छगनलालांचे सापळे (भाग १)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
27 Jun 2012 - 4:55 am

छगनलाल आणि कं.त नौकरीला लागून मला आज बरोब्बर २ वर्षे झाली होती.सलग २ वर्षे काम केलेली, ही माझी गेल्या ५/६ वर्षातील पहिलीच नौकरी.काय करणार, मागच्याच वर्षी लग्न झाले होते आणि घराचे हप्ते पण फेडायचे होते.तशी कं. बरी आहे.मालक बराच रगेल आणि रंगेल असला तरी, धंद्यावर त्याचे मूळापासून प्रेम आहे.आता धंद्यावर का ह्यातील पैशांवर, हा प्रश्न सोडून द्या.मारवाडी लोकांचे खरे प्रेम कोणावर, हा काही संशोधनाचा विषय नाही आहे.

ह्या नौकरीवर माझा काही जीव न्हवता, पण मालकांची वागणूक , जे शिकवायची , ते कॉलेजमध्ये शिकायला मिळत न्हवते.फसवणे आणि प्रामाणीकपणा ह्या दोन पायांवर मालकांचे विश्व उभे होते. इतरांना फसवणे आणि नोकरांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे, ही खरी मेख.माणसे ओळखण्याची कला ह्यांना जन्मजात होती आणि अतिशय गोड वाणी, ह्या फसवण्याच्या धंद्याला जोड देत होती. हा माणूस खरे तर , मूत्सद्दी म्हणून अतियोग्य.चीनची जमीन, अमेरिकेला भरमसाठ व्याजाने देवून , जपानकडून पैसे काढेल असा आणि परत दाखवेल असे , की ह्या सगळ्या भानगडीत नूकसान मात्र त्याचेच होत आहे. छगनलाल, एकदम गरीब कूटंबातील.ज्या कं,त कामाला लागला, त्याच मालकाच्या मूलीशी लग्न केले.मालकाला दूसरा पर्याय ठेवला नाही.लग्न झाले आणि दूसर्‍याच महिन्यात बाप पण झाला.म्हणजे बघा , बायको पण मिळाली, रेडीमेड धंदा पण मिळाला आणि दाखवले असे की, बघा, मी कूठे पाप लपवले आहे? शिवात मेहूणी बोनस.(हा मेहूणीचा किस्सा परत कधी तरी)

माझी आणि छगनलालची ओळख माझ्या मित्रा मूळे झाली.त्याने नौकरी सोडली आणि मालकाकडे माझी शिफारस केली.मालकाने मला इंटरव्ह्यूला मुंबईला बोलावले.ऑफीस एकदम चकाचक.एक पण पूरूष स्टाफ नाही.सगळ्या मूली, स्वर्ग सोडून मुंबईला आल्या आहेत की काय? असे वाटावे.ह्यातली एक पण मूलगी , आपल्याला मिळणार नाही, मग कशाला त्यांच्यावर लाईन मारा आणि आपला वेळ खर्च करा.नंतर समजले की, ह्या मूली , एयरर्लाइन इन्स्टिट्यूट मधल्या आहेत आणि ही सगळी मालकांच्या मूलाची कामगिरी आहे.(बाप बोटभर तर बेटा हात भर).सवईप्रमाणे मी पुस्तक वाचायला सूरूवात केली.इंटरव्ह्यूला जातांना , मी पुस्तक घेवून जातो.तेव्हढाच टाईमपास.

१५/२० मिनिटांनीच साहेबांनी बोलावले.प्रथमदर्शनीच नजरेत भरले ते, त्यांचे टोकदार नाक आणि भेदक डोळे.छान दाढी केलेला चेहरा आणि सूवासिक अत्तराचा घमघमाट.शिक्षण किती वगैरे गोष्टीत जास्त रस न घेता, कूठे जॉब करतोस ते विचारले.हाताखाली कामगार किती?आई वडील काय करतात? भाउ-बहीण किती? असेच प्रश्न विचारले. काम करतांना काय-काय अडचणी आल्या , आणि त्या कशा सोडवल्या, ह्यातच रस जास्त होता.मित्राने , आधीच कल्पना दिली होती,प्रामाणिक रहा.खोटे बोलू नकोस.शाळा ते कॉलेज काय उद्योग केले ते सगळे सांगातले.अगदी मारामार्‍या ते दारूची अवैध वाहतूक.(मी दमण ते बलसाड , दारू नेत असे)

अवैध वाहतूक , म्हणाल्याबरोबर , त्यांचे डोळे , मवाळ झाले.मवाळ डोळे म्हणजे धोका, हे ओळखायची वेळ अजून यायची होती.आज देखील, मी कूणी जास्त सलगी दाखवायचा किंवा अति प्रेमाने बोलायचा प्रयत्न केला की सावध होतो.त्या नौकरीनंतर मला कूणीच फसवू शकले नाही.शेवटी मालकाने एक प्रश्न विचारला. अवैध वाह्तूकीत तूझा जोडीदार कोण? मी म्हणालो, "नौकरी द्यायची असेल तर द्या.मित्राचे नांव सांगणार नाही." वातावरण थोडे तापले, असे त्याला वाटले आणि त्याने जॉब ऑफर दिली.सगळा तोंडी व्यवहार.पगार अमुक तमुक, बोनस नाही , ट्रॅव्हलिंग अलाउन्स अमुक-तमुक इ.ऑफीस जरी मुंबईला असले तरी , मला दमणची फॅक्टरी, बघायची होती.मालक आठवड्याला जे टार्गेट देईल, ते पूर्ण करायचे आणि ते पण ओव्हरटाईम न देता.

दूसर्‍या दिवशी , कामावर रूजू झालो.काम काय तर, CO2 मीटर बनवायचे.हे सगळे मीटर जाणार कूठे ? तर, गुजरात सरकारने, नविन कायदा आणला होता, की दर सहा महिन्यांनी , प्रत्येक वाहनाची तपासणी करायची, की ते किती धूर सोडत आहेत?आपण त्यात जास्त डीटेल्स मध्ये नको जायला.खुद्द मालकाच्या जावयानेच , मोठ्या शहरांत ह्याची एंजन्सी घेतली होती.तालूका प्रदेश मात्र सोडले होते.आमचे मशीन काय लायकीचे होते , ते आमचे आम्हालाच माहीत. मूळात , ती एका फ्रेंच मशीनची भ्रष्ट नक्कल होती.

एके दिवशी , मालकाला समजले, की गूजरातमध्ये हा असा-असा कायदा येणार आहे.मालकाने लगेच चौकशी केली आणि समजले की , असे मशीन फ्रान्स मध्ये बनते,मालकाने ते खरेदी करायला पैसे गोळा करायला सुरुवात केली.जवळचा माणूस न बघता, दूरचा माणुस बघितला.अहमदाबाद मधला एक व्यापारी गळाला लागला.त्याच्या बरोबर तोंडी व्यवहार ठरवला.मशीनची मूळ किंमत अधिक टॅक्स मिळून जवळ-जवळ ४ लाख रुपये होते.मालकाने त्याच्याकडून २ लाख घेतले.त्याबद्दल त्याला ५०% पार्टनरशीपची ऑफर दिली. फ्रान्स मधून मशीन मागवले, ते परत बोलीवर.९० दिवसांचा वेळ घेतला.

मशीन आल्याबरोबर,पैसे चारून , बिना कस्टम बाहेर काढले.दूसर्‍या दिवशी, एका एक्स्पर्ट तंत्रज्ञानाला बोलावून ते मशीन दाखवले.असेच दूसरे मशीन तयार केलेस तर, ५% पार्टनरशीप देवू केली.त्याने, भरपूर मेहनत घेवून ते मशीन तयार केले, पण एक प्रॉब्लेम आलाच. मुख्य सेंसर सोडून बाकी सगळे पार्टस इथे मिळत होते.पण सेंसर काही इथे तयार करता येणार न्हवता आणि आयात सेंसरची किंमत एक लाख रु. होती.

मालकाने डोके लावले, आणि म्हणाला. दूसरे कोई भी गॅस का चलाके देख.ऑक्सीजन नही तो हवा,कुछ तो दिखायेगा. अपनेको तो रीडींग दीखानेका है. सेंसर थोडी दिखानेका है? लडकी देखनेको जाता है, तो क्या देखता है? लडकी का चेहरा ..... या.... उसके......... पाँव? (मालकाचा हा डायलॉग नंतर पूर्ण कं.त फेमस झाला)

शेवटी, एक ऑक्सीजन सेंसर थोडा मॅच झाला.रीडींग डिस्प्ले सर्कीट मध्येच थोडा फेर फार केला आणि मशीन बनवले.ओरिजनल मशीनचा सेंसर आपल्या मशीनला लावला आणि आपले मशीन पास करून घेतले.ते पास झाल्यावर, मूळ मशीन, बिना सेंसरचे , परत कस्टम मध्ये ठेवून दिले.मोजून ३ दिवसांत ही भानगड केली.दूपारी २ ला मशीन दाखवून संध्याकाळी ४च्या आत सर्टिफिकेट मिळवले.

दूसर्‍या दिवशी, ते राजरोस फ्रेंच कं.च्या इथल्या इंजिनियर बरोबर बाहेर काढले.त्याने पॅकिंग उघडताच ओळखले, की काही तरी मामला आहे. छगनलालने तोपर्यंत ह्या ५/६ तासांत त्या माणसाला पटवले होतेच आणि पोलीस केस केली तर , आपल्याच देशाचे कसे नूकसान होईल, तिच्या प्रतिष्ठेला कसा धक्का लागेल, वगैरे सांगून.. आपण एक वेगळा अर्ज लिहू या, की मशीन मधला सेंसर काम करत नाही आहे.तू मला स्पेयर सेंसर दे.मी तूला पैसे देतो.आता माझ्याकडे १० हजार आहेत. ते तू घे आणि एखादा बिघडलेला सेंसर कं.ला दाखव.मी केस करत नाही. तसा अर्ज लिहून घेतला आणि सही मात्र नौकराची घेतली. नौकर पण तयार, त्याने पण लगेच सही केली. एका सहीचे त्याला ५००रु. मिळायचे. (पण मालकाने केस केलीच)

अशा प्रकारे, CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर लावून आमची कं. चालू झाली.शिवाय आता एकाच्या जागी २ सेंसर झाले.५% वाला पार्टनर आणि ५० % वाला पार्टनर , ह्यांचे काय झाले, ते आपण , पूढील भागात पाहू या.....

वाङ्मयकथाप्रतिभा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2012 - 5:10 am | श्रीरंग_जोशी

एका चालू कंपनीच्या महाचालू मालकाचे चित्र चांगले आहे. मात्र कथेने अजून तेवढी पकड घेतल्याचे वाटत नाही.

पुभाप्र!!

... सुधारायचा प्रयत्न करीन... जमेल की नाही ते माहीत नाही..

मराठमोळा's picture

27 Jun 2012 - 6:11 am | मराठमोळा

खरी असल्यासारखेच वाटते आहे.. कारण लुप होल सापडायला मार्ग नाही. (मला फार कळतं अशातला भाग नाही)
लिहा पुढचे लवकर. :)

शिल्पा ब's picture

27 Jun 2012 - 6:47 am | शिल्पा ब

+१ आणि +१

अर्धवटराव's picture

27 Jun 2012 - 6:32 am | अर्धवटराव

इंडीया शायनींग ची कथा ;)

मस्त सुरुवात झाली. येउ देत पुढील भाग लवकर.

अर्धवटराव

हा हा हा! असेच म्हणतो! :)
येऊदे पुढला भाग

नाना चेंगट's picture

27 Jun 2012 - 12:22 pm | नाना चेंगट

अगदी अगदी

पुढिल भाग लौकर टाकणे

५० फक्त's picture

27 Jun 2012 - 7:55 am | ५० फक्त

मस्त लिहिलं आहेस, एका खुप मोठ्या विषयाला हात घातला आहेस,

अशी ट्रेड सिक्रेट प्रत्येक धंद्यात असतातच, उदा. तुम्ही इथं जे फ्रेंच मशीन म्हणताय तेच मशीन जर त्या मुळ कंपनीला फ्रान्समध्ये वापरण्यासाठी करायचे असेल तर त्याचे स्पेसिफिकेशन्स तिथल्या सिस्टिमला अ‍ॅडजेस्ट केलेले असतील,

मुक्त विहारि's picture

27 Jun 2012 - 8:06 am | मुक्त विहारि

चालते ते कागदपत्रावर.

रीडींग दाखवतय ना? आणि ते त्या रेंज मध्ये आहे ना? मग झाले.

सरकारची अशीच भूमिका असते आणि व्यापारी , बनेल लोक ह्याचाच फायदा घेतात.

अमितसांगली's picture

27 Jun 2012 - 8:19 am | अमितसांगली

मालक व त्याच्या मुलाचे पराक्रम बघून काही काळ मल्ल्यांची आठवण झाली....

फसवणे आणि प्रामाणीकपणा ह्या दोन पायांवर मालकांचे विश्व उभे होते. चीनची जमीन, अमेरिकेला भरमसाठ व्याजाने देवून , जपानकडून पैसे काढेल असा आणि परत दाखवेल असे , की ह्या सगळ्या भानगडीत नूकसान मात्र त्याचेच होत आहे.

पु.भा.प्र.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jun 2012 - 11:22 am | मिसळलेला काव्यप्रेमी

फसवणे आणि प्रामाणीकपणा ह्या दोन पायांवर मालकांचे विश्व उभे होते. चीनची जमीन, अमेरिकेला भरमसाठ व्याजाने देवून , जपानकडून पैसे काढेल असा आणि परत दाखवेल असे , की ह्या सगळ्या भानगडीत नूकसान मात्र त्याचेच होत आहे

मस्त सुरवात, पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2012 - 11:31 am | संजय क्षीरसागर

मी तर पैल्यांदाच बोल्लोय - पैसा ( http://www.misalpav.com/node/22039) झाला मोठा माणूस झाला खोटा

रामदास's picture

27 Jun 2012 - 9:04 pm | रामदास

एक वाचलेली कविता आठवली ती अशी...
ये रे ये रे माणसा
तुला देतो पैसा
पैसा झाला मोठा
माणूस झाला खोटा.

बॅटमॅन's picture

27 Jun 2012 - 11:57 am | बॅटमॅन

कथा एक नंबर!!!! पुभाआप्र.

पहाटवारा's picture

27 Jun 2012 - 1:28 pm | पहाटवारा

पुढील कारनाम्यांच्या प्रतिक्षेत !

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2012 - 2:20 pm | प्रभाकर पेठकर

एक सेन्सरचा मुद्दा सोडला तर बाहेरचे मशीन आणून तसेच्या तसे इथे बनवायचे ह्यात गैर काही नाही. सरकरला फसविणे, कस्टमला 'मॅनेज' करणे इत्यादी प्रकार सर्रास अनेक कंपन्या(नुसत्या भारतियच नाही तर, परदेशी कंपन्याही) करीत असतातच. तेंव्हा इतर उद्योजकांच्या तुलनेत त्यांनी काही फार गंभिर गुन्हा केला आहे असे नाही. उद्योजकांच्या जमातीत ह्याला 'हुशारी' म्हणतात.

पण, कथा म्हणून मस्त आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे. लवकर येऊ द्यात.

प्रास's picture

27 Jun 2012 - 3:29 pm | प्रास

पेठकर काकांशी सहमत आहे.

कथा छान वाटतेय. आवश्यक ती सगळी सामग्री त्यात उपलब्ब्ध असल्याचे जाणवतेय.

मुविंना शुभेच्छा!

पुभाप्र

sneharani's picture

27 Jun 2012 - 2:30 pm | sneharani

पुढच्या भागाची प्रतिक्षा...येऊ दे लवकर!
:)

छान सुरुवात :)
बर्याचदा अस्सच चालत ,दिखाउ माल फसवा धंदा , पु.भा.प्र.

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2012 - 4:01 pm | संजय क्षीरसागर

ज्या प्रकारे हा उद्योजक धंदा करतोय त्याला हुशारी म्हणण अत्यंत खेदजनक आहे. जगभरात काय चालतं किंवा इतर काय करतात हा प्रश्न नाही आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे. संपूर्ण भारतीय बिजिनेस एथिक्सला ही मानसिकता लाजेनं खाली मान घालायला लावेल.

मुविनं नोकरी स्विकारली आणि ती घटना घडून गेलीये म्हणून जाऊं द्या मी व्यक्तीशः अश्या क्लायंटसाठी कधीही काम करणार नाही .

मुक्त विहारि's picture

27 Jun 2012 - 6:09 pm | मुक्त विहारि

हे सगळे, काल्पनिक आहे...

सरकार एखादे चांगले काम करायला जाते
आणि
त्या कामाची वाट लावायला, त्यातून फायदा काढायला सगळे तयार होतात.

सरकारी धोरण, जनतेचा फायदा कसा होईल ते ठरवते.
व्यापारी लोक, मुख्य मलिदा कसा काढता येईल, हे बघतात.
तर बाबू लोक. कागदपत्रांची किंमत वसूल करतात.

ह्या ३ बेसिक गोष्टींवर , हे आधारीत आहे....

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2012 - 7:24 pm | प्रभाकर पेठकर

सरकारी धोरण, राजकारण्यांचा फायदा कसा होईल ते पाहते.
व्यापारी लोक, मुख्य मलिदा कसा काढता येईल, हे बघतात.
तर बाबू लोक. कागदपत्रांची किंमत वसूल करतात.
असहाय्य जनता मात्र भरडली जाते.

कथानक काल्पनिक असलं तरी, हे वास्तव आहे.

मुक्त विहारि's picture

27 Jun 2012 - 7:37 pm | मुक्त विहारि

अगदी योग्य..

रामदास's picture

27 Jun 2012 - 9:07 pm | रामदास

क्या फर्क पडता है
राजा राम हो या रावण
जनता तो सिता होती है
अगर राजा रावण है तो
सिताको घरसे अगवा करेगा
अगर राम है तो
जिंदा जमीनमे दफनाएगा
क्या फर्क पडता है
(जशी आठवली तशी लिहीलेली आहे.चूभूदेघे.)

स्मिता.'s picture

27 Jun 2012 - 10:46 pm | स्मिता.

राम / रावण यांच्यात तुलना होते तेव्हा नेहमीच राम सज्जन आणि रावण दुर्जन असतो. पण शेवटी सितेच्या सोबत जे घडले त्याबाबतीत दोघांनाही एकाच माळेत बघून वेगळे (चूक नाही) वाटले, रूपक समर्पकच आहे.

आनंदी गोपाळ's picture

30 Jun 2012 - 9:52 pm | आनंदी गोपाळ

सरकारी धोरण, राजकारण्यांचा फायदा कसा होईल ते पाहते.
व्यापारी लोक, मुख्य मलिदा कसा काढता येईल, हे बघतात.
तर बाबू लोक. कागदपत्रांची किंमत वसूल करतात.
असहाय्य जनता मात्र भरडली जाते.

कथानक काल्पनिक असलं तरी, हे वास्तव आहे.

माफ करा.
पहिल्या प्रतिसादात मुवि लिहितात ते बरोबर आहे.
सरकारी धोरण 'जनतेचाच' कसा फायदा ते पहात असते.
राजकारणी व धंदेवाले चांगली 'स्कीम' 'खाली' पोहोचू देत नाहीत, अन बाबू लोक + बेपारी मिळून लूटमार करतात. सगळे खापर 'सरकार' नावाच्या अमॉर्फस वस्तूवर फोडले कसे जाईल हेही पहातात.

या केस मुख्य सेवेच्या प्रामाणीकपणाच्या बाबतीतच तडजोड आहे, तेंव्हा तो गंभीर गुन्हा आहे, मान्य.
पण लॉबींग करुन आपल्या उत्पादनाची खरेदी करायला भाग पाडणे, गरज निर्माण करणे, प्रतिस्पर्ध्याला भांडवल-कॉपी राईट्स-आय पी वगैरे जंजाळात बुडवुन मागे पाडणे.. अश्या अनेक "एथिकल" मार्गाने दुनियाभरचे बिझनेस चालतात- वाढतात. चीन च्या घोडदौडीला हा वारु तर फार मदत करतोय. अश्यावेळी कितिही चोख आणि प्रामाणिकपणे सेवा देतो म्हटलं तरी पंखच छाटले जातात तेंव्हा अशे तेढे मार्ग अवलंबणे भाग असते. अफु आणि मक्याच्या पिकाचे माफिया आणि पोर्क-बीफ सप्लाय करणार्‍या अवाढव्य कंपन्या मेक्सीकोच्या शेती व्यवसाय गुंडाळायला निघालेत. शिवाय तिथल्या तेलविहीरींची मक्तेदारी बिगब्रदर कडे. तेथील शेतकर्‍याला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी शेवटी कायद्याच्या लुपहोल्स्चा, भ्रष्टाचाराचा मार्गच निवडावा लागतोय... काय करतो बिचारा.

अर्धवटराव

पंखच छाटले जातात तेंव्हा अशे तेढे मार्ग अवलंबणे भाग असते

= ही अत्यंत चुकीची आणि सर्वस्वी गर्तेत नेणारी मानसिकता आहे.

प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या व्यक्तीसमूहाला समाज किंवा देश म्हटलय त्यामुळे व्यक्ती नेहमी प्रार्थमिक आहे, देश किंवा समाज या निव्वळ उपयोगी कल्पना आहेत. जर समाज किंवा देश नितीमान व्हावा असं वाटत असेल तर व्यक्तीची मानसिकता बदलायला लागते आणि सुरुवात नेहमी स्वतःपासून होते.

आपण आपला मोह व्यवस्था, राजकारणी, समाज यांच्यावर ढकलून स्वतःला जस्टीफाय करतो त्यामुळे स्वतः कधीही बदलत नाही आणि भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनून पुन्हा ती सुदृढ करतो. याउप्पर अशी विचारसरणी चारचौघात पसरवून इतरांनाही `हे असंच चालायच' अशी मनोधारणा करायला प्रवृत्त करतो त्यामुळे कोणताही बदल असंभव होतो.

चूक आणि भ्रष्टाचार यात फरक आहे, माझी चूक होऊ शकते पण मी भ्रष्ट कधीही होणार नाही किंवा कुणाला भ्रष्ट करणार नाही ही मानसिकता ठेवा तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागेल. चूक झाली तर आपण ती मान्य करुन, त्याचे परिणाम स्विकारुन त्यातनं मोकळे होऊ शकतो पण भ्रष्टाचार तुम्हाला तुमचं इमान विकायला लावतो कारण ती जाणूनबुजून केलेली फसवणूक असते.

भ्रष्टाचार किंवा फसवणूक ही हुशारी नाही, ती स्वतःची केलेली फसवणूक आहे. भले तुम्ही त्यातनं कितीही सहीसलामत बाहेर पडा तुम्ही स्वतःला अत्यंत दयनीय पातळीवर आणून ठेवलेलं असतं, पैश्यापुढे तुम्ही स्वतःला क्षूद्र केलेलं असतं. मग अश्या व्यक्ती स्वतःला आणि दुसर्‍याला त्याच्या सांपत्तिक स्थितीवर तोलतात आणि इतरांना आधीच आर्थिक काँप्लेक्स असल्यानं ते खजील होतात.

चुकीच्या साधनांनी कधीही श्रेयस साधता येत नाही... ते चुकीचा रस्ता योग्य ठिकाणी नेईल अशा भ्रमात राहणं आहे.

इमानी माणसाला समाज साथ देतो का आणि नियतीला तारतम्य आहे का मला माहिती नाही पण तुमचं मन तुम्हाला कधीही लज्जित करु शकत नाही आणि ज्याला मन लज्जित करु शकत नाही त्याला मोह आणि मत्सर कधीही स्पर्श करु शकत नाहीत.

मी तुम्हाला उगीच तत्वज्ञान शिकवत नाही, तुमचा पूर्वेतिहास किंवा धारणा काहीही असोत, तुम्ही आजपासून तुमची मानसिकता बदलून पाहा तुम्हाला एकदम स्वच्छ आणि मोकळं वाटायला लागेल.

साली ही प्रामाणिकता चीजच काही और आहे!

होय. मरे हुए जमीर का बोझ सबसे भारी होता है. आणि भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याचाही प्रश्न नाहि. पण जसा रोग तसा इलज करावा लागतो. खेळाचे नियम जर एका पार्टीने जिंकावे या उद्देशानेच बनले असतील तर दुसर्‍या पार्टीला नियम मोडल्यावाचुन पर्याय नसतो.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2012 - 8:57 am | संजय क्षीरसागर

ट्रकही आपला नाही, टोल नाक्यावर आपण उभे नाही आणि ट्रकमधे माल काय आहे ते माहिती नाही.

मला वाटतं काय लिहिलय ते शांतपणे न वाचता उगीच लगबगीनं प्रतिसाद दिले जातायत.

इमान कुणाचं विकलं गेलय आपलं की कंपनीच? तुमचं इमान शाबूत ठेवणं तुमच्या हातात आहे आणि हे प्रत्येकाच्या लक्षात आलं तरच इमान काय चीज आहे ते कळेल.

पहले खुदका इमान तो परखो फिर उसमें जिओ
तब जानोगे इमान क्या कयामतकी चीज थी

(हे असं होतं, माझं उत्तर यायच्या आत तुम्ही पुन्हा प्रतिसाद बदलला)

सत्य/कल्पित काहीही असले तरी त्यावर बोधपर प्रतिसाद दिलाच पाहिजे का?

अर्धवटराव's picture

28 Jun 2012 - 9:27 pm | अर्धवटराव

संजयजी, तुम्ही मनमानिपणे चर्चेचा ट्रॅक ठरवण्याचा अट्टहास धरता.

>>ट्रकही आपला नाही, टोल नाक्यावर आपण उभे नाही आणि ट्रकमधे माल काय आहे ते माहिती नाही.
-- अत्यंत असंबद्ध प्रतिसाद. या पलिकडे काहिही म्हणता येणार नाहि या वाक्याला.

>>मला वाटतं काय लिहिलय ते शांतपणे न वाचता उगीच लगबगीनं प्रतिसाद दिले जातायत.
-- दुर्दैवाने मला हे सतत तुमच्या बाबतीत जाणवायला लागलय.

>>इमान कुणाचं विकलं गेलय आपलं की कंपनीच? तुमचं इमान शाबूत ठेवणं तुमच्या हातात आहे आणि हे प्रत्येकाच्या लक्षात आलं तरच इमान काय चीज आहे ते कळेल.
-- आयडीअल सिचुएशन काय असावी हा चर्चेचा मुद्दाच नाहि.

>>पहले खुदका इमान तो परखो फिर उसमें जिओ
तब जानोगे इमान क्या कयामतकी चीज थी
-- अशी परख न करता लोकं तुम्हाला रिप्लाय देतात असा ग्रह आहे का तुमचा ?

>>(हे असं होतं, माझं उत्तर यायच्या आत तुम्ही पुन्हा प्रतिसाद बदलला)
-- हे असं पहिल्यांदा झालय. आणि याचं मुख्य कारण म्हणजे मी पहिले प्रातिनिधीक उदाहरण दिलं होतं ( टोलनाक्याचं ) आणि त्याचा मतितार्थ लक्षात न घेता, मतितार्थावर चर्चा न करता त्यावरुन चर्चेला वेगळे फाटे फुटतील ( जसं तुमच्या प्रतिसादात झालय) असं माझ्या लक्षात आलं म्हणुन मी मग डायरेक्ट मतितार्थ मांडला. तरि दुर्दैवाने असे फाटे फुटलेच.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2012 - 12:10 am | संजय क्षीरसागर

@ बॅटमन

>सत्य/कल्पित काहीही असले तरी त्यावर बोधपर प्रतिसाद दिलाच पाहिजे का?

= कथा कल्पित आहे हे मुविनं माझ्या प्रतिसादा नंतर क्लिअर केलय तस्मात तुमचा प्रतिसाद गैरलागू आहे

@ अर्धवटराव

>संजयजी, तुम्ही मनमानिपणे चर्चेचा ट्रॅक ठरवण्याचा अट्टहास धरता.

= तसं अजिबात नाही ,

माझ्या अशा प्रतिसादावर : `जगभरात काय चालतं किंवा इतर काय करतात हा प्रश्न नाही आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे'

तुमच्या प्रतिसादात असा मुद्दा आहे :

>अश्यावेळी कितिही चोख आणि प्रामाणिकपणे सेवा देतो म्हटलं तरी पंखच छाटले जातात तेंव्हा अशे तेढे मार्ग अवलंबणे भाग असते

त्याला मी उत्तर दिलय

अर्धवटराव's picture

29 Jun 2012 - 12:40 am | अर्धवटराव

बायस्ड नियमांवर आधारीत निकष प्रामणिकपणाला चॅलँज देऊ शकत नाहि इतका सिंपल मुद्दा मी मांडला. आणि हे ज्याचं तो ठरवेल. आणि ते ठरवताना नियमांचे अर्थ आंधळेपणाने स्विकारता येत नाहि. जगभर - इतर जर आपल्यासंबंधी व्यवहारात नेमकं काय चाललय हे ठरवल्याशिवाय पाऊल टाकता येते नाहि. त्यात कुठलीच आत्मघाती/गलिच्छ वृत्ती नाहि.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2012 - 12:42 am | संजय क्षीरसागर

`ज्या प्रकारे हा उद्योजक धंदा करतोय त्याला हुशारी म्हणण अत्यंत खेदजनक आहे. जगभरात काय चालतं किंवा इतर काय करतात हा प्रश्न नाही आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे'

आणि ती प्रामाणिकपणाची व्याख्या आहे, तो बायस्ड नियमांवर आधारित निकष नाही

अर्धवटराव's picture

29 Jun 2012 - 1:07 am | अर्धवटराव

"या केस मुख्य सेवेच्या प्रामाणीकपणाच्या बाबतीतच तडजोड आहे, तेंव्हा तो गंभीर गुन्हा आहे, मान्य."
प्रामाणीकपणाच्या आवश्यकतेत कुठेच छेद दिलेला नाहि. हि प्रामाणिकता नियमाधारीत नाहि एव्हढाच काय तो मुद्दा आहे. आणि हा मुद्दा कुठल्याच गर्तेत नेत नाहि, उलट गर्तेतुन बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतो हि व्यवहार्यता.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2012 - 1:18 am | संजय क्षीरसागर

तुमच्या त्याच प्रतिसादात तुम्ही शेवटी म्हटलय

>तेथील शेतकर्‍याला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी शेवटी कायद्याच्या लुपहोल्स्चा, भ्रष्टाचाराचा मार्गच निवडावा लागतोय... काय करतो बिचारा

याला माझं पहिल्या प्रतिसादापासून कायम एकच उत्तर आहे : `आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे'

आणि अर्थात तोच गर्तेतनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे

अर्धवटराव's picture

29 Jun 2012 - 1:25 am | अर्धवटराव

>>याला माझं पहिल्या प्रतिसादापासून कायम एकच उत्तर आहे : `आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे'
आणि अर्थात तोच गर्तेतनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे
-- म्हणजे व्यवहारातला चोखपणा हा गर्तेतं निघण्याचा मार्ग आहे, नियमातला प्रामाणिकपणा नाहि.
असो.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2012 - 8:53 am | संजय क्षीरसागर

आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा चोख देतो याचा अर्थच आपण नियमातही प्रामाणिक आहोत. व्यवहार आणि नियम दोन्ही एकच आहेत.

या कथेसंदर्भात `CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर' लावला तेव्हा एकाच वेळी प्रामाणिकता, नियम आणि व्यवहार सगळ्याच बाबातीत इमान हरवलं

आणि ज्या क्षणी तो सेंसर योग्य असेल त्या क्षणी ही सर्व परिमाणं एका वेळी साध्य होतील

अर्धवटराव's picture

29 Jun 2012 - 9:45 am | अर्धवटराव

>>आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा चोख देतो याचा अर्थच आपण नियमातही प्रामाणिक आहोत.
-- अनेक ठिकाणी असं नसतं. ( आणि हे केवळ अप्रामाणीकपणे फायदा कमवायला नाहि तर कर्तव्यपुर्तीसाठी देखील करावं लागतं... पण हे झालं अवांतर)

>>व्यवहार आणि नियम दोन्ही एकच आहेत.
-- अनेक ठिकाणी असं नसतं.

>>या कथेसंदर्भात `CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर' लावला तेव्हा एकाच वेळी प्रामाणिकता, नियम आणि व्यवहार सगळ्याच बाबातीत इमान हरवलं
-- या कथेसंदर्भात इमान हरवलं. नियम वाकवले. व्यवहार साधला.

>>आणि ज्या क्षणी तो सेंसर योग्य असेल त्या क्षणी ही सर्व परिमाणं एका वेळी साध्य होतील
-- आय सी. म्हणजे सेन्सर जर बरोबर असेल तरः
१) अश्या डिव्हायसेसची गरज निर्माण होणार आहे हे जाणणे (अर्थात, इथे आपले पॉलिटिकल कनेक्शन वापरुन. इथेही "रोकडा" व्यवहार आलाच )
२) कस्ट्म मधुन इल्लीगली डिव्हाइइस बाहेर काढणे
३) मूळ निर्मात्या कंपनीची परवानगी न मागता त्याचे डुप्लिकेट तयार करणे
४) इतर कुणाला सुगावा लागण्या अगोदर, टेंडर वगैरे निघण्या अगोदर आपले डिव्हाईस पास करुन घेणे
५) चोरी पकडली गेल्यास "यात देश्याच्या अब्रुचे धिंडवडे निघतील" अशी भिती घालणे व प्रकरण दाबणे

हे सर्व व्यवहार "प्रामाणीक"पणा पावतील, आणि सर्व काहि "नियमात" बसेल. इंटरेस्टींग.

अर्धवटराव

आपलं चुकीचं म्हणणं दुसर्‍याला सिद्ध करायला लावणं! प्रतिसाद खाली दिलाय.

अर्धवटराव's picture

29 Jun 2012 - 6:33 pm | अर्धवटराव

आता हे तुम्ही सिद्ध करा बघु :)

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2012 - 6:51 pm | संजय क्षीरसागर

हे वाचलं नाहीत बहुदा! असं होतं गडबडीत.

अर्धवटराव's picture

30 Jun 2012 - 2:02 am | अर्धवटराव

खालचा प्रतिसाद देखील वाचला होता. त्यात काहिच सिद्ध झालेलं नाहि :(

अर्धवटराव

@ संजय क्षीरसागर

मुळात कथा सत्य आहे की मिथ्या याचा त्या बोधामृताशी काहीही संबंध नाही . ही ऊठसूट बोधपर जिलेब्या पाडण्याची सुरसुरी गैरलागू आहे इतकेच निरीक्षण नोंदवतो.

संजय क्षीरसागर's picture

1 Jul 2012 - 12:17 am | संजय क्षीरसागर

यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तस्मात पुन्हा गैरलागू प्रतिसाद

हा सल्ला नसून हे एक निरीक्षण आहे असे प्रतिसादातच स्पष्ट केलेले आहे आणि निरीक्षणे लागू/गैरलागू नसतात. मला ऊठसूट सल्ला देण्याची सुरसुरी नाही.

प्रतिसाद आहेत. नुसतं निरिक्षण नोंदवतो म्हटल्यानं तिरकसपणा लपत नाही.

असे प्रतिसाद मत्सर दर्शवतात असा निष्कर्श आहे

बॅटमॅन's picture

1 Jul 2012 - 2:51 pm | बॅटमॅन

ब्वॉर्र्र्र्र...........चालूद्या...

पैसा's picture

27 Jun 2012 - 7:43 pm | पैसा

लवकर येऊ द्या पुढचा भाग!

आशु जोग's picture

27 Jun 2012 - 10:28 pm | आशु जोग

खूप भारी वाटलं होतं पण

हे दिसलं

>> CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर लावून आमची कं. चालू झाली

सगळच संपलं. इथे कथा पंक्चर होते

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jun 2012 - 1:51 am | निनाद मुक्काम प...

मुवि
अहो कथा काल्पनिक आहे असे आधीच सांगून जरासा रसभंग केला.
नाहीतर आमचे दादा ह्यां प्रकरणातून कधीकाळी गेले आहे असे वाटून कथा वाचण्याची खुमारी वाढली असती.
हे लेखकांच्या धंद्यातील ट्रेड सिक्रेट असते. खरे आणि काल्पनिकता ह्यांची बेमालूम सरमिसळ
रामदासांचे प्रतिसाद मस्त
त्यांची शेअर मार्केट वरील कथा ह्याच जात कुळीतील
ती काल्पनिक का कितपत खरी हे अजून गुलदस्त्यात
पण अधुरी एक कहाणी

मृत्युन्जय's picture

28 Jun 2012 - 11:14 am | मृत्युन्जय

लै बेश कथा आहे. मला तर बराच वेळ खरीच वाटत होती. मस्त जमली आहे. पुभाप्र

शिल्पा नाईक's picture

28 Jun 2012 - 3:04 pm | शिल्पा नाईक

इतके details दीले आहेत की मला वाटतच नाही कि काल्पनीक वगरे आहे.
या अश्या comman घटना रोज घडतच असतात, फक्त जे या commercial कामाच्या पासून लांब असतात त्यांना ते नवल वाटू शकत.
पण हे मारवाडी/गुजराथी व्यापारी लोक जे करतात ते समोर आलेच पाहीजे अस वाटत.

विजुभाऊ's picture

28 Jun 2012 - 5:38 pm | विजुभाऊ

पण हे मारवाडी/गुजराथी व्यापारी लोक जे करतात ते समोर आलेच पाहीजे अस वाटत.
शिल्पा ताई तुमचे हे विधान जातीवाचक आहे. शिर्के / पवार / पाटील / महाजन /राणे /कदम /वाघ/चव्हाण्,जोशी , आडनावाचे लोक्स जणू हे असले काही करीतच नाहीत. असे म्हणायचे आहे काय तुम्हाला?
(उदा: "पुण्यात बापट या आडनावाची एक आडबाजूला पडलेली अभिनेत्री कोथरुडमध्ये वेश्या व्यवसाय चालवायची " याचा अर्थ तुम्ही लावलेल्या मापाने कोणी लावला तर काय अनर्थ होईल?)
सरसकट सर्वाना एकाच मापाने मोजू नका.पी जी वुडहाऊसचे उद्गार आठवतात का" आय डोन्ट हेट इन प्लुरल"

शिल्पा नाईक's picture

29 Jun 2012 - 11:10 am | शिल्पा नाईक

मी कोणाच्या जाती बद्द्ल बोलत नाही. गुजराथी लोक स्वत च्या समाजातच एकी करुन व्यवसाय करतात. या एकीच्या बळावर ते ह्या अश्या गोष्टी सहज manage करतात. (उ. हीरे व्यापार) मी तरी माझ्या आयुष्यात कोणी मराठी समाजाने अस केल्याच पाहील नाही. म्हणून वर अस लिहिल. तुमच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागते.

मतभेद हा तर मराठी माणसाचा हाय पॉइंट आहे ना!

स्वाती दिनेश's picture

28 Jun 2012 - 10:12 pm | स्वाती दिनेश

सुरुवात रोचक!
पु भा प्र,
स्वाती

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2012 - 11:39 am | संजय क्षीरसागर

> आय सी. म्हणजे सेन्सर जर बरोबर असेल तरः

१) अश्या डिव्हायसेसची गरज निर्माण होणार आहे हे जाणणे (अर्थात, इथे आपले पॉलिटिकल कनेक्शन वापरुन. इथेही "रोकडा" व्यवहार आलाच )
२) कस्ट्म मधुन इल्लीगली डिव्हाइइस बाहेर काढणे
३) मूळ निर्मात्या कंपनीची परवानगी न मागता त्याचे डुप्लिकेट तयार करणे
४) इतर कुणाला सुगावा लागण्या अगोदर, टेंडर वगैरे निघण्या अगोदर आपले डिव्हाईस पास करुन घेणे
५) चोरी पकडली गेल्यास "यात देश्याच्या अब्रुचे धिंडवडे निघतील" अशी भिती घालणे व प्रकरण दाबणे

हे सर्व व्यवहार "प्रामाणीक"पणा पावतील, आणि सर्व काहि "नियमात" बसेल. इंटरेस्टींग

= आहो सेंसर प्रामाणिकपणे बसवणार्‍या माणसाच्या मनात असे विचार सुद्धा येणार नाहीत त्यामुळे `बाकीचे व्यवहार प्रामाणिकपणा' पावण्याचा प्रश्नच नाही; तसले व्यवहार होणारच नाहीत!

आता राहिला प्रश्न `अश्या डिव्हायसेसची गरज निर्माण होणार आहे हे जाणणे' ; कोणताही व्यावसायिक त्याच्या उप्तादनाला कुठे संधी आहे हे शोधतच असतो पण त्यासाठी ,(> इथे आपले पॉलिटिकल कनेक्शन वापरुन. इथेही "रोकडा" व्यवहार आलाच ) अशी सुरुवात करणं हीच अप्रामाणिकता आहे आणि एकदा सुरुवात चुकीची झाली की शेवट चुकीचाच होणार.

उगीच का मी म्हटलय `चुकीच्या साधनांनी कधीही श्रेयस साधता येत नाही... ते चुकीचा रस्ता योग्य ठिकाणी नेईल अशा भ्रमात राहणं आहे'

अर्धवटराव's picture

29 Jun 2012 - 7:39 pm | अर्धवटराव

>>= आहो सेंसर प्रामाणिकपणे बसवणार्‍या माणसाच्या मनात असे विचार सुद्धा येणार नाहीत त्यामुळे `बाकीचे व्यवहार प्रामाणिकपणा' पावण्याचा प्रश्नच नाही; तसले व्यवहार होणारच नाहीत!
-- मी जो काहि थोडबहुत बिझनेस बघितलाय त्यावरुन असा छातीठोकपणे दावा करुन शकत नाहि. पण तुमचा अनुभव दांडगा आणि परिपक्व... तेंव्हा माझी धारणा चुकीची ठरो अशी प्रार्थना करतो. असो.

>>उगीच का मी म्हटलय `चुकीच्या साधनांनी कधीही श्रेयस साधता येत नाही... ते चुकीचा रस्ता योग्य ठिकाणी नेईल अशा भ्रमात राहणं आहे'
-- परत ट्रॅक बदलला. या तुमच्या फिलॉसॉफीला मी कधिच प्रश्न केला नाहि. माझा प्रश्न एकदम सिंपल आहे. समजा मी एका कॉम्पीटिशन मध्ये आहे. आणि मला माहित आहे त्यातले नियम हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला जिंकवण्यासाठी बनवले गेलेत (आता माझ्या समझदारीवर शंका घेतली, किंवा मी त्या कॉम्पीटीशन मध्ये पडलोच का, हे प्रश्न निरर्थक आहे ) अशा वेळी मी जर शक्य तेथे नियम वाकवले तर तो माझा अप्रामाणीकपणा ठरावा काय? (याला "हो" अथवा "नाहि" इतकं साधं उत्तर देता येऊ शकतं.) सर्वात मुख्य गोष्ट... मी कुणाला काहि सिद्ध करायला सांगत नाहिए. मी फक्त माझ्या धारणा मांडतोय आणि इतरांच्या धारणांचे तौलनीक वाचन (अभ्यास म्हणा हवं तर) करतोय.

अर्धवटराव

माझा बेसिक मुद्दा (सर्वप्रथम प्रतिसाद असाय : ज्या प्रकारे हा उद्योजक धंदा करतोय त्याला हुशारी म्हणण अत्यंत खेदजनक आहे).... (थोडक्यात भ्रष्टाचार म्हणजे हुशारी नाही)

आणि माझं एकच म्हणणंय : जगभरात काय चालतं किंवा इतर काय करतात हा प्रश्न नाही आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे.

आता तुम्ही विचारताय :

>समजा मी एका कॉम्पीटिशन मध्ये आहे. आणि मला माहित आहे त्यातले नियम हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला जिंकवण्यासाठी बनवले गेलेत (आता माझ्या समझदारीवर शंका घेतली, किंवा मी त्या कॉम्पीटीशन मध्ये पडलोच का, हे प्रश्न निरर्थक आहे ) अशा वेळी मी जर शक्य तेथे नियम वाकवले तर तो माझा अप्रामाणीकपणा ठरावा काय?

= तुम्ही ही वेगळी स्टोरी सुरु केलीये आणि त्यात तुमचे व्यक्तीगत पॅरामिटर्स आहेत (त्यातले नियम हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला जिंकवण्यासाठी बनवले गेलेत) तस्मात हा प्रश्न या कथेवर गैरलागू आहे

अर्धवटराव's picture

30 Jun 2012 - 2:01 am | अर्धवटराव

प्रतिसाद १)
...पण लॉबींग करुन आपल्या उत्पादनाची खरेदी करायला भाग पाडणे, गरज निर्माण करणे, प्रतिस्पर्ध्याला भांडवल-कॉपी राईट्स-आय पी वगैरे जंजाळात बुडवुन मागे पाडणे.. अश्या अनेक "एथिकल" मार्गाने दुनियाभरचे बिझनेस चालतात-

प्रतिसाद २)
खेळाचे नियम जर एका पार्टीने जिंकावे या उद्देशानेच बनले असतील तर दुसर्‍या पार्टीला नियम मोडल्यावाचुन पर्याय नसतो.

प्रतिसाद ४)
बायस्ड नियमांवर आधारीत निकष प्रामणिकपणाला चॅलँज देऊ शकत नाहि इतका सिंपल मुद्दा मी मांडला. आणि हे ज्याचं तो ठरवेल. आणि ते ठरवताना नियमांचे अर्थ आंधळेपणाने स्विकारता येत नाहि.

प्रतिसाद ५)
प्रामाणीकपणाच्या आवश्यकतेत कुठेच छेद दिलेला नाहि. हि प्रामाणिकता नियमाधारीत नाहि एव्हढाच काय तो मुद्दा आहे.

प्रतिसाद ६)
समजा मी एका कॉम्पीटिशन मध्ये आहे. आणि मला माहित आहे त्यातले नियम हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला जिंकवण्यासाठी बनवले गेलेत (आता माझ्या समझदारीवर शंका घेतली, किंवा मी त्या कॉम्पीटीशन मध्ये पडलोच का, हे प्रश्न निरर्थक आहे ) अशा वेळी मी जर शक्य तेथे नियम वाकवले तर तो माझा अप्रामाणीकपणा ठरावा काय?

या सर्व प्रतिसादांवरुन जर तुम्ही म्हणत असाल कि आता माझ्या प्रश्नाचा अँगल बदललाय, तर तुम्हाला त्यात नवा अँगल दिसण्याचं एकच ( पटण्यालायक ) कारण असावं कि तुम्ही माझे प्रतिसाद वाचलेच नाहित. (न पटण्यालायक कारण- तुम्हाला माझे प्रतिसाद कळलेच नाहि).
आता पर्यंत मी मिपावर अनेक बुच पाहिलेत... एव्हढा सॉलीड बुच या सम हाच. मान गए :)

अर्धवटराव

आता तुमचा प्रश्न असाय की तुम्ही वर्णन केलेल्या परिस्थितीत ती राखायची कशी?

त्यामुळे तुम्ही अप्रामाणिक दुनियेत अप्रामाणिकता जस्टीफाय करताय

> अश्या अनेक "एथिकल" मार्गाने दुनियाभरचे बिझनेस चालतात
>खेळाचे नियम जर एका पार्टीने जिंकावे या उद्देशानेच बनले असतील तर दुसर्‍या पार्टीला नियम मोडल्यावाचुन पर्याय नसतो
>आणि ते ठरवताना नियमांचे अर्थ आंधळेपणाने स्विकारता येत नाहि.
>हि प्रामाणिकता नियमाधारीत नाहि एव्हढाच काय तो मुद्दा आहे.
>अशा वेळी मी जर शक्य तेथे नियम वाकवले तर तो माझा अप्रामाणीकपणा ठरावा काय?

= थोडक्यात तुम्ही तुमच्यापरिनं उत्तर शोधलय, मग तुम्ही उद्विग्न ( >आता पर्यंत मी मिपावर अनेक बुच पाहिलेत... एव्हढा सॉलीड बुच या सम हाच. मान गए) का होताय?

आपल्या दोघात कुठे काय वैयक्तिक आहे?

ओ अंकलजी. टेक इट इझी. मुळात माझ्या प्रश्नाला "हो" अथवा "नाहि" इतक्या सिंपल शब्दात उत्तर देणं शक्य असताना त्यात तुम्हाला प्रथम वेगवेगळे एंगल दिसले, आता उद्विग्नता, आणि काहितरी वैयक्तीक दिसतय. आय थिंक देअर इस अ मेजर डिस्कनेक्ट. आपल्या दोघात वैयक्तीक वगैरे असायचा प्रश्नच कुठे येतो ? तुम्ही एक सिद्धांत मांडला आणि मला त्यातल्या एका उपसिद्धांतावर मी प्रश्न विचारला... बस्स. कृपया कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये.

असो. एक अनुत्तरीत प्रश्न मागे ठेऊन हि चर्चा मी क्लोस करतोय. परत एकदा... कृपया कुठलाहि गैरसमज करुन घेऊ नये. आदिओस. ( भेटुया... पुढील चर्चेत... एक नए प्रश्न के साथ ;) )

अर्धवटराव

... एव्हढा सॉलीड बुच या सम हाच. मान गए

हा व्यक्तीगत शेरा आहे. तुमच्या प्रश्नाला "हो" अथवा "नाही" असं उत्तर येऊ शकत नाही कारण `अप्रामाणिक दुनियेत अप्रामाणिकता जस्टीफाय होते का? असा तुमच्या प्रश्नांचा अर्थ आहे; आणि तुम्ही होते असा सूर लावला आहे हे तुमचेच प्रतिसाद वाचून तुम्हाला समजेल. तुम्हाला बहुदा उत्तरा ऐवजी सहमती हवी आहे.

प्रश्न अनुत्तारित आहे असं वाटलं तरी प्रतिसाद संयत असला तर गैरसमज होणार नाहीत

अर्धवटराव's picture

1 Jul 2012 - 6:16 pm | अर्धवटराव

बुच बद्दल म्हणाल तर ते कोम्प्लिमेण्ट होते. त्यातही तुम्हाला व्यक्तीगत शेरा दिसला? पण आता त्यात काहि आश्चर्य वाटत नाहि. विनाकारण व्यक्तिगत शेरेबाजी आम्हि करत नाहि हो... प्रतिसाद संयतच होता. असो. चिल्ल माडी.

आणि प्रश्नाबद्दल म्हणाल ते मॅटर क्लोस झालय.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

2 Jul 2012 - 5:57 am | संजय क्षीरसागर

धारणारहित चित्त आहे सबब कोणत्याही धारणेला शह बसत नाही त्यामुळे कायम चिल्ड असतो.
तुमच्या प्रतिसाद काँप्लिमेंटरी होता आणि व्यक्ती शेरेबाजी करत नाही या विधानांवर विश्वास ठेवून चर्चा संपवतो, धन्यवाद!

अर्धवटराव's picture

30 Jun 2012 - 1:55 am | अर्धवटराव

प्र.का.टा.आ.

अर्धवटराव

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2018 - 1:44 pm | चौथा कोनाडा

छगनलालांचे सापळ्याची कहाणी अदभूतच आहे राव !
आता, पुढचा भाग वाचणं आलं ....... !
मुविबॉस..... _/\_

धन्यवाद, ट्रम्प ! या कहाणीचा धागा दुसर्‍या एका चर्चेत दिल्याबद्दल