मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी खरच योग्य केल का?

saishwari · · जनातलं, मनातलं
जवळ जवळ १५ दिवस झाले मला नोकरी सोडून . पण अजूनही या बाबत मला खात्री नाही. साधारण ३ वर्षांपूर्वी मला हि नोकरी लागली होती. तो काळ मंदीचा होता. नुकत्याच पदवीधर झालेल्यांना नोकरी मिळत नव्हती. ८ महिने नाममात्र पगारावर घासल्यावर हि संधी चालून आली होती. अर्थातच मोठ्या कंपनीतली ही संधी सोडून देण अजिबातच शक्य नव्हत. मुलाखत इथे झाली असली तरी नेमणूक बाहेरच्या राज्यात होती. फक्त ३ दिवसात सगळ ठरलं होत. सुरवातीचे दिवस नवीन शिकण्यात,नवीन ठिकाणी हिंडण्यात गेले, पैशांची चटक लागली होती, सोबतचे लोक अगोदरच पुढे गेले होते त्यामुळे आपण पण त्या शर्यतीत असाव अस वाटत होत. २ वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या पुण्यात यायचे वेध लागले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले पण त्या प्रयत्नांना यश येत नव्हत. असच करत करत अजून एक वर्ष सरल. बदली होत नव्हती आणि दुसरी नोकरी पण लागत नव्हती. सोबतच्या लोकांची बदली किंवा दुसरी नोकरीच काम होत होत. हळू हळू खूपच नैराश्या येऊ लागल. घराचे पण म्हणायला लागले कि सोड नोकरी आणि इथे पुण्यात येउन प्रयत्न कर. २-३ महिन्यात होईल कदाचित काम. सध्या मुलाखती देण सुरु आहे अजून कुठलाही confirm result मिळाला नाहीये. मला पडलेले काही प्रश्न १) मी जे केल ते योग्य केल का?(अर्थातच चूक केलेली आहे भावनेच्या भरात येउन पण काही चान्सेस नव्हते तिथून पुण्यातली नोकरी मिळण्याचे, जस कि मुलाखतीसाठी working days ला यायला लागायचं जे शक्य नव्हत ) २) सध्या बेकार आहे तेव्हा नवीन नोकरी मिळण्यासाठी काय खास प्रयत्न करावे लागतात monster आणि naukari वर register केल आहे ३) c2 H contract basis वर काही संधी मिळत आहेत तर contract वर काम करायचे काय फायदे तोटे आहेत? ४) knowledge update साठी course करायचे असल्यास .NET साठी classes ची माहिती मिळू शकेल का? ५)या व्यतिरिक्त पोटापाण्यासाठी काही घरच्याघरी उद्योग सुरु करता येईल का नोकरी मिळेपर्यंत like freelancing (freelancing बद्दल मी ऐकून आहे प्रत्यक्ष ज्ञान शुन्य आहे)?(suggestions च स्वागत आहे ) कदाचित हे माध्यम योग्य नसेल माझ्या मनातीत घालमेल व्यक्त करण्यासाठी परंतु माझी खात्री आहे कि इथे मला नक्की सांभाळून घेण्यात येईल आणि योग्य मार्गदर्शन मिळेल.

वाचन 11918 प्रतिक्रिया 0