गोटीपुअ

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
1 Dec 2011 - 1:04 am

हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे.

या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ".

हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार?

गोटी म्हणजे एक, आणि पुअ म्हणजे मुलगा. मुलगा नाचतो, म्हणून नृत्याचे नाव गोटीपुअ. प्रत्यक्षात आठ दहा जण नाचतात. पण नाव पडले आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये पूर्वी देवदासी प्रथा होती. या देवदासी बाहेर नाचू शकत नव्हत्या, मग मुलग्यांना स्त्री वेष देऊन नाचवायची प्रथा सुरु झाली असे म्हणतात. कुणी म्हणतात, जगन्नाथ आणि शिवाची पूजा एकत्र होत असे, जगन्नाथाला स्त्रीच्या विटाळाचे काही नसे, पण शंकराला मात्र "अपवित्र" होऊ शकत असलेल्या स्त्रीदेहाने केलेली आराधना चालत नसल्यामुळे मुलग्यांना स्त्रीवेष देऊन ही नृत्याराधना करण्याची प्रथा रुढ झाली. पंधराव्या शतकात.

कारण काहीही असले तरी नृत्य मात्र आहे रोचक. यावरुनच पुढे ओडिसी नृत्य विकसीत झाले असे म्हणतात. या नृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे "बंध". अशक्यप्राय वाटणार्‍या कसरती करत ईशस्तुतीचे विविध नमुने हे नृत्य सादर करते. सहा ते पंधरा वर्षे वयापर्यंतच्या मुलांना याचे प्रशिक्षण देण्यात येते. पंधरा वर्षांपुढील वयाची मुले हे नृत्य करत नाहीत. याविषयी अधिक माहिती या चलचित्रात मिळेल -

आणि इथेही -

आवर्जून दखल घेण्याजोगा हा नृत्यप्रकार आहे यात वादच नाही. विकीवरही याची माहिती आहे.

कलानृत्यसंगीतनाट्यधर्मइतिहाससमाज

प्रतिक्रिया

या नृत्यप्रकाराबद्दल प्रथमच ऐकतिये.
पाशवी शक्तींच्या दृष्टीने स्फोटक धागा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Dec 2011 - 2:09 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>पाशवी शक्तींच्या दृष्टीने स्फोटक धागा.
इथे रेवती आजींचे स्वगत :- चला, लक्ष ठेवायच्या यादीत अजून एक धाग्याची भर. हे धागे काढणार, आणि आमच्या डोक्याला त्रास. आळश्यांचा राजाचे काय जाते हे लिहायला, फुकट आमचे काम वाढवले.

तटी :- आळश्यांचा राजा आणि रेवती आज्जी यांनी मनावर घेऊ नये :-)

पैसा's picture

1 Dec 2011 - 7:48 am | पैसा

लिंक द्यायची राहिली का?

हे कारण माहिती नव्हतं, पण कोकणात खेळे असतात, त्यातही स्त्रीपात्रांच्या ऐवजी कोणी बाप्येच साड्या नेसून खेळे सादर करतात.

प्रीत-मोहर's picture

1 Dec 2011 - 9:56 am | प्रीत-मोहर

हो हो .. शिमग्याला करुल्या, राधा अस सगळ गावचे मुलगेच तर करतात

अन्या दातार's picture

1 Dec 2011 - 8:32 am | अन्या दातार

कुठे आहेत?

कपिलमुनी's picture

1 Dec 2011 - 9:30 am | कपिलमुनी

" अपवित्र होऊ शकत असलेल्या स्त्रीदेहाने "

अशा समजुतींचा णिषेढ !!