छगनलालांचे सापळे (भाग ६)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Nov 2014 - 4:20 pm

आधीचा भाग : http://misalpav.com/node/25470

हा भाग डोक्यात फार आधीच तयार होता...पण काही कारणांमुळे लिहायला उशीर झाला...दिरंगाई बद्दल क्षमस्व....

================================

महाराष्ट्राच्याच बाजूला "गोवा" नावाचे एक छोटे राज्य आहे.तशी तिथली प्रजा सुखी आणि समाधानी.रोजच्या जेवणांत भात,मासे आणि थोडीशी फेणी असली की झाले.पण इथल्या राजाला मात्र अधिक पैसे हवे होते.खाण आणि इतर उद्योगातून पैसे मिळत असले तरी पैशांची हाव काही सुटत न्हवती.

आमच्या साहेबाला ह्या मुख्यमंत्र्याची हाव समजली आणि त्याने समुद्र ढवळायला सुरुवात केली.

एक-दोन महिन्यात परीस्थितीचा अंदाज घेवून, आणि योग्य ती काळजी आणि उपाययोजना करून, साहेबाने मोर्चे पण बांधून ठेवले.मासा छोटा असला तरी, साहबाने शिकारीची जय्यत तयारी केली.

तिसर्‍या महिन्यात, दिल्लीहून एक खलिता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना आला.त्यात पर्यावरणाच्या संरक्षणाबाबतीत गोवा राज्य फार मागासलेले आहे, असे सांगून, पर्यावरणाच्या सुधारणे-बाबत काही उपाय-योजना सांगीतल्या होत्या.सगळ्याच सुचना, मुख्यमत्र्यांनी नजरेखालून घातल्या.त्यातून त्यांना योग्य ती माहिती मिळाली.ह्या सगळ्या सुचनांमध्ये एकच तथ्य होते.काही विशेष लोकांना कामे द्या आणि त्यांचे भले करा.

त्यातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी, वाहनांनी सोडलेल्या धूराचे परीक्षण करण्याची पण सूचना होती.शिवाय जोडीला उप-सुचना म्हणून आमच्या कंपनीचे नांव पण होते.

लगेचच मुख्यमंत्र्यांनी आमच्या कंपनीकडे विचारणा करणारे पत्र पाठवले.

आमच्या साहेबांचा, माझ्यावर आणि अशोकवर विश्र्वास असल्याने, त्यांनी आम्हाला चाचपणी करायला पाठवले.

मी आणि अशोक, दुसर्याच दिवशी गोव्याला रवाना झालो.

गोव्याला गेल्या-गेल्याच अशोक सुटलाच.खोलीत जाताच त्याने जेमतेम बॅग टाकली आणि बाटली जवळ केली.दिवसें-दिवस अशोकचे दारूचे प्रमाण फारच वाढत चालले होते.मी त्याला सावरण्याचा बराच प्रयत्न करत होतो.पण अशोक आता हाता बाहेर जात होता.आत्ता आत्ता पर्यंत अशोकच्या ग्लासांत दारू असायची पण हल्ली मात्र दारूच्या ग्लासमधून अशोकला बाहेर काढायला लागत होते.

मी एक-दोन तास वाट बघीतली पण अशोक आज काम करायला तयार न्हवता.शेवटी मीच पुढाकार घेण्याचे ठरवले आणि लॉबीत जावून साहेबांना फोन लावला.साहेबांकडून पुढील सुचना मिळाल्या आणि मी निघालो.अपेक्षेप्रमाणे साहेबांनी अशोक बाबत विचारले, पण मी, "तो आजारी आहे." असे सांगून वेळ मारून नेली.साहेबांबरोबर खोटे बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ.

मला भेटायला सांगीतलेला मनुष्य, गोव्यातील परीवहन मंत्री होता.साहेबांनी सांगीतल्या प्रमाणे रात्री १० वाजता गेलो.अशोक पुर्णपणे दारूच्या नशेत असल्याने एकटाच गेलो.इतरवेळी अशा कामांत अशोकच पुढाकार घेत असे.पण ह्यावेळी मात्र मलाच हे काम करणे भाग होते.

साहेब माझी वाटच बघत होते, पण लगेच गेल्या-गेल्या माझ्या सारख्या माणसाला कोण भेटेल? म्हणून त्याने भेट घ्यायला १ तास लावला.इकडून-तिकडून सगळी माणसे सारखीच.तशीच खुर्चीची हाव आणि सत्तेची धुंदी.

मी थोडक्यात आमची कंपनी काय करते ते सांगीतले आणि आमच्या कंपनीची तारीफ करणारी इतर राज्यांच्या परीवहन मंत्र्यांची शिफारस-पत्रे दाखवली.

अपेक्षेप्रमाणे, त्याने विचारले की, मी नक्की काय करतो? आणि मी नक्की काय करू शकतो?

मी सरळ सांगीतले, की आम्ही कुणालाही नाराज करत नाही.आमची सेवा वेळेवर आणि व्यवस्थित मिळेल आणि तुम्हाला पण तुमच्या शब्दाची किंमत ठेवावी लागेल.

त्याने ५०% पार्टनर शिप मागीतली.

समोरून बॉल आलाच आहे आणि साहेबांनीच तो टोलवायचा आहे, हे ओळकून मी वेळ मागीतला.परत खोलीवर आलो आणि साहेबांना फोन लावला.

साहेबांनी ५०% पार्टनर-शिपची सूचना ऐकून स्वतःच येण्याचा निर्णय घेतला.फोन ठेवता-ठेवता त्यांनी अशोक बाबत परत एकदा चौकशी केली.काहीतरी थातूर-मातूर देवुन मी ती वेळ निभावली.

दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही नाश्ता करायला म्हणून लॉबीत गेलो.(अशोक अजुनही दारूच्या नशेतच होता पण निदान बाटली तरी जवळ न्हवती.) आणि नेमकी त्याच वेळी साहेबांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला.साहेबांनी ह्यावेळी येतांना एक मादक तरूणी पण आणली होती.आयला, काय जबरदस्त चीज़ होती.माझ्या सारख्या लग्न झालेला आणि बायकोवर मनापासून प्रेम करणारा पण पार घायाळ झाला तर इतर लोकांचे काय होत असेल.तिने अशोक कडे बघून न बघीतल्यासारखे केले, तर अशोक मात्र ती दिसताच परत एकदा हवाल-दिल झाला.साहेबांबरोबर राहून मला पण थोडी माणसे वाचायची खोड लागलीच होती.इथे काही तरी वेगळे पाणी मुरत आहे, असे जाणवले.

साहेबांनी लगेच आपल्या बरोबरच्या तरूणीला रूम वर पाठवले आणि ते आमच्या बरोबर बसले.माझ्या कडून परत एकदा सगळे व्यवस्थीत समजावून घेतले आणि मला रूम वर जावून सामान पॅक करण्याची सूचना केली.मी अशोकला, येतोस का? असे विचारले, पण साहेबांनी मला एकट्यालाच रूम वर जायची सुचना केली.

मी रुमवर आलो आणि सामान पॅक करून अशोकची वाट बघत बसलो.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार ताकवले's picture

4 Nov 2014 - 4:34 pm | तुषार ताकवले

आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. तुम्ही वर्षभराने पुढचा भाग टाकल्यावर कसं व्हायचं

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Nov 2014 - 4:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

बहुतही छोटा भाग है ये.
अगली बार थोडा बडा भाग लिहो

पैजारबुवा

नाखु's picture

4 Nov 2014 - 4:45 pm | नाखु

कर दी इंतजार मे..

पु.भा.प्र.

वरील सर्व प्रतिसांदाना +1

विजुभाऊ's picture

4 Nov 2014 - 5:18 pm | विजुभाऊ

मुवि काका. या अगोदरच्या सगळ्या भागांची लिंक द्या ना.
मागील गोष्टींची लिंक लागेल जरा

पण प्रत्येक भागांत आधीच्या लेखाची लिंक दिली आहे.

योगी९००'s picture

4 Nov 2014 - 5:52 pm | योगी९००

खुप छान कथा..!!

आज परत पहिल्या भागापासून वाचून काढली. हा भाग उशीरा आल्याने मधली लिंक तुटली होती. लवकर पुढचा भाग टाका राव.. ..!!