Sonar of Thoughts !
जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि त्यात बुडालेली ही मुलगी.
मी काढलेला एक फोटो, गोव्यात. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (Oxford : Ghalib Life & Letters हे पुस्तक).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही. :-)
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
14 Oct 2011 - 12:59 pm | गवि
:(
14 Oct 2011 - 11:05 pm | वाहीदा
आईग्ग्ग ५०फक्त, तुमच्या कविताने अगदी काळीजच पिळवटून टाकलं :-(
14 Oct 2011 - 1:17 pm | प्रचेतस
अतिशय तरल आणि भावस्पर्शी कविता.
14 Oct 2011 - 1:24 pm | जयंत कुलकर्णी
वेगळा विचार व चित्र रंगवलेले आहे तुम्ही. पहिल्यापेक्षा खूपच चांगले आहे.
धन्यवाद !
14 Oct 2011 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर
क्या बात है, श्री. ५० फक्त.
कविता अगदी अंगावर येते आहे. न राहवून दोनदोनदा वाचली. अप्रतिम.
14 Oct 2011 - 3:59 pm | प्यारे१
खूप 'त्रास'दायक कविता! मान गये!
त्सुनामिचा अनुभव घेतलेल्यांना खरंच असंच काहीसं वाटत असेल.
अवांतरः च्यायला, 'डोक्या'ला मार लागलाय तर पार चौखूरच उधळलंय की.... ;)
14 Oct 2011 - 4:04 pm | प्यारे१
प्र का टा आ
15 Oct 2011 - 7:23 am | जयंत कुलकर्णी
परत वाचल्यावर असे वाटले की जर एखाद्याच्या आयुष्यात असा प्रसंग आला असेल आणि जर त्याने ही कविता वाचली तर............
14 Oct 2011 - 3:04 pm | गणपा
या विभागात आम्हाला गती नाही.
तस्मात एक मराठी जुने गीत आठवले ते देत आहे.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
15 Oct 2011 - 7:32 am | जयंत कुलकर्णी
मित्रहो आणि मैत्रिणींनो,
खाली सगळ्यांच्या कवितेचा स्लाईडशो टाकला आहे म्हणजे सगळ्या एकद्म वाचायला मिळतील.
मला वाटते आपण बक्षिसासाठी २० तारीख (येणारी) ही अंतीम ठरवावी. अर्थात त्यानंतर आपल्या सर्वांना हा धागा चालू ठेवायचा असेल तर जरूर चालू ठेवू शकता.
या स्लाईडशो मधे काही चुका असल्यास कळवाव्यात, म्हणजे दुरूस्त करता येतील, नवीन कविता त्यात घातल्या जातील त्यामुळे लिहीत रहा..........
यात सागर निझामीची ही एक गज़ल टाकली आहे कारण मला तॊ मुखपृष्ट म्हणून टाकायची होती पण ति रिशफल झाली आहे . :-(
जयंत कुलकर्णी.
15 Oct 2011 - 7:53 pm | वाहीदा
सर,
सहाव्या पानावर कोणाची कविता आहे दिसत नाही फक्त पांढरे रिकामे पेज दिसत आहे :-(
15 Oct 2011 - 8:42 pm | जयंत कुलकर्णी
हो बरोबर आहे. पुढची कविता आलि की हेही दुरूस्त करू म्हणून कंटाळा केला.
16 Oct 2011 - 12:55 am | प्रभाकर पेठकर
एकंदर २२ कविता आलेल्या दिसत आहेत परंतु वरील अल्बम मध्ये चौदांचाच समावेश झाला आहे. अल्बम मध्ये समावेशासाठी काही निकष/नियम ठरविलेले आहेत का?
16 Oct 2011 - 7:18 am | जयंत कुलकर्णी
नम्स्कार !
निकष्/नियम काही नाही हो ! प्रत्येकाची एक म्हणून टाकली आहे. जर आपल्याला दुसरी टाकायची असेल तर तसे सांगा. तसे करू किंवा सगळ्या टाकायच्या असतील तर तसेही करू.....
16 Oct 2011 - 10:54 am | प्रभाकर पेठकर
दुसरी टाकायची असेल तर तसे सांगा. तसे करू किंवा सगळ्या टाकायच्या असतील तर तसेही करू.....
छे..छे मला तसे अजिबात म्हणायचे नाही. अहो, ह्या दांडग्या कवींच्या पंगतीत माझे पान खरे तर काटकोनात मांडायचे पण आपण नावाजून पंक्तीतच बसविले आहे हाच मोठा सन्मान झाला. असो.
धन्यवाद.
16 Oct 2011 - 12:05 am | माझीही शॅम्पेन
(माझाही एक प्रयत्न सांभाळून घ्या :))
------------------------------------------------------------------------------
प्रिया केवळ एकदाच म्हणालस
मला नौसेनेत प्रवेश मिळालाय
एकादी कागदी होडी वाहून जावी
तसा पटकन नाहीसा झालास..
लोक म्हणतात तू कायमचा गेलास
पण परतुनी का नाही आलास
माझा वाळूचा किल्ला मोडायला
अरे किती वाट पाहु तुशी प्रिया
वारा होऊन रुंजी घालतोयस
अन् पाऊस होऊन बरसतोयस
मीच येते आता तुला भेटायला
वाळूचा कण होऊन गेलीय मी
तुझ्याच शिंपल्यात मोतीव्हायला
------------------------------
माझीही शॅम्पेन
16 Oct 2011 - 7:20 am | जयंत कुलकर्णी
पहिले कडवं मला जास्त आवडले.....
16 Oct 2011 - 9:06 pm | माझीही शॅम्पेन
धन्यवाद ! :)
मला वाटल शेवटाच बर असाव असो :)
16 Oct 2011 - 10:15 am | अर्धवट
आलोच.. एवढे मोठे लोक जमून राह्यले आपला पो घालायला काय हरकत आहे,
दुपारी लिहितो...
18 Oct 2011 - 10:11 am | जयंत कुलकर्णी
आमचाही एक साधासुधा प्रयत्न......
हुंदक्याची जागा
गाणे घेऊदेत
अश्रूंची जागा
फुले घेऊदेत
ढगांची जागा
रंग घेऊदेत
सागराची जागा
मन घेऊदेत
विचारांची जागा
कृती घेऊदेत
अंधारची जागा
प्रकाश घेऊदेत
आणि हे प्रिये,
जमले तर,
त्याची जागा
मला घेऊदेत................
17 Oct 2011 - 11:42 am | मी ऋचा
सगळ्या कवींना माझा मानाचा मुजरा! ईतके प्रतिभावान लोक ज्या एका परिवाराचे सदस्य आहेत त्या परिवाराची सदस्या असल्याचा मनापासून अभिमान वाटतोय __/\__ !!
17 Oct 2011 - 2:20 pm | विकाल
काल जिंदगी ना मिलेगी बघत असताना जावेद्जींच्या फरहान ने म्हटलेल्या काही ओळी या चित्रासाठी समर्पक वाटल्या म्हणून हा प्रयत्न....!
पिघलते हूये नीलम सा बेहता यह समां....
नीली नीली सी ये खामोशीयां....!
सरसराती हुई टेहनियां, पत्तियां...
कह रही है की बस तुम्ही हो यहां...
सिर्फ मैं हूं.. मेरी सांसे और मेरी धडकने...
ऐसी गहराईयां...
ऐसी तनहाईयां...
और सिर्फ मैं.....
अपने होने का मुझे यकीं आ गया....!!
मला वाटतं.. रचनेचा न कलेचा आनंद घ्यावा म्हणून हा यत्न...!!
17 Oct 2011 - 5:31 pm | गणेशा
माझी शँपेन, जयंतराव मस्त कविता ..
विकाल .. मस्त वाटली रचना वाचुन अप्रतिम...
स्लाईड शो नेहमीप्रमाणे पाहता आला नाही.. असो ..
18 Oct 2011 - 11:24 am | मनीषा
इथे सर्वांनी 'एक से बढकर एक' -- कविता लिहिल्या आहेत ...
तरीही माझी एक (नविन) कविता !
पराजित आज मी -- आले तुझ्या किनारी |
अथांग जळ सामोरी -- मी तृषित या किनारी ||
कित्येक आशा मनी -- अन् पाहिली किती स्वप्ने |
स्मृती तयांच्या अशा -- विखूरल्या या किनारी ||
भावनांचे अनेक पक्षी -- विहरती मुक्त गगनी |
सावल्यांचा खेळ त्यांच्या -- चाललासे या किनारी ||
उसळत्या तव लाटा -- किरणांची मिरवीत नक्षी |
रोखती मज आता -- मी बंदीवान या किनारी ||
धीर गंभीर तुझी गाज -- असते सदैव कानी |
मंत्र जणु मुक्तीचा -- मज भासे या किनारी ||
असीम तुझी व्याप्ती -- आलोट तुझी शक्ती |
सामर्थ्य पार करण्या -- मी मागते या किनारी ||
दिसते मज ती नौका -- शीड जिचे भरारी |
डौलाने काढीत वाट -- येईल या किनारी ||
मग थांबेल हे क्षितीज -- मजसाठी दूर किनारी |
लाटांसवे तुझ्याच -- मी जाईन त्या किनारी ||
21 Oct 2011 - 11:28 pm | क्रान्ति
एकापेक्षा एक सुन्दर चित्रकविता आहेत!
हा माझाही एक प्रयत्न
तो शांत, मीही शांत वरवर भासते
आतून काही गुप्त खळबळ गाजते
आभाळ मेघांनी भरुन धुमसे तरी
सांडेच ना, का खिन्न घुसमट दाटते?
या कातळाचे एक अविचल अंग मी
नि:शब्द, निर्वातात खिळुन अपंग मी
या सागराचा गूढ, गहन तरंग मी
आकांत आलापीत अनवट राग ते
मेघांतली अस्वस्थ हुरहुर पेलण्या,
येते इथे आभाळझड नित झेलण्या
ती दुष्ट जाते दूर मज अवहेलण्या
मी श्रांत, निश्वासून मन चुरगाळते !