रीमांडचे सात दिवस-पिसी जेसी आउट

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
19 Jun 2008 - 1:19 am

दहा साडेदहाच्या दरम्यान थोडीशी हालचाल सुरु झाली. कोर्टात हजर करण्यासाठी एकेक हवालदार आरोपींना घेण्यासाठी येत जात होते.ज्यांच्या तारखा नव्हत्या ते परत झोपी गेले होते.
"मै कोर्ट मे कैसा आयेगा. "
मेहेता हाफ चड्डीकडे बोट दाखवून विचारत होता.
मिश्रा खदखदा हसत म्हणाला
"स्साला तेरा हप्ता तो आने दे .तेरेको सूट सिलाते है."
मेहेता हिरमुसला .
"मेरे ऑफीससे कोई तो आयेगा यार." "मेरे कपडेका बंदोबस्त करो ना यार.जजके सामने ऐसा आधा नंगा कैसे जाउंगा.?"
आता पर्यंत लेंगा झब्बेवाला काहीच बोलला नव्हता. त्यानी एक लेंगा-झब्बा मेहेताकडे फेकला.
"ये पहनके जाना." माणसाच्या आवाजात एक अजब आज्ञा होती. मेहेता उड्या मारत कपडे घालायला पळाला.अजनबी माझ्याकडे बघून हसला.
"नमश्कार मै मलीक. नबाब मलीक ."
" मै जोशी "मी माझा परीचय दिला. "ये शामसुंदर मिश्रा."
नबाब परत हसला.मेहेताकडे बोट दाखवत म्हणाला "ये बनीया रुपया देगा क्या? नंगा है साला."
म्हणजे हा बाबा आमचं संभाषण ऐकत होता तर.
एक नवा प्रॉब्लेम.
माझं मन वाचल्यासारखा हसून नबाब म्हणाला" कोई टेन्शन नही, जोशीसाब."
"मै यहा आराम करने आया हूं.खानेका बंदोबस्त है क्या?"
मी नकारार्थी मान हलवली. नबाब गेट जवळ गेला. कांबळे हवालदार उभा झाला.
"क्या हो गया सेठ ? कुछ नही .मेरे लिये दो डीब्बा बुला ले. "कांबळे नी इकडे तिकडे बघितलं. खिशातून मोबाईल काढून नबाब कडे दिला.
" सेठ आप बात करो."
"सलाम.....पुढची दहा मिनीटं तो घरी बोलत होता."आज पेपर भी भेजना."
" पढनेवाला मिल गया है."
महाडीक आणि दोन हवालदार आत येताना दिसले. पाच मिनीटानी आमची वरात कोर्टाकडे निघाली.
----------------------------------------------------------------------------------------------- विरकर कडक युनीफॉर्म मध्ये आला होता. हातात फायली घेउन कोर्ट हवालदार उभा होता.किला कोर्टात चौदा नंबर मध्ये आम्हाला उभं करायचं होतं.
"तुमचा काही बंदोबस्त ठेवायचा आहे का? "महाडीकनी मऊ आवाजात मला विचारलं .
टूथपेस्ट. साबणासकट एक मोठी यादी मी त्याच्या हातात दिली.भायाचा मोबाईल नंबर दिला.सहासात हजार मागवून घेतले.पुढचे सात दिवस नबाब च्या मेहेरबानीवर काढायचे नव्हते.कोर्टाचे हवालदार वेगळे असतात. एका मोठ्या हॉल मध्ये आम्हाला सोडून विरकर निघून गेला.बाहेर आरोपींच्या नातेवाईकांची तुडुंब गर्दी होती हवालदार पन्नास पन्नास रुपये घेउन नातेवाईकांच्या बरोबर आरोपींच्या जोड्या जुळवत होते. केस कॉल करेपर्यंत आराम होता.चौदा नंबरला होळंबे साहेबांचं कोर्ट बसणार होतं.एव्हढ्यात माधुरी मला दिसली.पन्नासची नोट पुढे करत ती आमच्याकडे आली.
"शामको विरकर घर की तलाशी लेने आयेगा."
" तू एक घंटा पहले पहोच जाना. "
कोर्टासमोर उभंकेलं तेव्हा साडेबारा वाजले असावेत.रीमांडची प्रकरणं लंच पूर्वी संपवायची प्रथा आहे. सरकारी वकीलांनी आरोप ठेवले.कलमं अनेक होती फसवणूक फसवणूकीचा कट,दगाबाजी, सरकारी कागदाचा दुरुपयोग, खोटे दस्त ऐवज बनवणे वगैरे वगैरे.
मेहेताचा वकील घोड्यासारखा जागीच फुरफुरत होता. सरकारी वकीलाची बाजू संपल्यावर त्यानी पंधरा मिनीटे खर्ड्या फर्ड्या इंग्रजीचा नमुना सादर केला.
मी मेहेताकडे पाह्यलं त्याचा चेहेरा फुलून आला होता.
पाच मिनीटानी होळंबे साहेबानी त्याला थांबवलं.
"बाकी बचाके रखना आर्ग्युमेंट के लिये."
"बाकी आरोपीचे वकील कुठेआहेत."
मिश्रा चा वकील एक फुटकळ होता."आय रीक्वेस्ट .....असं पाच वेळा म्हणून खाली बसला.
मी वकील नाही आहे असं सांगीतलं.
विरकरला बोलावलं "किती वेळं लागणार .?
"संशयीत आरोपी सभ्य अणिसुशि़क्षीत असल्यामुळे सहकार्य करतील."
"मग तरी पण किती दिवसाचा रीमांड? "
आरोपीना उद्देशून साहेब म्हणाले "कोठडीत पोलीसाचा काही त्रास? "नकारार्थी माना डोलावल्यावर मेडीकल रीपोर्ट मागवून सात दिवसाचा रिमांड दिला.
झालं.
--------------------------------------------------------------------------------------------------
जी.टी. हॉस्पीटल आर्थीक गुन्हे विभागाच्या बाजूच्या कंपाउंड मध्येच आहे. मिश्रा हॉस्पीटलला जायचं म्हणून खूष. मेहेताच पोपट झाला होता. पोंडाचा काही उपयोग झाला नव्हता. त्यानी टुमणं लावलं. "जोशीसाब आज मेरेको दाखल करो ना हॉस्पीटल मे."
मेहेताची गणितं चालूच असायची.
विस लाख द्यायचं कबूल केल्यावर तो आता मला टूर ऑपरेटर समजायला लागला होता.
"तेरा रुपया कब आयेगा. "मी विचारलं.
कैसा देने का.? घेरे चार पेटी पयडी छे"
माझी दोन चार दिवसाची वाफ एकदम बाहेर पडली. "मादरचोद .. दोपरको तेरे घरकी तलाशी है. ..और तू घरमे चार रोकडा रखता है..."
मेहेताला ग्रॅव्हीटी समजली. परत रडायला सुरुवात.मिश्रा फॉर्म मधे.
"चलो.. चलो... हॉस्पीटल के पीसीओ से बात करो.".
याच्या घरी कुणिच नाही. शेवटी माधुरीला फोन करून काय ते समजावलं.
महाडीक इतके दिवस फारसा बोलत नसायचा आता हळूहळू गप्पा मारायला लागला होता. पुढचे सात दिवस पिसी मधे काढायचे तर त्याचंही काय ते बघायला लागणार होतं.
मेहेता डॉक्टर समोर आडवा पडल्यावर मिश्रा गंभीर चेहेरा करून मला म्हणाला.
"साब ये पैसा देगा क्या? "आज पोंडाकी चलती तो ये बाहर हो जाता."
मी हसलो" मिश्रा ये पुरा पैसा कभी नही देगा."
" मेरेको लगता है ये चार पेटी बोल रहा है ना घरमे और भी रहेगा माल आज जो मिलेगा वो मिलेगा "
".थोडा दिमाग चलाते है.. "माधुरी को फोन लगा...गेम सेट झाली.
महाडीकला सांगून मेहेताला चार तास जनरल ब्रँच बराकीत टाकायचं ठरवलं.
मग आम्हाला दोघांनाही कंटाळा आला. बाकावर आडवे पडून झोपून गेलो.
--------------------------------------------------------------------------------------------------
वडाळ्याला मेहेताच्या बापानी ठेवलेलं जुनं घर. फाइव्ह गार्डन च्या आसपास . विरकरनी त्याची गाडी आणली होती. मेहेताच्या बेड्या काढून घेतल्या होत्या. तशा बेड्या नव्हत्याच, रस्सीच्या बेड्या . पण त्याही काढलेल्या.
होम पिचवर आल्यावर मेहेता वतारला. तो आणि विरकर सलगीने बोलत होते.माधुरीला पाह्यल्यावर विरकरची कळी खुलली.
सावंत (हवालदार) घरात शोधाशोध करायला लागला. कपाट उघडली गेली. पासबुकाचा ढिगारा जमा झाला. सर्टीफिकेटचा गठ्ठा बाहेर आला. शेअर सर्टीफिकेटची बाडं निघाली. एक थाळा भरून दागीने. विरकरनी कागद सगळे जमा केले. आता प्रश्न आला पंचांचा. कॉलनीतल्या कुणाला बोलवायचे तर बदनामी. प्रेशर टॅकटीक चालू." बोल मेहेता तेरा पंच कौन?"
मेहेता काहीच बोलेना.मी शेवटी म्हटलं
"साहेब पंच मी ऑफीसमध्ये बोलावून घेतो. "
"ठिक आहे...."
माधुरीला मेहेताच्या बायकोचा गाउन सापडला असावा. साईज फारच मोठा होता.
याद्या तयार करताना चहा आला. माधुरी वाकली. विरकरची नजर मुद्देमालावर. पाच मिनीट बोलती बंद.
" नाष्टा तो लाव."
बिचारी(?) परत वाकली बशा ठेवताना.
विरकरचे पाय हलायला लागले.चहा थंड पडला. दोघांच "नैन मिले चैन कहा "सुरु.
चांगली संधी मिळाली. मी मेहेताला खूण केली. मी आणि तो बेडरुम मधे.
"नोट किधर है भाई. "
"बेन के पास."
" तेरे को कैसे मालूम . "
"गाउन मिला तो नोट मिली होगी."
एका थैलीत मेहेताचे कपडे भरून ठेवले होते. दुसर्‍या थैलीत खाणं. सात दिवसाची फुल्ल तयारी.
विरकर मऊ पडला होता.माधुरीला सांगत होता ..."
दिनभर तो मेरे सामने रहेगा . "
"सिर्फ रातको अंदर . "
"तुम डरना नही . तेरे भाईको मै नही मारेगा अभी. "
"सच सच बोलेगा तो मै जादा रीमांड नही मागेगा. "
"लेकीन मेरेको बता इसकी और जोशीकी दोस्ती कबसे है?"
" जबसे आप पोलीस स्टेशन मे बुलाया तबसे."
विरकरचा बाण फुकट गेला."देखो आज शुक्रवार.अब दो दिन वो नही मिलेगा."
" मेरेको जोशीके घरकी तलाशी कल लेनी है."
"तेरे भाभी से बात करायेगी फोन पे. "
माझ्या पोटात गोळा .
मेहेताची बायको विचार करेल ही नवी नणंद कोण. सगळंच मुसळ केरात.
माधुरी शाणी.
"साब आठवा चालू है."
" शोक हो गया तो. आपका वाईफ भी डिलीवरीमे है आप समझ सकते है."
"आप चाहो तो मै आपको साथ लेके दमण चलती हूं. अगले बुधवार चलेंगे?"
जादू चल गया.
"पक्का? "
"हा साब पक्का."
आता मी थोडा सैल झालो. मोबाईल ठेवायची परवानगी मिळाली. दिवसा. रात्री नाही. थोडे पैसे खिशात ठेवायला मिळाले. घरच्या डब्ब्याची परवानगी कोर्टानी दिलीच होती. परतीच्या वाटेवर माधुरीचा फोन आला. पाचशेची आठ बंडलं. हजारची तीन. जमा कुठे करू.
उद्या सकाळी जनता सहकारी मध्ये. विरकर पुढे बसून पासबुक चाळत होता.
मागे वळून मला म्हणाला .
"माधुरीनी तुला बरा फोन केला."
" मला म्हणाली ओळख नविन आहे."
" चक्कर काय आहे भटा.?"
"साहेब तुमची पण नवी ओळख पण येते आहे ना दमणला."
विरकर फिदीफिदी हसला.तोपर्यंत आम्ही परत पोचलो होतोच.
---------------------------------------------------------------------------------------------------दुसर्‍या दिवशी माझ्या घराची झडती.यावेळी मिश्रा सोबत होता. माझ्या घरी फारसं काही च मिळणार नव्हतं.पास बुक. शेअर सर्टीफिकेट, आणि बर्‍याच सीडी वगैरे,. विरकर हुषार खरा. घरातले जुने आल्बम चाळत बसला."
हे कोण "ह्या कोण "असं म्हणत म्हणत एकदम म्हणाला .
" तुमची बायको कुठे आहे? "
अमेरीकेत.
"मुलं? अर्थातच अमेरीकेत "
त्यानी स्वताच उत्तर दिलं
"आम्ही एकत्र नाही राहत."
मी सांगीतलं.
"का?"
" नाही पटत. "
"मग मुलं काय म्हणतात? "
"ते काय म्हणणार? ते त्यांचा संसार संभाळतात. "
आणखी प्रश्न वाढले असते पण सावंतला कोलची पुस्तक सापडली. पुराव्यात जमा झाली. विरकरनी मान डोलावली.
"भटा रेस ला पैसे कुठून येतात?"
" मेहेनत करतो. हे पहा पासबुक ." मी कमीशनची एंट्री दाखवली.
"पण रेस मधे जातात ते कुठून येतात."मी काही न बोलणं बरोबर होतं.
विरकर नी माधुरीला फोन लावला. "तुम्हारा भाई घोडेपे पैसा लगाता है क्या?"
" हा . हा. वोही. अच्छा ठीक है."
"मेहेता घोडेपे पैसा बरबाद करता है."पुरावा तयार.कॉंम्प्युटर जमा करून घेतला . सायबरसेलवाले सांगतील काय ते.तोपर्यंत मिश्रानी चहा तयारकेला होता.(मेहेताला घोड्याचा प्रकार कळला असता तर तो वेडाच झाला असता. त्याला साप शिडी तरी येते की नाही हिच शंका होती.)
आज येताना मेहेताला दुसर्‍या बराकीत टाकण्याची व्यवस्था केली होती.माझा जीव तिळतिळ तुटत होता.पण एकदाचं समाधान झालं आणि आम्ही परत फिरलो.मधूनच प्रश्नोत्तर व्हायची . विरकर पाय हलवायला लागला की समजावं विचार चालू आहेत.
विरकरनी एक निष्कर्ष काढला. मला रेसचा नाद होता, मेहेताला पण होता. आम्ही दोघंही कर्जबाजारी झालो होतो. गुन्ह्याचा हेतू सापडला होता.
बराकीत पोहचेपर्यंत मेहेताचा रडण्याचा आवाज यायला लागला होता. जनरलच्या बराकीत धमाल चालली होती.मेहेताला जवळ जवळ
नागडं केलं होतं.दोन काळे येमेनी ,दोघंही नव्वद टक्के नागडे ,त्याच्यामागे धावत होते.थोडा लेट झाला असता तर रेप झालाच असता.
मी गेल्यागेल्या त्याला बाहेर काढवलं .दोन्ही काळे नाराज झाले पण मेहेताल मला फक्त धक्का द्यायचा होता.मेहेता हातपाय पकडून म्हणाला.
"सेठ मेरे दो दिन तो रुकते."
दुसर्‍या दिवशी माधुरीकडे आणखी तीन जमा झाले.टोटल दहा.
मेहेताला वाचवणं माझं परम कर्तव्य झालं होतं आता.
मेहेताला सोडवण्याची खटपट ताबडतोब सुरु केली. विरकर बरोबर तहाची बोलणी सुरु करणं भाग होतं.
--------------------------------------------------------------------------------------------------
पुढचा क्रम लगेच टाकतो आहे.

कथा

प्रतिक्रिया

रामदास's picture

22 Jun 2008 - 1:27 am | रामदास

दोन दिवस थोडे थोडे लिहीत होतो. साठवून ठेवलं तर बोर्डावर येत नाही. काय केलं म्हणजे बोर्डावर यील?

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2008 - 1:53 am | बिपिन कार्यकर्ते

शेठ, जमलंय. आता क्लायमॅसक्स काय होईल? उत्सुकता ताणली जातेय...

बिपिन.

अनिल हटेला's picture

22 Jun 2008 - 5:18 pm | अनिल हटेला

एक दम सही स्पीड आहे....

येउ दे !!!

पुढचा भाग लवकरात लवकर येउ देत !!!!!

यशोधरा's picture

22 Jun 2008 - 5:41 pm | यशोधरा

>पुढचा क्रम लगेच टाकतो आहे.

कुठे आहे?? कुठे आहे???

भडकमकर मास्तर's picture

22 Jun 2008 - 6:20 pm | भडकमकर मास्तर

कसलं भन्नाट आहे राव... तीन वेळा वाचलं ...
जोशी साहेब लै पॉवरबाज आहेत वाटतंय...
"कस्काय जम्तं येकेकाला...?

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऍडीजोशी's picture

23 Jun 2008 - 12:28 pm | ऍडीजोशी (not verified)

जोशी असतातच पॉवरबाज ;)

आपला,

ऍडी (जोशी)
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विद्याधर३१'s picture

23 Jun 2008 - 7:11 am | विद्याधर३१

पिक्चर एकदम डोळ्यासमोर दिसु लागला....
एखादे भारी नाटक किंवा सिनेमा होइल याच्यावर...

विद्याधर

विसोबा खेचर's picture

24 Jun 2008 - 7:14 am | विसोबा खेचर

एखादे भारी नाटक किंवा सिनेमा होइल याच्यावर...

हेच म्हणतो..!

रामदासराव, सुंदर लेखन. औरभी आने दो...

आपला,
(वाचक) तात्या.

धमाल मुलगा's picture

23 Jun 2008 - 12:13 pm | धमाल मुलगा

ह्म्म.....
अपेक्षेप्रमाणे पुन्हा कलाटणी.....

कथेमध्ये नबाब मलीक पुढे काहीतरी खेळ करणार असं फक्त मलाच वाटतंय की खरंच तसं होणार आहे?

मेहताला दिलेला जनरल बराकीचा झटका जबराच!!!

बाकी तुमचा हा जोशी सॉलीड डोकेबाज दिसतोय.
विरकरच्या डोक्याला रेसचा भुंगा लै भारी लाऊन दिला.
च्यामारी,
ओ रामदास काका, आता मी लैच विचार करायला लागलोय...पुढे काय होणार...पुढे काय होणार...
फुकट मी माझं डोस्कं खपवायला लागलोय...त्या विरकरला सांगा मीपण केस सोडवायला मदत करतोय - पॅरा-लिगल म्हणा हवं तर. दे म्हणावं मलाही काहीतरी चिरीमिरी!

भारीच चाललंय हे....
येऊ द्या...

पण..थोड्या गॅपनंतर टाका पुढचा भाग. मी जरा डोकं खाजवतोय, पुढे काय म्हणून.

जोश्याला रेसचा नाद..खरा की खोटा कोण जाणे. तो नाद त्यानं मेहताच्या नावावर खपवलेला...
माधूरीकडे दहा पेट्या जमा. विरकरला माधूरी दमणला भेटणार, नबाबनं पैशाचं बरचसं बोलणं ऐकलेलं.
विरकरला पैसा देऊनही केस दाबता येणं आता शक्य नाही. मेहताच्या घरात चारच कोटी सापडलेले. बाकीचे कुठे असावेत...

झाला..झाला तिच्याआयला, माझा मंदार पटवर्धन झाला!

II राजे II's picture

23 Jun 2008 - 12:20 pm | II राजे II (not verified)

हेच म्हणतो !

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

अरुण मनोहर's picture

24 Jun 2008 - 6:45 am | अरुण मनोहर

मधे खूप गॅप पडली. त्यामुळे थोडा रसभंग झाल्यासारखे वाटले. पण भट्टी पुर्वीसारखीच जमली आहे.
अभीनंदन.

झकासराव's picture

24 Jun 2008 - 2:34 pm | झकासराव

कथानक, भन्नाट वेग,एक दे बढकर एक खेळ्या, चोरावर मोर होण्याचे सगळ्यांचेच प्रयत्न.
मस्तच सुरु आहे. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

II राजे II's picture

24 Jun 2008 - 2:42 pm | II राजे II (not verified)

द बॅंक जॉब चे मराठी भाषांतर नाही ना ???

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

रामदास's picture

24 Jun 2008 - 2:51 pm | रामदास

वाचून सांगतो.

II राजे II's picture

24 Jun 2008 - 2:56 pm | II राजे II (not verified)

चित्रपट आहे तो...
अधीक माहीती येथे आहे... http://en.wikipedia.org/wiki/The_Bank_Job

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

अभिज्ञ's picture

24 Jun 2008 - 6:53 pm | अभिज्ञ

आपल्या लेखणीत कसलि जादू आहे हो?
कथानक जबरदस्त गुंफलेय.
सुंदर लेखन.फारच आवडले.
पुढचा भाग लवकर टाकाच.

अभिज्ञ.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2008 - 12:03 am | llपुण्याचे पेशवेll

जोशाची गेम १० लाखाची. ४० लाख मेहेताचे. एकूण केस १.१ कोटीची. ६० लाख कुठे गेले?

पुण्याचे पेशवे