अल्बर्ट स्पिअर -सैतानाचा वास्तुविशारद. भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 Jul 2011 - 7:43 pm


अल्बर्ट स्पिअर -भाग १

हिटलरच्या पहिल्या दर्शनाबद्दल अल्बर्ट स्पिअर लिहितो “मला वाटले होते की माझी गाठ एका ब्राऊन रंगाचा शर्ट घातलेल्या धटिंगणाशी पडेल. पण माझी प्रत्यक्षात गाठ पडली ती एका गडद निळा सूट घातलेल्या अत्यंत सुसंस्कृत आणि ठाम व तर्कशुद्ध मते मांडणार्‍या माणसाची. तो एखाद्या कसलेल्या राजकारण्यासारखे सगळ्यांच्या प्रश्नांना अत्यंत मृदू आवाजात पण ठामपणे उत्तरे देत होता आणि महत्त्वाचे म्हणजे त्याने एखादे उत्तर दिल्यावर क्वचितच त्यावर प्रतिप्रश्न केले जात होते”. थोड्याच दिवसात सोशॅलिस्ट पार्टीने ४७४४८१ हा सभासद क्रमांक एका माणसाला दिला तो होता आपला वास्तूविशारद “अल्बर्ट स्पिअर” सुरवातीला पार्टीचे निरोप व साहित्य पोहोचविण्याचे काम त्याच्या स्पोर्टस् कारमधून करायचे त्याच्या नशिबात होते.

अजून हिटलरची जी प्रत्यक्ष गाठ पडायची होती, ती पडली हिटलर चॅन्सेलर झाल्यावर आणि कारण होते न्युरेंबर्गमधे होणारे पार्टीचे संमेलन व त्यासाठी त्याने केलेले आराखडे.
“त्यानंतर मात्र मी त्याला १९३३ साली वारंवार बर्लिनच्या काही इमारतींच्या बांधकामासाठी भेटायला लागलो. एक दिवस हिटलर मला म्हणाला “आज दुपारी माझ्याबरोबर जेवायला ये !” अर्थातच मी ते आमंत्रण ताबडतोब स्विकारले. पण दहा मिनिटात माझ्या लक्षात आले की माझा सूट खराब झाला आहे. आता कसे जायचे, हा प्रश्न माझ्यासमोर पडला. मी ते निमंत्रण नाकारायला परत त्याच्या ऑफिसमधे गेलो. कारण ऐकताच हिटलर मला म्हणाला ’त्याची काळजी करू नकोस ! त्याचे काय करायचे ते बघता येईल.’
त्या जेवणाच्या अगोदर हिटलरने स्वत: मला त्याचे एक निळेशार जॅकेट घालायला दिले व मला जेवायला स्वत:च्या शेजारी बसवून घेतले. टेबलाभोवती बरीच मोठमोठी मंडळी बसली होती. जेवण सुरू व्हायच्या अगोदर गोबेल्सच्या तीक्ष्ण नजरेतून अल्बर्ट स्पिअरच्या जॅकेटवरचा सोन्याचा सर्वोच्च अधिकाराचा बॅज सुटला नाही. त्याने लगेचच मला विचारले ’तुझ्या जॅकेटवर काय आहे तुला माहिती आहे का ? हे तुझे दिसत नाही.’ मी बावचळून इकडेतिकडे बघायला लागलो तेवढ्यात शेजारुन उत्तर आले “ गोबेल्स, बरोबर आहे तुझे. माझे आहे ते.”

एका नात्याला व एका वेगळ्या कारकिर्दीला सुरूवात झाली होती.

हिटलरचा प्रचंड प्रभाव अल्बर्ट स्पिअरवर पहिल्यापासूनच होता. फ्युररला हा तरूण आवडायचा आणि समकालीन कलाकार म्हणून त्याच्या मनात अल्बर्ट स्पिअरला खास स्थान होते. एका जगप्रसिद्ध जर्मन आख्यायिकेमधे फाउस्ट नावाचे एक पात्र आहे. हा माणूस अतिशय विद्वान, तत्ववेत्ता, मिळालेल्या ज्ञानाबद्दल नेहमीच असंतुष्ट असा दाखवलेला आहे. त्याच्या टोकाच्या ज्ञानलालसेने तो स्वत:चा आत्मा सैतानाकडे ( मेफिस्टोफेलिस) गहाण टाकतो आणि त्याबदल्यात त्याच्या कडून अमर्याद ज्ञानाची व भौतिक सुखाची मागणी करतो. त्या दोघांची गाठ ही जगातील अनेक कथा-कादंबर्‍यांचा पाया आहे. हिटलर अल्बर्ट स्पिअरला कौतुकाने तरूण फाउस्ट म्हणायचा.
आख्यायिकेच्या बाहेर परत एकदा फाऊस्ट व मेफिस्टोफेलिस यांची गाठ पडणार हे विधिलिखित होते.

अल्बर्ट स्पिअर म्हणतो “ अखेरीस मी एका सैतानाचा वास्तूविशारद झालो “

Unlimited Free Image and File Hosting at MediaFire

अल्बर्ट स्पिअर त्या काळातील एक तीक्ष्ण बुद्धी असलेला तरूण वास्तूविशारद होता पण बर्लिनमधे असे अनेक तरूण त्या काळात होते. मग अल्बर्ट स्पिअरलाच एवढे यश का मिळाले, याचे एक महत्वाचे कारण होते. हिटलर स्वत:ला या तरूणात बघत होता. त्याच्या वैफल्यग्रस्त आयुष्यात ज्या काही गोष्टी त्याला करून दिल्या गेल्या नाहीत तो त्या सर्व कल्पना तरूण अल्बर्ट स्पिअर कडून प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत होता. त्याने त्याच्या तरूण वयात जे वास्तूशिल्पाचे आराखडे प्रतिष्ठित व्हिएना स्कूल ऑफ़ फाईन आर्ट्स्‍ला पाठवले होते, ते सर्व तेथील प्राध्यापकांनी नापास केले होते. त्यामुळे त्याला त्या कलेच्या विद्यापिठात प्रवेश नाकारण्यात आला. याचा परिणाम एवढा भयंकर होईल अशी पुसटशी कल्पनाही त्यावेळी कोणी केली नसेल. त्याने माईन कांफमधे म्हटलेच आहे “ मला त्यांनी नापास केले म्हणून मी राजकारणात शिरलो”.

आश्चर्याची गोष्ट आहे, हिटलरने स्वत:च्या खाजगी वेळेतला जेवढा वेळ पक्षासाठी दिला, सैन्यासाठी दिला, त्याच्या पेक्षा कितीतरी वेळ तो इमारतींचे आराखडे बघण्यात घालवत असे. सैन्याच्या हालचालींपेक्षा त्याला त्यांच्या तळांच्या आराखड्यात जास्त रस असे. या नकाशां समोर आणि जगाच्या नकाशासमोर त्याचा जास्तीजास्त वेळ जायचा हे सत्य आहे. आणि या दोन्ही नकाशामधे एक जवळीकीचे नाते होते. एका मुलाखतीत अल्बर्ट स्पिअर ला विचारले गेले की तुम्ही जेव्हा संरक्षणसामुग्रीच्या उत्पादन खात्याचे मंत्री होता आणि ज्या काळात आपण तेथे विस्मयकारक यश मिळवले त्याबद्दल आपण काहीच बोलत नाही. ( त्या काळात त्याने उत्पादन चौपट केले होते ) आपल्या आठवणींत हिटलरचे वास्तूंवरचे व वास्तूकलांवरचे प्रेम याबद्दलच जास्त बोलता. याचे कारण काय ? अल्बर्ट स्पिअरने उत्तर दिले “ या अचाट पण विचित्र माणसाच्या स्वभावाचा हाच पैलू माझ्या जास्त परिचयाचा होता. वास्तूशिल्प हा त्याचा छंद नव्हता तर या भुताने त्याच्या मनाचा पगडाच घेतला होता. हा विळखा जेव्हा सुटत चालला तेव्हा मला कळून चुकले की हा माणूस बांधण्यासाठी तोडत नसून तोडण्यासाठी बांधतोय” पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

Unlimited Free Image and File Hosting at MediaFire

न्युरेंबर्गच्या खटल्यादरम्यान अल्बर्ट स्पिअरने एका प्रश्नाचे उत्तर देताना वकिलाला सांगितले होते “ हिटलरला खरा मित्र असणे ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती. पण त्याला जर एखादा मित्र असताच तर तो मीच असतो.” या वाक्याचा अर्थ काय हे जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले “ हिटलरचा प्रभाव मोठा होता आणि त्याच्या भोवती एक वलयही होते पण दुर्दैवाने तो मैत्रीचा पुढे केलेला हात कधीच स्विकारत नसे. त्याच्या स्वभावातच नव्हते ते. त्याच्या आत्म्याच्या गाभ्यात तेथे एक मोठी पोकळी होती. हे त्याच्या जवळच्या माणसांच्या फार उशीरा लक्षात येऊ लागले होते. इतरांना ते कधीच कळले नाही व कधी कळणारही नाही. आम्ही म्हणजे त्याच्या अहंकाराच्या या जगावर पडणार्‍या सावल्याच होतो. आणि मी कल्पना केलेल्या आणि सत्यात उतरविलेल्या सर्व इमारतींवरही ही काळी छाया पडली होती.”

सुरवातीला मी जे वाक्य लिहिले आहे त्याचा अर्थ आता तुम्हाला समजला असेल.

“पण माझे भवितव्य आणि नशीब या माणसाशी जखडले गेले होते. तो आमचा लाडका फ्युरर होता. पण तो एक वरफ्युररही होता. फ्युरर म्हणजे नेता तर वरफ्युरर हा त्याचा विरूद्धार्थी शब्द आहे. त्याची धडाडी, खंबीर मन आणि ठाम मते, त्यातून उद्भवणारा एक क्रूरपणा या सगळ्यांनी आम्हाला वेड लावले होते. एखाद्या चुंबकासारखा हा माणूस आम्हाला खेचून घेत असे. आमच्या मनात नसले तरीही. तिसरे राईश म्हणजे हिटलरच – बाकीची आम्ही त्याच्या मागे जाणारी मेंढरे किंवा भारलेल्या अवस्थेतील मानसिक रूग्ण होतो असे म्हटले तरी चालेल”

“ आता २५ वर्षांनंतर सगळे बदललेले आहे. तरूणपणी आम्हाला हिटलर हा आमच्या देशाचा तारणहार वाटायचा. आम्ही किती मूर्ख होतो हे आता आम्हाला कळतंय. त्याच्याबरोबर काम करताना हळूहळू आम्हाला तो किती उथळ होता हे पटत गेले. खरे तर आम्हाला त्यावर (जे पटत गेले त्यावर) विश्वास ठेवायला मनापासून अजिबात आवडायचे नाही. तो एक परिपूर्ण नेता होता, एक चलाख वक्ता होता, जो श्रोत्यांना संमोहित करून खोटी स्वप्ने दाखवायचा आणि दुर्दैवाने स्वत:ही ती बघायचा. जनतेशी खोटे बोलताबोलता तो स्वत:शी खोटे बोलायला लागला, हे त्याचे त्यालाच कळले नाही असे नाईलाजाने म्हणावे लागेल.”

स्पनडाऊ तुरूंगात अल्बर्ट स्पिअरने मिळेल त्या कागदावर अनेक आठवणी लिहून ठेवल्या ज्याचा उपयोग नंतर त्याने आपले आत्मचरित्र लिहिण्यासाठी केला. हिटलर कसा होता, त्याचे आचारविचार, कसे होते याची सगळ्यात चांगली कल्पना आपल्याला या टिप्पणातून येऊ शकते. त्याच्या दोन आठवणी अल्बर्ट स्पिअरने आत्मचरित्रात लिहिल्या आहेत. अर्थात त्यातील दुसरीत हिटलरचे कलाप्रेम दाखवायचा प्रयत्न त्याने केलेलाच आहे.

पहिली आठवण आहे ती हिटलरच्या घरावर गच्चीत घडलेल्या घटनेची. तारीख होती २३ ऑ. १९३९. त्याच दिवशी रात्री हिटलरने स्टॅलिनशी झालेला करार प्रसिद्धीस दिला होता. अल्बर्ट स्पिअर ने लिहिले आहे “मध्यरात्रीच्या आसपास, आम्ही सगळेजण गच्चीत नयनरम्य देखाव्याचा आनंद घेत उभे होतो. एक तासभर उत्तरेच्या उजेडाचा खेळ आकाशात चालू होता. (उत्तरेच्या आकाशात जो प्रकाशाचा खेळ असतो तो मोठा नयनरम्य व खिळवून ठेवणारा असतो. आपल्यापैकी अनेक जणांनी तो पाहिलाही असेल. विशेषत: जे स्कॅंडेनेव्हियन देशात राहतात त्यांनी... या खेळात रंगांची प्रचंड उधळण होत असते. काही वेळा उग्र रंग तर आपल्याला घाबरवूनही टाकू शकतात.) जणूकाही गेटरडेमाऊंगच्या खेळाचा अंतिम भागासाठी मोठा रंगमंच उभारला आहे असे वाटत होते. (गेटरडेमाऊंग हा रिचर्ड वॅगनेरचा हा शेवटचा ऑपेरा होता आणि त्याच्या कथेत देवांनी एकामेकांविरूद्ध पुकारलेल्या युद्धात मानवजातीचा/विश्वाचा कसा अंत होतो ही गोष्ट रंगवलेली आहे.)
अशाच एका उग्र रंगाच्या उधळणीत लालभडक रंग सगळीकडे पसरला आणि उपस्थितांच्या चेहेर्‍यावर, हातावर हा लालभडक रंग पसरल्यामुळे सगळे चित्र व वातावरण फारच भेसूर दिसायला लागले. हिटलर त्याच्या स्वियसहाय्यकाकडे वळून म्हणाला “ रक्तपात ! यावेळी आपल्याला विजयासाठी याची तयारी ठेवली पाहिजे”.
किती खरे होते ते........

क्रमश:.........

जयंत कुलकर्णी.
अल्बर्ट स्पिअर नंतर हाईन्झ गुडेरियन.....

इतिहासकथालेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

यकु's picture

31 Jul 2011 - 8:32 pm | यकु

खूप इंटरेस्टींग लिहीलंय..
हिटलरने स्वतःच अंगरखा दिलेला माणूस तेवढ्या ताकदीचा असणारच...
आणखी वाचायला आवडेल. :)
अल्बर्ट स्पिअरचे आत्मचरित्र जालावर पडले आहे काय? असल्यास दुवा?

जयंत कुलकर्णी's picture

1 Aug 2011 - 9:17 am | जयंत कुलकर्णी

आंतरजालावर आहे का ते माहीत नाही. पण माझ्याकडे आहे.

पल्लवी's picture

2 Aug 2011 - 12:38 pm | पल्लवी

“इन्साइड थर्ड राईश” हे पुस्तक सहज उपलब्ध आहे का ?

हा लेख सुद्धा छान जमुन आलायं.
पुढचा भाग लवकर आणि असाच मोठा टाकणे ही विनंती.

जयंत कुलकर्णी's picture

2 Aug 2011 - 1:45 pm | जयंत कुलकर्णी

मला वाटते "हो"

विसुनाना's picture

2 Aug 2011 - 3:23 pm | विसुनाना

प्रताधिकाराच्या बाहेर हे पुस्तक इथे सापडले. उतरवून घेतले. धन्यवाद.

अशोक पतिल's picture

31 Jul 2011 - 8:56 pm | अशोक पतिल

फारच मुद्देसुद लेखन ! हिटलर विषयी इतके सवीस्तर फार कमी माहित आहे. लिहित रहा .

प्रास's picture

31 Jul 2011 - 9:18 pm | प्रास

असलं सकस लेखन तुम्ही करत असताना कोण 'माई का लाल' असेल जो मधूनच गायब होईल? निदान मला तरी त्याची शक्यता दिसत नाही.

अल्बर्ट स्पिअरची कहाणी कुतुहलजनक आणि आकर्षक होतेय.

हाईन्झ गुडेरियनपूर्वी अल्बर्ट स्पिअर अख्खा मराठीत यावा मग त्यासाठी कितीही वाचायची तयारी आहे हे इथे नमूद करू इच्छितो.

पुलेप्र

तुमचा नि तुमच्या लेखनाचा फ्यान :-)

मी-सौरभ's picture

31 Jul 2011 - 11:06 pm | मी-सौरभ

फ्याण...

मितभाषी's picture

1 Aug 2011 - 10:49 am | मितभाषी

हेच बोल्तो.

आचारी's picture

31 Jul 2011 - 10:14 pm | आचारी

खतरनाक !!

इंटरनेटस्नेही's picture

1 Aug 2011 - 4:09 am | इंटरनेटस्नेही

खूप इंटरेस्टींग लिहीलंय..

गणा मास्तर's picture

1 Aug 2011 - 7:46 am | गणा मास्तर

लिहित रहा अजुन

मदनबाण's picture

1 Aug 2011 - 9:39 am | मदनबाण

सुंदर लेखन... :)

सुमो's picture

1 Aug 2011 - 11:05 am | सुमो

वाचत आहे.

स्वाती दिनेश's picture

1 Aug 2011 - 11:06 am | स्वाती दिनेश

लेखन आवडत आहे,
स्वाती

अन्या दातार's picture

1 Aug 2011 - 11:21 am | अन्या दातार

खिळवून ठेवणारा धागा, रोचक माहिती. :)

’तुझ्या जॅकेटवर काय आहे तुला माहिती आहे का ? हे तुझे दिसत नाही.’ मी बावचळून इकडेतिकडे बघायला लागलो तेवढ्यात शेजारुन उत्तर आले “ गोबेल्स, बरोबर आहे तुझे. माझे आहे ते.”

बस्स ,,,,,,,,,,,,,,,,, अंगावर रोमांच उभे राहिले.तुमची लिखाण शैली आहेच तशी

अतिशय मस्त लिखाण, खुप मस्त वाटलं वाचुन.

मराठी_माणूस's picture

1 Aug 2011 - 2:46 pm | मराठी_माणूस

मस्त.

दुसर्‍या महायुध्दाच्या माहीत नसलेल्या भागाची ओळख होत आहे.

स्मिता.'s picture

1 Aug 2011 - 2:54 pm | स्मिता.

अतिशय सुरेख लिहिताय. ज्या हिटलरबद्दल शाळेत शिकलेल्या दोन-चारच गोष्टी माहितीये त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळतेय. लिहित रहा...

जयंत कुलकर्णी's picture

1 Aug 2011 - 10:42 pm | जयंत कुलकर्णी

सर्व वाचक मित्र्/मैत्रिणींना हे आवडले हे वाचून आनंद वाटला.

पुष्करिणी's picture

2 Aug 2011 - 12:00 am | पुष्करिणी

मस्त लेखमाला, अत्यंत आवडतेय

आनंदयात्री's picture

2 Aug 2011 - 12:17 am | आनंदयात्री

उत्तम. पुढच्या भागाची वाट बघतोय.

प्राजु's picture

2 Aug 2011 - 1:29 am | प्राजु

मस्त मस्त!!!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2011 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार

खिळवुन ठेवणारे लेखन.

वाचतोय...

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2011 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार

खिळवुन ठेवणारे लेखन.

वाचतोय...

मनराव's picture

2 Aug 2011 - 2:52 pm | मनराव

वाचतो आहे........

नगरीनिरंजन's picture

2 Aug 2011 - 3:12 pm | नगरीनिरंजन

नेहमीप्रमाणेच अतिशय सुरस आणि माहितीपूर्ण लेखमाला.
वाचत आहे. येऊ द्या.

(लेखमालाफॅन) ननि.

किसन शिंदे's picture

2 Aug 2011 - 3:31 pm | किसन शिंदे

अल्बर्ट स्पिअरचा पुढील भाग वाचण्यास उत्सूक.....आमी बी फ्याण आहोत तुमच्या लिखाणाचे. :)

धनंजय's picture

2 Aug 2011 - 10:56 pm | धनंजय

छान लिहिलेले आहे. मालिका वाचतो आहे.

जयंत कुलकर्णी's picture

3 Aug 2011 - 7:49 am | जयंत कुलकर्णी

पुढचा भाग टाकण्याआधी सर्वांचे आभार मानतो.