प्रिमीयर कॅफे दादर
जयकर मुलींच्या शाळेसमोर(आता शाळा अस्तित्वात नाही.) मी रेड्डीची वाट बघत उभा होतो.रेड्डी माझा जुना पंटर. साडेनऊ दहा च्या दरम्यान रेड्डी काखेतली बॅग सांभाळत घाईघाईत येताना दिसला.मला बघीतल्यावर गोड हसला..खरं म्हणजे बॅगेचा आणि रेड्डीचा काही संबंध नाही.बॅगेत तीन दिवसाची रद्दी भरलेली असते.पण कुणीतरी त्याला सांगीतलं की बँकर नेहमी बॅग घेउन जातात.दुसर्या दिवशीपासून हातात बॅग.
"मैने लेट हुआ क्या"
"नही. नही. रेड्डीसाब"
"वैसेभी रेड्डी आया तो रामायण फिरसे चालू करना पडेगा" असं म्हणून खदखदून हसला.
"चलो, चाय पिना होंगा." मी मान डोलावली.
प्रिमीयर मध्ये नेहेमीची टोळकी बसलीच होती.
"मेरे पास बॉरोअर अकाउंटमें दोसौ करोड रुपया है."डोंबिवलीचा एक ब्रोकर सांगत होता.
"तो ऐसा करो चाय बिल तुम भरो आज."बोरकर त्याला म्हणाला.
"चाय क्या मै दारु पिलाएंगा पण लेनेवाला पार्टी किधर है?"
मला बघीतल्यावर बोरकर उठलांच जागचा.
"या ना साहेब."
"नको, चालू द्या तुमचं"
दोन टेबल सोडून आम्ही बसलो.
"बोलो साब"रेड्डी म्हणाला.
"कुछ नही . मार्केट कैसा है"
"मुडदे माफिक ठंडा. कुछ भी नही. सब लोगा को डिपॉजीट चाहिये. मगर फुक्कटमे."आप कुछ आफर लाया तो बोलो"
"आजकल डिपॉजीट आ रहा किधरसे?"मी विचारलं
"रीअल एस्टेटसे साब.बडा बडा सौदा पड रहा है." पार्टी लोगा ऍडवोकेट के पास रखता जी एस्क्रो अकाउंटमें"
रेड्डी बॅकांसाठी डिपॉजीट मोबीलाइज करतो.बँका ऑफिशिअली काहीच देउ शकत नाहीत.
पण हे एक ग्रे मार्केट आहे.
हर्षद मेहेताच्या जमान्यात दलाल याहूम कमावून गेले.
दलालांना पैसे मिळतात कर्ज घेणार्यांकडून.डिपॉ़जीट आणि लेंडींगचे एक गुणोत्तर बँकेला कायम ठेवावे लागते.
बँक मॅनेजरला धंदा हवा असतो.
गिर्हाईकाला कर्ज हवे असते.
रेड्डी चं नाव मॅनेजर पुढे करतो.
पार्टी दलाली देते.डिपॉजीट बॅंकेत येतं.दलाल त्याला किक बॅक म्हणतात. मान्यता नसलेलं मार्केट. कोणीही काम करू शकतो.दादरचा हा अड्डा खास यांचाच. रोज करोडो रुपयांचे सौदे दिले घेतले जातात. फक्त उठून जाताना बिल कोणी द्यायचं ही एकच चिंता असते.
समोरच्या संगमरवरी टेबल वर आता माशा घोंगावायला लागल्या.
"केबी कितना है अभी?"
बोरकर आणि मंडळींचं लक्ष आता पूर्णपणे आमच्याकडे. रेड्डी उठल्यानंतर चार पाच ऑफर नक्की.
"वोयी समझो. आधा टका.कितना होंगा आपको."
रेड्डीला पैशाचा वास लागला होता.
"एक करोड के आसपास . लेकिन केबी चालीस पैसा"
एव्हाना बोरकरच्या टेबलवर चुळबूळ सुरु झाली होती.
"भोत कम साब"
"देखो. जमता तो करो"
रेड्डी झाला तयार पंचेचाळीस पैशात.
"एडवांस?"
मी हजाराच्या पाच नोटा सरकवल्या.
बँकरच्या बॅगेत त्या जमा करत रेड्डी उठलाच.
"मैने फोन करना कल."
रेड्डी गेल्यावर पाच मिनीटांनी बोरकर त्याच्या पाठोपाठ बाहेर पडला.
मोबाईल वाजला.बोरकरचा फोन.
"काय साहेब ?आम्हाला सेवेचा मोका कधी?"
"बोरकर माझं तुमचं नाही जमायचं. ऍडवान्स खाणारे लोक तुम्ही."
मी मुद्दाम डिवचलं.
"नका नं देऊ बयाणा, सेवेचा मोका तर द्या."
"आत्ता ताबडतोब नकोय""
"उद्या बघू.ठिक आहे.?"
"वाट बघतो साहेब"
मी बाहेर पडलो. कैलाश लस्सीवाल्या समोर सलून मध्ये रेड्डी बसला होता.
मी आत गेल्यावर त्यानी चार नोटा मला परत केल्या.
"मेरा डिपॉजीट नही मंगता क्या?"
"नको, ये जॉब तुम्हारे लिये नही है."
बोरकरचं पहिलं डिपॉजीट आलं चाळीस लाखाचं.एस्क्रो अकाउंट.इब्राहिम मुल्ला अँड कं. मी केबी देउन डिपॉजीट नाकारलं.
बोरकरनी ते दुसरीकडे फिरवलं.डबल कमाई.बोरकर खूष.
===============================================================
पंधरा दिवसांनंतर
भाईंदरला पोहचता पोहचता साडेसात वाजले होते. स्टेशनच्या गर्दीतून वाट काढत काढत दिव्यप्रभा सोसायटीत येईतो आठ वाजले .
फ्लॅट नम्बर ३१५ वर नाव वाचून घेतले. विनीता अशोक परमार.बेल दाबली.विनीतानीच दार उघडलं.
विनीता माझं जुनं फाइंड.अशोक दम्याचा रोगी. दहा पावलं टाकली की धापा टाकायला लागतो.विनीतावर जबाबदारी पडली.ब्यूटी पार्लरच्या लाईनमध्ये.रेड पडली. जामिन भरायला माणूस नाही.परळचा मोठा भाया माझ्याकडे आला.त्याची मावस बहीण.कुन्देर वकीलाला सांगून जामीन झाला.दोन वर्षं लागली ट्रेन व्हायला.मुळात दिसायला सुंदर .बांधा घसघशीत.आता भाषा पण सुधारली.
मी आत गेलो .
"पानी?"
" नको. "
"चाय?"" बादमे.कामकी बात पहेले ध्यान से सून. अशोक क्यां छे?"
"बारे गयो छे."
मी वेस्ट साईडच्या दोन पिशव्या पुढे टाकल्या.त्यात एक सुंदर हिरवा टी शर्ट आणि पांढर्या रंगाची लिनन ची ट्राउजर.
"माझ्यासाठी.? "" होय..घालून दाखव .आत्ता ?"
होय. पटकन उठून ती आत गेली. पाच मिनीटानी बाहेर आली.थोडासा मेकप करून.कपडे हवे तस्से फिट्ट बसले होते.
माझ्यासमोरून दोनदा कॅट वॉक केल्यावर सुद्धा हवा तो ईफेक्ट येईना.
"एक काम कर . काढ तो टी शर्ट."
ती परत आत गेली.दार अर्धवट उघडून टी शर्ट फेकला.
"एक काम कर . तुझं नेल कटर दे."
दोन मिनीटानी मी परत टी शर्ट आत फेकला.
विनीता बाहेर आली.
"काय केलं या शर्टला"
"काय झालं? फिटींग ठिक आहे ना?"
"हो. पण हे पहा खालून ओढला तर बटन निसटतंय"
"मग काय झालं?"
काय झालं काय? आणि मग ती हसायला लागली.
"मी नेलकटरनी काज ढिला केलाय"
मग परत एकदा रिहर्सल .शर्ट ओढला की बटन काज सोडायचं.परफेक्ट क्लिव्हेज.
"तुझ्याकडे पुश-अप ब्रा आहे? "
"हो. सिल्वर कलरची."
"आपल्याला स्टेज शो नाही करायचा आहे"
"ही घे .३६-बी" काळी.
आता हवा तसा ईफेक्ट आला.
"गूड.आता बस आणि सिन -शॉट ऐक." नंतर तासभर मी बोलत होतो. ती समजून घेत होती.
"मेक-अप परफेक्ट पाहिजे.
परफ्युम मी सांगतो तोच.
कामाअगोदर तीन दिवस फेशिअल.
मॅनीक्युअर, पेडीक्युअर.
नविन पर्स. बिझीनेस कार्ड.
मोबाईल.पेन्सील हील्स."
"हे पंधरा हजार .ओके."तासाभरानंतर मी बाहेर पडलो.
उद्या गणेश टॉकीज मुलुंड. पण अगोदर परळ ला मोठ्या भायाला भेटायचं.
दुसरी सोंगटी कटेवर .
=====================================================================सात दिवसानंतर.....
"सर गुड मॉर्नींग , मै शैलजा, सिटी बँक की ओर से बात कर रही हूं."
मी सक्काळपासून अशाच कॉलची वाट पहात होतो.
"बोलो मॅडम , हमारी बँक आपको क्रेडीट कार्ड ऑफर कर रही है."
"आगे बोलो. मै सून रहा हू.................."
"तो फीर मै बंदेको किधर भेजू?"
ऐसा करो. मै पाच बजे स्वामीनारायण मंदीर के पिछे दादर क्लब है.वहां पे भेजो.
"ठीक है सर."
सहा वाजता सिटीचा डॉकबॉय आला.
"बस रे बाबा"
"सर , डॉक्युमेंट."
"हो राजा देतो ना?"
"एजन्सी कुठली रे तुझी? घे. कोक पी"
"पिनाकल सर."
"पगार किती रे "
" साडेतीन . आणि पंधरा रुपये एका पिक अप च्चे"
"कमी नाही पडत"
"पडतात ना" "तुम्ही देता का नोकरी "?
"नाही रे बाबा"
"तुला एका डॉ़कचे पंधरा मिळतात ना? मी पण देतो. "
" उद्यापासून जी पण डॉक्युमेंट आणशील त्याची एक कॉपी मला द्यायची"
थोडे आढेवेढे घेतले पण तयार झाला.
"चौथ्या दिवशी मनोरमा शेट्टीची डॉक्युमेंट आली."
तिसरी सोंगटी फीट.
========================================================================
प्रतिक्रिया
18 May 2008 - 3:20 am | भडकमकर मास्तर
ओ साहेब, मस्त चाललंय...
वाचतोय....
ष्टोरी भन्नाट...
एकदम जॉनी गद्दार स्टाईल स्क्रीनप्ले वाचतोय, असं वाटतंय...
18 May 2008 - 4:39 am | अनिता
रामदास ,
झकास झाला आहे हा भाग.
<अजून येउदेत
असेच म्हणते.
18 May 2008 - 7:12 am | विद्याधर३१
अतिशय रंगत येत आहे कथेमध्ये......
पुढचा भाग कधी......
अवांतर : कथेचे नाव सर्व भागांसाठी एकच असावे. आणी पुर्वीच्या भागांचा दुवा द्यावा...
विद्याधर
( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)
18 May 2008 - 10:44 am | रामदास
होय. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्रयत्न करून पाहतो.
18 May 2008 - 1:46 pm | मन
वेगळ्याच दुनियेची सैर घडतीये गोष्ट वाचुन.
सर्व साधारण सुरक्षित जगात(८ ते ५ सरळमार्गी चाकरी) अशा घटना दिसत नाहित, दिसल्या तरी त्याचा,त्या भाषेचा
सरळमार्गी माणसाला "असा" अर्थ लागत नाही.
"विनीतावर जबाबदारी पडली.ब्यूटी पार्लरच्या लाईनमध्ये.रेड पडली. "
हे आणि ह्यापुधचं तिसर्यांदा वाचलं, तेव्हा पुर्ण समजलं.
चालु द्यात मग, पुढच्या भागांची वाट पाहतोय.
आपलाच,
मनोबा
18 May 2008 - 8:21 pm | बिपिन कार्यकर्ते
(रामदास)स्वामी... रंगत येत आहे कथे मधे... तुम्हाला आम्ही इथले 'सुशि' म्हणून मागेच किताब बहाल करून टाकला आहे. आणि ह्या प्रकारच्या लेखनाला काही काँपिटिशन पण नाही इथे...
फक्त एक विनंति... तुम्ही आधी एक डिटेल ट्युशन घ्या ह्या धंद्याची म्हणजे भाषा अधिक समजेल आम्हाला .... (आणि हा धंदा जमतोय का ते पण प्रयत्न करून पाहता येईल)
:))
बिपिन.
19 May 2008 - 8:59 pm | झकासराव
एक से बढकर एक सुरु आहे की. :)
जबरदस्त गेम सुरु झालाय. रंगत वाढली आहे.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
20 May 2008 - 3:45 pm | सुमीत
ह्या कथे वर भन्नाट थ्रिलर सिनेमा नाहीतर मालिका बनेल, लेखन पण तसेच वाटत आहे. अगदी डोळ्या समोर फ्रेम येत आहेत माझ्या.
22 May 2008 - 1:10 pm | धमाल मुलगा
रामदासशेठ,
जब्बरदस्त चालू आहे :)
मस्त स्क्रिनप्ले दिसतोय मलाही...निदान एखादी दिर्घांकाची संहिता तरी आहेच आहे!
बिपिनशेठच्या म्हणण्याप्रमाणे एकदम 'सु. शि.' ष्टाईल...
मजा आली...
आत्ता कुठं गेम चालू झालाय...
वाचतो आहे..
पु.ले.शु.