संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेला पहिले वहिले प्रेम हा अल्बम नुकताच प्रकाशित झाला आहे.बेला शेंडे आणि वैशाली सामंत या आजच्या आघाडीच्या गायिकांसह नील नाडकर्णी या अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण गायकाने या अल्बमद्वारे मराठी संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची ८ गीते आहेत असून प्रवीण दवणे, मिलींद जोशी आणि मनोज यादव यांनी ती लिहिली आहेत. पं हरीप्रसाद चौरसिया यांचे शिष्य श्री राकेश चौरसिया यांनी या अल्बममध्ये बासरीवादन केले आहे.
या अल्बमबद्दल अशोक पत्कींनी व्यक्त केलेली प्रतिक्रीया आणि या अल्बमधली सगळी गाणी तुम्ही http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Pahile-Vahile-Prem या दुव्यावर ऐकू शकता आणि तुमचे रेटींग्सही देऊ शकता.तरीही मिपावरील संगीतरसिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा!:)
[ टीप : संगीतरसिकांनी दिलेल्या रेटींग्सनुसार सध्याची टॉप १० मराठी गाणी तुम्ही http://www.maanbindu.com/new-marathi-top-10-songs येथे ऐकू शकता! ]
प्रतिक्रिया
22 Sep 2011 - 3:33 pm | उदय के'सागर
अरे व्वा! धन्यवाद योगेश महितीबद्दल.
आशोक पत्की - अगदी serials च्या शीर्षक-गीतांपसुन ते चीत्रपट गीत... सगळंच भारी, मस्तंच!!! one of the awesome composer!
22 Sep 2011 - 3:40 pm | विसोबा खेचर
ऐकली पाहिजेत ही गाणी. 'नाविका रे', 'केतकीच्या बनी', ही पत्कींची गाणी माझी अत्यंत आवडती आहेत..
तात्या.
22 Sep 2011 - 4:37 pm | जाई.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
24 Sep 2011 - 2:25 am | मीनल
सर्व गाणी श्रवणिय आहेत. सर्व आवडली.
24 Sep 2011 - 3:14 am | शिल्पा ब
बेला म्हंटल्यावर मला मिपाचा बेलाच वाटला म्हणुन घाईघाईने धागा उघडला...
असो...छान.
24 Sep 2011 - 4:48 am | पाषाणभेद
खुपच छान माहीती. सवडीअंती ऐकेन.