http://www.misalpav.com/node/1708
http://www.misalpav.com/node/1724
http://www.misalpav.com/node/1809
http://www.misalpav.com/node/1815
http://www.misalpav.com/node/2015
रात्री पावणेदहाची एंट्री बुकात टाकून महाडीकनी मला कस्टडी हवालदाराच्या ताब्यात दिलं. लॉक अप ड्युटीच्य्या हवालदारानी माझी अंगझडती घेतली.पायात स्लीपर आहेत लेस वाले शूज नाहीत याची खात्री करून घेतली. खिशात हात घालून ब्लेड , सिगरेट, लायटर,माचीस , चाव्या,पेन ,नाणी, नोटा नाहीत याची खात्री करून महाडीकच्या हातात मेमोची कॉपी सही करून दिली.जनरल ब्रँचचा हवालदार नुस्ताच उभा होता. महाडीक जाताना काहीतरी बोलणार होता पण काही न बोलताच निघून गेला.
हवालदारानी गेट उघडून मला आत जायची खूण केली. आत मिश्रा वाट बघत होता. माझ्या चेहेरा बघून हात हातात घेउन म्हणाला
"बहोत पडी क्या? स्साला, विरकर हलकट है."
मी काहीच बोललो नाही. मेहेता बावरून गप्प उभा होता.त्याच ढगळ चड्डीत. ध्यान दिसत होता. लॉक अप मधली चारपाच माणसं झोपलेली होती.पुठ्ठ्याचे खोके मोडून सपाट करून झोपायची सोय केलेली होती. खिडक्या उंचावर जाळीच्या होत्या.पंखा नसतोच. लाईट पिवळा.टोकाला संडास असावा. मधूनच घाणीचा भपकारा येत होता. पहिल्या मजल्यावर असूनही वारा नव्हता.गर्दी कमी आहे हे बघून मला जरा हायसं वाटलं. "कल सवेरे कोर्ट मे खडे करेंगे. मेरा वकील आयेगा". मेहेता म्हणाला. त्यानी वकील पंधरा दिवसापासूनच तयार ठेवला होता.
मिश्रानी पाण्याची बाटली समोर केली. दोन घोट पोटात गेल्यावर मी मेहेता ला सांगीतलं "मेहेता ,कल तेरे घरमे ये लोग आयेंगे.मैने बताया वैसेही सब होगा तो तू छूटेगा."
मिश्राची चिंता मला करण्याचं कारण नव्हतं. जुना माणूस . पण राहून राहून काही प्रश्न मला सतवत होते.
मेहेताला अटक करण्याच काहीच सबळ कारण नव्हतं.
मेहेता ज्या बँकेत घोटाळा झाला तिथे मॅनेजर होता.
इतर आरोपींनी मेहेताला ओळखतो असंही सांगीतलं नव्हतं.
विरकरनी हे सगळं गेल्या महिन्याभरात चेक पण केलं होतं. मेहेता सतत सहकार्य करत होता.
पण मेहेता एवढा घाबरला का होता? म्हणजे मेहेताची आणखी एक पॅरलल गेम चालली होती.
"मला आज नाही उद्या अटक होणार हे खरं पण आज घाईघाईनी का? होम मधून विरकर वर दबाव कसा आला असेल. ?होमनी दखल घ्यावी असं हे प्रकरण मोठं पण नव्हतं. मला ह्या प्रकरणात लवकर अटक व्हावी अशी कुणाची इच्छा असेल?
मी गेम काळजीपूर्वक खेळतो.मोहरी आपली जागा सोडून पळत नाहीत. कारण त्यांचं पोट भरेल एवढं मिळत असतं.
सगळ्यात मोठा प्रश्न. मी फक्त दहा लाखाच चेक ईब्राहीम मुल्ला मधून उडवला होता. गेमप्लॅन तसा होता.पण तक्रार आणखी साठ लाखाची होती.
हे साठ लाख कुणी उडवले? मी नाही. मग कोण?
एक भयानक शंका माझ्या मनात आली. माझ्या पटावर एक आणखी नवा अनाहूत खेळाडू होता. चोरावर मोर?
---------------------------------------------------------------------------------------------------
रात्रभर अंग ठणकत होतं.मिश्रा माझ्या पायगती बसून होता.डोक्यामधे आलेला विचार झोप लागू देत नव्हता.आपली पकड निसटत तर नाही ना असा विचारही येत होता. आता पुढचे सात दिवस महत्वाचे होते.मेहेताचा धीर सुटता कामा नये.मला मेहेताची बाजू पक्की ठेवायची होती.मिश्राची काळजी नव्हती. जुना पक्का बाजीगर खेळाडू होता.मिश्रा माझा कटर होता.कमीतकमी दहा बारा सहकारी बँकेत त्याची सेटींग होती.त्याला चेक दिला की अकांउट न उघडता एन्कॅश करून रोकड पोच व्हायची.टीपी (थर्ड पार्टी) करणार्या बँका फक्त सहकारी बॅंका असतात. चेक कुणाच्याही नावावर असू देत पास होतात ते एकाच खात्यातून.सहकारी बँकाना धंदा हवा असतो. डायरेक्टर अर्धशिक्षीत असतात.टीपी करणारा धंदेवाईक असला तर धोका नसतो. काळबादेवीतल्या शेदिडशे मारवाड्यांचा धंदा या बँकांच्या जिवावर चालतो.अधून मधून एखादी बँक बुडते.चार दिवस गाजावाजा होतो. मिरा-भायंदर को.ऑप.बॅंक , रवीकिरण को.ऑप. अशाच बुडत गेल्या.
चार वाजले .मिश्रा माझ्या पायाशी झोपला होता.मेहेता घोरत होता. बाकी बराकीतून आवाज बंद झाले होते.माझ्या डोळ्यावर झोप कोसळली.मी सकाळी जागा झालो तेव्हा सात साडेसात वाजले असावेत.
---------------------------------------------------------------------------------------------------
भसाड्या आवाजात कोणीतरी गात होतं. मी जागा झालो. एक पंजाबी मध्यमवयीन माणूस भजन करत होता.दुसर्या कोपर्यात एक पांढरा शुभ्र लेंगाझब्बा घातलेला माणूस नमाज करत होता. मेहेता फेर्या मारत होता. अर्धवट दाढी वाढलेला एक इसम कोपर्यात गप्प बसलेला होता.मी जागा झाल्याचे पाहून मिश्रा पुढे झाला. हातावर चिमूटभर मिठ ठेवून म्हणाला "आज इससे चला लेना. बाहर निकालेंगे तब सबकुछ सेट करेंगे."मिठानी दात घासून तोंडावर पाणी मारून मी फ्रेश झालो.
मिश्रानी टाळी वाजवून कोपर्यात बसलेल्या माणसाला ऑर्डर दिली.
" ओ, उठ बे, संडास साफ कर,जल्दी." माणूस पटकन उठला. बराच वेळानी बाहेर आला." हो गया मिश्रा साब. "
मी संडासला गेलो. लॉक अप च्या संडासाला दरवाजे नसतातच. टमरेलाच्या जागी पाण्याची बाटली अर्धी कापून ठेवलेली होती.बाजूला बाथरूम होती.आंघोळ करून तेच कपडे घालणं भाग होतं.सगळं आटपून बाहेर आलो तेव्हा साडेआठ वाजले होते. अकराचे कोर्ट म्हणजे दहाच्या आधी बाहेर काढणार नाहीत. चहा वगैरेचा प्रश्न नव्हताच. नउ वाजता भत्ता .भत्ता म्हणजे उसळीचे पाणी आणि दोन पाव. मला चहा भत्त्ता नको होता. माझे पाव मेहेतानी खाउन टाकले.आता वेळ झाली होती हिशोबाची.मी , मेहेता , मिश्रा कोंडाळं करून समोरासमोर बसलो.
"बोल मेहेता , तेरा क्या?"
"मेरा वकील आयेगा. बेल हो जायेगा."
"भूल जा . तेरा सात दिन का रीमांड होनेवाला है."
"मै पोंडा को लाया है."
"पोंडा आने दे नही तो गेंडा .रीमांड पक्का. विरकर सात दिन पिटनेवाला है तेरेको."
मेहेताचा चेहेरा पडला . त्यानी माझ्याकडे पाह्यलं. मी होकारार्थी मान हलवली.
आता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. "
मैने कुछ नही किया फिरभी."
"हां. फिरभी."
आता मी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"मेत्ता ,एक बात बता तूने कुछ नही किया . तो तेरी इतनी क्यू फटी पडी है."
सिधीसी बात समझ ले."
"तेरेको बचना है पिटाईसे तो रास्ता निकलेगा .लेकीन हम लोग क्यू बचायेंगे तेरेको. वैसे कलतक तेरेको बचाया है . माधुरी सब सम्हाल लेगी."
"बापू, इसका सबका रुपया लगता है. वो कहासे आयेगा. विरकर को मालूम पडेगा की माधुरी....."
मेहेतानी गळाच काढला. फारशी वाट न बघता मिश्रानी मेहेताचे केस धरून त्याची मुंडी वर केली आणि कानाखाली वाजवली.
"स्साला ,रोता है. पिटाईसे डरता है. भोसडीके,अभी तो आर्थर रोड बाकी है."
" मेरे भाई चल बता दे तेरी ष्टोरी. फिर हम गाना लिखेंगे."
हाफ चड्डीतला मेहेता फारच गमतीदार दिसायला लागला होता.रडत , भेकत त्यानी जे सांगीतलं ते फारच गमतीदार प्रकरण होतं. मेहेता आणि त्याचा भाउ एकाच सर्टीफीकेट वर कामाला लागले होते. दोन भाउ ,एक सर्टीफीकेट . एक मुंबईत तर दुसरा सूरत मध्ये. हा खरा सुरेन्द्र मेहेता.दुसरी महत्वाची पिडा, मेहेता जुगारी होता. ट्र्स्टची डीपॉजीट आणून नल्ला सर्टीफिकेट इश्यु केली होती. माझी गेम दहा लाखाची तर मेहेताची दिड करोडची. आता फ्रॉड झाला म्हणजे ऑडीट येणार . मेहेता परत रडायला लागला.
मी थोडा विचार करून मेहेताला सांगीतलं. देखो मेहेता, तू बचेगा. मैने माधुरी को तेरे साथ रखा है. कोई नही जानता माधुरी तेरी बहन नही है.तू तीन दिन के बाद हॉस्पीटलमे जमा हो जा. अब ये बता ,नोट किधर है?नोट दिखा जान बचा ले.
हा एक बात और विरकर के साथ मिलके डबल ढोलकी बजा और फिर.....
मेहेतानी पाय पकडले. नही मालीक हूं रुपया आप्पीस. चोक्कस. पण हिसाबथी...
हा ना करता करता मेहेताला वाचवायचे विस लाख ठरले.
दिवसाची सुरुवात चांगली झाली होती.
---------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश...
प्रतिक्रिया
15 Jun 2008 - 11:21 am | अभिज्ञ
छान चाललय.
अजुन येउ द्यात.
अभिज्ञ.
15 Jun 2008 - 1:38 pm | अरुण मनोहर
आज आतापर्यंतचे सगळे एपीसोड वाचून काढले. जबरदस्त. हा एकच शब्द येतोय मनात. पुढचे वाचायला धीर धरवत नाही.
15 Jun 2008 - 4:27 pm | भडकमकर मास्तर
हं... मस्त...
सगळे फार पोचलेले लोक आहेत...
पहिल्या एपिसोडमध्ये वाटले होते की हा मी चुकून अडकला आहे,... इकडे तर सगळी दालच काळी आहे ...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
16 Jun 2008 - 11:44 am | धमाल मुलगा
खत्तरनाक!!!!
आयला, गेम मध्ये आणखी गेम?
जोरात दिसतंय प्रकरण.
"मी" ची १० लाखाची उडी, मेहताची डायरेक्ट दिड कोटीची?
मग तिसरा झटका ६० लाखाचा....तो कोणी केला?
च्यायला, सॉल्लीड भुंगा लाऊन दिला डोक्याला, राव तुम्ही...
वर आणि परत ती माधूरी मेहताची बहिणही नाहीच? आयची कटकट...काय प्लॅन आहे का चेष्टा?
वा! तिथं आतमध्ये बसल्याबसल्यादेखील धंदा?
च्यामारी, पक्के मुरब्बी दिसताहेत की.
काका, नेहमीप्रमाणेच एकदम फंटाश्टिक चालू आहे!
पु.भा.प्र.
-ध मा ल.
16 Jun 2008 - 1:11 pm | विद्याधर३१
असेच वाटले होते.
पुढचा भाग वाच्ण्यास उत्सुक.......
विद्याधर
( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)
17 Jun 2008 - 1:09 pm | ऍडीजोशी (not verified)
सगळे भाग पुन्हा एकत्र वाचले.
आधी सांगितलं तेच पुन्हा - पटापट लिहा की राव. का उत्सुकता ताणताय? वय झालं आता, जास्त ताण झेपत नाही.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
17 Jun 2008 - 5:00 pm | रामदास
इकडेही हाच प्रॉब्लेम .वयामुळे टंकायचा वेग कमी झाला आहे.
सगळी अक्षर धुन्डो धुंडो रे साजना करतात.
17 Jun 2008 - 2:47 pm | विसोबा खेचर
रामदासभाऊ,
जोरदारच लिहिता आहात...
हा भाग आत्ताच वाचला, आता पुन्हा एकदा सगळे भाग वाचणार आहे...
तात्या.
17 Jun 2008 - 10:19 pm | अनिल हटेला
ग्रेट !!!!
रामदास जी !!!!
बढीया है !!!!
जरा वेग वाढवा लिखाणाचा राव !!!!!
लिन्क तोडू नका प्लीज !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!!!!!
18 Jun 2008 - 11:10 am | llपुण्याचे पेशवेll
जबरदस्त गती आहे कथानकाला. पण पुढचा भागही त्याच गतीने टाकावा रामदाससाहेब. अप्रतिम.
पुण्याचे पेशवे
21 Jun 2008 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते
ग्रेट ऍज युजुअल..... पण ते भाग मोठे आणि लवकर टाका ना मालक...
बिपिन.