मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(बिल्ली हरवली)

पिवळा डांबिस · · जे न देखे रवी...
काव्यरस
विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल हरवली आहे एक बिल्ली... सुगरण, परंतु चित्र- विचित्र पदार्थच रांधणारी, नांवं उच्चारतांना वाचकाची जीभ लुळी पाडणारी... हरवली आहे एक बिल्ली... शुद्धलेखनप्रेमींचं अवघं मराठी बिघडवणारी, अच्रत-बव्ल्त शब्दांची उधळण करत नाचणारी... हरवली आहे एक बिल्ली... लेखन आणि फोटोग्राफी दोन्ही सुरेख करणारी, पण न पाहिलेल्या काकीच्या आठ्वणीने हमसून रडणारी... हरवली आहे एक बिल्ली... सर्वतापी चारोळ्यांची रांगोळी काढणारी, तरण्याताठया लोकांना उगाच काका बनवणारी... हरवली आहे एक बिल्ली... स्वतःच स्वत:ला बावीस सप्तमांश म्हणवून घेणारी, विक्षिप्तपणामधे देखील तार्किकता लपवू न शकणारी... हरवली आहे एक बिल्ली... समोरून वीट यायच्या आधीच पत्थर सुरू करणारी, हालोवीनच्या दिवसांत झाडूवर बसून उडणारी.... (सूचना: वरील बिल्ल्या हरवल्या आहेत. कुणास सापडल्यास पिशवीत घालून मिपावर आणून पोचवाव्यात. बिल्ली पकडतांना हातावर ओरखडे निघाल्यास मंडळ जबाबदार नाही!!!!) लवकरच स्वर्गवासी, पिडांकाका :)

वाचन 5398 प्रतिक्रिया 0