भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
दिवस ६
सँटोरिनी आणि गाढव यांचे एक अजब नाते आहे! या बेटावर सर्वत्र गाढव नजरेस पडतात. स्थानिक लोक त्यांचा वापर घोड्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांसाठी करताना दिसतात. बेटावर असलेली अनेक कठिण कडे हि गाढवे लिलया पार करतात. यांचा उपयोग पर्यटकांच्या करमणुकीसाठी देखिल केला जातो. तसेच फिरा व इयाचे समुद्राकडे झुकलेले कठिण कडे उतरायचे असल्यास गाढव किंवा रोपवे हे दोनच मार्ग उपलबद्ध आहेत.
अनेक प्राणिमात्र संघटणांनी गाढवाचे असे ओझी व माण्से वाहण्यावर, या आधी निषेध नोंदवला होता. तुरळक वेळा गाढवांचा पायी घसरुन इथे दुर्घटनाही घडलेल्या आहेत. आमच्या एथेन्स मधल्या मैत्रिणिने देखिल आम्हाला या गाढवावर न बसण्याचा सल्ला दिला होता. तसेही आम्हाला गाढवावरुन आमची वरात काढायची हौस नसल्याने, आम्ही देखिल त्यांच्या वाटेला फिरकलो नाही!
गाडी काल संध्याकाळीच परत केल्यामुळे आज आम्ही बसनेच पेरीसा समुद्र किनार्यावर जायचे ठरवले. आधी पाहिलेला कालामारी हा काळ्या गोट्यांचा समुद्र किनारा होता तर पेरीसा हा काळ्या वाळुचा. अनवाणी फिरताना हि वाळु आपल्या पायाला गुदगुल्या करत राहते. समुद्राच्या थंड पाण्यात डुबक्या मारुन आणि आता सराईतपणे छायाचित्र काढुन आम्ही जेवायला छानसे हॉटेल शोधले आणि ग्रीस हे खवय्यांसाठी (खास करुन मासेखाउंसाठी) एक पर्वणीचे ठिकाण आहे यावर शिक्का मोर्तब झाला! या वेळीस जेवणात होते ते, खास ग्रीक मधला जाड्या दाण्यांचा भात आणि मटणाचे स्ट्यु. त्या बरोबर तळलेल्या वांग्याचे काप आणि पाव. भारतात लादी पाव मिळतो अगदी तसाच! अणि सर्वात शेवटी खास ग्रीक dessert!!
*मटणाचे स्ट्यु
*तळलेल्या वांग्याचे काप
*जाड्या दाण्यांचा भात
*पाव
*ग्रीक दही
*सँटोरिनी लावा केक
*पेरीसा समुद्र किनारा
*पेरीसा समुद्र किनारा
पेरीसाचा समुद्र किनारा फिरुन झाला आणि आम्ही आमचे हॉटेल असलेला मेसारीयाचा भाग बघायचा ठरवला. कुठल्याही टुर एजन्सी विना केलेल्या सहलीचा फायदा म्हणजे आपण कुठल्याही वेळिस जे मनात येईल ते निसंकोच कितीही वेळ पाहु शकतो व म्हणुन मी माझ्या सगळ्या भटकंत्या या स्वतःच आ॑खतो, याचा आता मला छंदच लागला आहे! अर्थात त्यासाठी पुर्वतयारी ही आलीच!
मेसारीया हे छोट्या पवनचक्क्यांनी सजलेले बेटावरचे छोटेसे गाव आहे. सँटोरिनी हे जरी या पवनचक्क्यांसाठी प्रसिद्ध नसले तरी इथल्या पवनचक्क्या फारच मोहक दिसतात आणि त्यांच्या सोबतीला घराची गडद रंगांच्या खिडक्या व दारं ही आलीच!
*पवनचक्क्यां
*गडद रंगांच्या खिडक्या व दारं
*मेसारीयातील एक घर
*गडद रंगांच्या खिडक्या
मेसारीया ची भटकंती संपवुन आम्ही आमच्या हॉटेलवर परतलो आणि मागच्या बाजुला असलेल्या स्विमिंग-पुल मधे पोहत, दुपारच्या भरपेट झालेल्या भोजनामुळे आलेला आळस झटकला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस पुन्हा इया कडे आपोआप पावले वळली. कालचा सुर्यास्त मनात ताजा असतानाच काय वेगळे बघायला मिळणार याची उत्सुकता लागले होती. इयाला पोहोचण्याआधी एकदा फिराला थांबुन खरेदीचा कार्यक्र्म पक्का झाला आणि ग्रीस मधली शेवटची मनसोक्त खरेदी करुन इया कडे निघालो. फिराला खरेदी करताना आकाशात लांबवर पावसाळी ढग दिसु लागले होते तसेच आता समुद्री वारे जरा जास्तच वेगानी वाहत असल्याचे जाणवु लागले. इयाला पोहोचेपर्यंत, वार्याचे रुपांतर वादळात झाले. काळ्या मेघांनी आता सँटोरिनी ला चारी बाजुंनी घेरले. आजच्या आमच्या सुर्यास्त पाहण्याच्या कार्यक्रमावर पाणी पडले होते!
*इयाचे एक चर्च
*भरुन आलेले आभाळ
*भरुन आलेले आभाळ
*ढगाआड झालेला सुर्यास्त
सर्व शक्तिमान झ्युस देवाने आजचा आमचा सुर्यास्त बघण्याचा कार्यक्रम उद्ध्वस्त केला होता. आज त्या मावळत्या सुर्याला मानवंदना द्यायला इयाच्या त्या कड्यांवर कोणीच नव्हते. झ्युस देवाच्या कोपामुळे तो आज कोणतेही आढे-वेढे न घेता मुकाट अस्ताला गेला होता.
संध्याकाळी उशीरा पाऊस थांबला आणि आम्ही हॉटेलवर परतलो.
*इयातील एक दुकान
*इयातील एक दुकान
आज सँटोरिनी ने आम्हाला तिचा एक नवीन पैलु उलगडुन दाखवला होता. समुद्रातल्या या नखाएवढ्या, एकाकी बेटावर जेव्हा वादळ येत, तेव्हा काय परिस्थीती होते, हे आम्ही अनुभवले होते. सुर्यास्त हुकल्याचे अजिबात दु:ख नव्हते, उलट सँटोरिनीच्या ह्या रौद्ररुपाने आम्हाला भारावुन सोडले होते. दुसर्या दिवशी सकाळी सुर्योदयाच्या वेळीस आमचे विमान सँटोरिनी वरुन उड्डाण करणार होते. त्यामुळे रात्रीच हॉटेलच्या रिसेप्शन वर पहाटे एअरपोर्ट टॅक्सी बुक करुन आम्ही आमचे सामान बांधुन झोपी गेलो.
दिवस ७
पहाटे सुर्योदयाच्या आधीच आम्ही हॉटेल सोडले आणि सँटोरिनीच्या त्या छोट्याश्या एअरपोर्टवर पोहोचलो. थिरा एअरपोर्ट हे एजि.पारास्केवी ह्या सँटोरिनीच्या पुर्वेच्या समुद्र किनार्याला लागुन आहे. मुंबईच्या मुख्य बस डॅपो पेक्षाही लहान असे हे एअरपोर्ट असावे! विमानाची वाट पहात असताना समोर समुद्राच्या लाटा उसळताना दिसत होत्या. पुन्हा एकदा त्याकडे बघत तंद्री लागली होती. आणि काहीही ध्यानीमनी नसताना सुर्यदेव जणु कोणी आज्ञा केल्याप्रमाणे हळु हळु आपल्या सोनेरी किरणांसोबत एगियनच्या जादुमयी समुद्रातुन प्रकट होताना दिसले आणि एअरपोर्ट वरच्या गेटजवळ बसलेल्या आम्हा तुरळक प्रवाशांची, त्याचे दर्शन घ्यायची धडपड सुरु झाली. समोरच्या काचेला नाक चिटकवुन अगदी लहान मुला प्रमाणे आम्ही सारे, निसर्गाचा हा नित्यकर्म एखाद्या चमत्कारा प्रमाणे पहात होतो. सँटोरिनीतुन दिसणारा सुर्य नक्की मनावर काय जादु करतो, हे शब्दात सांगणे खरेच कठिण आहे!
हे सर्व इतक्या पटकन घडले कि कॅमेरा काढुन फोटो काढण्याचे भान देखिल राहिले नाही. तरी मनात साठवलेला हा सुर्योदय आजही, डोळे बंद केले की समोर येतो. जणु आदल्या दिवशीच्या सुर्यास्ता पासुन आम्हाला वंचित ठेवल्यामुळे झ्युस देवाने आज हा सुर्योदय आमच्या समोर त्याची भरपाई म्हणुन पेश केला होता!
विमान नियोजीत गेट वर लागले होते जड पावलाने आम्ही या सँटोरिनी नामक स्वर्गाचा निरोप घेत होतो. विमानाने ठरलेल्या वेळी आकाशात उड्डाण केले, खिडकीतुन खाली पाहिले असता, नकाशात दिसते तसे हुबेहुब सँटोरिनी दिसत होते. तिच्यावरची ती निळ्या घुमटाची घरे आता अगदी ठिपक्यांएवढी झाली होती. विमानाने आता गती पकडली होती आणि आम्ही समुद्र पार करुन अथेन्सच्या मुख्य एअरपोर्टवर पोहोचलो होतो.
व्हिएन्नाच्या आमच्या connecting flight मधे बसुन आम्ही ग्रीसचा निरोप घेतला होता... ग्रीस आता उरणार होते ते फक्त आठवणींपुरतेच..!!
आज या सफरीला दिड वर्ष उलटुन गेले तरी ग्रीस मधल्या त्या आठवड्याची आठवण काही केल्या पुसट होत नाही. युरोप मधले अनेक देश फिरलो असलो तरी ग्रीसनी माझ्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे आणि म्हणुनच ही आठवण तुमच्या पर्यंत पोचवावी तसेच तिला एक कायमस्वररुपी स्थान मिळावे म्हणुन हा सगळा लिहण्याचा खटाटोप पार पाडला. ग्रीस मध्ये झालेल्या आमच्या मित्र-मैत्रिणींची आता आमच्या बरोबर चांगलीच गट्टी जमली आहे. परंतु ग्रीक सरकारच्या कडक धोरणांमुळे ते देखिल बेकारीचे बळी पडले आणि नाखुशीनेच त्यांना कॅनडाला परतावे लागले. ग्रीस (खास करुन अथेन्स) हा जरी पर्यटकांसाठी आता धोकादायक शहर समजले जात असले तरी योग्य परिस्थिती निवडुन इथे आठवड्याभारासाठी फिरुन येणे सहज शक्य आहे. हजारो बेटे असलेला हा देश आता आम्हाला पुन्हा कधी साद घालतोय याचीच आम्ही देखिल वाट पहात आहोत. तो पर्यंत अथेन्स आणि सँटोरिनी च्या रमणिय आठवणींमध्ये रमण्याशिवाय दुसरा पर्याय नाही...
समाप्त.
प्रतिक्रिया
12 Mar 2013 - 3:42 am | रेवती
सगळे फोटू पाहून, लेख वाचून भारावून गेल्यासारखं झालं. लेखमाला आठवणीत राहण्यासारखी झाली, मुख्यम्हणजे मला उठून कुठे जायला नको आता! नवर्याला या मालिकेबद्दल सांगणार नाहीये, नाहीतर ग्रीसला जावे लागेल. ;)
लेखनाबद्दल धन्यवाद निशांत!
12 Mar 2013 - 3:53 am | nishant
रेवती ताई, संपूर्ण लेखमाला आवडल्याब्द्द्ल तुमचे अनेक धन्यवाद... मी तर म्हणतो एकदा ग्रीस ला जाउनयाच नवर्या बरोबर :)
12 Mar 2013 - 1:32 pm | Mrunalini
अगं रेवती... उअल्ट नवर्याला दाखव फोटो... म्हणजे मग तुला पण ग्रीसला जाता येईल ;) ... खरच खुप सुंदर आहे.. एकदा तरी नक्की जाउन ये. :)
12 Mar 2013 - 1:34 pm | Mrunalini
अगं रेवती... उलट नवर्याला दाखव फोटो... म्हणजे मग तुला पण ग्रीसला जाता येईल ;) ... खरच खुप सुंदर आहे.. एकदा तरी नक्की जाउन ये. :)
12 Mar 2013 - 8:20 am | ५० फक्त
खुप खुप धन्यवाद, तुमचा सगळा प्रवास इथं शेअरल्याबद्दल आणि जाउदे अजुन काय लिहिणार, तेच ते लिहुन कंटाळा आलाय.
12 Mar 2013 - 12:46 pm | nishant
५० फक्त राव, प्रतिसादाब्द्द्ल, तुमचे अनेक धन्यवाद :)
12 Mar 2013 - 1:01 pm | बॅटमॅन
मस्त मस्त मस्त!!!! या लेखमालेबद्दल अनेक धन्यवाद!!!
12 Mar 2013 - 8:46 pm | nishant
तुमच्या प्रतिक्रिये बद्द्ल अनेक धन्यवाद..
12 Mar 2013 - 8:41 pm | मिसळ
मस्त मालिका आणि तेवढेच अप्रतिम फोटो. धन्यवाद.
12 Mar 2013 - 8:48 pm | nishant
फोटो आणि लिखाण आवड्ल्याबद्द्ल अनेक धन्यवाद..
13 Mar 2013 - 1:05 am | श्रीरंग_जोशी
संपूर्ण लेखमालिका म्हणजे एक पर्वणीच आहे. संपल्यामुळे हुरहुर लागली आहे.
15 Mar 2013 - 1:53 pm | nishant
लेखमालीका आवड्ल्याब्द खुप धन्यवाद.. :)
14 Mar 2013 - 1:29 pm | दिपक.कुवेत
का संपली हि लेखमाला...सर्व भाग आणि फोटो परत परत पहावेसे वाटतायत. तुझी अशाच एखादी पुढिल सफर येउदे.
15 Mar 2013 - 2:00 pm | nishant
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद... लवकरच, अशिच एखादी लेखमालीका घेउन पुन्हा हाजिर होइल.. :)
15 Mar 2013 - 2:45 pm | आतिवास
पूर्ण लेखमाला वाचली. आवडली. (सर्वांनी सांगितल्याप्रमाणे) फोटो अप्रतिम आहेत.
15 Mar 2013 - 4:21 pm | nishant
उत्स्फुर्त प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद.. :)
15 Mar 2013 - 2:47 pm | पैसा
या मालिकेतल्या इतर लेखांप्रमाणेच या भागातही उत्तम फोटो आणि लिखाण मिळाले. धन्यवाद!
15 Mar 2013 - 4:22 pm | nishant
लेखमाला आवड्ल्याबद्द्ल अनेक धन्यवाद :)
15 Mar 2013 - 2:57 pm | तर्री
वर्णन आणि फोटो - समसमा योग .
15 Mar 2013 - 4:23 pm | nishant
लेखमाला आणि फोटो आवड्ल्याबद्द्ल अनेक धन्यवाद :)
16 Mar 2013 - 12:09 am | निनाद मुक्काम प...
नितांत सुंदर देश , ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देशात सध्या त्यांच्या नागरिकांना आपला देश सोडून जर्मनी किंवा फ्रांस मध्ये स्थलांतरित व्हावे लागत आहे.

ग्रीक जेवण व माणसे स्वभावाने खूपच चांगली असतात असा माझा अनुभव आहे.
ह्या लेख मालिकेच्या माध्यमातून ह्या देशाला जाणून घ्यायची संधी मिळाली.
त्याबद्दल निशांत ह्यांचे आभार.
पुढच्या लेख मालिकेतून तुमचा देश जाणून घ्यायची इच्छा आहे.
ही लेख मालिका व ग्रीक लक्षात राहण्यासारखे आहे.
बाय बाय ग्रीक
16 Mar 2013 - 2:54 am | nishant
धन्यवाद निनाद.
ग्रिक लोकांबद्द्ल तु म्हण्तोस ते अगदि १००% खरे आहे! आणि स्लोव्हाकीयाबद्द्ल म्हणशिल तर लिहायला बरेच काहि असल्याने जरा सवडीनेच लिहिणार आहे :)
17 Mar 2013 - 12:02 am | अशोक सळ्वी
लेखमाला पूर्ण वाचली व खुप आवड्ली. ग्रीसच खुप छान वरणन मोजक्या शब्दात झालय्..फोटो तर अप्रतीम! लवकरच नवी लेखमाला सुरु करा! वाट पहतो आहोत.
17 Mar 2013 - 3:01 am | nishant
धन्यवाद