मित्रानो इथे मिपावर चतुरंग काकांची भन्नाट कॉमेन्ट्री वाचून बुद्धीबळातील एका खेळी बद्दल लहानपणापासून असलेले कुतुहल पुन्हा जागे झाले. तसे आमच्या ग्यांगचे बुद्धीबळाचे ज्ञान तोकडेच. राजा कुठे फक्त एक घर चालु शकतो. उंट तिरका जातो. घोडा अडीच घरे जातो. हत्ती उभ्या आडव्या रेषेत फिरतो. प्यादे सरळ एकच घर फक्त सुरवातीला दोन घरे फक्त मारायला सरळ न जाता तिरके एक घर इतके नियम माहीत असले की झाले . आले बुद्धीबळ. उन्हाळ्यात पत्ते खेळताना विशेषतः गड्ड्या झब्बु च्यालेन्ज किंवा नाटेकाटेठोम खेळताना भरपूर आरडा ओरडा व्हायचा. च्यालेन्ज मधला च्यालेन्ज उचलेन्ज तर फार प्रिय.
त्यामानाने बुद्धीबळ फार शांतपणे व्हायचे. निदान एक दहा मिनेटे तरी शांतता नांदायची. आम्ही बुद्धीबळात "डबल्स" प्रकार शोधुन काढला होता. पण त्याला फारसे पाठबळ लाभले नाही.क्यारम खेळताना तर "ए गोलावर हात नाही. रेषेवरची सोंगटी तू सरकवली" असे करत त्याचे पर्यवसन क्यारम उधळून आवराआवर करायच्या फन्दात न पडता सगळी टीम उधळून बाहेर पडण्यात व्हायचे.पण क्यारम मधे फक्त पैशे आणि गेम हे दोनच प्रकार असायचे. ते सुद्धा सोंगट्या उभ्या मांडणे आणि आडव्या गोलाकार माडणे हेच त्यातले मुख्य फरक . आम्ही सोंगट्या उभा मांडून स्ट्रायकरने त्या उडवून समोरच्याचा गेम करण्याचे एक्स्पर्टी मिळवली होती.
घरात शांतता नांदावी हा घरच्यांचा उद्देश म्हणून त्यानी चेस बोर्ड आणि सोंगट्यांचा सेट आणुन दिला. शेजारच्य कोणीतरी नियम समजावून दिले. नियम आले की चेस आले हे आमचे गणीत. प्याद्यांची कापाकाप करताना चुकून समोरच्याचा उंट किंवा हत्ती मेला की एकदम प्रतापगड मिळवल्याचा आनंद यायचा. वजीर मिळाला की अगदी सिंहगडचे युद्ध जिंकल्या सारखे वाटायचे. तोंडाने तोफाअंचे आवाजदेखील काढायचो. घरात शांतता नांदवायच्या कटाला एकदम उडवून लावायचो..
मग एक दिवस असाच शाळेत चेस च्या युद्ध भाग घेतला. नशीब आमच्या दामले मास्तरानी चेस खेळताना चिलखत तलवार घालून यायचे कम्पल्शन केले नाही. कधी काय सांगतील हे त्यांच्याबाबत काही सांगता यायचे नाही. त्या स्पर्धेचे वातावरन काही एकदम भारीच होते. स्पर्धेचे नियम साम्गुन झाले. पण त्यात गुण कसे मोजतात. याचा आम्हाला काहीच पत्ता नव्हता. मी शेजारच्या विन्याला साम्गितले की नक्की नियम विचारुन ये. म्याच किती गुणांची असते वगैरे वगैरे. पण विन्या लाजाळू जो गेला तो परत आलाच नाही.
स्पर्धा सुरू झाली. मी तुफ्फान हाणामारी करत होतो. समोरच्या पेकात मोडावे तसे त्याचे दोन उंट, एक घोडा चार प्यादी अगदी एकद म्जोशात घेतली. माझाही एक हत्ती ,उंट, चार प्यादी गारद झाली. युद्ध म्हंटल्यावर हे होणारच की. पण या खेळाचे एक गम्मत आहे. खेळ सुरु असताना एकमेकांशे इरीशीरीने लढणारी प्यादी , वजीर हत्ती हे औट झाल्यावर मात्र एकदम डॉर्मेटरीत झोपल्यासारखे एकमेकाम्च्या ग़ळ्यात गळे घालून झोपी जातात.
आमच्या खेळ एकदम रंगात आला होता. घोडा उंट आनि हत्ती यांच्या कचाट्यात समोरच्याला एकदम पुरता प्याक केला होता. काय झाले कोण जाणे तो अचानक क्यासलिंग असे माही तरी म्हणाला आनो त्याने हत्ती आणि राजाच्या जागा बदलल्या. हे म्हणजे माझ्यासाठी बॉलरने बॉल टाकण्यासाठी धावत यावे आणि ब्याट्समनने ट्याम्प्लीज म्हणत रस्त्याच्या कडेला तोंड फिरवुन उभे रहावे तसे काहीसे झाले. हा असा काही नियम असतो हेच मला माहीत नव्हते.असायचे ही कारन्नव्हते. ऐन धुमश्चक्रीच्या मारामारीत ट्याम्प्लीज घ्यावी तसा हा क्यासलिंगचा प्रकार मला एकदम बुचकळ्यात टाकून गेला. मी देखील पुढच्या खेळीत क्यासलिंग म्हणत माझा उंट आणि वजीर बदलला. दामले मास्तराना त्याचा काय राग आला कोण जाणे त्यानी माझ्यकडे एकदम रागाने पाहिले आणि डाव बंद करायला लावला.
त्या दिवसापासून मला क्यासलिंग या शब्दाबद्दल कुतुहल निर्माण झाले. मी शेजारच्या विन्याला विचारले तर तो म्हणाला तो शब्द क्यासलिंग नै कै. क्यान्सलिंग असा आहे. तेंव्हा पासून मी लोकाना क्य्न्सलिंग म्हणजे काय असे विचारायला सुरवात केली. तीन बिर्हाडे सोडून चौथ्या खोलीत रहाणार्या शकु परांजपेला सुद्धा विचारले. तिने मला पाठीत धपाटा तर घातलाच वर पुन्हा चालता होत म्हणून साम्गितले. मला काय माहीत की तीचे लग्न क्यान्सल झाले होते म्हणून.
त्यामुळे की काय क्यासलिंग या शब्दाचे कुतुहल वाढतच गेले. क्यासलिंगचा अर्थ कोणीतरी "अदलाबदल" असा सांगितला. मराठीत त्याला कोणीतरी" कोट करणे" असाही अर्थ सांगितला. याने अर्थातच कुतुहल शमले नाही.
क्यासलिंग म्हणजे नक्की काय? ते कशासाठी करतात? कधी करतात. ते फक्त बुद्धीबळातच असते की अन्यखेळात देखील असते. उदा वेंकटेश प्रसाद ब्याटिंगला आला की क्यासलिंग करून सचिन तेंडुलकरला आणायचे. किंवा नेहरा फिल्डिंगला आला की क्यासलिंग करून त्याच्या ऐवजी जॉन्टी र्होडस ला आणायचा.
किंवा लंगडीत ऐनवेळेस खेळाडू औट व्हायच्या वेळेस म्हणजे पाठलगाकरणार्या खेळाडुचा हात समोरच्या भिडूच्या पाठीला लागायला अवघा अर्धा इंच उरला आहे त्या वेळेस एकदम क्यासलिंग म्हणायचे आणि नवा गडी मैदानात आणायचा.असे काही नियम आहेत का?
मनात सदोदित क्यासलिंगचेच विचार यायला लागाले. भुगोलात खारे वारे मतलई वारे हे समुद्राच्या पाण्यातील आणि जमिनीच्या तापमानातील फरकामुळे क्यासलिंग होउन वेगवेगळ्या दिशेने वहातात असे लिहीले होते. मास्तरानी मार्कांचे क्यासलिंग करुन ६१ ऐवजी ६१ दिले होते ती गोष्ट निराळी.
शाळेतील इयत्ता वाढत गेली तसे क्यासलिंग चा विसर पडला. जॉबमधे अप्रेजल च्या वेळेस नॉर्मलायझेशन नामक क्यासलिंगचा फटका बसल्यावर कधितरी तो शब्द आठवतो. कुठल्यातरी अपघातात बस चुकली म्हणून मागे राहिला आणि वाचला म्हणुन कोणीतरी देवाचे आभार मानत असतो तेंव्हा क्यासलिंग ची आठवण होते. सागर चित्रपटात डिंपल ने ऋषीकपूर आणि कमलहसनचे क्यासलिंगच केले होते.
आपल्याला आवडणारी पिंगट टप्पोरे डोळे महिरपी केस असलेली स्मिता प्रधान आपल्याकडे बघु हसते. तेंव्हा जीव अक्षरशः वरखाली होत असतो. हाय म्हणत हात उंचावून थांबण्याची खूण करत ती आपल्याकडेच येत असलेली दिसते तेंव्हा तर आपण साले एकदम राजा असल्याचीच जाणीव होते घशाला कोरड पडते. र्हदयात नाशीकढोल वाजायला लागतो. ती आपल्या समोर येवून थांबते. आणि तिच्या त्या माधुरी दिक्षीत स्टाईलच्या स्माईलने आपल्याशी बोलायला सुरवात करे. काय कसा आहेस. तुला एक काम सांगितले तर करशील? नाही नाही म्हणणार ना? बघ तुला माझी शप्पथ.....
असे काहीसे मान तिरपी करत बोलायला लागते. आपली पार शोएबाख्तरने यष्टी पार थर्डमॅन पर्यन्त लांब उडवावी तशी विकेट उडालेली असते पुढच्याच क्षणी ती म्हणते. शशी तुझा मित्र आहे ना? त्याला माझा एक निरोप सांगशील......
आयला तिने हे सांगेपर्यन्त आपले क्यासलिंग झालेय हे लक्षातच येत नाही.
प्रत्येकवेळी आपल्यालाच एस्केलेटेड प्रोजेक्टवर जावे लागते तेंव्हा क्यासलिंगची प्रकर्शनाने आठवण होते. वाटते की कोणीतरी राजा वाचावा म्हणून आपल्याला हत्ती करुन क्यासलिंग केले जाते.
हे सगळे आठवताना माझा मूळ प्रश्न कायमच आहे. क्यासलिंग म्हणजे काय? आंतर्जालावर शोध घेतला तर कैच्या कै वेगळेच वाचायला मिळते. काय तर म्हणे आपण ज्याला वजीर म्हणतो त्याचे नाव क्वीन. आणि राजा म्हणतो तो बिशप. बहुधा चतुरंगाचा हा देशी खेळ इंग्रजी भाषेत नेताना राणी राजा वजीर बिशप यांचे क्यासलिंग करुन नेला
हे असले वाचल्यावर मनाचा गोंधळ अणखीनच वाढतो. मनात विचारांचे क्यासलिंग जोरात होत रहाते.
पण प्रश्न कायमच रहातो. क्यासलिंग म्हणजे काय?
प्रतिक्रिया
14 Nov 2013 - 1:53 am | मोदक
पुढच्या लेखासाठी कच्चा माल ;)
14 Nov 2013 - 2:12 am | वडापाव
कॅसलिंग म्हणजे राजाला/किंगला आत घुसवणे आणि हत्तीला/कॅसलला बाहेर काढणे.
कॅसलिंग फक्त राजा आणि हत्ती यांतच होऊ शकते.
जर राजा आपल्या जागेवरून जराही हलला नसेल, तरच कॅसलिंग होऊ शकते.
जो हत्ती आपल्या जागेवरून हलला नसेल, त्याच्याशीच कॅसलिंग होऊ शकते.
कॅसलिंग करताना राजा आणि हत्ती यामध्ये कोणतेही प्यादे, उंट, घोडा, आपल्याचा असो वा दुस-याचा - असता कामा नये.
म्हणजे समजा, राजा E1 वर आहे, आणि हत्ती A1 वर आहे, तर B1, C1, D1 या जागा रिकाम्या असायला हव्यात. तसेच या मार्गात प्रतिस्पर्ध्याच्या कोणत्याही प्याद्याचा(वजीर, हत्ती, घोडा, उंट किंवा साधं प्यादं) चेक असता कामा नये.
A1 वरील हत्तीशी कॅसलिंग झाल्यावर राजा B1 वर आणि हत्ती C1 वर येतो. H1 वरील हत्तीशी कॅसलिंग झाल्यावर राजा G1वर येतो.
कॅसलिंगमुळे राजा सुरक्षित होतो आणि हत्तीला बाहेर पडायला एक वेगळी वाट मिळते, असा दुहेरी फायदा होतो. पण दरवेळी राजा सुरक्षित होतोच असं नाही. कॅसलिंगनंतर राजासमोरची तीन प्यादी जर जागची हलली नसतील, तर प्रतिस्पर्ध्याने त्याचा हत्ती किंवा वजीर १ क्रमांकाच्या रांगेत नुसता राजासमोर ठेवल्यानेही आपण चेकमेट होऊ शकतो.
14 Nov 2013 - 1:18 pm | सौंदाळा
एक प्रश्न..
प्यादे जर शेवट्च्या लाइनपर्यंत गेले तर आधी मेलेली कोणतीही सोंगटी परत जिवंत करुन घेता येता हे खरे आहे का?
14 Nov 2013 - 1:26 pm | वडापाव
खरंय.
14 Nov 2013 - 1:44 pm | चतुरंग
हवे असे नाही. कोणतेही मोहोरे मेलेले नसले तरी पाहिजे ते दुसरे मोहोरे घेता येते!
14 Nov 2013 - 4:04 pm | प्रसाद गोडबोले
राजा सोडुन =))
14 Nov 2013 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
चेकमेट !
14 Nov 2013 - 1:19 pm | साळसकर
कॅसलिंगनंतर राजासमोरची तीन प्यादी जर जागची हलली नसतील, तर प्रतिस्पर्ध्याने त्याचा हत्ती किंवा वजीर १ क्रमांकाच्या रांगेत नुसता राजासमोर ठेवल्यानेही आपण चेकमेट होऊ शकतो.
पण वाटेत आपला हत्ती असतो ना !
14 Nov 2013 - 1:25 pm | वडापाव
हॅ हॅ हॅ... हत्ती किंवा वजीर त्या रांगेत नसताना ओ... राहून गेलं सांगायचं.
14 Nov 2013 - 1:41 pm | साळसकर
जेमतेमच ओ, म्हणून कन्फर्म केले :)
14 Nov 2013 - 2:15 am | वडापाव
बिशप म्हणजे उंट; किंग म्हणजे राजा.
कॅसल म्हणजे हत्ती; नाईट म्हणजे घोडा.
पॉन म्हणजे बिच्चारं प्यादं; आणि क्वीन म्हणजे वजीर.
14 Nov 2013 - 1:47 pm | चतुरंग
कॅसल (castle) म्हणजे किल्ला - त्यावरुनच "कॅसलिंग" म्हणजे किल्लेकोट असा शब्द आलाय.
हत्तीला रुक (rook) असं म्हणतात म्हणून तर नोटेशनमधे R असा सिंबॉल वापरलेला असतो.
14 Nov 2013 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर
अगदी बरोबर.
कॅसल म्हणजे 'किल्ला'. हत्तीला बाहेर काढून राजाला किल्यात पाठवायचे. ह्या कृतीला कॅललिंग म्हणतात. राजा समोर तिन सोंगट्या असल्याने पटाच्या (समोरच्या) कुठूल्याही भागातून राजाला शह देता येत नाही. फक्त शेवटची घरांची ओळ सांभाळावी लागते. तेवढे सांभाळले की झाले. आणि ते सांभाळणे, राजा उघड्यावर राहण्यापेक्षा जास्त सोपे असते. पण शेवटच्या घरांच्या ओळीत हत्ती नसेल तर राजा किल्यातच मरू शकतो (चेकमेट). म्हणून किल्याच्या तिन प्याद्यांच्या मधले प्यादे एक घर वर सरकवून राजाच्या हालचालीसाठी एक घर मोकळे करून ठेवतात. कॅसलिंग पटाच्या दोन्ही बाजूस करता येते.
बुद्धीबळाच्या खेळावरून एक विनोद आठवला.
एकदा संता आणि बंता बुद्धीबळ खेळत असतात. (नाही, हा विनोद नाहीए. विनोद पुढे आहे). थोड्यावेळाने संताला कंटाळा येतो तो बंताला म्हणतो, बस झालं यार. कंटाळा आलाय बंद करूया खेळ आता.'
बंता म्हणतो, 'हो. ठिक आहे. नाहीतरी माझा एक उंट आणि तुझा एक घोडा एवढंच उरलंय पटावर.'
14 Nov 2013 - 7:47 pm | रमताराम
कॅसल म्हणजे 'किल्ला'.>> आणि म्हणून तो शब्द 'कॅसल-इन' असा आहे ('कॅसलिंग' नव्हे!, तो शब्द क्रियाविशेषण आहे, नाम नव्हे!), '(राजा) किल्ल्यात नेणे'! यावरून मराठीत 'किल्लेकोट' करणे अशी वाक्यरचना केली जाते.
14 Nov 2013 - 10:02 pm | चतुरंग
कॅसलिंग हा चुकीचा आहे. कॅसल्-इन हे मूळ योग्य!
15 Nov 2013 - 2:01 am | प्रभाकर पेठकर
डिक्शनरी आणि विकीपिडियावर 'कॅसलिंग' हाच शब्द आहे.
14 Nov 2013 - 6:22 am | पप्पु अंकल
हे हे हे… जबराट.. हाउर आंदो
14 Nov 2013 - 12:34 pm | विजुभाऊ
अशीच एक टर्म "ड्यूस" त्याचा देखील अर्थ लागत नाही...... ;)
14 Nov 2013 - 9:08 pm | बहुगुणी
'ड्यूस' हा शब्द टेनिसमध्ये वापरला जातो, जेंव्हा दोन्ही खेळाडू ४०-४० अशा बरोबरीत असतात तेंव्हा त्याला 'ड्यूस' म्हणतात.
(लेख मस्तच जमला आहे.)
14 Nov 2013 - 1:10 pm | जे.पी.मॉर्गन
भारी लिवलंय. मायला आपल्याला तर कधी कोणताच बैठा खेळ झेपला नाही. कॅरम, पत्ते सुद्धा नाहीत तिथं जागी बसून डोकं लावण्याची कामं कोण करणार? सगळा वेळ नातूबागेच्या ग्राऊंडवर पावसाळ्यात फुटबॉल आणि एरवी क्रिकेट खेळण्यात जायचा. पण म्हणूनच आपण आपलं "क्यासलिंग" नाही होऊ दिलं कधी ;-). सरळ स्टंप उडाला बर्याचदा... पण निदान आपली "रिप्लेसमेन्ट" नाही झाली.
बादवे.... प्रधानताई आणि शशीचा डाव तरी निकाली ठरला का हो? कि विशी कार्लसन सारखा ड्रॉ वर ड्रॉ?
ब्येस जमलाय लेख!
जे.पी.
14 Nov 2013 - 1:27 pm | प्यारे१
मस्त लेख हो इजुभौ!
14 Nov 2013 - 1:57 pm | अग्निकोल्हा
काय समजनाच माझे प्यादे मारले गेले कसे ??? सारा डाव पलटला , En Passant चा धसका जबरी बसला होता
14 Nov 2013 - 2:22 pm | विजुभाऊ
का राव उगा जुन्या खपल्या पुन्हा काढताय.क्यासलिंग झाल्यावर हत्ती कशाला लक्ष देतोय राजाकडे. बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना.......
पण तो डाव निकाली ठरला...... शशी अगोदरपासूनच एंगेज्ड होता. आपली साली नुसती पोष्टमनगिरी.
परत त्या स्मितवदनेला त्या नजरेने पाह्यला अवघडच झालं.
14 Nov 2013 - 7:48 pm | रमताराम
प्यादं पुढे ढकलून त्याचा वजीर होतो की...
14 Nov 2013 - 2:32 pm | प्रभाकर पेठकर
विजुभाऊ,
ह्या तुमच्या वरील विधानाकडे जरा लक्ष द्या. मला तरी कांही घोळ वाटतो आहे.
बाकी कॅसलिंग म्हणजे काय? ह्याचा उलगडा वरील प्रतिसादांतून झाला असेलच.
14 Nov 2013 - 2:37 pm | विजुभाऊ
बरोबर ते ६१ ऐवजी १६ असे हवे आहे. संपादकाना साम्गुन लेख एडीट करुन घेतो. तशाही आणखी काही चुका आहेत. त्या दुरुस्त करायच्या आहेत.
14 Nov 2013 - 3:55 pm | बॅटमॅन
अवांतर काही शंका:
बुद्धिबळाचे सध्या आंतरराष्ट्रीय नियम आहेत. स्टँडर्डायझेशन होण्याअगोदरच्या काळातले नियम काय होते-विशेषतः भारतात किंवा त्यातही महाराष्ट्रात?
माझ्या मते:
१. क्यासलिंगचा फंडा नव्हता.
२ प्यादे आठव्या घरात गेल्यावर प्यादे आठज्या मोहर्यापुढचे प्यादे आहे तोच मोहरा जिवंत करता यायचा. त्यामुळे हत्तीपुढचे प्यादे वजीर होणे वैग्रे प्रकार नव्हते.
३. राजा अन वजीर सोडून अन्य कुठल्याही मोहर्यासमोरचे प्यादे पहिल्यांदा दोन घरे पुढे नेता येत नव्हते, एक एक करतच दामटावे लागायचे.
४. वजीराला सध्या उंट अन हत्ती दोहोंची पॉवर आहे. आधी बहुतेक उंटाची पॉवर नव्हती.
अन मुख्य म्हणजे टाईम लिमिट नामक प्रकार नव्हता.
चौथा नियम कन्फर्म्ड नाही, पण जुने लोक अगोदर वरच्या १ ते ३ प्रमाणे खेळत असे मानण्यास जागा आहे. माझ्या आजोबांबरोबर लहानपणी खेळायचो तेव्हा ते तसे नियम वापरायचे, अर्थात बाबांनी नंतर रघुनंदन गोखल्यांचे बुद्धिबळ नामक पुस्तक आणल्यावर मग वाद होऊ लागले हा भाग वेगळा. काका नेहमीचेच नियम वापरत पण जुन्या काळी असे होते इ.इ. सांगत. बाबा मात्र पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांचे पुरस्कर्ते.
याबद्दल कुणाला कै माहिती असेल तर सांगा प्लीज़.
14 Nov 2013 - 9:28 pm | बहुगुणी
पण पहिल्या तीनही प्रकारच्या चालींनी खेळत असता (तेंव्हा माहित नसलेल्या या नव्या नियमांनी) मी माझ्यापेक्षा लहान मुलांकडून हरल्याचं नक्की आठवतंय, बहुधा तीस-एक वर्षांपूर्वी.
क्र. चार विषयी कधी ऐकलं नाही.
टाईम लिमिट मला वाटतं अजूनही 'नियम' नाही, फक्त स्पर्धात्मक सोयींसाठी मर्यादित वेळेचा वापर केला जात असावा. पण आम्ही तासं-तासच नव्हे तर दिवसें-दिवस एकच डाव खेळत असू हे चांगलं आठवतंय. (आठवा: "शतरंज के खिलाडी" मध्ये संजीव कुमार आणि अमजदचं पुन्हा-पुन्हा अर्धा राहिलेला डाव पुढे चालू करणं.)
15 Nov 2013 - 1:03 am | बॅटमॅन
कण्फर्मेषणसाठी बहुत धन्यवाद!
14 Nov 2013 - 4:09 pm | प्रसाद गोडबोले
कॅसलिंग हा माझ्यामते कॅसल + इन चा अपभ्रंश असावा :D
14 Nov 2013 - 4:48 pm | जेपी
या कॅसलींग मुळे भरे बाजार बेईज्जती झाली होती .
चक्क हारलो माझ्यापेशा 3 वर्षानी लहानाकडुन . आजपर्यंत तो घाव उरी बाळगतोय .
भावी संपादक -तथास्तु
14 Nov 2013 - 5:02 pm | arunjoshi123
कासलिंग, कॅसलिंग नव्हे
14 Nov 2013 - 6:40 pm | जेपी
माहित नव्हत म्हणुन तर ......
14 Nov 2013 - 5:48 pm | दुश्यन्त
लहानपणी आम्ही खालिलप्रमाणे खेळ खेळात असू.
1) कॅसलिंग हे फक्त राजा आणि हत्ती मध्ये दोन जागा मोकळ्या असतानाच करत असू. अर्थात त्यापूर्वी राजा / हत्ती हाललेला नसावा.
मध्ये तीन घरे मोकळी असलेले कॅसलिंग नंतर उशिरा समजले.
2)प्यादे आठव्या घरात गेल्यास तिथल्या जागी जी सोन्गटि ठेवतो ती जिवंत होत असे. अर्थात वजीर किंवा राजाच्या जागी पोहचली तर वजीरच आणि उन्टाच्या जागी त्याच घरातला उन्ट (तो जिवंत असेल तर विरुद्ध घरातला/ कलरचा उन्ट).
3) फक्त सुरुवातीच्या पहिल्या चाली मध्ये एक प्यादे एकदम दोन घरे चालत असे. बाकी सातही प्यादी एक एक घर चालत असत.
14 Nov 2013 - 5:56 pm | विजुभाऊ
वजीर जोवंत असेल तर?
14 Nov 2013 - 7:52 pm | रमताराम
दुसरा वजीर घेता येतो.
अर्थात एक वजीर असताना तुम्हाला दुसरा वजीर घेता येण्याची स्थिती आणू देणारा प्रतिस्पर्धी असेल तर त्याला तुम्ही इथपर्यंत खेळू दिलात हा तुमच्याच 'माथा आळ लागे' समजायला हवा. :p|
14 Nov 2013 - 11:08 pm | आतिवास
लेख आवडला.