गाभा:
जालावरील मराठी लेखन लेखक यायच्या वैशिष्ट्याचा आढावा घेणारा 'मराठी ब्लॉगजगत आंतरजालावरील चविष्ट मिसळ' दै.लोकमतमधील मंथन पुरवणीत लिव्हणारे आणि मिपावर वावरणारे अभिनय कुलकर्णी यायचे मनःपूर्वक अभिनंदन...!
मिपावरील तात्या अभ्यंकर, रामदास, मधुकर,राजे, छोटा डॉन आणि सिझनल अंक काढणारे प्रमोद देव यायचे कवतुक लेखात वाचाला मिळीन. या बरुबर मराठी संकेतस्थळे, मराठी जालीय लेखनाचा चांगला आढावा लेखकाने घेतला हाय. सर्वांनी लेख जरुर वाचावा. सर्वाचे अभिनंदन.
लेखनामधील लेखनासोबत कंपु, कट्टे, ब्लॉगर्सचे मेळावे, फुटबॉल सदराची नोंद बाबुरावला इशेष आवडली. लेखनाची चांगली सजावट केल्याबद्दल दै.लोकमतचे अभिनंदन आन आभार..!
प्रतिक्रिया
4 Jul 2010 - 10:20 am | आनंदयात्री
दुवा द्या की राव !!
4 Jul 2010 - 10:25 am | उग्रसेन
लोकमतच्या मंथनच्या पुरवणीचा दुवा देता येत नाय राव.
म्हंजी ऑनलाइन ताजे मंथन लोकमत देत नाय चुभुदेघे.
कोणाला ताजा मंथनचा दुवा देता येत आसन तर जरुर द्यावा.
बाबुराव :)
4 Jul 2010 - 10:28 am | शेखर
हा घ्या
4 Jul 2010 - 10:31 am | उग्रसेन
शेखर दुव्याबद्दल आभारी हाय.
लेख वाचून भल्या बु-या इचाराचा जरुर काथ्याकुट करावा. :)
बाबुराव :)
4 Jul 2010 - 10:40 am | आनंदयात्री
हाण्ण !! लै भारी !!
4 Jul 2010 - 11:03 am | टारझन
भोचकराव लै भारी !! आमच्या डाणबाचंही त्यात णाव आल्याचं पाहुन आणंदाश्रुंचा ओघ आवरत नाहीये ;)
बाबुराव , धन्यवाद !
4 Jul 2010 - 11:09 am | छोटा डॉन
हु हु हु हा हा हा !
अंमल गुदगुल्या झाल्या राव, मस्त लेख आहे.
अभिनयरावांचे अभिनंदन आणि आभार ... :)
>>लेखनामधील लेखनासोबत कंपु, कट्टे, ब्लॉगर्सचे मेळावे, फुटबॉल सदराची नोंद बाबुरावला इशेष आवडली. लेखनाची चांगली सजावट केल्याबद्दल दै.लोकमतचे अभिनंदन आन आभार..!
येस्स.
+१, असेच म्हणतो, बाबुरावांनी ही बातमी इथे दिल्याबद्दल धन्यवाद !
चीयर्स !!!
------
छोटा डॉन
4 Jul 2010 - 11:36 am | निखिल देशपांडे
अभिनंदन छोटा पुणेरी डॉण ;)
लेख मस्तच आहे :-)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
4 Jul 2010 - 11:18 am | स्वाती दिनेश
लेखनामधील लेखनासोबत कंपु, कट्टे, ब्लॉगर्सचे मेळावे, फुटबॉल सदराची नोंद बाबुरावला इशेष आवडली. लेखनाची चांगली सजावट केल्याबद्दल दै.लोकमतचे अभिनंदन आन आभार..!
सहमत आहे,
लेख आवडलाच आणि लेखाची बातमी अन् दुव्याबद्दल आभार.
स्वाती
4 Jul 2010 - 2:09 pm | वेताळ
डानरावाचे अभिनंदन.........
लेख अद्यावत केल्याबद्दल बाबुरावांचे देखील अभिनंदन,......
वेताळ
4 Jul 2010 - 12:07 pm | ऋषिकेश
लेखात एकूणच मसंचा धांदोळा छान घेतला आहे.
डॉन्याचे आणि आपल्या सगळ्यांचेच अभिनंदन! :)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
4 Jul 2010 - 12:26 pm | अवलिया
छान ! ज्यांचे नाव आले त्यांचे अभिनंदन, ज्यांचे नाही आले त्यांचे पण अभिनंदन. :)
बाकी सदर लेखकाला मसंवरचा संपादक हा प्रकार माहित नसावा. अर्थात त्याच्या साठी संकेतस्थळावर लेखन, प्रतिसाद करावे लागतात आणि एका पुरवणीत मावेल असा संपादकीय कर्तृत्व आढावा घेता पण येणार नाही. असो.
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
4 Jul 2010 - 1:48 pm | उग्रसेन
सदर लेखकाला मसंवरचा संपादक हा प्रकार माहित नसावा.
आरं लेका लेखकाला सार्या भानगडी माहित हायेत.
बाकी तुमचा प्रॉब्लेम कै सुटलेला दिसत नाय...! :)
बाबुराव :)
4 Jul 2010 - 1:52 pm | अवलिया
>>>आरं लेका लेखकाला सार्या भानगडी माहित हायेत.
काय वार्ता करतोस मर्दा... च्यामारी पोचलेलं दिसतंय बेणं
>>>>बाकी तुमचा प्रॉब्लेम कै सुटलेला दिसत नाय...!
हॅ हॅ हॅ आता त्रिस्थळी यात्रा करुन येतो कुंडली दाखवायला.. युयुत्सु, घाटपांडे, ओक. बघुया काय म्हणतात ते.. ;)
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
4 Jul 2010 - 1:20 pm | Pain
१) एवढ्या सर्वमान्य गोष्टीचे/ व्यक्तीचे अभिनंदन काथ्याकूटमध्ये कसे काय ?
२) हा ७ ओळींचा लेख ग्रामीण बाजात लिहायचा फसलेला प्रयत्न आहे, नटरंग आणि तत्सम चित्रपटांच्या संवादासारखा.
4 Jul 2010 - 1:32 pm | टारझन
हा हा हा :)
पेणराव ,मग तुम्हीच एखादं मोठ्ठं ललित पाडा की राव .. आम्ही आवडीने वाचु ... तसंही सकस काही येत नाही हल्ली.(असं लोकं म्हणतात)
-(पेणश्रीचा फ्यान) टार्या.
बसवला ऑटोत , विषय संपला
4 Jul 2010 - 1:45 pm | उग्रसेन
१) एवढ्या सर्वमान्य गोष्टीचे/ व्यक्तीचे अभिनंदन काथ्याकूटमध्ये कसे काय ?
मंग कुठं लिव्हाला पाह्यजेन होतं ?
२) हा ७ ओळींचा लेख ग्रामीण बाजात लिहायचा फसलेला प्रयत्न आहे,
चालायचंच.
लेख काथ्याकूटात काहून. चर्चाप्रस्तावातला भाषेचा बाज कसा फसलेला हाय.
ह्या भानगडीत पडण्यापेक्षा मुख्य लेख वाचून लेखकाच्या कवतुकाबद्दल,
लेखनाच्या घेतलेल्या धांडोळ्याबद्दल दोन शबूद लिव्हले असते त तुम्हाला काय कमीपणा आला असता का ?
बाबुराव :)
4 Jul 2010 - 1:54 pm | Pain
१) मंग कुठं लिव्हाला पाह्यजेन होतं ?
------------------------
काथ्याकूट
हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता खास राखून ठेवले आहे.
---------------------------
हा मिपाचा नियम असल्याने इथे तर नक्की नाही. मग कुठे, तो तुमचा आणि संपादकांचा प्रश्न आहे.
२) ह्या भानगडीत पडण्यापेक्षा मुख्य लेख वाचून लेखकाच्या कवतुकाबद्दल,
लेखनाच्या घेतलेल्या धांडोळ्याबद्दल दोन शबूद लिव्हले असते त तुम्हाला काय कमीपणा आला असता का ?
तुम्ही दुवा दिला नाहीत. न वाचताच कसे काय.... ?
4 Jul 2010 - 2:03 pm | टारझन
हे मात्र बरोबर आहे बरं का ... खालच्या प्रतिसादात दुवा सापडला म्हणुन मी प्रतिसाद बदलला ... :)
दुवा नं देता त्या दुव्यातल्या गोष्टीवर चर्चा करण्याची अपेक्षा करणे म्हणजे .. .. एका लेखावर अनुकुल प्रतिक्रीया आल्या नाही की तोच धागा पुन्हा प्रकाशीत करुन येतील अशी अपेक्षा करण्यासारखे आहे :)
4 Jul 2010 - 2:06 pm | उग्रसेन
तुम्ही दुवा दिला नाहीत. न वाचताच कसे काय.... ?
बरं बाबा !
आता मुख्य चर्चाप्रस्तावात दिला दुवा.
आता कै तरी चांगभलं लिव्हा. :)
बाबुराव :)
4 Jul 2010 - 1:45 pm | Pain
"बसवला ऑटोत , विषय संपला"
कळल नाही.
4 Jul 2010 - 1:55 pm | सहज
डॉनराव, प्रमोदकाकांच्या मेहनतीची तसेच इतर मिपाकर मित्रमंडळींची दखल घेतली याचा आनंद आहे.
बाकी असे वाटतेय की दर दोन एक महीन्यांनी कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्राच्या पुरवणीत/संस्थळावर असा लेख पडत रहाणार. असो नाव वाचुन गुदगुल्या होणार, जळजळ वाढणार निश्चित! ;-)
4 Jul 2010 - 2:13 pm | प्रकाश घाटपांडे
मिपावर समद्या पर्कारची ल्वॉक हायेत हे बाकी लोकान्ला म्हाईती झाल. याबद्दल भोचकरावांचे अभिणंदन
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
4 Jul 2010 - 4:58 pm | आनंदयात्री
व्यवस्थापकांना विनंती की या आणि अश्या मिडीया कव्हरेजचे एक सेक्शन बनवले जावे. शक्यतो बातमीची स्कॅन कॉपी कव्हरेज म्हणुन जोडावी, अगदीच नाही जमले तर ऑनलाईन आवृत्तीचा स्क्रीनशॉट तरी असावा.
धन्यवाद.
4 Jul 2010 - 4:59 pm | आनंदयात्री
व्यवस्थापकांना विनंती की या आणि अश्या मिडीया कव्हरेजचे एक सेक्शन बनवले जावे. शक्यतो बातमीची स्कॅन कॉपी कव्हरेज म्हणुन जोडावी, अगदीच नाही जमले तर ऑनलाईन आवृत्तीचा स्क्रीनशॉट तरी असावा.
धन्यवाद.
4 Jul 2010 - 5:11 pm | पिंगू
बाबुराव बातमी अतिशय गोड आहे... मिठाई वाटा... <:P =D> <:P =D>
4 Jul 2010 - 5:32 pm | डॉ.श्रीराम दिवटे
उपरोक्त लेखामध्ये भोचकरावांनी कॉपीराईट चा मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्याचीही चर्चा व्हायलाच पाहिजे.
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
4 Jul 2010 - 7:41 pm | शिल्पा ब
सगळ्यांचे अभिनंदन... लेखात बहुतेक गोष्टीचा उहापोह केलेला आहे...लेख आवड्ला.
जरी या सदरात हा लेख बसत नसला तरी आता काढून परत नवीन जागी टाकू नये पुन्हा पुन्हा किती वेळा प्रतिसाद लिहिणार ?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
21 Jul 2010 - 5:16 pm | योगी९००
जालावरील मराठी लेखन लेखक यायच्या वैशिष्ट्याचा आढावा घेणारा 'मराठी ब्लॉगजगत आंतरजालावरील चविष्ट मिसळ' दै.लोकमतमधील मंथन पुरवणीत लिव्हणारे आणि मिपावर वावरणारे अभिनय कुलकर्णी यायचे मनःपूर्वक अभिनंदन...!
अभिनय कुलकर्णी यांना श्रद्धांजली. त्यांचे असे लेख आता आपल्याला वाचायला नाही मिळणार..
खादाडमाऊ
29 Jul 2010 - 5:15 pm | उग्रसेन
> नमस्कार, दै.लोकमतमधील आपले लेखन आवडले. चौकशी केली असता कळले की अभिनय कुलकर्णी म्हणेजे मिपावरील 'भोचक' आहेत. मिपावरील भोचक हे सर्वांना माहित असेलच असे नाही. आपला उल्लेख करु का ?
>बाबूराव, धन्यवाद. आपण लेखासंदर्भात मिपावर उल्लेख केलात त्याबद्दल. भोचक असा उल्लेख केलात तरी हरकत नाहअर्थात, अनेकांना 'मीच तो' असे माहिती आहे. आपले पुन्हा एकदा आभार.
मित्रा तुमची ओळख खूप मोठी होती. तुम्ही मोठेच होता. तुमची सतत आठवण येते.
फक्त बाबुराव म्हणजे कोणता आयडी हे तुम्हाला सांगायचे राहिले आहे, मला क्षमा करा.
बाबुराव