छगनलालांचे सापळे (भाग ८)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Nov 2014 - 7:40 pm

आधीचा भाग : http://misalpav.com/node/29328
==========================================================================

किरण हा साहेबांचा तिसरा मुलगा.आला तोच मुळी तोंडात पानाचा तोबरा भरून.त्याने स्वतःहून काहीच न विचारल्याने, मी पण जास्त लक्ष न देता, स्वतःला कामात जुंपून घेतले.तो त्याच्या मनाचा राजा तर मी माझ्या मनाचा बादशा.गेला उडत.

साधारण पणे १च्या सुमारास साहेबांचा फोन आला.त्यांना रिपोर्ट केला आणि जेवायला बसलो.सुदैवाने माझ्या जेवणाच्या डब्याची जबाबदारी आमच्या एका शेजार्‍याने घेतल्याने, ती चिंता न्हवती.पहिल्या दिवसापासूनच मी एक धोरण ठेवले होते, की कामगारांना जास्त दडपण द्यायचे नाही.त्यांना विश्र्वासांत घेवून रोजच्या कामाचे ध्येय ठरवले आणि ते साध्य होईपर्यंत घरी न जायचे ठरवले.जेवण होते न होते इतक्यात फोन वाजला.समजले की साहेबांना चेकच्या फ्रॉड संदर्भात अटक झाली.(आज ना उद्या, हे होणारच होते.)

किरण लगेच संधीचा फायदी घेवून मुंबईला पळाला.तो गेला ते बरेच झाले.नाहीतरी दिवसभर नुसता टाइमपासच करत होता.सतत पान खाणे आणि चहा सिगरेट प्यायला बाहेर जाणे.एक ३/४ तासांतच ह्या मुलाचे गुण आम्ही सगळ्यांनीच जोखले.

एक तीन-चार दिवस झाले असतील नसतील, तोच साहेब स्वतःच सकाळी सकाळी फॅक्टरीत हजर झाले.ह्यावेळी किरण पण बरोबर होता.बिन तोबर्‍याचा किरण मी प्रथमच बघत होतो.

आल्या आल्या साहेबांनी मला आणि किरणला केबीनमध्ये बोलावले.माझ्या समोर त्यांनी किरणला फैलावर घेतले.किरणला फार काही त्रास होत न्हवता.त्याचा चेहराच त्याच्या मनांतील कोडगेपणा सांगत होता.हा मानसिक कोडगेपणा फार घातक, साला एकदा चिकटला की चिकटला.लवकर जात पण नाही आणि कुटुंबियांची फार दारूण अवस्था करून टाकतो.

साहेबांनी आता दमणलाच मुक्काम ठोकला.एक ४/५ दिवस गेले असतील.एक दिवस दुपारी अहमदाबादच्या ऑफीसमधून बोलावणे आल्याने साहेब अहमदाबादला निघून गेले.साहेब असे पर्यंत किरण एकदम सुता सारखा होता पण साहेब जाताच त्याचा ताळतंत्र सुटला.साहेब गाडीत बसतायत न बसतायत तोच किरण गायब झाला.तो आला त्यावेळी रात्रीचे ८ वाजले होते आणि आमचे काम जवळपास संपत आले होते.टेबलावर अजून ३/४ मशीन्स होती.

माझे टेस्टींगचे काम तात्पुरते संपल्याने मी थोडा रिकामाच होतो.किरणने मला केबीनमध्ये येण्याची खूण केली.त्याने माझ्या समोर आज रात्रीच्या जेवणाचा प्रस्ताव ठेवला.एक क्षण भर विचार करून मी होकार दिला.

रात्री ९च्या सुमारास इतर सगळी मशीन्स पण हातावेगळी केली.पॅकींग आणि स्टँपिंगसाठी इतर कामगारांना सुचना दिली आणि मी किरण बरोबर निघालो.

ठरल्याप्रमाणे गुरुक्रुपालाच बसलो.किरणने ऑर्डर दिली.मी ह्यावेळी कूठलेही मद्य न प्यायचे ठरवले होते.घरी आमची बायको आमच्यासाठी वाट बघत असतांना इथे जेवण्याची हौस कुणाला? काही काही गोष्टी टाळता येत नाहीत तर काही गोष्टी नक्कीच टाळाता येतात.

किरण हे एक वेगळेच आहे, हे मला त्या दिवशी समजले.जेमतेम १ क्वार्टर पिवून होतेय न होतेय, तोच त्याने वेटर बरोबर वाद उकरून काढला.कारण काय तर म्हणे वेटरने त्याला खून्नस दिला.कुठल्याच बार मधील कुठलाच वेटर खून्नस देत नाही.सुदैवाने मालक चांगला असल्याने प्रकरण जास्त न वाढवता, त्याला घरी घेवून गेलो.जातांना सरळ रिक्षा केली.सुदैवाने रिक्षावाला ओलखीचा होता.दमणला एक-दीड वर्ष रहात असल्याने आणि गांव तसे छोटेच असल्याने बरेच जण निदान तोंड-ओळख दाखवण्यापुरते तरी ओळखीचे होतच.वाटेतच किरणने रिक्षात उलटी केली.रिक्षावाला जाम वैतागला होता.पण मी त्याला थांब अशी खूण केली. बेल वाजवली आणि दार उघडायची वाट बघत बसलो.

दार उघडले तेच मुळी साहेबांच्या बायकोने.तिच्या मदतीने किरणला त्याच्या रुममधील बेडवर झोपवून मी निघालो.सहज म्हणून पँट कडे बघीतले, तर त्यावर उलटीचे कण उडलेले.साहेबांच्या बायकोला बाथरूम कुठे आहे असे विचारले.तिच्या मार्गदर्शनानुसार बाथरूम मध्ये जावून पँट धूतली.बाहेर आलो.

बाथरूम मधून बाहेर येताच, साहेबांच्या बायकोने चहा घेणार का? अशी खूण केली.खरे तर मला नकार द्यायची तीव्र इच्छा झाली.पण सकाळ पासून काम आणि साहेबाच्या मुलाच्या पराक्रमांनी इतका त्रासलो होतो की, चहा घ्यावासा वाटलाच.चहा झाला आणि मी निघालो.साहेबांच्या बायकोने मी रात्री तिथेच थांबावे अशी मुक्याने सुचना केली.पण तिला नम्रपणे नकार देवून मी सरळ घरी निघालो.(आमचा वेडेपणा दुसरे काय्?वेड्या बायकोला वेडाच नवरा मिळाणार ना?)

घरी पोहोचता पोहोचता रात्रीचे ११ वाजले होते, कदाचित १२ पण असतील.घड्याळ घ्यायची ऐपत तेंव्हा तर अजिबात न्हवती आणि आज ऐपत असून पण त्या दिवसांची आठवण रहावी म्हणून घड्याळ वापरत नाही.

बायको जेवायला थांबली होती.तिच्या बरोबर जेवतांना आजचे सगळे रामायण तिला सांगीतले.सकाळी उठल्या नंतर तिने शांतपणे दुसरी नौकरी शोधा, असा सल्ला दिला.म्हणाली, तुमच्या साहेबाच्या संपर्कात जितकी माणसे येतात, तितकी सगळी काही-तरी कारणांमुळे वाया तरी जातात किंवा त्यांचे आयुष्य तरी खराब होते.

मनांत हा विचार घोळवतच मी कामावर गेलो....आणि काय योगा-योग त्याच दिवशी हे काम लवकरांत लवकर सोडायचा निर्णय मला घ्यावाच लागला.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

भाते's picture

4 Nov 2014 - 8:15 pm | भाते

आता लेख वाचतो!

जेपी, पुन्हा एकदा संधी हुकली! :)

टवाळ कार्टा's picture

4 Nov 2014 - 9:39 pm | टवाळ कार्टा

कंपू जॉईन करता का??? ;)

काल मीच पयला लेख वाचला होता.पण नविन रक्ताला चान्स मिळावा म्हणुन पयली प्रतिक्रिया दिलि नाय,

बाकी लेख भारिच

आदूबाळ's picture

4 Nov 2014 - 8:55 pm | आदूबाळ

मुवि, उत्कंठा वाढतीये...

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2014 - 12:21 am | डॉ सुहास म्हात्रे

खूप दिवस रेंगाळत असलेली मालिका परत मार्गी लागली हे पाहून आनंद झाला. आता खूप वेळ न घेता लवकर लवकर पुढचे भाग टाका. उत्सुकता ताणली जात आहे !

नाखु's picture

5 Nov 2014 - 8:27 am | नाखु

पु.भा.प्र.

कंजूस's picture

5 Nov 2014 - 5:09 am | कंजूस

गमतीदार घटना.

खटपट्या's picture

5 Nov 2014 - 5:37 am | खटपट्या

सगळे भाग एकदम वाचले. मस्त चालु आहे
पु, भा. प्र.

समीरसूर's picture

5 Nov 2014 - 2:03 pm | समीरसूर

वाचनीय!!

पटापट पुढचे भाग टाका. :-)

अभिजित - १'s picture

5 Nov 2014 - 6:21 pm | अभिजित - १

वा !! पढचा भाग येउ द्य

मृत्युन्जय's picture

5 Nov 2014 - 6:26 pm | मृत्युन्जय

वाचतोय. सापळे पहिल्यापासुन वचतोच आहे. येउ द्यात लवकर

अर्धवटराव's picture

6 Nov 2014 - 12:20 am | अर्धवटराव

सुसाट निघाले आहे छगनलाल. आता अडवु नका त्यांना.

एक शंका. (कथा काल्पनीक असली तरी)
जेंव्हा एखादं उपकरण विक्रीकरता म्हणुन बनवल्या जातं तेंव्हा त्याच्या प्रत्येक पार्टचं डिक्लरेशन जरुरी असतं ना? भलेही त्यातला एखादा भागावर इंटलेक्चुअल प्रॉपर्टी असेल, पण त्याच्या प्रणालीचं सर्टीफीकेशन आवष्यक असतच. तर तो चुकीचा सेन्सर कसा खपल्या गेला मार्केटमधे? कुणि तरी, प्रॉबॅबली एखाद्या मगनलालने नक्की चोरी पकडली असती.

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2018 - 4:20 pm | चौथा कोनाडा

प्रमाणीकरण देखील बनावट असेल !
सगळेच एकमेकांना सामील अन फक्त कमिशनचे धनी असल्यावर मॅनेज करायला काय लागणार ?