५ सप्टेंबर १९७२ - म्युनीच - जर्मनी.
आजचा दिवस ऑलंपीक इतिहासातला एक काळा दिवस म्हणून नोंदला जाईल याची कुणाला पुसटशीही कल्पना नव्हती.
२६ ऑगस्ट १९७२ ला सुरू झालेल्या ऑलंपीकला दीड आठवडा होवून गेला होता. आयोजक, स्पर्धक, प्रेक्षक दर चार वर्षांनी होणार्या या महोत्सवात जोशाने सहभागी झाले होते.
मार्क स्पिट्झ ने जलतरण स्पर्धेतील सात वेगवेगळ्या प्रकारात विश्वविक्रम करत सातही सुवर्णपदके पटकावून खळबळ उडवून दिली होती. कोणत्याही खेळाडूने केलेली आत्तापर्यंतची ही सर्वोच्च ऑलंपीक कामगिरी. (हा विक्रम पुढे २००८ पर्यंत; माईकल फेल्प्सपर्यंत अबाधित राहिला.)
Rowing, Diving, Swimming, Gymnastics वगैरे खेळांच्या सर्व स्पर्धा संपल्या होत्या व एकूण १७ दिवस चालणार्या या स्पर्धेची सांगतेकडे वाटचाल सुरू होती.
सगळे सुरळीत सुरू असताना अचानक इस्रायली खेळाडूंवरील हल्ल्याच्या बातमीने सर्वजण हादरून गेले.
इस्राईलच्या दोन खेळाडूंची हत्या आणि बाकी नऊ जण (इस्रायली खेळाडू, कोच व रेफ्री) ओलीस - खुद्द ऑलंपीक व्हिलेजमध्ये!!
सर्व स्पर्धाप्रकार तातडीने थांबवले गेले. अचानक स्पर्धा थांबवली जाण्याची ही बहुदा पहिलीच वेळ.
या नाट्याला पहाटे पहाटे सुरूवात झाली. स्पोर्ट्स बॅग घेतलेल्या आठ 'खेळाडूंनी' ऑलंपीक व्हिलेजमध्ये प्रवेश केला. ट्रॅकसूट व संपूर्णपणे खेळाडूसारखा पेहराव असल्याने कुणाला काहीच शंका आली नाही. निर्धोकपणे हे सर्वजण इस्रायली खेळाडूंच्या निवासस्थानापाशी पोहोचले. या सर्व दहशतवाद्यांनी स्वतःचे खेळाडूंमध्ये इतके बेमालूम वेशांतर केले होते की ऑलंपीक व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना एका सहा सात फुटी कुंपणावरून उड्या माराव्या लागल्या व हा 'शॉर्टकट' तिथल्याच काही अमेरीकन (खर्या) खेळाडूंनी अजाणतेपणे या दहशतवाद्यांना दाखवला - आपल्यासारखेच खेळाडू समजून.
या इमारतीत व शेवटच्या मधल्या खिडकीच्या खोलीत हे सगळे नाट्य सुरू झाले.
बनावट किल्लीच्या सहाय्याने दहशतवाद्यांनी इमारतीत प्रवेश मिळवला. प्रवेश मिळाल्यानंतर काही मिनीटातच अत्यंत चपळाईने हालचाली करत सगळेजण ग्रेनेड, पिस्टल्स आणि राईफल ने शस्त्रसज्ज झाले. हा सगळा साठा स्पोर्ट्स बॅगांमध्ये लपवला होता. दहशतवाद्यांनी आता मोर्चा खेळाडूंच्या खोल्यांकडे वळवला व हाती असलेल्या किल्ल्यांच्या सहाय्याने दरवाजे उघडण्याची खटपट करू लागले. या आवाजाने एक रेफ्री - Yossef Gutfreund जागा झाला. दारापाशी होणारा आवाज व गडबड कशाची आहे हे पहायला गेल्यावर त्याला दारातून आत येण्याचा प्रयत्न करणारा व चेहरा झाकलेला एक दहशतवादी दिसला व त्या दहशतवाद्याच्या हातातील AKM (AK-47 चे एक भावंड) राईफल ही डोकावत होती. Yossef ने ओरडून आपल्या सहकार्यांना जागे केले, एक जड वजन दरवाज्याच्या आतील बाजूने लावले व हाताने दरवाजा घट्ट बंद करून मदतीसाठी आरडाओरड करू लागला.
हे आवाज ऐकून वेटलिफ्टींग कोच Tuvia Sokolovsky एक काचेची खिडकी तोडून पळून गेला.
८ दहशतवाद्यांच्या ताकतीपुढे एकट्या Yossef चे प्रयत्न अपुरे पडले व दहशतवाद्यांनी खोलीत प्रवेश मिळवला. Yossef ला बंदी बनवून ते बाकीच्या खेळाडूंचा शोध घेवू लागले. पुढचा नंबर होता Yossef एक सहकारी Moshe Weinberg . या कुस्तीच्या कोच ने प्रतिकार करायचा प्रयत्न केला, एका दहशतवाद्याने Moshe च्या गालात गोळी मारून त्याला जखमी केले व त्याला सोबत घेवून आणखी खेळाडूंचा शोध सुरू केला. यादरम्यान काही इस्रायली खेळाडू काय घडते आहे याचा अंदाज आल्याने मिळेल त्या मार्गाने पळून गेले.
Moshe ने प्रसंगावधान राखत या दहशतवाद्यांना दुसर्या खोलीकडे न नेता सरळ तिसर्या खोलीमध्ये नेले जिथे सहा रेसलर्स आणि वेटलिफ्टर्स होते. कदाचित् Moshe ला त्या सशक्त खेळाडूंकडून प्रतिकाराची अपेक्षा असावी पण ते सर्वजण झोपेतून नुकतेच जागे झाल्याने गोंधळून गेले व कोणताही प्रतिकार न करता दहशतवाद्यांच्या स्वाधीन झाले.
Moshe व सर्व ओलीस घेवून दहशतवादी पुन्हा पहिल्या खोलीकडे येताना Moshe ने पुन्हा हल्ला करून एका दहशतवाद्याला बेशुध्द केले व दुसर्यावर तिथल्याच एका सुर्याने वार केले. दहशतवाद्यांनी बंदूकीच्या सहाय्याने Moshe ला शांत केले - कायमचे.
आणखी एक वेटलिफ्टर Yossef Romano ने ही प्रतिकार करून एका दहशतवाद्याला जखमी केले पण लगेचच Yossef वर गोळ्या झाडून त्याचाही कायमचा बंदोबस्त केला गेला.
या गडबडीचा फायदा घेवून दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेला Gad Tsobari हा रेसलर सुटका करून घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला.
दोन खेळाडू ठार व नऊ जण ओलीस.
रक्ताळलेली सकाळ उजाडली.
हळूहळू एक एक गोष्टी उजेडात येवू लागल्या. "ब्लॅक सप्टेंबर" या पॅलेस्टाईन गटाच्या दहशतवाद्यांनी हे सगळे घडवून आणले होते. अपुरी व ढिली संरक्षण व्यवस्था आणि एका बाजूला असलेले इस्रायली खेळाडूंचे अपार्टमेंट याचा पुरेपूर फायदा घेत दहशतवाद्यांनी हा रक्तपात घडवून आणला होता व इस्राईल पॅलेस्टाईन संबंध बघता हा रक्तपात इथेच थांबणार नाही याचीही सर्वांना खात्री पटली होती.
दहशतवाद्यांच्या हातात नऊ निष्पाप खेळाडू सापडले होते आणि केवळ त्यांचे "ज्यू" व "इस्रायली " असणे दहशतवाद्यांना पुरेसे होते.
Ze'ev Friedman (वेटलिफ्टर)
David Berger (वेटलिफ्टर)
Yakov Springer (वेटलिफ्टींग जज)
Eliezer Halfin (रेसलर - कुस्तीपटू)
Yossef Gutfreund (रेसलींग रेफ्री)
Kehat Shorr (शूटींग कोच)
Mark Slavin (रेसलर)
Andre Spitzer (फेन्सींग कोच)
Amitzur Shapira (ट्रॅक कोच)
या नऊ खेळाडूंच्या हातापायांना व नंतर एकमेकांना बांधून त्यांचा संपूर्णपणे ताबा घेवून दहशतवादी पुढच्या कामाला लागले. सर्व खेळाडूंनी आपले भवितव्य हताशपणे नियतीकडे सोपवले होते.
प्रतिकार करणार्या Moshe Weinberg च्या गालावर गोळी मारून त्याला जायबंदी करणार्या व नंतर त्याला निर्दयीपणे ठार मारणार्या दहशतवाद्यांचा कृरपणा खेळाडूंना बंदी बनवल्यानंतरही सुरूच राहिला. बंदूकीच्या धाकाने काही खेळाडूंना अत्यंतीक मारहाण केली गेली, घृणास्पद प्रकार म्हणजे आधीच मरण पावलेल्या Yossef Romano चे गोळ्यांनी चाळण झालेले व रक्ताने माखलेले शव बंदी खेळाडूंच्या पायाशी आणून टाकून दिले गेले, या सर्व खेळाडूंना जरब बसावी म्हणून.
दहशतवाद्यांनी मागण्या जाहीर केल्या. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या २३४ पॅलेस्टीनीयन कैद्यांची सुटका करून त्यांना इजिप्तला पोहोचवणे व जर्मनीच्या ताब्यात असलेल्या दोन कैद्यांची सुटका.
इस्रायलने त्यांच्या त्या वेळच्या धोरणाप्रमाणे लगेचच नि:संदिग्ध शब्दात उत्तर दिले..
"कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत"
(एकदा वाटाघाटी करण्याचे धोरण अवलंबले की भविष्यातली परिस्थीती आणखी गुंतागुंतीची होते हा या धोरणामागचा विचार!)
आपल्या मागण्यांमागचा गंभीरपणा अधोरेखीत करण्यासाठी दहशतवाद्यांनी Moshe चे मृत कृरपणे अपार्टमेंट बाहेर टाकून दिले.
सर्व ओलीस ज्यू असल्याने जर्मनी ची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली. जर्मनी ने ज्यू खेळाडूंच्या बदल्यात अमर्यादीत पैसा देवू केला, उच्चपदस्थ जर्मन ऑफिसर्स ओलीसांच्या बदल्यात ओलीस म्हणून देवू केले पण दहशतवाद्यांनी आपला निर्णय बदलला नाही.
वाटाघाटी करण्यास नकार देणारा इस्राईल..
निर्णय न बदलणारे दहशतवादी..
जर्मनीचे त्यावेळचे नेतृत्व..
संपूर्ण ऑलंपीक..
आख्खे जग..
काहीतरी चमत्कार घडून हे कोडे सुटावे, ही परिस्थिती बदलावी अशी इच्छा करत होते.. आपआपल्या देवांना प्रार्थना करत होते...
(क्रमश:)
प्रतिक्रिया
8 Aug 2012 - 4:19 am | वीणा३
या वाईट प्रसंगाची माहिती नव्हती. समयोचित लेख. पु.भा.प्र.
8 Aug 2012 - 5:41 am | नेत्रेश
http://en.wikipedia.org/wiki/Munich_massacre
8 Aug 2012 - 8:39 am | ५० फक्त
कालच वर दिलेली लिंक वाचत होतो, आपलं इंग्लिश मेल मध्ये शिव्या देण्यापुरतं मर्यादित आहे, तु मराठीत लिहितो आहेस हे उतम.
एक शंका - तु उल्लेख केला आहेस तसं इस्त्रायली खेळाडुंना देण्यात आलेली जागा स्पर्धा सुरु होण्याच्या आधी काहि दिवसच बदलण्यात आलेली होती, हे खरं आहे काय का ही सुद्धा एक थिअरी आहे. कारण असं ऐकलं आहे की यामुळेच जर्मन सरकारनं थोडंसं मवाळ धोरण स्विकारलं होतं, ज्युद्वेषाचा इतिहास असुन सुद्धा.
8 Aug 2012 - 8:53 am | मन१
वाईट, दुर्दैवी पण थरारक घटना.
प्रतिकार करणार्यांच्या हिमतीस मानलं पाहिजे.
ह्याच धर्तीवरचं अवांतर :- आजच TOIमध्ये बातमीत म्हटल्यानुसार अमेरिकेतील गुरुद्वार्यात गोळीबार करत सुटलेल्या एकास अडवायला एक सरदारजी निव्वळ कृपाण घेउन सामोरे गेले. स्वतः गोळी खाल्ली, पण त्यामुळे इतरांना, बायका पोरांना बचावाची संधी मिळाले, ते सुरक्षित मागे हटले. अचानक आलेल्या संकटास लाग्णारी प्रतिकाराची क्षमता मानसिक जास्त आणि शारीरीक कमी असावी.
8 Aug 2012 - 9:27 am | अक्षया
थरारक घटना.
लिखाण नेहमी प्रमाणेच छान..
8 Aug 2012 - 9:42 am | मुक्त विहारि
सुंदर
8 Aug 2012 - 9:46 am | मी_आहे_ना
या घटनेबद्दल वाचले नव्हते, पु.भा.प्र., लवकर येऊद्या.
8 Aug 2012 - 10:31 am | प्रेरणा पित्रे
या प्रसंगाची माहिती नव्हती.
8 Aug 2012 - 10:54 am | अमोल खरे
ह्यावर आधारित "म्युनिक" नावाचा हॉलिवुडपट आहे. अतिशय सुंदर सिनेमा आहे. जरुर पाहावा.
8 Aug 2012 - 11:10 am | मोदक
Steven Spielberg. पण तो याच्या पुढच्या घटनेवर जास्त केंद्रीत आहे.. (जो या लेखमालेचा ४था भाग असेल.)
8 Aug 2012 - 5:38 pm | प्रशांत
खुपच मस्त लेख.. :)
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ...
8 Aug 2012 - 7:56 pm | sagarpdy
मोदक, फुल प्लान करून लिहितोयस. छान. पु भा प्र
8 Aug 2012 - 11:51 am | Dhananjay Borgaonkar
हेच म्हणायला आलो होतो.
बाकी लेखमाला भारी होणार यात वादच नाही.
पु.भा.प्र.
8 Aug 2012 - 1:38 pm | मोहनराव
माझा अतिशय आवडता सिनेमा आहे हा!
इस्रायलचा त्यामुळे अभिमान वाटतो. नाहीतर आपल्याकडे दहशतवादी हमले झाल्यावर चर्चा करण्यातच वेळ दवडला जातो आणि कसाबसारखे लोक तुरुंगात चिकन तोडत बसतात.
8 Aug 2012 - 9:00 pm | चावटमेला
+१
8 Aug 2012 - 11:10 am | अत्रुप्त आत्मा
:)
8 Aug 2012 - 11:13 am | शिल्पा ब
इस्त्राईलने पॅलेस्टाइन गिळंकृत केलं असं ऐकुन आहे.
8 Aug 2012 - 11:27 am | मोदक
वादाचा मुद्दा आहे तो, सहा दिवसांचे युध्द, गोलान टेकड्या आणि गाझा पट्टी या विषयांचे अधिक वाचन केल्यावर हेच लक्षात येईल की 'लवकर तोडगा निघणार नाही..'
अमेरीकेची कुंपणावर बसण्याची भूमीका, अमेरीकेचा इस्राईलला असलेला पाठिंबा आणि अमेरीकेचे अरब राष्ट्रांशी (तेलामुळे) असलेले तथाकथीत सौदार्हपूर्ण (?) संबंध हाही या वादाचा एक महत्वाचा भाग आहे.
8 Aug 2012 - 11:39 am | शिल्पा ब
बाकी जाउदे पण पॅलेस्टाईनच्या लोकांनी इस्त्राईली लोकांवर हल्ले करणे वगैरे सहाजिक आहे हे मला म्हणायचं होतं. दादा अमेरीकेच्या धोरणामुळं बरंच काय काय तुंबलंय पण तो वेगळा विषय आहे.
असो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
8 Aug 2012 - 11:39 am | झकासराव
ह्या घटनेविषयी माहिती नव्हत.
आता लेखमाला वाचुन ज्ञानात भर पडेल.
धन्यवाद गाववाले :)
8 Aug 2012 - 12:19 pm | प्यारे१
अॅज युज्वल मस्त लेखमाला...!
अशा काही घटनांमध्ये घेतलेल्या कणखर भूमिकांमुळे इस्त्रायलबद्दल अभिमान वाटतो.
8 Aug 2012 - 12:22 pm | कवितानागेश
+१
मलापण इस्त्रायलबद्दल अभिमान वाटतो! :)
8 Aug 2012 - 12:43 pm | पुण्याचे वटवाघूळ
लेख आवडला. हा प्रकार अत्यंत थरारक घटनांपैकी आहे.
आता यातून भारतानेही इस्त्राएलसारखेच करावे इत्यादी तुणतुणे वाजायला लागले नाही म्हणजे मिळवलं.
8 Aug 2012 - 3:06 pm | आत्मशून्य
करावेच. पण भारत आपलीच राज्यघटना भारतात घडलेल्या गुन्ह्यांसाठी गुडांळुन ठेवायची किंमत देऊच शकत नाही, नाहीतर देशात राष्ट्रपती राजवट लागु करायची वेळ त्वरीत येइल. आणी भारतीयांसोबत फक्त भारता बाहेरच नृशंस गुन्हे घडवेत अशी अजुन तरी परीस्थीती नाही.
तरीही सर्वबाजुने शत्रुनी वेढलेले असताना इस्त्रायलचे खरोखर कौतुक वाटते. विषेशतः जेव्हा अरबांनी ६ दिवसांच्या युध्दात चक्क अत्याधुनीक शस्त्रांचा वापर करु शकतो हे दाखवुन जगाला चकीत केलेच पण इस्त्रायलचे अस्तित्वही जवळपास(?) धोक्यात आलेले होते त्यातुन शिकलेला धडा ते आजही विसरले नाहीत ते बघता व भारतीय लोक इतिहासापासुन जे शिकतात ते बघता भारतानेही इस्त्राएलसारखेच करावे वाटले तर फार काही गैर वाटत नाही.
8 Aug 2012 - 5:03 pm | पुण्याचे वटवाघूळ
इस्त्राएलची मोठी लॉबी अमेरिकेत आहे त्यामुळे अमेरिकेने कायम इस्त्राएलला सपोर्ट केले होते. आणि आजही अमेरिकेत ज्यू लोक विविध उद्योगधंदे आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहेत. त्यामुळे अमेरिका इस्त्राएलच्या विरूध्द जाऊ शकत नाही. भारताच्या बाबतीत हे खर आहे का? किती महासत्ता आज आपल्या बरोबर आहेत/ पूर्वी होत्या? तेव्हा भारताने काही आततायी पाऊल उचलले आणि त्याचे परिणाम उलटे झाले तर इथे मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे पळून जातील पण त्याची जबाबदारी भारत सरकारवर असेल. तेव्हा भारत-इस्त्राएल तुलना करू नका आणि इस्त्राएलने मागच्या वर्षी एका सैनिकाला सोडवायला ७०-८० पॅलेस्टिनींची सुटका केली होती हे पण विसरू नका. (मला फार चांगला लिहिता येत नाही म्हणून पूर्ण मुद्दा मांडता आलेला नाही).
8 Aug 2012 - 10:08 pm | सुनील
आणि इस्त्राएलने मागच्या वर्षी एका सैनिकाला सोडवायला ७०-८० पॅलेस्टिनींची सुटका केली होती हे पण विसरू नका
२००६ साली हिज्बुलने दोन इस्रायली सैनिकांचे अपहरण केले होते. त्यांना सोडविण्यासाठी इस्रायलने थेट लेबेनॉनवर हल्ला केला. महिनाभर युद्ध चालले. पुढे युनोच्या मध्यस्तीने युद्धबंदी आली आणि वाटाघाटी सुरू झाल्या.
वाटाघाटींचे फलित? - दोन वर्षांनंतर (२००८ साली) त्या दोन इस्रायली सैनिकांच्या मृतदेहांच्या बदल्यात हिज्बुलच्या पाच जिवंत अतिरेक्यांची इस्रायली तुरुंगातून सुटका!
एंटेबी वारंवार घडत नसते!
13 Aug 2012 - 9:38 pm | पैसा
पण दोन सैनिकांसाठी लढाई सुरू करायची हिंमत इस्राएल दाखवतो. आमच्या कॅप्टन कालिया साठी आम्ही काय केलं आणि करतो आहोत? :(
8 Aug 2012 - 12:37 pm | विजुभाऊ
अमेरीकेने जिथे जिथे नाक खुपसलय ते ते सगळे प्रश्न लोंबकळत पडले आहेत. चिघळले आहेत.
इस्राईल नेहमीच स्पष्ट भुमीका घेते . एन्टेबे विमान हायजॅक ची घटना ही एक मस्त उदाहरण आहे.
8 Aug 2012 - 1:15 pm | कुसुमिता१
पुढील भाग लवकर पोस्ट करा.
8 Aug 2012 - 1:24 pm | रणजित चितळे
मन अस्वस्थ करते हे सगळे वाचले की
8 Aug 2012 - 1:53 pm | स्मिता.
ही घटना माहितीच नव्हती. अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना आहे.
सुरुवात चांगली झालीये, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
8 Aug 2012 - 3:29 pm | नीलकांत
इस्त्रायलबद्दल वाचताना काही घटना ठळक लक्षात येतात. त्यातील ही एक. मात्र मोदकराव यावर क्रमशः लिहीताहेत म्हटल्यावर आता पुढील भागांबद्दल उत्सुकता आहे.
- नीलकांत
8 Aug 2012 - 3:43 pm | चिगो
ह्या घटनेबद्दल ऐकले आहे, पण विस्तृत माहिती नाही. नेहमीप्रमाणेच मोदक आणखी एक जबरा लेखमाला लिहीणार, ह्याबद्दल शंका नाही. तेव्हा, आने दो.
8 Aug 2012 - 3:52 pm | अन्या दातार
थत्तेचाचांचे विचार ऎकण्यास उत्सुक.
8 Aug 2012 - 7:55 pm | गणामास्तर
आम्ही सुद्धा त्यांचे विचार वाचण्यास उत्सुक.
9 Aug 2012 - 12:47 pm | नितिन थत्ते
वर सुनील यांनी "एण्टेबी वारंवार घडत नसते" असा प्रतिसाद दिला आहे त्याच मुद्द्यावर धागा प्रस्तावक मोदक यांच्यासोबत काही काळापूर्वी खरड/ व्यनि चर्चा झाल्याचे आठवते.
इस्रायल-पॅलेस्टाईन वाद, दहशतवाद, युद्धे, अपहरणे वगैरे सातत्याने ५०-६० वर्षे चालू आहेत. त्या ५०-६० वर्षांत एक किंवा दोन "कणखरपणाचे" दाखले दिसतात (आणखी काही घटना घडल्या असल्या आणि "बोटचेपेपणा केलेला असतो तेव्हा तो रंगवून सांगितला जात नाही). शिवाय त्या (अमेरिकेच्या जिवावर केलेल्या) कणखरपणाने दहशतवादही आटोक्यात आल्याचे दिसलेले नाही. तेव्हा असो.
अवांतर : इस्रायलच्या संदर्भातल्या घटनेबाबत थत्तेचाचांचे मत जाणून घ्यायची लोकांची उत्सुकता पाहून "कस्चं कस्चं" असं वाटून ड्वाले पाणावले.
9 Aug 2012 - 8:53 pm | मोदक
तुम्ही म्हणत होता की "एण्टेबी सारखी घटना एखादीच!" आणि सुनील म्हणत आहेत "एण्टेबी वारंवार घडत नसते"
माझा मुद्दा होता की "एण्टेबी सारखे आणखीही बरेच यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन्स झाले आहेत" (फक्त इस्राईल- युगांडा अंतराचा मुद्दा वगळून - कारण ती अपवादात्मक परिस्थिती होती.)
आता आळशीपणा न करता नक्की विदा जमवतो आणि देतो. :-)
त्यावेळी आपल्या बोलण्यात Acceptable Fatality Ratio बद्दलही बोलणे झाले होते, तो रेशो लगेच आठवत असेल तर प्लीज देता का? माझे खव उचकायचे काम वाचेल.
8 Aug 2012 - 3:55 pm | किसन शिंदे
मोदक स्टाईल अनुवाद! :)
8 Aug 2012 - 4:13 pm | सुहास झेले
ह्या प्रकाराबद्दल पहिल्यांदा म्युनिकमधून कळले होते.... एकदम भयंकर घटना. ऑपरेशन एंटबीबद्दल वाचल्यानंतर, इस्त्रायलच्या राजकारण्यांचा आणि लष्करी धोरणांचा प्रचंड आदर वाटतो
पुढील भागाच्या प्रतीक्षेत :) :)
8 Aug 2012 - 7:39 pm | मन१
अवांतर पण महत्वाचं वाटालं म्हणून सांगतो.
अशा घटनातून वाचल्यावर पॅलेस्टीनीच कसे इस्राइलींना त्रास देतात, त्यांच्या नागरिकांवर(civilians) वर हल्ले करतात असे वाटते. वस्तुस्थिती अशी आहे की इस्राइली लश्कर पॅलेस्टीनी नागरिकांचे जिणे हराम करीत आहे. पॅलेस्टीनींचे लष्कर प्रतिकार करण्याइतके सक्षम नाही. त्यांचे argument हे आहे की :-
"आमचे civilians इस्राइली लष्कराकडून रोजच्या रोज मारले जातात. मग आम्ही इस्राइली नागरिकांना का सोडावे?"
इस्राइल जगासमोर काय शंख करते ? "बघा हो बघा कसे आमच्या नागरिकांवर हल्ले करतात हे दहशतवादी"
संपूर्ण प्रतिसाद अवांतर आहे. अधिक चर्चेसाठी वेगळा धागा उघडाता येइल.
8 Aug 2012 - 10:25 pm | शिल्पा ब
+१
अन इस्त्राईलला अमेरीकेतल्या ज्यु लोकांचा आर्थिक अन राजकीय पाठींबा आहे...त्यामुळे पॅलेस्टाईन ताब्यात घेउनसुद्धा दादागिरी चाललीये. अर्थात सामान्य नागरीकांना वेठीस धरायचं कारण नाही पण हे सगळीकडे होतंच. उदा. भारत.
भारतासाठी तशी परीस्थीती नाही. म्हणुन सगळीकडे बोटचेपे धोरण घेणं म्हणजे काय ते वेळोवेळी होणारे बाँबस्फोट दाखवतातच म्हणा.
9 Aug 2012 - 11:55 am | मैत्र
भारतीयांना अरब विरोधी / मुस्लिम विरोधी म्हणून आणि आपल्या बोटचेप्या परराष्ट्र धोरणापेक्षा कणखर इस्राईल हा खूप महान वाटतो. पण इस्राईल ने केलेले अत्याचार कुठे पोचत नाहीत.
१९४८ साली सरळ एका भूमीतून इस्राईल देश तयार केला. पॅलेस्टिनिअन मागे हटवले. मग गेले ६० वर्ष अजून सीमा वाढवण्याची इस्राईल ला का इच्छा आहे.
आणि त्याहून महत्त्वाचं १९९२/१९९६/२००६ या वेळेस इस्राईल ने केलेले भीषण अत्याचार का दडवले / दडपले जातात.
अरब काही सरळ नाहीत हे खरं पण एंटेबी एखादंच असतं आणि त्यालाही ३५ वर्ष झाली.
लेबनान वर इस्राईल ने पॅलेस्टिनिअन निर्वासितांना आश्रय दिला म्हणून हल्ला केला. आणि नेहमीच बिनदिक्कत पणे सिव्हिलियन भागात डोळे मिटून शेलिंग केलं आहे. काही वेळा नेम धरून रेड क्रॉस हॉस्पिटल्स / बायका मुले बॉंब टाकून उडवले आहेत.
आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर 1996 qana massacre lebanon यावर शोध घेऊन पहा. ईमेजेस पाहिल्या तर जेवण जाणार नाही.
भारताच्या मवाळ धोरणासाठी गळे काढणारे जर या कणखर पणा बरोबर असला विकृत नरसंहार पण आला भारतीय सत्तेकडे तर काय पवित्रा घेतील ?
एंटेबी एक दिसतं. आणि अजून अनेक लोक मुद्दा करतात की आपले परराष्ट्र मंत्री घेऊन गेले अतिरेक्यांना आय सी ८१४ मधल्या लोकांना सोडवायला. तालिबानी इतिहास जगाला माहीत आहे. जर त्यांनी त्या रुपेश प्रमाण उडवले असते १०० लोक तर ४ दिवसात विरोधकांनी सरकार खाली आणलं असतं.
एका मेहबूबा मुफ्ती साठी अतिरेकी सोडणं बरोबर पण शेकडो सामान्य नागरिकांच्या आयुष्यासाठी अतिरेकी सोडणं हे बोटचेपं / मवाळ धोरण.
असो .. खूप अवांतर झालं. पण इस्राईलचा विषय निघाला की पुन्हा पुन्हा तेच मुद्दे येतात त्यामुळे एकूण लिहिणं भाग पडलं.
9 Aug 2012 - 12:41 pm | शिल्पा ब
कोणीही म्हणत नाही की भारताने नरसंहार करावा. पण कमीत कमी स्वत:च्याच नागरीकांची रक्षा करायला काही हरकत आहे का?
तो कसाब, अफजल गुरु पकडुन पोसण्यापेक्षा मारुन का टाकत नाहीत...कोणत्याही मार्गाने. त्यांना जिवंत ठेउन सामान्य नागरीकांचं आयुष्य कसंकाय सुखकर होतं बॉ? अन इस्त्राईल सारखं सगळीकडे उगाचच हल्ले करत फिरणं कोणालाही इथे पटणार नाही.
9 Aug 2012 - 1:25 pm | क्लिंटन
इस्त्राएलने पॅलेस्टिनींची जमिन कशी हडपली याचे एक साधे उदाहरण देतो. मी हिरव्या देशात एका विद्यापीठात होतो. ते विद्यापीठ सोडून दोनेक वर्षे झाल्यानंतर आम्ही सगळे मित्र फोनवर कॉन्फरन्समध्ये बोलत होतो. परत एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या विद्यापीठाच्या ठिकाणी सगळ्यांनी जावे असा विषय निघाला. मग राहायचे कुठे हा पण प्रश्न आला. आमच्यातलाच एक इस्त्राएलचा कट्टर समर्थक होता. त्याला इस्त्राएलने नक्की काय केले हे समजावून द्यायला त्याला आमच्यातल्याच एका मित्राने म्हटले होते (अर्थातच sarcastic): "आपण राहत होतो त्या अपार्टमेन्टमध्ये जायचे. तिथे जे कोणी राहत असतील त्यांना हुसकावून लावायचे आणि म्हणायचे: दोन वर्षांपूर्वी आम्ही इथे राहत होतो आणि देवाने हे अपार्टमेन्ट आम्हाला दिले आहे म्हणून हे अपार्टमेन्ट आमचे. आणि तिथेच राहायचे". इस्त्राएलने पॅलेस्टिनी लोकांबरोबर नेमके हेच केले. इथे फरक एवढाच की २ वर्षांपूर्वी आम्ही राहत होतो ऐवजी २००० वर्षांपूर्वी आमचे पूर्वज इथे राहत होते आणि देवाने ती जमिन आम्हाला दिली आहे म्हणून ती जमिन आमची असे म्हणत तिथे पिढ्यानपिढ्या राहत असलेल्यांना हुसकावून लावले गेले. आपल्यापैकी अनेक लोक हा इतिहास लक्षात घेत नाहीत किंवा घेतला तरी जे लोक हुसकावले गेले त्यापैकी बहुसंख्यांचा धर्म एक विशिष्ट होता म्हणून त्याकडे काणाडोळा करतात (एकेकाळी मी पण त्यातलाच होतो हे खेदाने नमूद करावेसे वाटते.)
10 Aug 2012 - 12:05 pm | मैत्र
हिंदू मध्ये आलेला हा आजचा लेख या संदर्भात वाचनीय आहे :
Break free of U.S. - Israel shadow
13 Aug 2012 - 10:56 pm | मन१
आमची तक्रार जाणवली म्हणायची कुणाला तरी.
इस्राइलला हल्ली एकदम "वा वा . ब्येष्ट ब्येष्ट ." असं सरसकट समर्थन देताना पाहून आश्चर्य वाटतं.
किंबहुना पॅलेस्टींनींची अशी काही बाजूच नाही; ते सगळे सदैव विनाकारण जीवावर उदार होउन बॉम्ब फोडत सुटलेत असं चित्र मनातल्या मनात तयार करुन घेउन त्यांना पाथिंबा दिला जातो; तेही कशामुळं, तर पॅलेस्टीन - इस्राइल हे काश्मीर -भारत ह्यासारखे भासते म्हणून म्हणे.
ह्यात आपण भारताचीच बदनामी करतोय हे लक्षात का घेतले जात नाही.
13 Aug 2012 - 11:34 pm | गणामास्तर
इस्राइल जे काही करतोय ते सरसकट पणे समर्थनीय नसले तरी असे वाटते की जेव्हा
त्या देशाच्या सर्व बाजुंनी मुस्लीम राष्ट्रे त्यांच्या नरडीचा घोट घ्यायला टपून बसलेले असताना
बोटचेपे, नेळभट धोरण अंगीकारणे इस्राइलला नक्कीचं परवडणारे नाही.
सतत आक्रमक राहण्याशिवाय इस्राइलला पर्याय नाहीये असे वाटते.
बाकी पॅलेस्टींनीं चा प्रश्न धसास लावण्यात कुठल्याचं मुस्लीम राष्ट्राला स्वारस्य नाहीये आणि हिताचेही नाहीये.
14 Aug 2012 - 7:50 am | नितिन थत्ते
>>पॅलेस्टींनीं चा प्रश्न धसास लावण्यात कुठल्याचं मुस्लीम राष्ट्राला स्वारस्य नाहीये
तरीसुद्धा केवळ पॅलेस्टिनी लोक मुसलमान आहेत म्हणून आपण इस्रायलला पाठिंबा देतोय असं तर नाही ?
14 Aug 2012 - 10:12 am | गणामास्तर
पॅलेस्टिनी लोकांमध्ये ख्रिश्चन व शिया पंथीय मुस्लीम सुद्धा आहेत हे विसरु नका.
अनेक मुस्लीम संघटनांना, मुस्लीम राष्ट्रांना (सुन्नी) पॅलेस्टाईनच्या इस्लामीकरणात जास्त रस आहे इतकेचं मला म्हणायचे होते.
8 Aug 2012 - 7:43 pm | रेवती
वाचतीये.
8 Aug 2012 - 10:10 pm | सुनील
सुरुवात छानच! पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
अवांतर - धागा "वेगळे" वळण घेणार हे आत्ताच दिसू लागले आहे!
14 Aug 2012 - 7:59 am | नितिन थत्ते
>>धागा "वेगळे" वळण घेणार हे आत्ताच दिसू लागले आहे!
आमच्या थिअरीनुसार विशिष्ट वळणासाठीच अनेकदा धागे काढले जातात.
[अर्थात हा धागा तसा नाही असे उगाचच वाटत आहे].
8 Aug 2012 - 10:15 pm | खेडूत
बापरे ! सारं भयंकरच होतं ..
8 Aug 2012 - 11:11 pm | रामपुरी
म्युनिक चित्रपटातही हा भाग काही प्रमाणात दाखविलेला आहे.
8 Aug 2012 - 11:46 pm | शिल्पा ब
http://www.youtube.com/watch?v=76I23wBhKmI
ही स्टीवन स्पीलबर्गने बनवलेली डॉक्युमेंटरी.
9 Aug 2012 - 12:15 am | मोदक
Steven Spielberg ची Munich नावची मूव्ही २००५ साली रिलीज झाली..
One Day in September ही केव्हीन मॅक्डोनल्ड ने तयार केलेली डॉक्युमेंट्री आहे - १९९९ साली.
9 Aug 2012 - 4:36 am | शिल्पा ब
हं.. नावात गडबड झाली पण याच घटनेवर आहे.
9 Aug 2012 - 1:07 am | अभ्या..
नुकतेच दै. तरुण भारतमध्ये ऑपरेशन एंटबी वाचले होते. लोकसत्ता मध्ये ऑपरेशन एंटबीच्या सूत्रधाराचे पुस्तक परिक्शण. समाधान झाले नव्हते. आता पूर्वरंग मिळाला. खूप छान लिहिले आहे. पुढील भागाची ऊत्सुकतेने वाट पाहात आहे.
9 Aug 2012 - 1:38 am | Pearl
वाईट आणि धक्कादायक आहे ही घटना.
पण लेख चांगला झाला आहे. पु.भा.प्र.
9 Aug 2012 - 1:39 am | Pearl
२ दा प्रकाशित झाल्याने प्र.का.टा.आ.
9 Aug 2012 - 1:35 pm | इरसाल
वर सागर आणी धनंजयशी सहमत
9 Aug 2012 - 2:14 pm | अमोल केळकर
पुढील भाग वाचण्यास उत्सूक
अमोल
10 Aug 2012 - 12:52 pm | गणेशा
वाचत आहे ... असेच छान लिहित रहा..
10 Aug 2012 - 5:56 pm | तर्री
झकास ! पु.भा.प्र.
*इस्रायल मध्ये सर्वांना सैनिक शिक्षण "आवश्यक" आहे. ( सावरकर सांगून गेलेच होते )
*सगळे ज्यू प्रंचड "धर्माभिमानी" आहेत. देशासाठी / धर्मासाठी मृत्यु आलेल्याचा पूर्ण सन्मान होतो. ( आपले नेभळट पुरोगामी -त्यांना "स्व" पेक्षा "पर " प्रिय ! )
* जगामध्ये कोणत्याही देशात /कुठेही "ज्यू" असला तरी त्याला इस्रायलची साथ / अमुकम्पा असते. ( येथे आसाम झाले आहे आणि आपण षंढ होवून पाहतो !)
उगाच भारत आणि इस्रायलची तुलना नको.
13 Aug 2012 - 9:46 pm | पैसा
हा सगळा रक्तरंजित इतिहास वाचायला नको वाटतं, पण वाचणं भाग आहे. लेखन नेहमीप्रमाणे उत्तम.