पिसि.जेसि.-पूर्वतयारी

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
17 May 2008 - 11:16 pm

एक वर्षभरा पूर्वीची गोष्ट.म्हाडाचे बारा कोटी रुपये ठाण्याच्या एका राष्ट्रीय बँकेतून नाहीसे झाले.तीन महिन्यानंतर सहा जणांना अटक करण्यात पोलीसांना यश आले.रिकव्हरी फक्त रुपये साडेचार कोटी.
चेंबूरच्या एका खाजगी बँकेत आलेले तीन कोटी (अनिवासी) भारतीयाचे डिपॉजीट महासमता को.ऑप. बँकेत गेले आणि नाहीसे झाले. खाजगी बँकेच्या मॅनेजर सह सगळ्यांना अटक.रिकव्हरी काही लाखात.
एका फेमस कंपनीने वर्ल्डकपच्या मोसमात एक सवलत दिली.भारतीय संघ किती चौकार ,षटकार मारेल याचा अचूक अंदाज करा.किंमतीत भरघोस सवलत घ्या.कोट्यावधी रुपयांचे ड्राफ्ट जमा झाले. त्यातले जवळ जवळ दिड कोटींचे ड्राफ्ट नाहिसे झाले.चौदा जणांच्या चौकशीनंतर चार जणांना अटक.रिकव्हरी शून्य.
या सगळ्या बातम्या वाचनात येतातंच असं नाही.पण जेव्हा येतात तेव्हा एकच प्रश्न मनात येतो. हे असं होतंच कसं?
संगणकीकृत शाखा आहेत,अंतर्गत लेखापरीक्षा आहेत, अनेक वर्षं काम करणारी माणसं आहेत, मग हे होतं तरी कसं?
पोलीसांचं म्हणणं ठाम असतं आतून मदत असल्याशिवाय हे गुन्हे होत नाहीत.
व्यवस्थीत पगार, सुरक्षीत नोकरी, पेन्शन , असल्यावर कोण बरं हा धोका पत्करेल?
पण,गुन्हे घडतात हे तर खरंच आहे.
वरवर पाहता बँकेच्या कामाची विण घट्ट दिसते पण काम करणारी माणसंच आहेत. व्याज,कर्ज,लोभ , व्यसनं, मानसिक दुबळेपणा, अगतीकता, लाचारी, आळस, बेफिकीरी, इथे पण आहेच.
वर दिलेली सर्व उदाहरणं मोठ्या घोटाळ्याची आहेत. छोटे घोटाळे होण्यासाठी आपणसुद्धा थोडासा हातभार लावतोच.
चेकबुकच्या मागे चेक दिल्याची नों द करण्याची व्यवस्था असते.कितीजण ती पूर्ण करतात.?
रोख पैसे घेताना सगळेच जण पैसे मोजून घेतातं .
नविन चेकबुक घेतल्यानंतर कितीजण चेक मोजून घेतात.?
आता साहजिक प्रश्न असा आहे की कोरे चेक कशाला मोजायचे?
सध्या हा एक कॉमन फ्रॉड आहे.
चेक मोजले जात नाहीत.एक चेक आधीच काढला जातो.
दुसर्‍या चेकबुकची मागणी येइपर्यंत तो वापरला जात नाही. सहा सात महिन्यानंतर एक न समजणारी एंट्री पासबुकात येते.
मग चौकशी. गोंधळ. कही बँका दाद घेतात , काही तुमच्या डोक्यावर खापर फोडून मोकळ्या होतात.
अनिवासी भारतीय या फ्रॉड चे लाडके ग्राहक. कारण फार सोपं आहे. यांचं पासबुक फार कमी वेळा नियमीत करण्यासाठी बँकेत येतं.
फ्रॉड चा पत्ता लागेपर्यंत सहा महिने निघून गेलेले असतात.असो.
पिसि-जेसिच्या निमित्ताने हे लिहावेसे वाटले.अप्रस्तुत वाटल्यास माफी असावी.
आता प्रश्न असा आहे की मोठे गुन्हे कसे होतात?
मोठे गुन्हे फक्त व्यावसायीक गुन्हेगार करतात. आतून मदत करणारे बळी जातात.पैसे कापरासारखे उडून जातात परत न येण्यासाठी.
कनायवन्स असलेल्या गुन्ह्याचा छडा लावणं तसं सोपं जातं. हुशार अधिकारी पगार पावत्या अणि रजेच्या नोंदी आधी बघतात.कर्जाच्या रेट्याखाली कितीजण आहेत याचा तपास केला जातो. जुगार आणि दारु चे व्यसन असणार्‍यांची यादी बनवली जाते.अचानक झकपक खर्च करणार्‍यांवर नजर ठेवली जाते.माहिती देणार्‍यांना अभय मिळण्याची ग्वाही द्यावी लागते. तपास अधिकार्‍याचे काम सोपे होते.
पण ......आतून मदत न घेता गुन्हा घडला तर तपास काम एका वळणानंतर थांबून जातं.
आत बघू या पिसि जेसि चा पुढला भाग.

कथा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

17 May 2008 - 11:21 pm | बिपिन कार्यकर्ते

पार्श्वभूमी समजली. आता पुढचा भाग कधी?

बिपिन.

भडकमकर मास्तर's picture

18 May 2008 - 2:56 am | भडकमकर मास्तर

कनायवन्स असलेल्या गुन्ह्याचा छडा लावणं तसं सोपं जातं.
म्हणजे?
चेक मोजले जात नाहीत.एक चेक आधीच काढला जातो.
दुसर्‍या चेकबुकची मागणी येइपर्यंत तो वापरला जात नाही. सहा सात महिन्यानंतर एक न समजणारी एंट्री पासबुकात येते.

आता नेहमी चेकबूक मिळालं की चेक मोजणार

रामदास's picture

18 May 2008 - 10:42 am | रामदास

खास तपासकामाचा शब्द. आतून होणारी मदत. संगनमत.

सुमीत's picture

20 May 2008 - 4:06 pm | सुमीत

पण माहिती की ह्या क्षेत्रात काम करतानाचे निरीक्षण? माफी मागतो तुमची पण तुम्ही एकदा जाहिर पणे सांगाच की हे लेखन तुमच्या माहिती वर आधारीत कथा आहे आणि तुमचा कधी असल्या गुन्ह्याशी संबध आला नव्हता.

रामदास's picture

23 May 2008 - 9:40 am | रामदास

सांगून किंवा न सांगून काहिच फरक पडणार नाही.
माझी भूमिका फक्त an ear to the ground एव्हढीच आहे.
पण एक नक्की , ही स्टोरी नल्ला (डुप्लिकेट ) नाही.

प्राजु's picture

20 May 2008 - 7:39 pm | प्राजु

पुढचा भाग लवकर येऊद्या..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

21 May 2008 - 6:15 am | मदनबाण

पिसि जेसि चा पुढला भागची वाट पाहतोय.....

(ऑन-लाईन व्यवहार पण सावधपणे केला पाहिजे) असे म्हणणारा.....
मदनबाण.....