छगनलालांचे सापळे (भाग ३)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
1 Jul 2012 - 3:26 am

थोडे मनोगत : दोन वेगळ्या-वेगळ्या कथा-बीजांवर आधारीत लिहीत असल्याने भाग छोटे होत आहेत. मेंदू फारच शीणला आहे.पण हा भाग खास माझ्या मिपाकरांसाठी... मित्रांनो, मला फार पळवू नका रे!!!

आधीचा भाग : http://www.misalpav.com/node/22122

ज्या दिवशी तो ५ % वाला मुंबईच्या ऑफीसमध्ये गेला, त्या दिवशी साहेब, दमणला होते.त्या दिवशी , ५% वाला परत गेला.दूसर्‍या दिवशी त्याने त्या मुलींकडून फोन नं. घेतला आणि दमणला फोन केला. मीच फोन उचलला.साहेबांनी आधी कल्पना दिली होतीच.त्यामूळे, मी ते दिल्लीला गेले आहेत असे सांगीतले.परवा येतील असे सांगीतले.त्याने आपण होवून मला फोन नं. दिला. तशी पण साहेबांची सूचना होतीच. की गोड बोल आणि त्याचा फोन नं. घेवून ठेव.स्वतः होवून त्याचा फोन नं. साहेबाला का हवा आहे? हे काही मला कळत न्हवते.

मूंबईच्या ऑफीसमधील मुलींना नक्की भानगड काय आहे ते माहीत न्हवते.एका आठवड्या पूर्वीच त्यांना हा जॉब दिला होता.त्यांच्याच पैशाने त्या तिथे बसत आहेत, हे अजून काही त्यांना उमगलेले न्हवते.साहेबांच्या अनेक थातूर माथूर कं. पैकी "अबक एव्हिएशन" ही अशीच एक कं. होती.त्यांचा मूलगा ह्या कं. चा कारभार सांभाळत होता.इथे एक साधारण स्किम होती.

प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असते, एयर होस्टेस किंवा नायिका व्हायचे आणि प्रत्येक मुलाचे एक स्वप्न असते, कंडक्टर, ड्रायव्हर व्हायचे, त्यात पण पायलट तर व्हायचेच असते.अगदीच गेला बाजार , मग ते केबिन क्रु व्हायला तयार होतात.त्यांनी बघितलेल्या स्वप्नांची किंमत मात्र साहेब वसूल करत होता.

ह्या इन्स्टिट्यूट मध्ये , "केबिन क्रु" चे प्रशिक्षण देत असत.गेले ३/४ वर्ष हा पैसे कमवायचा स्त्रोत चालू होता.५/६ मूलींना वशील्याने नौकरी लावून पण दिली होती.त्यांना एका गिर्‍हाइका मागे ५% कमिशन होते.गिर्‍हाइक कोण, तर नविन अ‍ॅडमिशन घ्यायला आलेले पालक.शक्यतो त्या गिर्‍हाइकाची आणि त्या मुलीची ओळख ऑफीस मध्येच होत असे.दिल्लीच्या मुलीला, बँगलोरचे गिर्‍हाइक आणि कलकत्त्याच्या मूलीला , मुंबईतले गिर्‍हाइक, असला चतूरपणा दाखवणे साहेबाला जमत होतेच.मूंबईतले गिर्‍हाइक आलेच तर , स्पेशल १०,००० रु. देवून तो चेन्नईतल्या एखाद्या मुलीला आणत असे. (सगळ्या एयर लाइन कर्मचार्‍यांमध्ये ही गोष्ट माहीत झाली होती... आधी पैसे घेतल्याशिवाय कूणीही येत न्हवते.इथली एकी साहेबांना माहीत होती, म्हणून हे गेलेले पैसे तो त्या मुलींकडून वसूल करत न्हवता.तर हे १०,००० रु. नंतर तो त्या गिर्‍हाईका कडूनच वसूल करत असे.कसे, ते पूढे कधीतरी..)

हे पैसे मात्र साहेब लगेच देत होता."कोंबडी-कोंबडी" तला फरक साहेब जाणून होता.सोन्याच्या कोंबडीला पोसत होता आणि कापायची कोंबडी , व्यवस्थित पोसून, मग वेळ काळ बघून कापत होता.एकदा साहेबांच्या मुलाबरोबर , मी त्या ऑफीसला गेलो होतो.

वॉव !!!! काय ऑफीस होते राव!! एकदम कडक. सॉलीड. मउसुत कोच. ऐयर कंडिशन्ड जागा, विमानांची मॉडेल्स, देखण्या हवाईसुंदरींचे फोटो.पॅन अमेरिका. कॅथे पॅसिफिक. लुफ्तान्सा, एयर फ्रान्स इ. कंची प्रशस्ती पत्रके. त्यात , अमूक तमूक कर्मचार्‍याचे गूणगान. त्याच्याच बाजूला त्या कर्मचार्‍याचा त्या कं.च्या वेषातील फोटो. भपका आणि इतर गोष्टींचा एव्हढा सुंदर मारा केला होता की कूणालाही त्यातील चूक समजू नये.वरील सर्व कामगारांनी, त्यांचा ट्रेनिंग कालावधी पूर्ण केल्याचे ते सर्टिफिकेट होते.

दोनच खोल्या होत्या.जेम-तेम १२ जणे बसतील अशा.साहेब एका बॅच ला १२ जणांना प्रवेश देत होते आणि २ पाळ्यांत हा धंदा करत होते. सहा महिन्याचा कोर्स , एका वेळेची फी ५०,०००. वर्षाला जवळ जवळ ५० लाख साहेब मिळवत होता.त्यातला ४० लाख त्याचा नेट इन्कम होता. ५ जणांना नौकरी लागली तरी खूप , अशा शिक्षण मार्गातून साहेब २०० जणांकडून "बेकारीच्या शापाचे" फळ खात होता.

त्या प्रत्येक मूलीला साहेब काही दिवस ऑफीसमध्ये बसवत होता.त्यांच्यातील सौंदर्याचा उपयोग तो , एक गळ म्हणून करत होता.आपला इथे नक्की उपयोग काय आहे?आपण ट्रेनिंग कूठले घेत आहोत आणि आपण हे काय काम करत आहोत? हे जाणून घ्यायची त्यांची चौकस बुध्धीच न्हवती. "रागावलेल्या माणसाला शांत करायचे, ऑन लाइन ट्रेनिंग" ह्या गोंडस नावाखाली हा सगळा प्रोग्राम आखल्या गेला होता.ह्या ट्रेनिंगचे शास्त्ररित्या शिक्षण त्यांना दिले गेले होते. साहेबाचा हा एक गूण मात्र मला मान्य केलाच पाहिजे.साहेबाने कधीही हवेत गोळीबार केला नाही.उगाचच , करून बघू या , म्हणून एखादा धंदा केला नाही.जे काही करेल ते व्यवस्थित.माणसे निवडतील, ती पारखून्.एकाच धंद्याच्या बेस वर किंवा पूरक दूसरा धंदा.

हा बेकारीचा शाप, एकदा लागला, की लागला, लगेच सूटला, तर नशीब.. नाहीतर तो माणसाकडून , वाट्टेल ती कामे करून घेईल.पण एक वेळ हा शाप परवडला तरी चालेल पण खोटे पणाचा आळ नाही परवडत.सामान्य माणूस घाबरतो ते गूंडांना आणि पोलीस चौकशीला.आणि ह्याच अवगूणामूळे भरडल्या गेला तो ५% वाला. साहेबाने सामान्य माणसांच्या ह्या जाणीवांचा , परिस्थेतीचा खूप फायदा करून घेतला.

मी, जितका जितका , साहेबांच्या जवळ जात होतो, तितका तितका मी, स्वतः पासून दूर जात होतो.रात्री झोपेत पण ह्या मुलांचे आई-बाप काय करत असतील. ही मुले कशी वागत असतील , ह्यांचे नातेवाईक कसे टोमणे मारत असतील... अशीच स्वप्ने पडायला लागली.आपसूकच मी थोडा तूटक तुटक वागायला लागलो.पण दिवसा मात्र मला ह्या खेळांत रस पण वाटत होता.एकाच वेळी थ्रिल आणि सद्सदविवेकब्द्धी ह्यांच्या कात्रीत सापडलो होतो.पण देव करतो ते भल्यासाठीच.पुढे काही वर्षांनी ह्याचाच फायदा मला "छगनरावांचे किस्से" आणि"मुलांची शेती" हे दोन परस्पर भिन्न लेख लिहीतांना झाला. एकाच दिवशी, मी "छगनरावाची चतूरगिरी " पण दाखवत होतो आणि "मुलांचे देवत्व" पण.

वाङ्मयकथाप्रतिभा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2012 - 3:49 am | श्रीरंग_जोशी

मुवि - तुमच्या (कथेतल्या) साहेबांची कार्यपद्धती वाचून आता डोके गरगरायला लागले आहे. हे असले उद्योग करायला केवढी बुद्धिमत्ता धैर्य लागत असेल? तेच जर एखाद्या खरोखरच्या उद्योगात वापरले तर हा माणूस भोवतालच्या लोकांना सोबत घेऊन किती पुढे जाऊ शकेल?

या कार्यपद्धतीच्या गुणवत्तेवरून एकच उदाहरण डोळ्यासमोर येते - हर्षद मेहता.

मराठमोळा's picture

1 Jul 2012 - 6:08 am | मराठमोळा

मस्त झालाय हा भाग पण.. सगळं कसं डोळ्यासमोर उभं राहतय. :)
पुढील भाग तुमच्या कंवेनीयंस प्रमाणे लिहा..पण नक्की लिहा (लवकर लिहा असे म्हणत नाही.. तुम्ही बिझी दिसता.)

अमित's picture

1 Jul 2012 - 6:49 am | अमित

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ट्रॅकवर एवढं प्रभावी लिहिण खरंच अवघड आहे हो.

काळा पहाड's picture

1 Jul 2012 - 9:19 am | काळा पहाड

एक चूक दुरुस्त करु इच्छीतो. पॅन अमेरिकन एअरवेज December 4, 1991 ला बुडाली. जवळ जवळ २० वर्षांपूर्वी.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 2:54 pm | मुक्त विहारि

पण , तरी ती ह्या लेखांत असू द्यावी... कारण परिस्थितीने गांजलेला मनूष्य , जास्त खोलात न जाता, वरवर माहिती काढतो आणि भपकेबाजाला भुलून पैसे गमावून बसतो..

कानडाऊ योगेशु's picture

1 Jul 2012 - 3:54 pm | कानडाऊ योगेशु

उत्तर आवडले.
कधी कधी प्रश्नातच उत्तर दडलेले असते ते असे.
लाखो रुपये गुंतवण्यापूर्वी थोडीफार बॅकराऊंड चेकिंग करणे कधीही चांगलेच.

अवांतर : छगनरावाला कुणी शेरास सव्वाशेर मगनराव भेटावा असे राहुन राहुन वाटत आहे.

जयनीत's picture

1 Jul 2012 - 8:39 pm | जयनीत

थांबा हो, जरा दम घेउ द्या.

एक तरी धंदा धड होता का त्याचा?

अर्थात ह्याहुनही जास्त रुथलेस माणसं जगात असतात म्हणा.

अतिशयोक्ती काहीही नाही.

वर्णन शैली उत्तम, खुपच प्रभावी चित्रण झालय.

अमृत's picture

2 Jul 2012 - 2:00 pm | अमृत

बापरे कठिण काम आहे ब्वॉ.

अमृत

बॅटमॅन's picture

2 Jul 2012 - 6:17 pm | बॅटमॅन

बापरे, च्यायला त्याच्या *****, खल्लास डोके, इ.इ.इ.

खरंच मति गुंग होते ब्वॉ हे अस्लं कैतरी वाचता वाचता.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Jul 2012 - 5:46 pm | निनाद मुक्काम प...

मला दाट शंका आहे
की कथेत कोठेतरी सत्याचा अंश आहे.
डोळ्यासमोर किंग फिशर च्या प्रशिक्षण केंद्रांचे चित्र तरळले.
फ्रेंकलीन सोडल्यास इतर प्रशिक्षण केंद्र बकवास
बरेच जण ह्या मुलींना पंचतारांकित हॉटेलात नोकरी लावून देतात.
ह्या कोर्स मुळे त्यांना पंचतारांकित विश्वात प्रवेश मिळतो. मात्र पुढे काय असा प्रश्न चिन्ह डोळ्यासमोर उभा ठाकतो.