नमस्कार!
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे, किंवा कधी कधी अंतरे, प्रश्नकर्त्यांनी पेश करायचे, आणि रसिकांमधील 'कानसेनां'नी प्रतिसादांत ते गाणं ओळखायचं, आणि कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे, अशा स्वरूपाची 'कानसेन कोण?' ही स्पर्धा गेल्या वर्षी सलग चार आठवडे चालली, आणि मिपाच्या वाचकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ३० ऑगस्ट २०१० रोजी सांगता झालेल्या २३ भागांच्या या स्पर्धेत १८८ जण विजेते ठरले.
ही स्पर्धा सुरु होऊन आता वर्ष उलटलंय. मधल्या कालावधीत मिसळपावावर बरीच नवीन मंडळी येऊन दाखल झाली आहेत. तेंव्हा वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा 'कानसेन कोण?' ही मालिका सुरू करावी असा प्रभो, गणपा, चतुरंग, रेवती, मस्त कलंदर, मेघवेडा प्रभृतींचा विचार आहे.
ही स्पर्धा-मालिका लवकरच सुरू होईल, आणि ती चालू ठेवण्यात मी जमेल तसा भाग घेईनच, पण गतवर्षीप्रमाणेच डॉ. प्रसाद दाढे, प्रदीप इत्यादि दर्दी मंडळींचाही सहभाग असेल अशी आशा आहे.
तर व्हा तयार स्पर्धेत भाग घेण्यासाठी!
****************
पुनःप्रत्ययासाठी या आधीच्या २०१० मधल्या स्पर्धांचे दुवे खाली एकत्र दिलेले आहेत:
कानसेन २०१०
भाग १: http://misalpav.com/node/13040
भाग २: http://misalpav.com/node/13072
भाग ३: http://misalpav.com/node/13075
भाग ४: http://misalpav.com/node/13089
भाग ५: http://misalpav.com/node/13097
भाग ६: http://misalpav.com/node/13120
भाग ७: http://misalpav.com/node/13024
भाग ८: http://misalpav.com/node/13031
भाग ९: http://misalpav.com/node/13136
भाग १०: http://misalpav.com/node/13137
भाग ११: http://misalpav.com/node/13139
भाग १२: http://misalpav.com/node/13141
भाग १३: http://misalpav.com/node/13148
भाग १४: http://misalpav.com/node/13155
भाग १५: http://misalpav.com/node/13163
भाग १६: http://misalpav.com/node/13164
भाग १७: http://misalpav.com/node/13178
भाग १८: http://misalpav.com/node/13182
भाग १९: http://misalpav.com/node/13184
भाग २०: http://misalpav.com/node/13215
भाग २१: http://misalpav.com/node/13217
भाग २२: http://misalpav.com/node/13230
भाग २३: http://www.misalpav.com/node/13451
- बहुगुणी
प्रतिक्रिया
7 Aug 2011 - 4:42 am | गणपा
सोमवारची वाट पहात आहे. :)
7 Aug 2011 - 9:51 am | मस्त कलंदर
मी पण...
7 Aug 2011 - 1:09 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
असेच म्हणतो.
7 Aug 2011 - 7:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सध्या बेरोजगारीमुळे फार वेळ मिळत नाही, पण जमेल तशी हजेरी लावेनच.
7 Aug 2011 - 9:51 pm | स्मिता.
मागच्या वर्षी भाग घेवू शकले नव्हते. यावर्षी जमेल तसा सहभाग घेईन.
7 Aug 2011 - 11:13 pm | प्रभो
मजा येणार :)
8 Aug 2011 - 10:38 am | मुलूखावेगळी
रेडी आहे :)