आजचा सवाल-'?'

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
26 Sep 2011 - 10:01 am

मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे...

पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?
बेधुंदीचा जीवन प्याला,का जहराने उगा भरु?....गं गं गं गं$$ माझे बाइ..!

प्र-धाडस ठायी असेल भारी,सावध चित्ता जरा करा
बेधुंदीही मरण दावीते,तीथे मनाला अवर जरा...रं रं रं रं$$ माझ्या राजा..!

पु-इष्कही आहे काव्यही आहे,स्रुष्टी सारी बेहोषी
का थांबु मी जीवन म्हणते,नाते आहे धुंदीशी...

प्र-सैरभैरही नकोस धाऊ,जात तुझी पाचोळ्याची
वादळ/वारा उधळुन लावी,काय कल्पना साय्राची...

पु-येडी म्हणु की खुळी म्हणू गं$$,ओळख नाही माझी तुला
जीवन मी अन मरणही मी गं,नकोस समजू खुळं मला...

प्र-दमले बाबा तुझ्या समोरी,अक्कल शिकवू कशी तुला?
कल्पनाच त्या साय्रा असती,नकोच झुलवू शब्द झुला...

पु-अगं शब्दांचा हा खेळच सारा,कुठे शब्द अन कुठे झुला?
नाते जडते शब्दांनीही,समजुन घे रे सोनफुला....

प्र-(रागानी) अरे,भूल टाकूनी माझ्यावरती,तुझी हुशारी दाऊ नको..
उत्तर दे मग या प्रश्नाचे,तसाच पळुनी जाउ नको...
प्र- जीवन म्रुत्यु असशील तुही,पहिले यातील काय असे..?
उत्तर दे रे विचार करुनी, ना जमले तरं तुझे हसे....

पु-अंगं मेला$$ जीव नी गेला मातीत,मिसळुन तुझीया कायेशी
तुझ्याच मधुनी संचय पहिला,म्रुत्युच असतो अविनाशी...

०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=

शृंगारहास्यवीररसकविताधर्मइतिहाससमाजजीवनमान

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Sep 2011 - 10:42 am | मिसळलेला काव्यप्रेमी

प्र-सैरभैरही नकोस धाऊ,जात तुझी पाचोळ्याची
वादळ/वारा उधळुन लावी,काय कल्पना साय्राची

भन्नाट!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Sep 2011 - 10:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी

द्विरुक्ती! :( प्र. का. टा. आ.

गणेशा's picture

26 Sep 2011 - 2:31 pm | गणेशा

मस्त .. कविता आवडली

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2011 - 6:18 pm | अत्रुप्त आत्मा

मि.का. गणेशा दोघांनाही धन्यवाद........... :-)

पाषाणभेद's picture

27 Sep 2011 - 1:08 am | पाषाणभेद

कारणे द्या नोटीस
आपली वर्णी पंतकवींमध्ये का करू नये?

अत्रुप्त आत्मा's picture

27 Sep 2011 - 1:23 am | अत्रुप्त आत्मा

@---आपली वर्णी पंतकवींमध्ये का करू नये? चालेल हो पा.भे. आंम्ही कवींमधले पंत ठरलेलो आहेच... ;-) तुंम्ही पंतांमधले कवी म्हणा.... :-)

प्रकाश१११'s picture

27 Sep 2011 - 4:32 am | प्रकाश१११

परागजी- -वा ,,एकदम झकास ..!!

राजेश घासकडवी's picture

27 Sep 2011 - 5:08 am | राजेश घासकडवी

पुरुष आणि प्रकृतीचं युगुलगीत ही कल्पनाच भन्नाट आहे. कुठच्यातरी बागेमध्ये अशोक सराफसारखा पोटावर घट्ट होणारा टीशर्ट घालून नाचण्याची ऍक्टिंग करतोय, आणि त्याच्याबरोबर प्रकृती बळंच हसून गाणं म्हणतेय असा विचार करून बेजार झालो.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Sep 2011 - 6:16 am | अत्रुप्त आत्मा

@-पुरुष आणि प्रकृतीचं युगुलगीत ही कल्पनाच भन्नाट आहे. राजेश महाराज- हे युगुलगीत नाहीये हो... सवाल-जबाब हे त्याचं स्वरुप सुद्धा केवळ एक लेखन प्रकार म्हणुन आहे... हे पुरुष-प्रक्रुती ''भांडण'' वेदांती,सांख्य,चार्वाकपंथ या सर्मथकां मधलं आद्य भांडण आहे.त्याला काळानुसार वाट करुन द्यायचा मी प्रयत्न केलाय...इतकच... :-)