मी खरच योग्य केल का?

saishwari's picture
saishwari in जनातलं, मनातलं
24 Jul 2013 - 7:42 pm

जवळ जवळ १५ दिवस झाले मला नोकरी सोडून . पण अजूनही या बाबत मला खात्री नाही. साधारण ३ वर्षांपूर्वी मला हि नोकरी लागली होती. तो काळ मंदीचा होता. नुकत्याच पदवीधर झालेल्यांना नोकरी मिळत नव्हती. ८ महिने नाममात्र पगारावर घासल्यावर हि संधी चालून आली होती. अर्थातच मोठ्या कंपनीतली ही संधी सोडून देण अजिबातच शक्य नव्हत. मुलाखत इथे झाली असली तरी नेमणूक बाहेरच्या राज्यात होती. फक्त ३ दिवसात सगळ ठरलं होत. सुरवातीचे दिवस नवीन शिकण्यात,नवीन ठिकाणी हिंडण्यात गेले, पैशांची चटक लागली होती, सोबतचे लोक अगोदरच पुढे गेले होते त्यामुळे आपण पण त्या शर्यतीत असाव अस वाटत होत. २ वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या पुण्यात यायचे वेध लागले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले पण त्या प्रयत्नांना यश येत नव्हत. असच करत करत अजून एक वर्ष सरल. बदली होत नव्हती आणि दुसरी नोकरी पण लागत नव्हती. सोबतच्या लोकांची बदली किंवा दुसरी नोकरीच काम होत होत. हळू हळू खूपच नैराश्या येऊ लागल. घराचे पण म्हणायला लागले कि सोड नोकरी आणि इथे पुण्यात येउन प्रयत्न कर. २-३ महिन्यात होईल कदाचित काम. सध्या मुलाखती देण सुरु आहे अजून कुठलाही confirm result मिळाला नाहीये.
मला पडलेले काही प्रश्न
१) मी जे केल ते योग्य केल का?(अर्थातच चूक केलेली आहे भावनेच्या भरात येउन पण काही चान्सेस नव्हते तिथून पुण्यातली नोकरी मिळण्याचे, जस कि मुलाखतीसाठी working days ला यायला लागायचं जे शक्य नव्हत )
२) सध्या बेकार आहे तेव्हा नवीन नोकरी मिळण्यासाठी काय खास प्रयत्न करावे लागतात monster आणि naukari वर register केल आहे
३) c2 H contract basis वर काही संधी मिळत आहेत तर contract वर काम करायचे काय फायदे तोटे आहेत?
४) knowledge update साठी course करायचे असल्यास .NET साठी classes ची माहिती मिळू शकेल का?
५)या व्यतिरिक्त पोटापाण्यासाठी काही घरच्याघरी उद्योग सुरु करता येईल का नोकरी मिळेपर्यंत like freelancing (freelancing बद्दल मी ऐकून आहे प्रत्यक्ष ज्ञान शुन्य आहे)?(suggestions च स्वागत आहे )
कदाचित हे माध्यम योग्य नसेल माझ्या मनातीत घालमेल व्यक्त करण्यासाठी परंतु माझी खात्री आहे कि इथे मला नक्की सांभाळून घेण्यात येईल आणि योग्य मार्गदर्शन मिळेल.

मुक्तकप्रकटनविचारअनुभवमतमदत

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

24 Jul 2013 - 7:56 pm | दादा कोंडके

या दिवसात दुसरी मिळेपर्यंत नोकरी सोडायला नको होती. पुण्यात स्वस्त मनुक्षबळ खूप आहे. (पैसे कमी मिळाले तरी चालतील पण पुण्याबाहेर नको, असं म्हणणारे खूप आहेत). तुमचा अनुभव दोन-तीन वर्षांचा आहे त्यामुळे नोकरी लागण्याची शक्यता आहे. पण सध्या तिशी पार केलेल्या आणि आठ-दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणार्‍या लोकांना जास्त मागणी नाही. भारतात तेव्हडं स्कील लागणारं काहीही (आयटी आणि नॉन आयटी मध्ये) बनवत नाहीत. म्यानेजर म्हणून काही लोकं पुरेसे होतात.

saishwari's picture

24 Jul 2013 - 8:24 pm | saishwari

खूप मोठी रिस्क घेतली आहे खरी.

आशु जोग's picture

24 Jul 2013 - 9:00 pm | आशु जोग

मागे तुमचा धागा वाचला
माहिती हवी आहे - पुण्यातील आयुर्वेदिक केंद्रे /निष्णात वैद्य
दोन महिन्यांपूर्वीचा. तेव्हा कुठे होतात ? नोकरी सोडली त्याला १५ दिवस झाले म्हणताय.
असू द्या...

एक गोष्ट म्हणजे पुण्यात यायचे असे का वेध लागावेत. असं काय आहे पुण्यात ?
जाऊ दे ... समजू शकतो.

तीन वर्षात काही शिकता आले असेल तर उत्तमच. त्या आधारावर नोकरी मिळू शकेल.
मात्र
"सॅपमे बहोत पैसा है" असले सल्ले ऐकून तिकडे जाऊ नका. तेच ओरॅकल अ‍ॅप्सबद्दल. आपल्याला काय नीट जमते याचा अंदाज घ्या. फ्री लान्सिंगला फारसा अर्थ दिसत नाही.

अन्यथा स्वतःच्या हिमतीवर उद्योग सुरू करा. फक्त एक ध्यानात ठेवा. उद्योग करणार असाल तर नोकरीचा विचार सोडून द्यावा लागेल. दोन गोष्टी एकावेळी नाही जमत.

saishwari's picture

24 Jul 2013 - 10:18 pm | saishwari

१५ दिवसांपूर्वी पर्यंत परराज्यात होते . आणि पुण्यात यायचं कारण म्हणजे आई वडील, नातेवाईक सगळे पुण्यात आहेत.आणि घरासाठी काही जबाबदार्या आहेत त्यासाठी येण आवश्यक होत

आशु जोग's picture

25 Jul 2013 - 12:31 am | आशु जोग

स्वतःचा व्यवसाय करा. ही एक संधी समजा.

अग्निकोल्हा's picture

25 Jul 2013 - 12:34 am | अग्निकोल्हा

या म्हणीचा अर्थ आता कळाला.

आदूबाळ's picture

25 Jul 2013 - 12:17 pm | आदूबाळ

+१ :)

आशु जोग's picture

26 Jul 2013 - 10:52 pm | आशु जोग

माझा पास

कवितानागेश's picture

24 Jul 2013 - 10:26 pm | कवितानागेश

आता नोकरी सोडलीच आहेत तर दुसरी मिळेपर्यंत स्किल्स कसे वाढवता येतील ते पहा.
मला या फिल्डमधले फारसे काही माहित नाही, पण लहान कम्पन्यांमध्ये सुद्धा अ‍ॅप्लाय करा.
आणि अगदीच मिळत नसेल तर जे स्किल्स आहेत ते वापरण्यासाठी, ताजे ठेवण्यासाठी एखाद्या क्लासमध्ये ते शिकवा. म्हणजे पैसेपण मिळतिल आणि टच पण जाणार नाही.

अर्धवटराव's picture

24 Jul 2013 - 10:41 pm | अर्धवटराव

जर दोर कापले नसतील तर परत ति नोकरी जॉइन करा (जुने सहकारी, मॅनेजर, एच. आर. वगैरे मंडळी उपयोगी पडतील) आणि नेक्स्ट टाईम आहे त्यापेक्षा चांगलं मिळवण्यासाठीच नौकरी-धंदा चेंज करा. आई-वडील, नातेवाईक पुण्याला परत यायचा आग्रह करतात किंवा इतर जबाबदार्‍या आहेत वगैरे सबबी निरर्थक आहेत हे तुम्हीही जाणुन आहात... कशाला स्वतःशी खोटं बोलताय?

अर्धवटराव

नाय वो अर्धवटराव.. त्यांच्या वैयक्तीक जबाबदार्‍या असतीलही. त्या त्यांच्यासाठी महत्वाच्या असतील. आपण सगळी परिस्थिती माहिती नसताना एकदम निष्कर्ष कसे काय काढणार..?

अर्धवटराव's picture

25 Jul 2013 - 7:30 am | अर्धवटराव

माझी धारणा अशी आहे कि जी गोष्ट तुमची भाजी भाकरी मिळवुन देते, मग तो व्यवसाय असो वा नोकरी, ति वन ऑफ द मोस्ट इंपोर्ट्ण्ट आहे. त्या पलिकडे देखील काहि महत्वाचं वाटत असेल तर ते खरच तेव्हढं महत्वाचं असायला हवं.

चालती नोकरी सोडुन देण्यामागे कारणे दोन्ही प्रकारची असतात, इमोशनल आणि प्रॅक्टीकल. इमोशनल कारणांसाठी, जसं होम सीकनेस, प्रेमसंबंध वगैरे, यासाठी नोकरी सोडुन जाणारे पाहिले आहेत व त्यातल्या बहुतेकांना आपल्या चुकांची जाणिव कधितरी होतेच. अशा इमोशनल कारणांसाठी नोकरी सोडुन देणे अयोग्य आहे.

प्रॅक्टीकल कारणांसाठी, जसं घरच्यांचं आजारपण वगैरे, माणुस अगोदर दुसर्‍या पायरीवर पक्का पाय ठेवतो व मगच मागची पायरी सोडतो, किंबहुना त्याने तसच करावं, अन्यथा त्याला जबाबदार्‍या निभवणं कठीण होउन जातं.

धागाकर्तीला जर कुठल्याही कारणाने पुण्यात परत यायचं होतं, तर पुण्याला नवीन जॉब शोधुन मग येता आलं असतं. तसंही एक बंगळुर, हैद्राबाद सोडलं तर पुण्याला संधी आहेतच. जर पुण्याला परतायचं कारण एव्हढच अर्जंट होतं तर कंपनीला तसं कळवुन, काहि महिन्यांची विनापगार सुट्टी घेऊन कार्य साधता आलं असतच. पुणे परतीचं कारण जर याहीपेक्षा महत्वाचं असेल तर जॉब वगैरे तसंही दुय्यम प्रायॉरटीवर येतं.

माझ्या मते आपलं जींदगीचं मीटर चालु असणं सर्वात महत्वाचं. धागाकर्तीने जर त्यावर पाणि सोडलं तर त्याला तेव्हढच महत्वाचं कारण आहे का हे त्यांनी शांतपणे समजुन घ्यावं म्हणुन प्रतिसाद प्रपंच केला.

अर्धवटराव

मी तुमच्याशी सहमत आहे - प्रॅक्टीकल विचार करताना कोणीही असाच विचार करेल.

परंतु,

१) आई-वडील, नातेवाईक पुण्याला परत यायचा आग्रह करतात किंवा इतर जबाबदार्‍या आहेत वगैरे सबबी निरर्थक आहेत हे तुम्हीही जाणुन आहात...

२) कशाला स्वतःशी खोटं बोलताय?

या दोन वाक्यांवरून धागाकर्ती (किंवा अन्य कोणीही) "शांतपणे समजून" घेण्याच्या मानसिकतेपासून दूर जाईल असे माझे मत आहे.

सौंदाळा's picture

26 Jul 2013 - 2:10 pm | सौंदाळा

मला वाटतं धागाकर्त्या ताईंच्या ऐवजी एखादे दादा असते तर त्यांनी असा निर्णय घेतला असता का?
किंबहुना मध्यमवर्गीय (थोडे +/-) स्तरातील बहुतांशी पुरुष सध्याच्या असा निर्णय घेतील का? मला नाही वाटत.
तुम्हाला घरच्यांची आत्यंतिक ओढ तसेच नजिकच्या भविष्यात होणारा विवाह(तुम्ही अविवाहीत आहात व विवाह करणार आहात असे ग्रुहीत धरुन)आणि त्यानंतर परत घर सोडावे लागणे या विचारातुन तर हा निर्णय घेतला नाही ना / नसेल ना असे वाटुन गेले.
आता नोकरी सोडलीच आहे तर चुक का बरोबर हा विचार सोडुन द्या आधी नाममात्र पगारावर नोकरी करत होतात तशी नोकरी अजुनही मिळेल पटकन, ती घ्या किंवा तुमच्याच आधीच्या फिल्ड रीलेटेड नवीन गोष्टी शिका / शिकत राहा आणि नवीन नोकरीचा शोध चालु ठेवा.
शुभेच्छा.

मला वाटतं धागाकर्त्या ताईंच्या ऐवजी एखादे दादा असते तर त्यांनी असा निर्णय घेतला असता का?

अगदी सुरूवातीला हा मुद्दा डोक्यात आला होता परंतु त्यावेळी हा मुद्दा मांडला असता तर तथाकथीत स्त्री भावनांची गळचेपी होवून स्त्रीपुरूष समानतेच्या मुद्द्यावर धागा हायजॅक करण्यासाठी टपलेल्या आयडींच्या हातात कोलीत मिळाले असते.

सौंदाळा's picture

26 Jul 2013 - 2:34 pm | सौंदाळा

खरच की मोदका..
अनुभव अनुभव म्हणतात तो हा.

ह्म्म्म... ति शक्यता आहे खरी.
धागाकर्तीला "भावनाओको समझो" हि विनंती.

अर्धवटराव

पॉझिटिव्हली घेतल्याबद्दल धन्यवाद. :-)

१) मी जे केल ते योग्य केल का?(अर्थातच चूक केलेली आहे भावनेच्या भरात येउन पण काही चान्सेस नव्हते तिथून पुण्यातली नोकरी मिळण्याचे, जस कि मुलाखतीसाठी working days ला यायला लागायचं जे शक्य नव्हत )

ठीक आहे.. सध्या योग्य / अयोग्य च्या विचारामध्ये मेंदू शिणवून बसण्यापेक्षा या परिस्थितीमध्ये काय करू शकता याचा विचार करा. निगेटीव्ह विचारसरणी आणि तत्सम लोकांपासून कटाक्षाने दूर रहा.

२) सध्या बेकार आहे तेव्हा नवीन नोकरी मिळण्यासाठी काय खास प्रयत्न करावे लागतात monster आणि naukari वर register केल आहे

फक्त रजिस्टर करून नोकरीसाठी कॉल येतीलच याची खात्री बाळगू नका. तुमची प्रोफाईल टॅगलाईन, स्किलसेट आणि एकंदर प्रोफाईल कसे साकारले आहे ते पहा. तुमची टॅगलाईन नेमक्या शब्दात नसेल तर एम्प्लॉयर्स प्रोफाईल मध्ये रस घेत नाहीत. तुम्हाला योग्य सल्ला देणारी अशी एखादी मोठी व्यक्ती असेल, पूर्वीचे कलीग्ज, बॉस वगैरे, त्यांच्याकडून प्रोफाईल, रिझ्यूम, तपासून घ्या.

पूर्वीच्या कलीग्ज ना प्रोफाईल पाठवा (पुण्यातच नोकरी हवी हे स्पष्ट करा). इंटर्नल हायरींग मध्ये एखाद्यावेळी जॅकपॉट लागू शकतो. सर्वात महत्वाचे - सध्या बेकार आहात म्हणून "मिळेल तो" जॉब पत्करू नका. तुम्ही जी नोकरी स्वीकारणार असाल त्या ठिकाणी किमान १ वर्ष देणार आहात ते लक्षात असूद्या.

३) c2 H contract basis वर काही संधी मिळत आहेत तर contract वर काम करायचे काय फायदे तोटे आहेत?

याबाबत मला फारशी माहिती नाही पण माझ्यामते काँट्रॅ़क्टच्या नोकरीवर आपण कोणत्याही क्षणी लाथ मारू शकतो. नोटीस पिरीयड वगैरे भानगडी नसतात. माहिती असलेला फायदा इतकाच. ही माहिती संपूर्णपणे चुकीची असू शकते.
अधिक माहिती आहे का कोणाला..?

४) knowledge update साठी course करायचे असल्यास .NET साठी classes ची माहिती मिळू शकेल का?

तुमचे फील्ड आणि नोकरीतील लेव्हल (या आधी कोणत्या पदावर काम केले आहे वगैरे..) माहिती दिल्यास नेमकी मदत करता येईल. तरीही ज्या कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करत आहात त्याच्या सतत संपर्कात रहा. नॉलेज अपग्रेड करत रहा.

५)या व्यतिरिक्त पोटापाण्यासाठी काही घरच्याघरी उद्योग सुरु करता येईल का नोकरी मिळेपर्यंत like freelancing (freelancing बद्दल मी ऐकून आहे प्रत्यक्ष ज्ञान शुन्य आहे)?(suggestions च स्वागत आहे )

फ्रीलान्सींग च्या नावाखाली चुकूनही मल्टीलेव्हल मार्केटिंगमध्ये जावू नका. गेलात तर फायदे तोटे नीट अभ्यासूनच जा!

वरील मते माझ्या अत्यल्पानुभवातून आली आहेत. चुकीची वाटल्यास दुरूस्त केली तरी हरकत नाही.

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Jul 2013 - 10:57 pm | लॉरी टांगटूंगकर

लै वेळा सहमत आहे,
सगळे मुद्दे व्यवस्थित सांगितले आहेत.

फ्रिलांसिगच्या नादि लागु नका. भारतात त्यात पैसा नाहिच पण नवख्या व्यक्तिला झेपणारी ति जबाबदारीही नाहि. जर का काहि प्रोब्लेम(बग) आला तर कल्पनेपलिकडील मेहनत घ्यावी लागते. पल्याड तुमचे डायरेक्ट कॉंटॅक्ट्स असतिल व ते कामे देतिल तर मात्र गोश्ट निराळि, बट दॅट डेफिनेटलि डझंट सिम द केस हिर.

नॉलेज अपडेट वगैरे ठिक आहे पण मुळात प्रत्यक्ष कामाचा खरच अनुभव असेल व ओओपि स्ट्राँग असेल तर चिंताच नको. पण यासाठि चक्क कोर्स वगैरेची विचारपुस म्हणजे आपला आत्मविश्वास कमालिचा खालावला असल्याचे लक्षण आहे. यातुन त्वरित बाहेर पडा. सराव म्हणून सहज गप्पा मारता मारता एखादा मोठा इमॅजिनरी प्रोजेक्ट तयार करुन त्याचे इन डेप्थ डिटेल्स, अर्किटेक्चर, डिजाइन पॅटर्न, टिंम, टास्क म्यानेजमेंट, वर्शन कंट्रोल जर तुम्हाला डोळ्याची पापणीही न हलवता विषद करता येत नसतिल तर.... त्यावर प्रभुत्व मिळवा. आत्मविश्वास वाहु लागेल.

तिन साडेतिन महिने सातत्याने प्रयत्न केल्यास काम नक्किच होउन जाइल.

तुम्हाला मुक्त कामाचा अनुभव दिसतोय. ;)

अग्निकोल्हा's picture

24 Jul 2013 - 11:54 pm | अग्निकोल्हा

अजुन एक महत्वाची गोश्ट लिहायची राहिली. धनाजिराव अथवा धन्या या आयडिंना अवश्य व्यनि करा त्यांनी नुकतेच यशस्वी जॉबस्थलांतर केलेले आहे व ते तुम्हाला हमखास यशाचा राजमार्ग नक्किच दाखवतिल.

मन१'s picture

25 Jul 2013 - 12:17 am | मन१

हेच बोल्तो. त्यातही

पण यासाठि चक्क कोर्स वगैरेची विचारपुस म्हणजे आपला आत्मविश्वास कमालिचा खालावला असल्याचे लक्षण आहे. यातुन त्वरित बाहेर पडा.
+१
.

सराव म्हणून सहज गप्पा मारता मारता एखादा मोठा इमॅजिनरी प्रोजेक्ट तयार करुन त्याचे इन डेप्थ डिटेल्स, अर्किटेक्चर, डिजाइन पॅटर्न, टिंम, टास्क म्यानेजमेंट, वर्शन कंट्रोल जर तुम्हाला डोळ्याची पापणीही न हलवता विषद करता येत नसतिल तर.... त्यावर प्रभुत्व मिळवा.
+१००
ह्या प्रकाराचा मला फायदा झालेला आहे. त्यानिमित्तने उत्तम उजळणी होते, नवीन शिकणे होते, बुद्धी गंज चढण्यापासून दूर राहते.

विजुभाऊ's picture

24 Jul 2013 - 11:15 pm | विजुभाऊ

जे झाले त्यावर फारसा विचार करू नका.
तुमचे स्कील्सेट अपडेट करा. तुमची स्कील्स जर फिरतीच्या नोकरीची असतील ( कन्सल्टिंग) तर नवी नोकरी देखील त्याच प्रकारची मिळतेल हे ध्यानात ठेवा.
स्कील्स सेट्स वाढवत असतानाच तुम्हाला नव्या संधी कुठे आहेत ते समजेल

मन१'s picture

25 Jul 2013 - 12:14 am | मन१

केलं ते चूक का बरोबर हे तपशील माहिती नसतानाच सांगणं शक्य नाही. आणि एनी वेज् ते करुन झालेलं आहे.
मला सुचणारे उपायः-
१.वरती काही जणांनी सांगितल्याप्रमाणे परतीचा रस्ता धरणे. पण तिथे काही कारणाने जमत नाही, पुण्यातच राहणे प्राधान्याचे आहे म्हणूनच इकडे आलात. त्यामुळे तिकडे तुम्ही जाण्याची शाक्यता किती ते ठाउक नाही.
..
२. सुदैवाने जॉब मार्केट सध्या बर्‍यापैकी सुधारले आहे. खालील कंपन्यांची विविध स्किलसेट साठी जोरदार भरती भरती/वॉक इन्स सुरु आहेत.
नेहमीच्या सर्विस इंडस्ट्री पैकी wipro,tcs,capgemini, pspl,LnT ह्यात वॉक इन सुरु आहेत. सहसा वॉक इन ची पाटी ह्या भल्याथोरल्या कंपन्यासमोर झळकली की तिथून पुढे दोन तीन आठवडे तरी त्याच स्किल सेट साठी भरती सुरु असते.(अधिक डोक्यांची गरज असेल तर दोन्-तीन महिन्यांपर्यंतही हे चालत असलेले दिसेल.)
hsbc,citi bank,barclays ह्यांच्याकडे इतर स्किलचे ठाउक नाही. डेटाबेसची बरीच गरज दिसली. पुरे पुरे म्हणेस्तोवर ह्यांनी पिच्छा पुरवला होता. cybage, synechron,syntel, येथीलही वॉक इनचे इ मेल पाहिलेत. पण नक्की किती प्रमाणावर सुरु आहेत ते ठाउक नाही.

principal financial group ही मगरपट्ट्याची कंपनी. तिथं दोनेक अआथवड्यापूर्वी दणदणीत भरती सुरु दिसली.ती अजूनही सुरु असावी असा अंदाज(पण स्किल सेट फक्त दोन्-तीनच होते.)
fundtech ही औंधमधील प्रॉडक्ट बेस कंपनी. तिथे कोअर डेटाबेसवाले हवे होते. इतर स्किल सेट्सचे ठाउक नाही.
.
थोडक्यात सांगायचं हे आहे की, सध्या जॉब मार्केट उत्तम सुरु आहे. तुम्हाला पटकन संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. पण अर्थातच नौकरी डॉट कॉम व मॉन्स्टर वर विसंबून राहू नका. मला कित्येकदा नौकरी वर रेझ्युमे असतानाही कॉळ आला नाही. रेफरलमार्फत पाठपुरावा केल्यास मात्र अवश्य येतो असा अनुभव आहे.
थोड्क्यात, तुमचे मित्र, नातेवाईक गाठा ह्या वर सांगितलेल्या कंपन्यातले. त्यांना लक्ष ठेवायला सांगा. एखाद्या कंपनीत डायरेक कुनीच मित्र नसला तर मित्राचा मित्र, मित्राचा भाउ/बहिण अशी लिंक लावून पहा. रेफरल* मार्फत पाठपुरावा होत असल्यास तुम्ही इंटारव्यू टेबल पर्यंत पोचालच. त्यापुढे सर्व काही तुमच्या कौशल्यावर, प्रोफाइअलवर नि कर्मावर. पण सध्या तरी इंटारव्यू टेबलावर पोचणे महत्वाचे.
फुरसतीत अधिक टंकेन म्हणतो.
.
.
* नुसते रेझ्युमे अपलोड करुन सोडणे हा रेफरलचा औपचारिक प्रकार झाला. तुमच्या मित्राने एच आर च्या खनपटीला बसून काम करुन घेणे महत्वाचे.

वरती बर्‍याच कंपन्यांची नावे आली आहेत* म्हणून एक सल्ला.

"XXX ही कंपनी लै टुकार आहे - आज्जीबात जॉईन करू नकोस" किंवा "लै भारी कंपनी आहे सोडू नकोस"" असे सल्ले कितपत मनावर घ्यायचे ते ठरवा.

तुमचे प्रोफाईल काय आहे आणि त्यामध्ये नवीन काय शिकताय यावर बरेच काही अवलंबून असते.

(मनोबा - निगेटिव्हली घेवू नकोस रे!)

मन१'s picture

25 Jul 2013 - 12:50 am | मन१

मोदकशेठ, कोणती कंपनी चांगली किंवा वाईट आहे, ह्याबद्दल कुठे काय लिहिले आहे?
सर्कार, अहो कुठे कुठे "मास रिक्रुटमेंट" सुरु आहे ते सांगण्याचा उद्देश होता.
मास रिक्रूटमेंट म्हणजे मोठमोठे वॉक इन्स. ह्याचे काही फायदे आहेत.(प्लीझ नोट कंपनी चांगली किंवा वाइट असण्याबद्दल बोलत नाहिये, मास रिक्रूटमेंट प्रोसेसबद्दल बोलत आहे.)
१. डझनाच्या किंवा शेकड्याच्या भावाने उमेदवारा घेतले जातात. त्यामुळे अर्थातच निवड होण्याची शक्यता खूप अधिक असते.
२. ह्या कंपन्यांचे वॉक इन्स हे प्रामुख्याने कॉम्पिटन्सी बेस्ड असतात. म्हणजे, लागलिच एखाद्या स्पेसिफिक डेस्क्/क्यूबिकलसाठी , एखाद्या स्पेसिफिक प्रोजेक्टसाठी ते तुम्हाल घेत नसतात, तर नजीकच्या भविस्ष्यात येणार्‍या मोठ्या प्रोग्राम साठी घेत असतात. त्यामुळे अर्थातच त्यांची किंचित थांबण्याची तयारी असते. ते तुम्हाला तुमचा नोटिस पिरियड लै मोठा आहे, असे म्हणत हाकलून द्यायची शक्यता कमी.
.
सो, कुठल्याच कंपनीबद्दल मी बोलत नाहिये रे बाबा, चांगलं किंवा वाईट म्हणून. पण ह्या सर्व कंपन्यात सध्या वॉक इन सुरु झालेला आहे, म्हणून कळवावं असं वाटलं. त्यांना त्याचा फायदा होउ शकतो. माझ्या सख्ख्या मित्रांनी आताच ह्या ठिकाणांचे इंतरव्यू दिलेत.( प्रत्येकाने तीन चार दिले आहेत, त्या सर्वांनीच प्रामुख्याने इथेच दिलेले आहेत, मगच्या दोनेक महिन्यात, कारण इथे अधिक संधी(सध्यातरी ) आहेत इतकेच म्हणायचे आहे.)
.
अर्थात, माझी समज माझ्या स्वतःच्या अनुभवाइतकी किम्वा फारतर माझ्या वर्तुळाइतकीच मर्यादित आहे हे मान्य.
ह्याउप्परही कुणाला दुरुस्ती सुचवाविशी वाटली किम्वा प्रतिसाद उथळ वाटला तरी ते मान्य आहे.

मोदकशेठ, कोणती कंपनी चांगली किंवा वाईट आहे, ह्याबद्दल कुठे काय लिहिले आहे?

मनोबा राजे.. मी पण तसे म्हणत नाहीये. फक्त आपले काय होते, भरपूर कंपन्यांची नावे एकत्र आली की असे सल्ले सुरू होतात. म्हणून स्पष्टपणे सांगितले इतकेच!

ब़जरबट्टू's picture

25 Jul 2013 - 9:20 am | ब़जरबट्टू

एकदा निर्णय घेतला ना मग आता योग्य अयोग्य च्या भानगडीत पडू नका. मागचे विसरा ( Knowledge सोडून :) ) व पुढे चला. आत्मविश्वास तर अजिबात गमवू नका. सगळे ते बेस्ट !

थोडे विषयांतर :- काय बी म्हणा, पण पुणे, पुणे, महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणत मराठी लोक परत मागे फिरतात हा अनुभव बरेच नार्थ आणि साऊथ चे सांगतात, आणि खुपदा त्यामुळेच आपल्या निवडिबाबत थोडे उदासिन दिसतात, आपण कितीही जीव तोडून सांगा… :) म्हणतील आज नाही तर उद्या सुरू करशीलच… पुणे, पुणे, तेथे काय उणे… :) ;)

चावटमेला's picture

25 Jul 2013 - 9:47 am | चावटमेला

HSBC मध्ये ETL टेस्टींग साठी आणि CITI मध्ये ETL डिवेलपमेंट साठी भरती सुरू आहे. तुमचा स्किल सेट अनुरूप असल्यास कोणी ओळखीचे तिथे सापडते का ते पाहा आणि रेझ्युमे रेफर करा.

सार्थबोध's picture

25 Jul 2013 - 10:02 am | सार्थबोध

जे झाले ते ठीक आहे यातून तुमचे नक्कीच काही तरी चांगले होणार आहे. जरा एवढी परिस्थिती निवळू द्या. बाहेरचे लोक ज्यांना तुमच्या क्षेत्रातले काही कळत नाही ते काय सांगतात तिकडे लक्ष देऊ नका. मिपा वर सगळ्यांनीच चांगले सांगितले आहे तसे करा. फरक नक्की पडेल. नोकरी नक्कीच मिळेल फक्त सध्या पगाराची फार अट ठेवू नका असे माझे फक्त मत आहे , कारण शक्यतो लोक पगारावर फार काथ्याकुट करतात आणि मग ऑफर जाते." लिंक्ड इन" वर संपर्क बनवा ते एक प्रभावी माध्यम आहे, आणि लहान लहान कंपन्या मध्ये अर्ज पाठवा . नवीन काही अवाजवी पैसे देऊन शिकू नका, सध्या मंदी आहे उदा.- एसएपी, ओर्यकल इत्यादी.

बाळ सप्रे's picture

25 Jul 2013 - 10:12 am | बाळ सप्रे

एखाद्या ठिकाणी काम करणे अगदी अशक्य/असह्य झालय अशी परीस्थिती नसल्यास .. दुसरी ऑफर मिळण्याआधी पहिली नोकरी सोडणे म्हणजे जरा घाईच केलीत असे म्हणेन मी.. पण पुण्यासारख्या ठिकाणी २ वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर IT मध्ये नोकरी मिळवणे फार कठीण नाही.. जरा bargaining power कमी होईल.. पण कोणतेही काम करायची तयारी ठेवा, नवीन शिकायची तयारी ठेवा, थोडक्यात नोकरीसाठी flexibility ठेवा.. काही कोर्स वगैरे करताना कोणत्या कौशल्याला जास्त मागणी आहे त्यावरुन ठरवा.. कोर्स केल्यावर काहीतरी project वगैरे करत रहा.. ज्यायोगे शिकलेले विसरले जाणार नाही..
आणि नुसत्या naukri, monster वर अवलंबुन न रहाता मित्र, सहकर्मचारी यांच्या माध्यमातून प्रयत्न करा.. बहुधा कंपन्या "referral"ला जास्त प्राधान्य देतात..

मी योग्य केलं का किंवा मी किती चुकीचं पाऊल उचललं याचा आता खल करू नका. त्यातून बोध घेऊन पुढे चला.
जास्त कीस पाडल्याने उगाच आत्मविश्वासावर परिणाम होतो.
काही आभाळ कोसळलेलं नाही. आणि ३ वर्षे म्हणजे इतका अडचण ठरेल इतका मोठा अनुभव नाही, उलट या अनुभवासाठी उपलब्ध संधी तुलनेने जास्त मिळतील.
आहे तो वेळ शिकण्यात आणि केलेले नीट समजून घेण्यात चांगला घालवा. कुठेही मुलाखतीमध्ये तुमच्या कामाबद्दलचं तुमचं स्वतःचं अंडरस्टँडिंग जास्त महत्त्वाचं. या दोन्ही गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
भरपूर अ‍ॅप्लिकेशन्सची मानसिक तयारी ठेवा. २-४ ठिकाणी काम नाही झालं तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका.
तुमचं मुख्य स्किल काय आहे याबद्दल किंवा तुमच्या पदवी बद्दल तुम्ही माहिती दिलेली नाही. ती इथे शेअर करा. इथे मा.तं. क्षेत्रातले अनेक जण आहेत. योग्य माहिती सह मार्ग नक्की निघेल. अजिबात अवघड नाही.

आशु जोग's picture

25 Jul 2013 - 4:01 pm | आशु जोग

"माहिती हवी आहे - पुण्यातील आयुर्वेदिक केंद्रे /निष्णात वैद्य "
हा धागा, पुण्यात येण्याचे वेध लागणे,
स्वाक्षरीमधे
"
कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे !"
हे पाहता काही लग्नाबिग्नाचा विचार असेल तर मग तिकडच्या पार्टीला विचारून काय ते करा.
शक्य त्या सर्व संभाव्यता ध्यानात घेऊन निर्णय घ्यावा.

उदय के'सागर's picture

26 Jul 2013 - 9:53 am | उदय के'सागर

इथे सर्वांनी योग्य आणि आवश्यक असे सल्ले दिले आहेतच असं वरवर प्रतिक्रिया वाचल्यानंतर जाणवलं त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जसे इथे बाकीच्यांनी सांगितलं आहे की आता ही योग्य वेळ नाहीये हा विचार करायची की तुम्ही केलं ते चूक आहे की नाही...
त्याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगावी वाटते की :
तुम्ही एक-दोन ठिकाणी असे म्हंटले आहे की 'इतरांना नोकर्‍या मिळाल्या, त्यांची बढती झाली , लगेच त्यांना पुण्याला बदली मिळाली' वगैरे वगैरे ... कृपया इथून पुढे जिथे कुठे नोकरी मिळेल तेव्हा असे आणि इतरांचे विचार करु नका ... ईर्षा असणे स्वाभाविक आहे पण त्या बरोबर थोडा 'प्रॅक्टीकल' विचार करणे पण गरजेचे आहे. आपण आपल्या आर्थिक, कौटुंबिक जवाबदार्‍या पाहूनच अश्या कुठल्याही ईर्षेला महत्त्व द्यावे आणि मगच असे निर्णय घ्यावे.. तसंही ईर्षा कधीच संपत नसते...

आशु जोग's picture

27 Jul 2013 - 12:54 am | आशु जोग

हेच आम्ही म्हणत होतो
http://www.misalpav.com/comment/500276#comment-500276
--
बादवे
लगीन याबाबत कुणी शंका विचारल्यास मिसळीवर त्या विषयातलेदेखील उत्तम कौंन्सेलर मिळतील.
असा पूर्ण विश्वास वाटतो.

आशु जोग's picture

27 Jul 2013 - 12:57 am | आशु जोग