डोंबिवली कट्टा....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
8 May 2013 - 10:30 pm

प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो,

दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे.

नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे.

ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल.

प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.

ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे...

मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.

हे ठिकाणधोरणविचारप्रतिसादशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

हरकत नाही. एकुणात कोंकणाच्या हद्दीतला आंबा आहे तोसवर काही हरकत नाही. माझ्या शालेय वयात रत्नागिरी हा एकच जिल्हा होता. त्यामुळे देवगड रत्नागिरीतच होते. सिंधुदुर्ग हा आपला प्रशासकीय सोयीसाठी वेगळा काढलेला भाग आहे झालं.

हां.. कोंकणाबाहेरची कोणतीशी आंब्याची जात अधिक उत्तम आहे म्हणाल तर वादास तोंड फोडण्यात येईल.

नन्दादीप's picture

9 May 2013 - 1:13 pm | नन्दादीप

>>कोंकणाबाहेरची कोणतीशी आंब्याची जात अधिक उत्तम आहे म्हणाल तर वादास तोंड फोडण्यात येईल>>
कोंकणाबाहेरची कोणतीही आंब्याची जात अधिक उत्तम नाहीयनायावर ठाम विश्वास..
बाकी चवी बाबत बोलाल तर आजोळ रत्नागिरी, त्यामुळे दर मे महीना हा रत्नागिरीला ठरलेला.... तरीही रत्नागिरी व देवगड हापूस यामध्ये निवडायचा ठरल्यास नक्कीच देवगड निवडीन.
माझ्या ओळखीच्या अख्ख आयुष्य रत्नागिरीमध्ये घालवलेल्या पक्क्या कोकणस्थ आजोबांनी जेव्हा देवगड हापूस खाल्ला, तेव्हा त्यांनी स्वतःहून मान्य केलय हे.

देवगड फळ लहान पण गोड असतं. रत्नागिरीला आकार जरा मोठा पण घमघमाट देवगडइतका नाही.

रत्नागिरीमधेही मूळचा जंगलातला (नैसर्गिक) अर्थात एका वर्षाआड फळ येणारा असंकरित आंबा फार म्हणजे फार कमी. गुहागरनजीक आमची जी थोडीफार झाडे शिल्लक आहेत ती या प्रकारातली नैसर्गिक आहेत. अफलातून चव असते, पण ती ८० वर्षांहूनही जुनी असल्याने इतकी उंच गेली आहेत की त्यावर कोणी चढू शकत नाही (चढायला तयार होत नाही) किंवा कितीही बांबू जोडले तरी झोळण्याने उतरवता येत नाहीत. झाडपिके पडतात तेच हल्ली मिळतात.

नन्दादीप's picture

9 May 2013 - 1:40 pm | नन्दादीप

नाही ओ. गैरसमज असेल कदाचित. पण देवगड फळ १,२,३,४ अश्या चारही प्रतीत मिळते... १ नंबर आंबा २५०-३०० ग्राम पर्यंत असतो.
रत्नागिरी फळ पण मोठे असते... परंतु चव देवगड आणि रत्नागिरी वेगळीच... झाडांच्या बाबतीत बोलाल तर रत्नागिरी मधली झाड खूपच मोठ्ठी आणि ऊंचच ऊंच असतात यावर मात्र सहमती.

पैसा's picture

9 May 2013 - 5:40 pm | पैसा

गोव्याच्या मानकुरादची चव जगात कोणत्याच आंब्याला नाही. हापूसपेक्षा महाग आहेत आतासुद्धा! यावरून काय तो बोध घ्यावा.

आँ ? रत्नांग्रीची ना तू मूळची ? गोव्याच्या रंगाला भुललीस? तिकडची झालीस का गो?

पैसा's picture

9 May 2013 - 5:52 pm | पैसा

जास्त जोरात बांग देतो अशी म्हण ऐकलीव नाय काय कंदी?

jaypal's picture

9 May 2013 - 5:50 pm | jaypal

तु गोव्याहुन मानकुराद पाठव. या निमीत्तने तो तरी चाखायला मिळेल. ;-) काय हॅपी ना?

पैसा's picture

9 May 2013 - 6:00 pm | पैसा

मूळ रत्नांग्रीची आणि वरच्या आळातली असल्याने या विषयावर मौन पाळत आहे.

सूड's picture

9 May 2013 - 8:26 pm | सूड

मानकुराद कसा दिसतो त्याचा फोटो तरी डकवा की !!

पैसा's picture

9 May 2013 - 8:38 pm | पैसा

http://www.heartbeatgoa.com/?q=node/58 आज चित्र चिकटवायला काहीतरी पिराब्ळम आहे.

मी किती वर्षांत मानकुराद नाही खाल्ला ज्योताई!मला पाठव बघू मानकुराद! ;)

पैसा's picture

9 May 2013 - 7:36 pm | पैसा

यशोधरा, जयपाल, गवि, सगळ्यांनी गोव्यात या आणि मनसोक्त मानकुराद खाऊन चला!

यशोधरा's picture

9 May 2013 - 7:45 pm | यशोधरा

येणारच आहे मी. तू ठेव आंबा माझ्यासाठी. ;)

इरसाल's picture

10 May 2013 - 10:09 am | इरसाल

मानकुराद खाउ मनमुराद.
.
.
.
.
.
.
.
.
.
रजा मुराद म्हणावेसे वाटत होते :);)

अनन्न्या's picture

9 May 2013 - 4:59 pm | अनन्न्या

देवगड असो किंवा रत्नांग्रि एक नंबरच!!!! काय रत्नाग्रिकर, अशामुळेच फावते चीन आणि पाकड्यांचे! एकवाक्यता नाही आपल्यात! आपण आपले एकमेकांतच स्पर्धा करतो.
@ सूड,
मी आले असते तर नक्की आणले असते रत्नागिरी हापूस!! आमची स्वतःची बाग नाही आणि मी कोब्रा आहे तरीही!

ढालगज भवानी's picture

9 May 2013 - 7:57 pm | ढालगज भवानी

उगा बेचव मेक्सिकन आंबे खाणार्‍यांना जळवू नका रे!!!

श्रीरंग_जोशी's picture

9 May 2013 - 8:09 pm | श्रीरंग_जोशी

रत्नांग्रीचा अल्फोन्सो मिळतो की इकडे...

ढालगज भवानी's picture

9 May 2013 - 10:54 pm | ढालगज भवानी

आमच्या सुपीरीअर मध्ये नाही मिळत. ब्लूमिंग्टन ला पटेल ला गेलो की आणू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे बघा... फेड-एक्स ने जगभर आंबे पोचवतात (अर्थात ज्या देशांत कायद्याने आयातबंदी नाही तेथे):

http://www.mangobazar.com/

ढालगज भवानी's picture

9 May 2013 - 11:32 pm | ढालगज भवानी

धन्यवाद!!! :)

क्लिंटन's picture

9 May 2013 - 8:29 pm | क्लिंटन

कट्ट्याला यायला आवडले असते पण रविवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास डोंबिवलीहून निघून घरी (चेंबूरला) परत यायला उशीर होईल आणि परत सोमवारी ऑफिस आहेच.त्यामुळे या कट्ट्याला येता येणार नाही :(

शैलेन्द्र's picture

9 May 2013 - 8:33 pm | शैलेन्द्र

वा वा .. कट्टा, आण तोही डोंबिवलीत ?

आलंच पाहिजे..

:)

कट्ट्याला शुभेच्छा.. सध्या पथ्यपाण्याच्या नादात बरेच कट्टे हुकले आहेत.

असो..

सुधीर मुतालीक's picture

10 May 2013 - 11:33 am | सुधीर मुतालीक

हल्ली नशिक डोंबोली दीड तासात पोचता येते त्यामुळे नाशिकला ब्रुह्त्मुंबै जाहीर केल्यास आम्ही ही येऊ, नाशिक बाजा घेऊन !चालेल ना ?

विसोबा खेचर's picture

10 May 2013 - 1:57 pm | विसोबा खेचर

जमलं तर येईन साहेब..

उपास's picture

17 May 2013 - 11:21 pm | उपास

मजा करा आणि त्यानिमित्ते रामदाससाहेबांच्या डोंबिवलीवरच्या त्या लेखाचे यथोचित वाचनही होउंद्या :)
शुभेच्छा!