आठवणीतले ग्रीस - भाग ४

nishant's picture
nishant in भटकंती
19 Feb 2013 - 3:00 am

भाग १
भाग २
भाग ३

दिवस तिसरा:

kldf

* एथेन्स ते पिराउस

सकाळी लवकरच जाग आली. रोजच्या प्रमाणे हॉस्टेल मध्येच नाश्ता करुन बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या मेट्रो स्थानकावर पिराउस कडे जाणारी मेट्रो पकडली. ऑफिसला जाणर्‍या कर्मचार्‍यां बरोबरच अनेक पर्यटकही स्थानकावर दिसत होते. मेट्रोच्या डब्यात मोक्याच्या जागी फलक लावले होते - "विनातिकिट प्रवास करणार्‍यास १००० युरो दंड किंवा ६ महिने तुरुंगवास!" ग्रीसला कर्जबाजारीतुन मुक्त करण्यासाठी सरकारनी योजलेल्या अनेक अभिनव उपक्रमांपैकी हा एक! संपुर्ण युरोप मध्ये असला दंड कुठेही नाही. आम्ही आपले तिकिट पुन्हा एकदा खिशात निट पडताळुन पाहिले. २० मिनिटातच आम्ही पिराउस स्थानकावर पोहोचलो. पिराउस मेट्रो स्टेशन सोडताच समोर दिसते पिराउस बंदर. स्वच्छ निळा समुद्र आणि त्यात उभ्या असलेल्या अनेक फेरी, क्रुज लाइनर्स, मोठाली जहाजे. समुद्र उजव्या हाताला ठेवत "ब्लु स्टार फेरीच्या" (Blue star ferry) कार्यालयाच्या दिशेने चालु लागलो. आकाशात गिरक्या घेणारे सिगल्स, मधेच, अचानक समुद्रात डुबकी मारत आणि अलगद मासे पकडुन पुन्हा वर येत. एका गलने मासा पकडला कि तो हिसकवण्यासाठी बाकिचे डांबीस पक्षी त्याचा पाठलाग करत. हा खेळ बघत आम्ही आमच्या फेरी कंपनीच्या ऑफिसात पोहोचलो आणि ५ मिनिटाच्या आत आमचे तिकिट confirm असल्याचे समजले. सँटोरिनी बेटावर पोहोचवणारी फेरी, उद्या सकाळी इथुनच निघणार याची आता खात्री झाली! एक चिंता मिटली!

klsd
* सीगल पक्षी

ksdfj
* पिराउस बंदर

dfog
* पिराउस बंदर

ori
* पिराउस बंदर

kl
* पिराउस बंदर

rdfkjg
* पिराउस बंदर

dkflj
* पिराउस बंदर

lwfj
* पिराउस बंदर

kjfr
* पिराउस बंदर

"सारोनीक गल्फ" च्या पुर्व किनार्‍यावरचे. अथेन्सच्या मुख्यभुमी पासुन १२ किमी दक्षिणेकडे असलेले पिराउस हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात गाजवलेले 'पॅसेंजर पोर्ट' मानले जाते. प्रवासी तसेच मालवाहु जहाजे ह्याच बंदराला लागतात. बंदराचा आवार अतिशय स्वच्छ आणि निटनेटके आहे. पिराउस भागातील घरे लाल दगडातील गोल घुमट असलेली होती. काही काळ बंदराचा फेरफटका मारला आणि सुर्य डोक्यावर यायच्या आधी आम्ही तिथुन निघालो. अथेन्स सेंटर मध्ये परतल्यावर समोरच नजरेस पडली ती एथेन्स शहराची सहल घडवणारी "Open air bus tour". आज आमचा एथेन्स मधला शेवटचा दिवस होता आणि पुढच्या टुरची बस यायला अजुन २-२.३० तासांचा अवधी शिल्लक होता. Open air bus चे तिकिट काढले आणि कडाक्याचे ऊन जाणवत असताना देखिल बसच्या वरच्या मजल्यावर जाउन बसलो. बस मध्ये मिळालेल्या 'रेकोर्डस' कानाला लावुन बाहेरचे नजारे बघत होतो. बस सिंटागामा square मधुन निघत, ग्रीस पार्लिमेंट, ऑलिंपीक स्टेडियम, नॅशनल लायब्ररी असे करत बरीच ठिकाणे फिरवत होती. मी जमेल तसे फोटो घेण्याचा प्रयत्न करत होतो. एथेन्स सारख्या मोठ्या शहरात कमी वेळात जास्त गोष्टी बघायच्या असल्यास ही बस टुर एकदम उत्तम आहे.

oieu
* city tour bus

kjer
* city tour bus

jdksfh
* ऑलिंपीक स्टेडियम

kjfh
* city tour

reituiet
* city tour

oir
* city tour

jdkhfk
* city tour

kjerh
* अ‍ॅक्रोपोलिस

skdfhksd
* ग्रीक तिळाचा ब्रेड

सिटी टुर संपवुन निघालो ते 'केप सुनिनच्या' (Cape Sounion) 'टँपल ऑफ पॉसाय्डोनच्या' (Temple of Poseidon) टुर बसच्या स्टॉप कडे. अथेन्सच्या मुख्य बस स्थानकावरुन केप सुनिन साठी नियमीत KTEL च्या लोकल बस सेवा उपलब्द्ध आहेत. तसेच ज्यादा पैसे मोजुन आपण टॅक्सीने देखिल इथवर पोहोचु शकतो, परंतु सद्ध्या वारंवार होणार्‍या दंगली आणि अथेन्स मध्ये सतत होत असलेल्या संपांचा विचार करत आम्ही ग्रीसला निघण्या पुर्वीच www.viator.com वरुन टँपल ऑफ पॉसाय्डोनची सहल निश्चीत केली होती. त्यामुळे हाती असलेल्या voucher च्या आधारे आम्ही बस स्टॉप शोधला आणि बस तिथे पोहोचताच, आमच्या आरक्षित केलेल्या खुर्चीत जाउन बसलो. ऐसपैस Mercedeze कंपनीची बस, त्यातला थंडगार AC आणि आरामदायक आसने, ह्यामुळे बाहेरच्या रणरणत्या उन्हातुन आत आल्याबरोबर फार बरे वाटले.
बस मध्ये आमच्या सारखेच १५-२० पर्यटक होते. बस सुरु होताच, इंग्रजी बोलणार्‍या guide ने तिचा परिचय करुन देत Cape Suonin आणि Posiodon च्या देवळाची माहिती द्यायला सुरवात केली. एथेन्स पासुन ७० किमी वर असलेले Cape Suonin हे ग्रीसच्या दक्षिणेकडचे शेवटचे टोक आणि या टोकावर बांधलेले देऊळ म्हणजेच Temple of Poseidon. ७० किमी हा प्रवास पुर्ण पणे एगियन (Agean) समुद्राच्या काठाने होतो, बसच्या उजव्या हाताला समुद्र तर डाव्या हाताला ग्रीक मार्बलचे डोंगर आणि या नागमोडी वळणाच्या रस्त्यावरुन आमची बस धावत होती. ग्रीक मार्बल हा जगात सापडल्या जाणार्‍या काही महागड्या मार्बल्स पैकी एक. खरेतर जगाला मार्बलची ओळख या ग्रीक लोकांनी करुन दिली. "मार्बल" हा शब्द देखिल एका अस्स्ल ग्रीक शब्दापासुन आलेला आहे.
खिडकीतुन दिसणारा निळा स्वच्छ समुद्र आणि वाळुचे किनारे, बस मधुन उतरुन सरळ पाण्यात उडी घ्यायचा मोह आवरणे कठिणच होते. १-२ तासातच Temple of Poseidon नजरेस पडु लागले. Guide ने driver ला एके ठिकाणी बस थांबवायला सांगितली आणि आम्हाला या फोटो पॉइंटवर फोटो काढण्यास सांगितले. फोटोचा कार्यक्रम १०-१५ मिनिटात उरकुन पुन्हा बस सुरु. काही वेळातच आम्ही केप सुनिन च्या टेकडीवर पोहोचलो. टेकडीवरुन दिसत होता तो अथांग पसरलेला एगियन समुद्र, त्यावर चमकणारी सोनेरी सुर्यकिरणे आणि तरंगणार्‍या लहान मोठ्या होड्या.

oiy

opixdv
* फोटो पॉईंट वरुन काढलेला फोटो

oert
* एगियन समुद्र

sklrf
* केप सुनिन वरुन दिसणारा एगियन समुद्र

"क्रेत" या ग्रीक बेटावरली महाकाय राक्षसांचा वध करुन राजकुमार थिसियुस, केप सुनिनला आपल्या जहाजाने परतत होता. आपल्या पुत्राची वाट बघत अथेन्सचा राजा एगियुस याच केप सुनिनच्या टेकडीवर उभा होता. प्रथेप्रमाणे आपल्या जहाजावरचा काळा झेंडा काढुन, विजयी पांढरा झेंडा फडकवायला मात्र राजपुत्र विसरला. राजपुत्राची नाव लांबुन काळा झेंडा फडकावर येत असलेली बघुन राजा एगियुसला वाटले की राजपुत्र राक्षसा बरोबरच्या लढाईत गतप्राण झाला. राजाने न राहवुन दु:खाच्या भरात सरल समुद्रात उडी टाकुन आपले प्राण त्यागले. ग्रीसच्या समुद्राला एगियन हे नाव पडले ते असे!
याच टेकडीवर आहे ते ग्रीकांचा समुद्र देव पॉसायडोनचे मंदिर. प्राचीन ग्रीक मान्यतेनुसार निसर्गात असणारी प्रत्येक गोष्ट ही देवांच्या मर्जीप्रमाणे वागते, त्यामुळे जसा वायु, जशी पृथ्वी तसाच समुद्र. समुद्रात आपल्या नावा उतरवण्यापुर्वी ग्रीक नावीक ह्या पॉसायडोन देवाचा आशिर्वाद घेत, त्या समोर बकर्‍याचा किंवा कोंबड्याचा बळी देत आणि मगच समुद्री मोहिमेला निघतात.
४४० BC ला बांधलेल्या या मंदिराचे आता फक्त भग्नावशेश उरले आहेत. मंदिराच्या खांबावरील कोरीव काम अत्यंत उत्क्रुष्ठ दर्जाचे आहे हे आता वेगळे सांगायला नकोच!

oyiiop
* Temple of Poseidon

oore
* Temple of Poseidon

rih
* केप सुनिन वरुन दिसणारा एगियन समुद्र

foyioty
* Temple of Poseidon

ktj
* केप सुनिन वरुन दिसणारा एगियन समुद्र

ytoi
* केप सुनिन वरुन दिसणारा एगियन समुद्र

संध्याकाळी ५ च्या सुमारास आमची बस केप सुनिन पासुन एथेन्स शहराच्या दिशेने रवाना झाली. आजची हि अथेन्स मधली आमची शेवटची संध्याकाळ असल्याने, आम्ही Sintagama square ते प्लाका असा एक फेरफटका मारायचा ठरवले. भोजनासाठी प्लाकामधल्याच एका लहानशा रेस्टॉरंट मध्ये जेवण केले. ह्या वेळेस चव चाखली ती 'Moussaka' (ग्रीक पद्धतीने बनवलेले वांगे) आणि तळलेले फेटा चीज आणि ह्या सगळ्यांबरोबर ग्रीक सॅलॅड!
एथेन्स मधले आमचे वास्तव्य आता संपले होते. दुसर्‍या दिवशी पहाटे ५ ची मेट्रो पकडुन पिराउसला पोहोचुन सॅन्टॉरीनी बेटावर जाणारी फेरी पकडायची होती. जहाजाने होणारा हा आमचा आयुश्यातला पहिलाच प्रवास असणार होता! एथेन्स मधले ३ दिवस अगदी मजेत गेले होते. उरलेली सुट्टी सुद्धा अशीच आरामात जावी अशीच ग्रीक देवाकडे प्रार्थना करत झोपी गेलो...

eir
* Sintagama square जवळ

klrj
* Sintagama square जवळ

ditu
* Sintagama square जवळ

kwr
* प्लाका

rht
* प्लाका

krjt
* प्लाका

krelj
* तळलेले फेटा चीज

ri
* Moussaka (ग्रीक पद्धतीने बनवलेले वांगे)

क्रमशः

भाग ५

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2013 - 3:24 am | श्रीरंग_जोशी

नयनरम्य चित्रे आहेत. वर्णन सवडीने वाचतो.

एक सूचना - काही चित्रांनी फारच अधिक क्षेत्रफळ व्यापले आहे. एच टी एम एल चा वापर करून त्यांचे क्षेत्रफळ प्रमाणबद्ध केल्यास अधिक बरे दिसेल व चित्रांची गुणवत्ताही बाधित होणार नाही.

चित्रे आवडल्याब्द्द्ल धन्यवाद :)
या फोटोंची साइज ऑरीजन्ल फोटोंपेक्षा ९०% कमी केलि आहे..अजुन कमी केली तर त्यांचा दर्जा खराब होण्याची श्क्यता आहे, म्ह्णुन अजुन 'एचटीएमएल' नी छोटी करत नाही आहे..

पैसा's picture

19 Feb 2013 - 6:14 pm | पैसा

वर्णन फोटो फार छान आले आहे. ग्रीक पुराणातल्या गोष्टी मधून मधून आल्याने अधिकच रंजक!

सुनील's picture

20 Feb 2013 - 7:43 am | सुनील

लेखमाला चांगली सुरू आहे. फोटोही सुंदर.

सुंदर चित्रे आणि वर्णनही. निळा रंग मोहक आहे. सध्या हिवाळा असताना तर सूर्यप्रकाशात काढलेली चित्रे बघायला बरे वाटत आहे. छान!

आवडेश... :) (अवांतर - खाण्याचे फोटु असले की आम्हांला सगळंच आवडेश.) :)

nishant's picture

20 Feb 2013 - 1:00 pm | nishant

खाण्याचे फोटु असले की आम्हांला सगळंच आवडेश.

मी पण हेच म्ह्णतॉ ;)

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 2:10 am | श्रीरंग_जोशी

या भागातील रोचक वर्णन आवडले.

तुम्ही जिथे राहता त्याबद्दलही कधी विस्ताराने लिहा...

nishant's picture

21 Feb 2013 - 5:30 pm | nishant

स्लोवाकीया बद्द्ल फार कमी जणांना माहीती असल्यामूळे व लिहीण्यासारखे बरेच काहि अस्ल्याने, सवडिने लिहिणार आहेच... :)

प्रसाद१९७१'s picture

21 Feb 2013 - 6:07 pm | प्रसाद१९७१

मला अ‍ॅथेन्स मधे ग्रीक लोकांचा वाईट अनुभव आला, त्यामुळे ग्रीक वरचे मन च उडाले

स्मिता.'s picture

21 Feb 2013 - 8:08 pm | स्मिता.

निळ्याशार समुद्राचे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाचे फोटो बघून खूप खूप छान वाटले.

मुक्त विहारि's picture

21 Feb 2013 - 10:18 pm | मुक्त विहारि

वाचायला मजा येत आहे.

धन्यवाद...

सुफी's picture

19 Apr 2013 - 12:37 am | सुफी

सर्वच फोटो खुप छान ... विशेशतः एगियन समुद्राचे