पिसि .जेसि .आणि आउट.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
7 May 2008 - 5:18 pm

ह्या ष्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी माहिती.
पिसि म्हणजे पोलिस कस्टडी. जेसि म्हणजे ज्युडीशिअल कस्टडी. आउट म्हणजे जामिनावर सुटका.
आय .ओ.म्हणजे चौकशी अधिकारी. पो. नि. म्हणजे आयो शिवाय इतर पोलीस इन्स्पेक्टर.
बाकीची माहिती कथेच्या ओघात येईलंच. बँक फ्रॉड एखाद्या शेअर च्या इश्यु सारखा अंडरराईट होतो.अंडररायटर कोण हे फक्त फ्रॉड उघडकीला आला तरच कळतं कारण सेटलमेंट तोच करू शकतो.आयो सुध्दा सुरुवातीला ह्या प्रश्नाला हात घालत नाही. कारण त्याला तो कधीच पकडू शकत नाही.मॅटर कोणी वाजवली हे तपासाच्या अंतीम टप्प्यात कळतं.तो पर्यन्त आयोची तुंबडी भरलेली असते. एकदा केस बनली की त्याचं काम संपलं. पिसि संपली की आरोपी आणि आयो मित्र.
तपासाच्या दरम्यान सगळ्यांना अटक होते असं काही नाही . गुन्हा दाखल करण्यासाठी लॉजीकली ज्यांना ऍरेस्टकरायला पाहिजे त्यांनांच होते.बाकी बाजार बुणगे बाहेरचं राहतात.आता एवढंच पूरे. नाही तर फार कंटाळवाणं होईल.
---------------------------------------------------------------------------------------------------
बारा जानेवारी २००२ ला संध्याकाळी साडेचार वाजता सरतेशेवटी मला अटक झाली. महिनाभर माझी आणि मेहता, मिश्रा यांची कसून चौकशी चालली होती. चार वाजता विरकर ऍडीशनल सि.पि .ला भेटून परत आले आणि आम्हाला बोलावलं.
देखो मेहता तेरेको पैला चांस.
एफडी रिसिट कौन बनाया?
मेरेकु नही मालूम. हू तो वरली मा छू.मेहेताचे वाक्य संपायच्या आत मेहेताच्या दोन्ही कानाखाली आवाज.
दोन मिंट शांतता. टायपिस्ट मध्येचं थांबले .मेन रोडच्या रहदारीचा आवाज.बाकीचे आयो बोलायचे थांबले.
दहा सेकंदानी मेहेताचा रडण्याचा आवाज. अमावस्येला कुत्रं रडत तशा भेसूर आवाजात.
(जोशी साब अपना नंबर है आज.मिश्रा माझ्या कानात कुजबुजला.)
मेहेता परत विरकर च्या समोर बसला.
महाडीक वाटंच पहात होता. त्यानी मेहेताच्या पाठीत एक जोरात रट्टा हाणला.
मेहेता दोन टेबलाच्या गॅप मध्ये.
विरकरनी पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर ओतला.
मेहेताचा आवाज अजून भेसूर झाला.
तो परत उठून खुर्चीवर बसणार तेवढ्यात विरकरनी खुर्ची वर लाथ मारली.
निचे बैठ गांडू.मेहेता जेमतेम त्या फटीत मावला.
विरकरनी एकदा कपाळावरचा घाम पुसला.महाडीकला सांगीतलं
पट्टा काढा महाडीक...
कपाटातून महाडीकनं पट्टा काढला.
(ये जीतना मार खायेगा उतना अपनेको कम पडेगा)
इसकी भैन आयी क्या आज?
नही साहेब.
फिर रहेने दे .
ती आल्यावर तिच्यासमोर मारतो साल्याला.
काय रावसाहेब , ऍडीशनल नी दिला काय आज?(बांबू)
समोरच्या टेबलवरून प्रधान साहेबांनी तेल घातलं.ही केस त्याला हवी होती खरं म्हणजे पण विरकर स्वताकडे केस मार्क करून घेण्यात हुशार.प्रधानला बार असोसिएशनची भुक्कड केस मिळाली होती.
बँक फ्रॉड मध्ये आरोपी गब्बर .थर्ड डीग्री जास्त वापरावी लागत नाही. आरोपी पेक्षा नातेवाईकांवर प्रेशर घालायचं. चारी बाजूनी कमाई.जोडीला एखादी नवी बाई.पण आर्थिक घोटाळे समजण्याची अक्कल पाहिजे.आणि अफरातफरीचे नेहेमीचे यशस्वी कलाकार माहिती हवेत.गणित साधंसोप असतंय.दोन तीन कारकूनांना मॅनेजर सोबत घेउन यायचं. त्यातल्यात्यात नाजूक जो दिसेल त्याला आधी फटकवायचा.मॅनेजरवर चार चौघात चढायचं.सहा सात तास बसवून ठेवायचं.घरून मोबाइलवर फोन यायला सुरुवात झाली कि फोन हिसकून आपणंच बोलायंच. तोपर्यंत सगळ्यांना मुतायला लागते. दुसर्‍या दिवशी बँकेच्या दोन बायकांना पंधरा विस मिनीटं या शो मध्ये बोलवायचं. तिसर्‍या दिवशी पासून कमाई चालू.पांढरपेशा समाजातले लोक वकीलाला घेउन येत नाहीत. कमीपणा समजतात.अडाणी आरोपीचा वकिल त्याच्या आधी पोलिस स्टेशनला येउन सेटींग लावतो.टॅरीफ ठरलेलं असतंय.महिन्याभराच्या सरावामुळे माझ्या घरून कोणी नाही आलं तरी चालणार होतं
माणसांची गरज अटक झाल्यावर लागते. आत केलेला पैसा तेव्हा कामाला येतो.थर्ड डीग्री पडत नाही. आत केलेला माल पचवता येतो. थोडीशी रिकव्हरी द्यावी लागते पण ठिक आहे . सिनीयर पासून सगळ्यांना बघाव लागतं . वो भी ठिक है. पुढच्या मॅटरचा इन्शुरन्स प्रिमीयम .आयो ची बदली झाली की आणखी एक एरिया आपला.
महिन्याभराच्या काळात सगळ्या युनीटची नाव पाठ झाली होती
---------------------------------------------------------------------------------------------------
त्या भय्याला घे रे आत .
(मेरा नंबर लगा जोशीसाब.)
मिश्रा उठला.हात जोडून विरकर समोर उभा राहिला.
थोबाडीत मारायची तर त्यांना जागेवरून उठावं लागेल असा उभा राहिला.
तू कल रात घर गया था?
हां साब .
*****किधर सोया था?
साब दहिसर गया था.
कौन से बार मे.
इस टेन्शन में क्या घर और क्या बार साब.(मॅटर फुटल्यानंतर मिश्रा घरी गेलाचं नव्हता.)
विरकर जागचा उठला.मिश्रा दोन पावलं मागे सरकला.महाडीक मागे उभाचं होता . त्यानी मिश्राला पुढे ढकललं. मिश्रा विरकरच्या
टप्प्यात आला. फाड्कन आवाज आला. मिश्रा भुईसपाट. ओठ फाटला. रक्त गळायला लागलं.बाहीला रक्त पुसत परत हात जोडून उभा राहीला.
आय**** चा बाप आज हेबिअस कॉर्पस फाइल करून आला.
ऍडीशनल सिपि चढला माझ्यावर आज.
आता विरकर कळवळायला लागला.खूप झालं जमा करा भ***ना.
इतका वेळ माझ्याकडे लक्ष नसलेलं आता पूर्ण माझ्याकडे फोकस झालं होतं.
भटा , तुझी आज वाजवतो.
मी काहीचं बोललो नाही. फक्त नाक दाबून उभा राहीलो. मिश्रा बाजूला उकिडवा बसला होता. तोही उभा राहीला.
साब , त्यानी मेहेताकडे बोट दाखवलं.
मेहेता मुताचा थारोळ्यात बसून होता.
पुढची दहा मिनीटं गतीमान हालचालीत गेली. थोरात मेहेताला बाथरूम मध्ये घेउन गेला.भयंकर ढगळ हाफ चड्डी घालून तो परत आला.
माधुरी , मेहेताची बहिण ठेपला ने चा घेउन आली. विरकर खूश होउन एसिपी साहेबांच्या केबीन मध्ये गेला.
मेहेता आणि मिश्रा दोघांची ऍरेस्ट मेमो रायटर लिहायला सुरुवात केली.
मिश्रा माझ्या बाजूला येउन बसला होता. अचानक खूश होउन म्हणाला
चलो जोशी साब मेरी छुट्टी शुरु.
एक बार पिसि हो गयी तो समझो मॅटर खतम .
ये साला अब और नही मार सकता. दो दो दिन बाद मेडिकल लिखानी पडेगी.
आपको लास्ट अंदर करेगा .
मै मेरा दे देगा. लेकीन आप जादा ढिल नही देना सालेको.
हां माधुरी को बोलना आज नही . कल.
मला सगळं सम़जलं.
आता फक्त पंधरा दिवस.
मी परत एकदा हसलो. विरकर समोर उभा होता.
(ही स्टोरी प्रयोगादाखल लिहीली आहे. पुढचा भाग जर लोकाग्रह दिसला तर. नाहीतर फिलम बदलू.)
,

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

झकासराव's picture

8 May 2008 - 9:21 pm | झकासराव

कळायला कठिण आहे. पुढचे भाग आले तर कळेल पुर्ण मॅटर काय आहे ते.
मी हा भाग दोनदा वाचला.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामदास's picture

8 May 2008 - 11:19 pm | रामदास

या प्रकारचं लिखाण मराठीत मी कमी वाचलं आहे.कुणी लिहिलेलं पाहिलं नाही.
मिपाच्या माध्यमातून हा विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिण्याचा विचार केला तेव्हा मला निर्णयाप्रत येण्यास बराच वेळ लागला.माझा सुद्धा हा पहिला प्रयोग होता.माझ्या कडून काही त्रुटी राहून जातील याची खात्री होती. Paul Erdman हा एकच लेखक होता ज्यानी हा प्रकार सुंदर हाताळला होता.
आपण दोनदा वाचून हा प्रतीसाद दिलात आपला आभारी आहे.
एक नविन चॅप्टर लिहून पाहतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

8 May 2008 - 9:42 pm | llपुण्याचे पेशवेll

हेच म्हणतो मी...
पुण्याचे पेशवे

मन's picture

8 May 2008 - 11:17 pm | मन

पण हे लेखन काही धड समजलं नाही.
संपुर्ण दिवस भर पु: पुनः हीच कथा वाचेत होतो.
पण आपल्या क्षेत्रातील(फिनान्स मधील)खुप जास्त टेक्निकल शब्द वापरले आहेत असं वाटत.
(किंवा कुठल्या तरी वेगळ्याच भाषेतील वापरले आहेत असं वाटलं.)
खुप प्रयत्न केला समजुन घ्याय्चा, पण छ्या. जमल नाय.
बहुदा अगदि अर्व साधारण बुद्धिमत्ता असनार्‍या लोकांसाठी हे नसावं.
"मास ऑडियन्स" साठी हे नाही.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

रामदास's picture

8 May 2008 - 11:56 pm | रामदास

हा या कथेचा पहिला फ्लॅश होता. अजून मांडणी पूर्ण झाली नाही.
मासेस साठी हा विषय नाही असे नव्हे.
कथा विषयाशी त्यांचा जवळून संबंध येत नाही.(येउ नये ही प्रार्थना)
पण इतर क्षेत्रासारखे इथेही नाट्य आहे.
मानवी स्वभावाचे हेलकावे, अगतीकता,स्वार्थ. करुणा, मानभावी पणा सगळं काही आहे पण वाचकाला हे क्षेत्र नविन आहे.
थोडंस सहन करा.
आणखी रंजक आणि सोपं कर्रोन पाहतो.
आभारी आहे.

वाचक's picture

9 May 2008 - 12:07 am | वाचक

मला वाटतं, विराम चिन्हांच्या आणि मोकळी जागा सोडण्याच्या अभावा मुळे थोडे जास्त 'किचकट' वाटते आहे.
पण तुमचे म्हणणे बरोबर असावे - मराठी मधे असल्या विषयावर आणि ह्या फॉर्म मधे वाचल्याचे आठवत नाही.

भडकमकर मास्तर's picture

9 May 2008 - 1:21 am | भडकमकर मास्तर

खरं सांगतो...
भीती वाटली हो वाचताना....
पोलीस स्टेशनात आपल्याला फटकावणार आहेत , काही मिनिटात ही भावना टरकावते आपली....
शिवाय कळायला थोडं अवघड गेलं...
पण जबर्‍या इन्ट्रेष्टिन्ग्...थोडं व्यक्तिरेखन अधिक माहिती देणारं कराल तर बरं राहील...
पण मजा आहे हं या ष्टायलीत्...लिहाच....
वाट पाहतोय...

>>>>>>>>>>>>>>.
अवांतर : याच लायनीवर किडन्या चोरणार्‍या सर्जनची गोष्ट लिहिता येईल..... सुरुवात ... ओटी मध्ये ऍनेस्थेशियापासून , स्काल्पेल, इन्सिजनचे वर्णन, बाहेर नातेवाईक रुग्णाच्या दुसर्‍याच शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत, आणि गरजवंताचे नातेवाईक आशा आणि पैसे लावून बसलेत वाट बघत... तेव्हाच एका वरकरणी इमानदार पोलीसाची एंट्री आणि तो शेवटी पैसे घेऊन पसार... आजची सगळी कमाई पोलीसावरच गेली अशी डॉक्टरची खंत......

अति अवांतर : आपण पेशाने वकील किंवा पोलीसात का ?

रामदास's picture

9 May 2008 - 1:33 am | रामदास

वीस तास गेल्यावर एकही प्रतीसाद नाही .
माझा तर जीव वर खाली होत होता.
दिवसभरात हज्जार वेळा चेक केलं.
वाटलं प्रयोग फसला.
आता वाटत फसला नाही.
माझीच कळा सोसण्याची तयारी नव्हती.
धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

9 May 2008 - 1:57 am | भडकमकर मास्तर

हो, असंच होतं ...
पण तुम्ही नक्की लिहा...
( तुमची गोष्ट वाचून आठवले...माझ्या एका बँकेतील नातेवाईकांकडून त्यांच्या ब्रँच मध्ये घडलेल्या चोरीची ची गोष्ट ऐकली आहे.... कॅशियर ने रक्कम आदल्या दिवशी नीट मोजून ठेवल्यावर पैसे दुसर्‍या दिवशी गायब, अशा प्रकारची गोष्ट होती... कोणीतरी आतल्यानेच केलेली, म्हणजे डाका वगैरे नव्हता...त्यानन्तर तुम्ही लिहिल्याप्रमाणे बराच काळ त्या प्यूनला पीसीमध्ये ठेवून मारहाण झाली असे ऐकले पण तो निरपराध असावा कारण पुढे काहीच तपास लागेना...) असो...

सुमीत's picture

9 May 2008 - 1:33 pm | सुमीत

तुम्ही लेख किती वेळा वाचला गेला ते पाहीले नसेल. मला माहीत नाही का ते पण बर्‍याच वेळा चांगल्या लेखांना पण प्रतिसाद एक दोनच मिळतात. धकाधकीचे आयुष्य्....अजून काय. तुम्ही लिहित राहा.
तसे तुम्ही हा लेख अजून खोलात जाऊन लिहा, लेख मालिका लिहिलित तर वाचायला आवडेल.

अनिल हटेला's picture

27 May 2008 - 5:25 pm | अनिल हटेला

पूढील भागाच्या प्रतीक्षेत..................

अभिता's picture

10 Jun 2008 - 1:16 am | अभिता

मस्त लिहित आहात्.सगळी गोष्ट एकत्र वाचता आली तर मझा येईल. न कळण्यासारखे काहि नाही असे वाटते. किंवा माझा घरचा अभ्यास चांगला असावा.(कॅप्टन दिप,समशेर,इत्यादिचे वाचन )