(बिल्ली हरवली)

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
7 May 2011 - 2:55 am

विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल

हरवली आहे एक बिल्ली...
सुगरण, परंतु चित्र- विचित्र पदार्थच रांधणारी,
नांवं उच्चारतांना वाचकाची जीभ लुळी पाडणारी...

हरवली आहे एक बिल्ली...
शुद्धलेखनप्रेमींचं अवघं मराठी बिघडवणारी,
अच्रत-बव्ल्त शब्दांची उधळण करत नाचणारी...

हरवली आहे एक बिल्ली...
लेखन आणि फोटोग्राफी दोन्ही सुरेख करणारी,
पण न पाहिलेल्या काकीच्या आठ्वणीने हमसून रडणारी...

हरवली आहे एक बिल्ली...
सर्वतापी चारोळ्यांची रांगोळी काढणारी,
तरण्याताठया लोकांना उगाच काका बनवणारी...

हरवली आहे एक बिल्ली...
स्वतःच स्वत:ला बावीस सप्तमांश म्हणवून घेणारी,
विक्षिप्तपणामधे देखील तार्किकता लपवू न शकणारी...

हरवली आहे एक बिल्ली...
समोरून वीट यायच्या आधीच पत्थर सुरू करणारी,
हालोवीनच्या दिवसांत झाडूवर बसून उडणारी....

(सूचना: वरील बिल्ल्या हरवल्या आहेत. कुणास सापडल्यास पिशवीत घालून मिपावर आणून पोचवाव्यात. बिल्ली पकडतांना हातावर ओरखडे निघाल्यास मंडळ जबाबदार नाही!!!!)

लवकरच स्वर्गवासी,
पिडांकाका
:)

भयानकहास्यनृत्यबालगीतविडंबन

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ, बिल्लीसम्मेल्लन भरवायचं आहे का काय अमेरीकेच्या कोकणात यंदा? ;-)

बाकी बिल्ल्या भलत्याच बोचर्‍या असतात असा आपला अनुभव असल्याने आपण काय शोधायला जाणार नाय ब्वॉ! ;-)

(जेरी)

प्रियाली's picture

7 May 2011 - 4:28 am | प्रियाली

उडवली आहे एक खिल्ली
दगडांऐवजी टाळ्या मारायला लावणारी
निगरगट्ट खडूस चेहर्‍यावरही स्मित आणणारी... ;)

(पत्थरप्रेमी) प्रियाली मेसन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 May 2011 - 8:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही पहिले 'खिल्ली उडवली' हेच आठवलं.

उडवली आहे रोजच खिल्ली
टार्गेट मात्र स्वतःलाच केलेली
कोटी करमणूक स्वत:साठीच असलेली

(वाघाची, तीनाच्या अपूर्णांकातली मावशी) अदिती

लै भारी..

असेच काही बिल्ले पण हरवलेले आहेत..

हरवला आहे एक बिल्ला...
भल्या भल्यांना गप्प करनारा,
संपादकांच्या नेहमी डोक्यात जानारा...

--टुकुल

राजेश घासकडवी's picture

7 May 2011 - 4:57 am | राजेश घासकडवी

मालकांनी प्रेमाने 'काही अडचण आहे का?' विचारल्यावर सरळ त्या धाग्यावरतीच लिहायचं, तर ते नाही. असल्या काहीतरी आचरट, टारगट कविता लिहायच्या.... अहो, करतील सगळ्या बिल्ल्या आपापले फोटू पुन्हा अपलोड. धीर धरा.

पिवळा डांबिस's picture

7 May 2011 - 6:50 am | पिवळा डांबिस

अडचण काहीच नाही आणि फोटूंचीही आवश्यकता नाही...
सगळ्या बिल्लीतायांनी पुन्हा लिहायला सुरवात करावी म्हणून केलेलं हे अंमळ मिस्किल आवाहन आहे!!!!

मिल्कशेक पाककृती
अतीरेक जाहला निश्चिती |
म्हणोनि बिल्लीतायांप्रती
आवाहन पामराचे ||
:)

सहज's picture

7 May 2011 - 7:36 am | सहज

मस्त हो बोकोबा!


फोटो जालावरुन

प्रीत-मोहर's picture

7 May 2011 - 8:10 am | प्रीत-मोहर

मस्त हो पिडांकाका....

टारझन's picture

7 May 2011 - 10:21 am | टारझन

खी खी खी ...

चला तोवर मी " ओ बिल्लो राणी .. कहो तो अपणी जाण दे दुं .. " अतिशय टुकार आवाजातलं पण चांग्ला विडियो असलेलं गाणं पाहुन आलो :)

- ( किल्ली फॉर ए बिल्ली ) टारझन टल्ली

अरुण मनोहर's picture

7 May 2011 - 10:43 am | अरुण मनोहर

वाहवा! खळखळून हसायला लावणारे विडंबन!

- डांबीस बिल्ला.

मस्त कलंदर's picture

7 May 2011 - 3:37 pm | मस्त कलंदर

मस्तच!!!

श्रावण मोडक's picture

9 May 2011 - 10:00 pm | श्रावण मोडक

पिडां,
या भाटीलाही या कवितेत घ्या आणि सप्तबिल्ल्या करून टाका.

विडंबन वाचून खालील विचार मनात डोकावून गेला हो पिडाकाका...

"बिल्ली बदनाम हुई डांबिस तेरे लिये"

हलकेच घ्या... :)

- पिंगू

श्रावण मोडक's picture

7 May 2011 - 4:09 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... लय भारी.

यशोधरा's picture

7 May 2011 - 8:47 pm | यशोधरा

:)

ती कथा थय अर्धवट ठेवन हय विडंबनाची कडबोळी पाडतास काय काका? :P कथेचो पुढचो भाग कधी?

ajay wankhede's picture

7 May 2011 - 9:37 pm | ajay wankhede

राव तुम्हि लगेच काळे पिव्ळे होता असं वाट्ते ..
जरा पेशन्स ठेवा...नाहितर का चा मा होईल.
बिल्लि आव्डलि..

पंगा's picture

7 May 2011 - 11:16 pm | पंगा

...(नक्की कोणी ते आठवत नाही, पण) कोणीतरी मनोगतावर 'माझ्या मनोगती मैत्रिणी' नावाची एक लेखमालिका सुरू केली होती, त्याची आठवण झाली.

टाकली आहे एक गुगल्ली
'काका' असं ऐकून फिस्करणारी
'लिहा'म्हणत बिल्ल्यांना वेठीस धरणारी.. ;) :P

(यल्लो ना 'काका' उपाधी देणारी सर्वतापी)

नरेशकुमार's picture

9 May 2011 - 6:19 am | नरेशकुमार

मुझे जंगली बिल्लिया बोहोत पसंद है !
डॉन - भाग दोन. शाहरुख खान टु प्रियांका चोप्रा.

विनायक बेलापुरे's picture

8 May 2011 - 11:58 am | विनायक बेलापुरे

बिल्ली हरवलीच आहे ना फक्त ? मारली नाही ना कुणी ?

मग काळजी नका करु ........ बिल्ल्या घराला धार्जिण्या असतात ......

पोत्यात घालून कितीही जरी दूर नेउन सोडले तरी येतातच घरी माघारी ..... ;)

गीव्ह बिल्लीज देअर ओन टाइम

विसोबा खेचर's picture

9 May 2011 - 10:55 am | विसोबा खेचर

मस्त धमाल रे..!

विजुभाऊ's picture

9 May 2011 - 11:09 pm | विजुभाऊ

डांबीस काका.
हल्ली हल्ली मांजर्‍या कशाचाही अभ्यास करतात
चंद्र तारे सोडून गंज लागलेली चित्रे बघत असतात.
कपड्यावरच्या डागांना चित्र मानून त्यात अर्थ शोधत बसतात.
विसरून धूमकेतूच्या शेपटीच फराटे मोहवितात त्याना झाडु अन खराटे
तुम्हाला हवी ती आनन्दी मांजरी सापडेल तिच्या गुहेतच.
वाघाला भाचा बनवणारी अन मधुनच उगाच गुर्र करणारी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 May 2011 - 11:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अश्लील, अश्लील, अश्लील!!!