ इथे बाजूला सरकायला सुरुवात झाली असावी. कार्लसनने प्यादे मारताच आनंदने घोडा बी६ वर आणला. मी माझ्या पहिल्या लेखात म्हटलं होतं की कार्लसनला प्यादी पुढे सरकवून त्यामागे मोहोरी सरकवून जागा ताब्यात घ्यायला आवडते. इथे आनंदने त्याच्या ह्या सवयीचा बरोबर फायदा उचलला असावा असा माझा कयास आहे. कारण कार्लसनने सी ५ असे प्यादे ढकलले आणि घोड्यावर चाल केली. लगोलग आनंदने सी४ अशी आक्रमक चाल केली, ही देखील अपेक्षित नव्हती कार्लसनला (कालच्या परिषदेत तो अनवधानाने म्हणा पण चटकन बोलून गेला की दहाव्या मूवनंतर "इमर्जन्सी ब्रेक्स" लावावे लागले!) (इथे कार्लसनने सी ४ वरचे प्यादे सरकवण्याच्या उत्साहाला थोडा आवर घालून हत्ती ई१ मधे खेळून ई४ असे प्यादे सरकवण्याची तयारी करायला हवी होती असे वाटते).
आनंदचा घोडा अचानक बी२ च्या उंटावर चाल करुन आल्याने उंटाला सी१ वर माघार घेण्याखेरीज पर्याय नव्हता. कारण त्या उंटाची मारामारी केली असती तर काळ्याच्या दोन उंटांसमोर डाव अवघड होत गेला असता.
पुढची घोडा डी ५ ही देखील लागोपाठ दुसरी आक्रमक चाल आनंद खेळला!इथे दोन धमक्या आहेत घोडा सी३ वरच्या बिनजोरी घोड्याला मारणार किंवा त्याहीपेक्षा धोकादायक म्हणजे बी ४ वरती तो उडी मारुन येऊ शकतो आणि पुढच्या खेळीला एफ५ मधला उंट सी२ असा येऊन वजिराच्या दाढीला हात घालतो!!
डी५ वरचा घोडा मारला तर काळा वजीर घोडा मारुन डावाच्या मध्यात येऊन बसतो. त्यापुढच्या खेळीला ई५ असं प्यादं खेळून डावाचा मध्य भाग ओपन करु शकतो. तिथून पांढर्याच्या अडचणी वाढू शकतात.
उंटाने सी२ घर धरल्याने आता वजीर फक्त बी३ मधूनच घोड्याला जोर लावू शकतो. वजीर तिथे आणल्या बरोबर आनंदने घोडा ए५ वर नेऊन वजिरावर हल्ला केला. आणि ए ३/बी३ अशा दोनच खेळी वजिराला ठेवल्या. इथे कोंडी फोडून डाव पुढे नेण्यात कार्लसनला काही स्वारस्य नव्हते कारण त्याला कोणतेही कंटिन्यूएशन मिळणे शक्य दिसत नव्हते.
बरोबरी करण्यात आनंदचा काहीच तोटा नव्हता, उलट तो कार्लसनला एकप्रकारे सज्जड दमच होता की काळ्या मोहोर्यांनी मी १६ खेळ्यात तुला बरोबरीत आणले आता उद्या माझी पांढरी मोहोरी आहेत!!
पत्रकार परिषदेत आनंदच्या डोळ्यांमधली चमक लक्षवेधी होती. त्याला पहिल्याच डावात सूर सापडल्याचा आत्मविश्वास दिसत होता. त्याऐवजी कार्लसन जरासा नाराजच दिसत होता, सरळ आहे, कारण पांढर्या मोहोर्यांनी खेळतांना लढत वगैरे सोडाच पण काही धुमश्चक्री निर्माण व्हायच्या आतच डाव बरोबरीत गेला होता, नामुष्कीची गोष्ट होती!
असो. कालचा डाव इतिहासजमा झाला. आज काय होते ते दुसर्या डावावरच्या दुसर्या धाग्यात अजून ३ तासांनी बघूयात.
10 Nov 2013 - 12:47 pm | चतुरंग
10 Nov 2013 - 3:21 pm | रमताराम
दुसरा डाव एकदम धामधुमीतच सुरू झाला की. दहा मिनिटात बारा खेळ्या, अपोजिट साईड कॅसल्स. धुवांधार गेमची नांदी.
10 Nov 2013 - 3:23 pm | रमताराम
आनंदच्या वजीराच्या मार्याच्या दिशेनेच कॅसल करून मॅग्नसने सॉल्लिड च्यालेंज दिलंय. घे लेका, कर हल्ला.
6 Nov 2014 - 2:25 pm | केदार-मिसळपाव
शनिवार, दि, ९ नोव्हेंबर २०१३ शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०१४ ला उद्घाटन आणि
शनिवार, ८ नोव्हेंबर २०१४ ला बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय.
०८ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- १ला सामना
०९ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- २रा सामना
१० नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- विश्रांतीचा दिवस
११ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- ३रा सामना
१२ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- ४था सामना
१३ नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- विश्रांतीचा दिवस
१४ नोव्हेंबर २०१४ -- शुक्रवार -- ५वा सामना
१५ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- ६वा सामना
१६ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- विश्रांतीचा दिवस
१७ नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- ७वा सामना
१८ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- ८वा सामना
१९ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- विश्रांतीचा दिवस
२० नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- ९वा सामना
२१ नोव्हेंबर २०१४ -- शुक्रवार -- १०वा सामना
२२ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- विश्रांतीचा दिवस
२३ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- ११वा सामना
२४ नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- विश्रांतीचा दिवस
२५ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- १२वा सामना
२६ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- विश्रांतीचा दिवस
२७ नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- समगुण फोड सामना
7 Nov 2014 - 2:36 am | रेवती
अरेच्च्या! तुम्ही आहात होय! मला वाटले रंगराव यावेळी नवा धागा काढण्याऐवजी जुन्या धाग्यातच नवी खेळी खेळतायत का!
8 Nov 2014 - 5:24 am | चतुरंग
परंतु मला यावेळी धावते समालोचन करायला जमेल असे वाटत नाही
पण माहितीचा धागा देऊ शकेन.
-चतुरंग
8 Nov 2014 - 6:57 am | पहाटवारा
येस येस ..
वी नीड धा$$गा .. वी नीड धा$$गा ..
चतुरंगशेठ, माहितीचाहि सहि, पण धागा काढाच.
-पहाटवारा
8 Nov 2014 - 7:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> परंतु मला यावेळी धावते समालोचन करायला जमेल असे वाटत नाही
असं कसं सेठ, तुमच्याशिवाय सामने रंगतदार व्हणार नाय !
तेव्हा वेळात वेळ काढून समालोचन करायला याच.
-दिलीप बिरुटे
(रंगासेठच्या बुद्धीबळाचा कौतुक असलेला)
8 Nov 2014 - 7:31 am | कंजूस
इतरत्र संस्थळांवर चतुरंग चतुरंग अशी हाकाटी होत आहे शेवटी थकून धागे काढले जात आहेत तेव्हा इथे तरी न्याय द्यावा ही विनंती.
8 Nov 2014 - 3:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला सामन्यातल्या पहिल्या लढतीला दोन तास बाकी आहेत. याच धाग्यावर रंगासेठ येईपर्यंत जमेल तसं आपण लिहु बोलू
अँड्रॉइडवर चेसचे अॅप्लीकेशन तुम्ही मोबाईलवर टाकलेले असेलच. सामना इथे दिसावा.
8 Nov 2014 - 4:13 pm | चतुरंग
तुमच्या प्रेमाने मला अखेर इथे आणलेच.
प्राडाँनी सुरुवात करुन दिलेली आहेच.
मी स्वतंत्र धागा सुरु करतो आहे तिथे पहिल्या सामन्याचे वर्णन करुयात.
(बुद्धीबळप्रेमी)चतुरंग
8 Nov 2014 - 4:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
ग्रेट !