Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिवळा डांबिस on Sat, 05/07/2011 - 02:55
विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल हरवली आहे एक बिल्ली... सुगरण, परंतु चित्र- विचित्र पदार्थच रांधणारी, नांवं उच्चारतांना वाचकाची जीभ लुळी पाडणारी... हरवली आहे एक बिल्ली... शुद्धलेखनप्रेमींचं अवघं मराठी बिघडवणारी, अच्रत-बव्ल्त शब्दांची उधळण करत नाचणारी... हरवली आहे एक बिल्ली... लेखन आणि फोटोग्राफी दोन्ही सुरेख करणारी, पण न पाहिलेल्या काकीच्या आठ्वणीने हमसून रडणारी... हरवली आहे एक बिल्ली... सर्वतापी चारोळ्यांची रांगोळी काढणारी, तरण्याताठया लोकांना उगाच काका बनवणारी... हरवली आहे एक बिल्ली... स्वतःच स्वत:ला बावीस सप्तमांश म्हणवून घेणारी, विक्षिप्तपणामधे देखील तार्किकता लपवू न शकणारी... हरवली आहे एक बिल्ली... समोरून वीट यायच्या आधीच पत्थर सुरू करणारी, हालोवीनच्या दिवसांत झाडूवर बसून उडणारी.... (सूचना: वरील बिल्ल्या हरवल्या आहेत. कुणास सापडल्यास पिशवीत घालून मिपावर आणून पोचवाव्यात. बिल्ली पकडतांना हातावर ओरखडे निघाल्यास मंडळ जबाबदार नाही!!!!) लवकरच स्वर्गवासी, पिडांकाका :)

Submitted by Nile on Sat, 05/07/2011 - 03:38

Permalink

हॅ हॅ हॅ, बिल्लीसम्मेल्लन

हॅ हॅ हॅ, बिल्लीसम्मेल्लन भरवायचं आहे का काय अमेरीकेच्या कोकणात यंदा? ;-) बाकी बिल्ल्या भलत्याच बोचर्‍या असतात असा आपला अनुभव असल्याने आपण काय शोधायला जाणार नाय ब्वॉ! ;-) (जेरी)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 05/07/2011 - 04:28

Permalink

खिल्ली उडवली

उडवली आहे एक खिल्ली दगडांऐवजी टाळ्या मारायला लावणारी निगरगट्ट खडूस चेहर्‍यावरही स्मित आणणारी... ;) (पत्थरप्रेमी) प्रियाली मेसन.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 05/07/2011 - 20:38

In reply to खिल्ली उडवली by प्रियाली

Permalink

मलाही पहिले 'खिल्ली उडवली'

मलाही पहिले 'खिल्ली उडवली' हेच आठवलं. उडवली आहे रोजच खिल्ली टार्गेट मात्र स्वतःलाच केलेली कोटी करमणूक स्वत:साठीच असलेली (वाघाची, तीनाच्या अपूर्णांकातली मावशी) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Sat, 05/07/2011 - 04:35

Permalink

लै भारी.. असेच काही बिल्ले पण

लै भारी.. असेच काही बिल्ले पण हरवलेले आहेत.. हरवला आहे एक बिल्ला... भल्या भल्यांना गप्प करनारा, संपादकांच्या नेहमी डोक्यात जानारा... --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 05/07/2011 - 04:57

Permalink

काही अडचण आहे का?

मालकांनी प्रेमाने 'काही अडचण आहे का?' विचारल्यावर सरळ त्या धाग्यावरतीच लिहायचं, तर ते नाही. असल्या काहीतरी आचरट, टारगट कविता लिहायच्या.... अहो, करतील सगळ्या बिल्ल्या आपापले फोटू पुन्हा अपलोड. धीर धरा.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 05/07/2011 - 06:50

In reply to काही अडचण आहे का? by राजेश घासकडवी

Permalink

मालक नीड नॉट बी बॉदर्ड...

अडचण काहीच नाही आणि फोटूंचीही आवश्यकता नाही... सगळ्या बिल्लीतायांनी पुन्हा लिहायला सुरवात करावी म्हणून केलेलं हे अंमळ मिस्किल आवाहन आहे!!!! मिल्कशेक पाककृती अतीरेक जाहला निश्चिती | म्हणोनि बिल्लीतायांप्रती आवाहन पामराचे || :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 05/07/2011 - 07:36

Permalink

हा हा हा

मस्त हो बोकोबा! Image removed. फोटो जालावरुन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Sat, 05/07/2011 - 08:10

Permalink

मस्त हो पिडांकाका....

मस्त हो पिडांकाका....
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 05/07/2011 - 10:21

Permalink

खी खी खी ... चला तोवर मी " ओ

खी खी खी ... चला तोवर मी " ओ बिल्लो राणी .. कहो तो अपणी जाण दे दुं .. " अतिशय टुकार आवाजातलं पण चांग्ला विडियो असलेलं गाणं पाहुन आलो :) - ( किल्ली फॉर ए बिल्ली ) टारझन टल्ली
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Sat, 05/07/2011 - 10:43

Permalink

वाहवा! खळखळून हसायला लावणारे

वाहवा! खळखळून हसायला लावणारे विडंबन! - डांबीस बिल्ला.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Sat, 05/07/2011 - 15:37

Permalink

:-)

मस्तच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 05/09/2011 - 22:00

In reply to :-) by मस्त कलंदर

Permalink

भाटी

पिडां, या भाटीलाही या कवितेत घ्या आणि सप्तबिल्ल्या करून टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Sat, 05/07/2011 - 15:50

Permalink

विडंबन वाचून खालील विचार मनात

विडंबन वाचून खालील विचार मनात डोकावून गेला हो पिडाकाका... "बिल्ली बदनाम हुई डांबिस तेरे लिये" हलकेच घ्या... :) - पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 05/07/2011 - 16:09

Permalink

हाहाहाहा

हाहाहाहा... लय भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 05/07/2011 - 20:47

Permalink

ती कथा थय अर्धवट ठेवन हय

:) ती कथा थय अर्धवट ठेवन हय विडंबनाची कडबोळी पाडतास काय काका? :P कथेचो पुढचो भाग कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by ajay wankhede on Sat, 05/07/2011 - 21:37

Permalink

बिल्लि सापडेल.....

राव तुम्हि लगेच काळे पिव्ळे होता असं वाट्ते .. जरा पेशन्स ठेवा...नाहितर का चा मा होईल. बिल्लि आव्डलि..
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sat, 05/07/2011 - 23:16

Permalink

फारा वर्षांपूर्वी...

...(नक्की कोणी ते आठवत नाही, पण) कोणीतरी मनोगतावर 'माझ्या मनोगती मैत्रिणी' नावाची एक लेखमालिका सुरू केली होती, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 05/07/2011 - 23:30

Permalink

टाकली आहे एक गुगल्ली'काका'

टाकली आहे एक गुगल्ली 'काका' असं ऐकून फिस्करणारी 'लिहा'म्हणत बिल्ल्यांना वेठीस धरणारी.. ;) :P (यल्लो ना 'काका' उपाधी देणारी सर्वतापी)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 05/09/2011 - 06:19

Permalink

मार ड्डाला.

मुझे जंगली बिल्लिया बोहोत पसंद है ! डॉन - भाग दोन. शाहरुख खान टु प्रियांका चोप्रा.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on Sun, 05/08/2011 - 11:58

Permalink

बिल्ली हरवलीच आहे ना फक्त ?

बिल्ली हरवलीच आहे ना फक्त ? मारली नाही ना कुणी ? मग काळजी नका करु ........ बिल्ल्या घराला धार्जिण्या असतात ...... पोत्यात घालून कितीही जरी दूर नेउन सोडले तरी येतातच घरी माघारी ..... ;) गीव्ह बिल्लीज देअर ओन टाइम
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 05/09/2011 - 10:55

Permalink

मस्त धमाल रे..!

मस्त धमाल रे..!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 05/09/2011 - 23:09

Permalink

डांबीस काका. हल्ली हल्ली

डांबीस काका. हल्ली हल्ली मांजर्‍या कशाचाही अभ्यास करतात चंद्र तारे सोडून गंज लागलेली चित्रे बघत असतात. कपड्यावरच्या डागांना चित्र मानून त्यात अर्थ शोधत बसतात. विसरून धूमकेतूच्या शेपटीच फराटे मोहवितात त्याना झाडु अन खराटे तुम्हाला हवी ती आनन्दी मांजरी सापडेल तिच्या गुहेतच. वाघाला भाचा बनवणारी अन मधुनच उगाच गुर्र करणारी.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 05/09/2011 - 23:37

In reply to डांबीस काका. हल्ली हल्ली by विजुभाऊ

Permalink

अश्लील, अश्लील, अश्लील!!!

अश्लील, अश्लील, अश्लील!!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5386 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com