डिस्क्लेमर :
आधीच्या ९ भागांचा या भागाशी काही-एक संबंध नाही.
मी ,स्पा वेग्रे उपटसुंभ्या लोकांनी ५० फक्त यांच्या लग्नाची पत्रिका छापायचे/वाटायचे ठरवले..
त्यासाठी ही छापलेली पत्रिका अन चेष्टा...
ही प्रत्येक मिपाकर मंडळीपर्यंत पोचवुन त्या दांपत्याला शुभाशिर्वाद मिळावेत म्हणुन हा छोटासा प्रयत्न ...
दिल्लगी आहे दिल्लगीतच घ्यावे ही सर्व रसिक जणांना विनंती.
.
.
.
.II श्री अष्टविनायक प्रसन्न II
आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, .
...
II वर II ----------------------II वधु II
चि. हर्षद ---------------- चि. सौ. माधवी
रा. सोलापुर ------------------- रा. बार्शी
यांचा शुभविवाह अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर करण्याचे योजिले आहे.
तरी आपण सहकुंटुंब, मित्रपरिवारासह उपस्थित
राहुन वधु-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत ही विनंती.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
देवकार्य : वैशाख शु.द्वितिया, सायंकाळी ९ वाजता
विवाह मुहुर्त : अक्षय्य तृतीया, शके १९३३, सकाळी १०:३० वाजता.
विवाहस्थळ : सरुटॉबाने
मार्गदर्शन : वल्ली, जातिवंत भटका व विमुक्त.
मंत्र जाप्य : सखी, यशोधरा व पुष्करिणी.
कार्यकारी पंडित : पंगाशेट
आचारी : रेवतीआज्जी अन गणपा (पियुशा यांच्या सहकार्यात)
: प्रतिष्ठाण :
स्पा भेळवाले, टार्या एंटरप्रायझेस,
इंट्या चार्टर्ड अकाउंटंट्स, परा नेट क्याफे.
: प्रेषक :
धमाल मुलगा, पुणे-३० व
वपाडाव, गोदावरी चाळ, नांदेड.
कार्याध्यक्ष : सरपंच
विनीत
समस्त मिपाकर मंडळी
दादाच्या लग्नाला यायचं हं !!
(मुवे, अपर्णा, मृग्गा, सुड)
उखाणे प्रायोजक : गणेशा, मनराव
छायाचित्रकार : शरद
वाजंत्री : प्रास
आहेर अन पाकिटंच स्विकारल्या जातील. फुलं आणु नयेत. नवदांपत्यांना संसारोपयोगी सामान गरजेचे आहे हे लक्षात ठेवावे.
कुणाचं नाव अनावधानाने राहिले असल्यास क्षमा असावी...
प्रतिक्रिया
6 Apr 2011 - 3:39 pm | माझीही शॅम्पेन
नाक्ककी येणार ..
आहेराच काय करायाच ?
:)
6 Apr 2011 - 3:54 pm | वपाडाव
आपल्या रिक्वेस्टला पाहुन नविन कलम जोडण्यात आलेला आहे...
तसं करु का? म्हंजे प्रतिक्रिया वेश्ट जाइल? हो की नाय...
6 Apr 2011 - 3:40 pm | पैसा
:)
आचार्यांबरोबर आणि आचार्यांबरोबर कॉण्ट्रॅक्ट केलंस का? नाहीतर पोकल बांबूचे फटके बसतील!
6 Apr 2011 - 3:47 pm | नि३सोलपुरकर
वधु-वरांस शुभाशिर्वाद
6 Apr 2011 - 3:48 pm | माझीही शॅम्पेन
कशाला बारबेक़ू-नेशन आहेना !!!
गोव्याहून क्रइस्तव बामन मागवु शकाल !
6 Apr 2011 - 3:57 pm | स्पा
हॅ हॅ हॅ
पावण्यांना अफाट भेळ चारण्यात येईल
(तेवढंच जेवणाची पान कमी होतील ;) )
6 Apr 2011 - 3:59 pm | सूड
'आपटें' शोभता !!
6 Apr 2011 - 4:28 pm | वपाडाव
पावणे म्हंजे नक्की कोण?
हे विचारायला विसरलास का रे सुड?
6 Apr 2011 - 4:00 pm | स्पा
आपटें' शोभता !!
हॅ हॅ हॅ
6 Apr 2011 - 4:01 pm | धमाल मुलगा
=)) =))
च्यायला!!!
लेको, हर्षदचं ठीक आहे, त्याला गुदगुल्या झाल्या असतील. चुकुन वहिनीनं वाचला हा धागा तर त्या बिचार्याची काय गत होईल ह्याचा विचार केलात का? ;)
6 Apr 2011 - 4:07 pm | विशाखा राऊत
लग्नात जेवायला भेळ.. अग्गो बाई
बाकि आमंत्रण एकदम झक्कास...
6 Apr 2011 - 4:12 pm | यशोधरा
हे काय? :D
6 Apr 2011 - 4:30 pm | गणेशा
आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, .
सुरुवातच जबर्या आहे ..
---
बाकी उखाने कधी चालु करायचे .. लग्ना नंतर काय ...
एक नमुना :
वहिनी साहेबा:
स्पा च्या प्रतिसादाला संमं ची छडी
स्पा च्या प्रतिसादाला संमं ची छडी
हर्षदरावांच्या संगतीन पुन्हा मी
खादाडीवर मारते उडी ..
खादाडीवर मारते उडी ...
6 Apr 2011 - 4:33 pm | यशोधरा
LOL! भारीये उखाणा!
6 Apr 2011 - 5:10 pm | सूड
वाढपी उभे पाणक्ये उभे
उजवं-डावं कळेना,
भेळेने भरलं पान
काही वाढायला जागा मिळेना !! :D
6 Apr 2011 - 5:48 pm | गणेशा
छानच
6 Apr 2011 - 4:59 pm | हरिप्रिया_
:)
लै भारी....
6 Apr 2011 - 5:43 pm | जातीवंत भटका
वधूवरांस ३ "लार्ज" हालत्या डुलत्या शुभेच्छा !!
--
जातीवंत बेवडा :)
6 Apr 2011 - 11:07 pm | प्रास
आमची वाजंत्री-सेवा आतापासूनच सुरू.....
वि.सू. -
उपरोल्लेखित नाद सनईचा ध्वनि मानावा नि तो (ढुम्) चौघड्यावरील समेची खूण मानावी ही प्रेमळ विनंती....
:-)
7 Apr 2011 - 4:28 am | स्पंदना
ब्यांडवाल्यात गवींची 'ल्युना ' लावायची ना? पाहिजे तेंव्हा पाहिजे तसले आवाज काढते ती.
बाकि लग्नात 'भेळ, अन मिसळ' ही प्रमुख पक्वान्न राहतील.
दारात्च आहेर चेक करुन मग आत सोडल जाइल.
वरातीत नाचायला तिकिटे बुक करा !! त्वरित ! त्वरित!
7 Apr 2011 - 11:33 am | वपाडाव
तिकिटे बुक करण्याकरिता खालील संस्थळावर धडक मारावी...
www.aparnatoursandtravels.co.in.sn (याला प्रसन्ना च्या धर्तीवर वाचावे.)
वरातीची सगळी सोय केल्या गेली आहे.
(होय सगळीच, आदल्या दिवशी चढवण्यापसुन दुसर्या दिवशी उतरेपर्यंत)
बुकिंग करता परा नेट क्याफे वर गेल्यास घसघशित सुट मिळेल.