मी जर हा असतो तर : भाग २

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
10 May 2008 - 3:38 pm

ह्यावेळी मी मिपा कुटुंबियांवर लिहणार नसून एकंदरीत सामाजीक परिस्थीतीवर आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींवर लिहणार आहे...

मी जर कॉन्ग्रेसचा नेता असतो तर,
मी आपल्याला निवडणूकीत लोकांसमोर जायला कुठलेच विधायक कार्यक्रम उरले नाहीत का याचा विचार केला असता.
महात्मा गांधींनी स्थापन केलेया पक्षाची आपण लावलेली वाट पाहून व त्या बद्दल शरम वाटून राजघाटावर जाउन गांधींची क्षमा मागितली असती.
राहूलसाठी केलेल्या चापलूसकीमुळे आपली प्रतिमा बिघडत चालल्याबद्दल विचार केला असता. आरक्षणाच्या मुद्द्यावर एक ठाम भुमीका घेतली असती.
सत्तेसाठी आपण डाव्यांचे लाड करून देशाचे नुकसान करतो आहोत जे जाणून सत्तीला लाथ मारली असती व ताठ मानेने निवडणूकीला सामोरे गेलो असतो ....

मी जर राहुल गांधी असतो तर,
पहिल्यांद्या आपल्या भोवती असलेल्या चापलूसकांच्या चांडाळ चौकडीला लाथ मारून आपली जनमानसातील प्रतिमा सुधारली असती.
गांधी घराण्याच्या वलयाचा वापर देशाच्या व पक्षाच्या कल्याणासाठी केला असता.
झालच तर स्वताच्या मनाने परिस्थीतीचा अभ्यास करून भाषणे दिली असती, सध्यासारखी नुसती वाचून दाखवली नसती.
दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
स्वताबद्दल पंतप्रधानपदासाठी उडणाऱ्या वावड्यांना आपण अजून तेवढे परिपक्व नसल्याचे नमूद करून पुर्णविराम दिला असता.
स्वताला आपण देशावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याचे युवराज नसुन देशाच्या कल्याणासाठी अनेक वेळा बलिदान करणाऱ्या गांधी घराण्याचा एक पुढचा सैनिक आहे असे समजावले असते.

मी जर भाजपा नेता असतो तर,
मी कुणा एकाचे नेतत्व मान्य करून पक्षबांधणीसाठी स्वताला वाहून घेतले असते.
उठसुठ गांधी घराण्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नाठाळांवर कसा काबू करायचा याचा विचार केला असता.
विरोधी पक्षाची भुमीका नुसती "विरोधासाठी विरोध " अशी नसते हे समजावून घेतले असते.
पुढच्या निवडणूकीसाठी आत्ताच तयारी सुरु केली असती व त्यासाठी जनतेच्या व देशाच्या कल्याणाचा एक कार्यक्रम लोकांसमोर ठेउन त्याआधारे निवडणूकांना सामोरे गेलो असतो.
पराभवानंतर मनाला लाजवेल असे आकांडतांडव केले नसते व विजयानंतर हुरळून पण गेलो नसतो ...

मी जर गोपीनाथ मुंडे असतो तर,
महाजनांनंतर पक्षाला मी सोडून महाराष्ट्रात कुणीच वाली नाही ह्याचा गैरफायदा घेतला नसता.
पक्षाला उठसुठ ब्लॅकमेल केले नसते.
गडकरींशी एकदा काय आहे ते मिटवून शेवटी दोघांनी मिळून पक्ष पुढे न्हेला असता.
मिडीयाच्या व लोकांच्या मनात पाल चुकचुकेल अशी "जातीच्या आधारे पक्ष" काढण्याबद्दल हालचाल केली नसती.

मी जर लालू प्रसाद यादव असतो तर,
उठसुठ कुणाला दमात घेण्यापेक्षा आपली भारतीय राजकारणात प्रतिमा "जोकर" कशामुळे झाली याचा विचार केला असता.
"राज ठाकरे" यांच्या घरासमोर "छटपुजा" घ्यायचा हट्ट टाकून ती सुधारलेल्या बिहारच्या भुमीत कशी घेता येईल यांसंबंधी विचार केला असता.
येवढी वर्षे सत्ता असुन आपण काहीच करू शकलो नाही याबद्दल शरम वाटून राजकारणातुन सन्यास घेउन स्वताच्या मालकीची मालकीची "गोपालनशाळा" काढली असती व राबडीला बरोबर घेउन मस्त धंदा संभाळला असता. आत्तापर्यंत पाळलेल्या साधू यादव सारख्या गुंडांचा वापर आपली गुरे सुरक्षीत ठेवण्यासाठी केला असता.
राज ठाकरेंवर टिका करण्याआगोदर "ते रस्ताने गेले तर लोक पाया पडतात व आपण रस्ताने चाललो तर लोक दगड का मारतात ?" याचा विचार केला असता ....

मी जर अबु आझमी असतो तर,
राज ठाकरेंना धडा शिकवायला थेट आझमगढहून २०००० माणसे आणण्यापेक्षा त्यांचे कल्याण तिकडेच कसे करता यीएल हे पाहिले असते.
आपली लायकी काय आहे हे न समजता भैय्या चॅनेल्स वर अशा बेफाट मुलाखती दिल्या नसत्या.
परिस्थीती लै बिघडली व आपल्याला महाराष्ट्रात जाणे अशक्य झाले तर पोट कसे भरावे यासाठी प्लॅनिंग चालू केले असते.

मी जर अमरसिंग असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. पुन्हा कुणी विचारले की बच्चन घराण्याशी तुमचा काय संबंध तर ही नाती त्याच्या तोंडावर फेकली असती.
त्यांच्यापैकी कुणाला साधी शिंक जरी आली तरी न्युज चेनेल्सना हाताशी घरून सगळे वातावरण पेटवले असते व राज ठाकरेच्या अटकेची मागणी केली असती.
उत्तर प्रदेशातली सत्ता गेलीच आहे आता लोकसभेत परिपत्य झाल्यावर पळायचे कुठे ह्याचा प्लॅन रेडी ठेवला असता. कधीतरी वेळ काढून शिवसेनेच्या संजय राउतांबरोबर मिसळपार्ट्या झोडून "मी कसा मराठी संस्कृतीशी मिसळून राहतो " ह्याबद्दल न्युज चॅनेल्सवर अखंड बडबड केली असती.
थोडक्यात सध्या वागतो तसेच मुर्खासारखे वागलो असतो.

मी जर राज ठाकरे असतो असतो तर,
वर उल्लेख केलेल्या माकडांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले असते.
शिवसेनेशी न भांडता मराठी माणसाचा उत्कर्ष कसा करता येईल हे पाहिले असते.
शक्यतो आपल्या आंदोलनात सामान्य माणसे भरडली जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवले असते.

मी जर देवेगौडा असतो तर,
कोलांट्याउड्या मारण्यामध्ये आपला एक नवा जागतीक विक्रम झाला आहे असे गिनीस बूक वाल्यांना कळवले असते व त्याची सगळीकडे जहिरात केली असती.
सध्या होणाऱ्या निवडणूकात पण ह्या विक्रमाच्या आधारे मते मागितली असती.
आम्हाला स्थिर सरकार द्या म्हणणाऱ्या लोकांना व पक्ष कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या "विधानसौधेवरून" फेकून दिले असते.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात "राईस सांबार" विकण्याचे दुकान काढले असते व शेजारी आपल्या मुलाला म्हणजे कुमारस्वामीला कॉफी व सिगारेट विकायची टपरी काधून दिली असती व दिवसभर गल्ल्यावर "फक्त कन्नड गाणी " ऐकत झोपा काढल्या असत्या.

मी जर कुमार केतकर असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीच्या चापलूस गटाचे कायदेशीर सदस्यत्व घेतले आस्ते.
आपण जे मुर्खासारखी विधाने करतो अथवा लेख लिहतो त्यामागचे कारण म्हणजे आपल्याला लागलेला "म्हातारचळ" आहे का याचा विचार केला असता.
आपण खरेच निरपेक्षपणे लिहू शकत नाही हे ओळखून वर्तमानपत्राच्या सम्पादकपदाचा राजीनामा दिला असता.
कुठल्या संभेलना बोलावल्यास तेथे जाउन, आयोजकांबरोबर भांडणे काढून, कुढल्या जातीवर टीका करुन स्वताला पळून जायची वेळ येउ दिली नसती ...
लोक आपल्याला सुमार केतकर का म्हणतात याचाही अभ्यास केला असता.

मी जर संजय राउत असतो तर,
सामना हे फक्त शिवसेनेच्या बातम्याला वाहून घेतलेले वृत्तपत्र नव्हे हे दाखवून दिले असते.
ह्या गोष्तीमुळे आपल्या वर्तमानपत्राची प्रतिमा संध्यानंदसारखी होत आहे याची काळजी केली असती.
मराठी माणसाचे हित लक्षात घेउन राजच्या सभेचा पानभर वृत्तांत दिला असता.
दररोज शिवसेनेच्या विजयाबद्दल व विरोधकांच्या पराभवाबद्दल देमार बातम्या देउन स्वताचे हसे करून घेतले नसते.
एकेकाळी सामना हा मराठी माणसाचा मानबिंदु होता याची आठवण ठेवली असती ....

मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ. ] असतो तर,
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ...

हे ठिकाणप्रतिसादप्रतिक्रियालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

10 May 2008 - 3:50 pm | अभिज्ञ

डॉन साहेब,
लेख छान झालाय.
चिमटे जबरदस्त काढले आहेत.

लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ...

हा हा हा.लै भारी काढलि आहे. =D>
खल्लास.
कुण्या न्युज चॅनेल वाल्याने वाचले तर लगिच मनावर घेतील हो. :SS

असेच पुढचे लेख येउ द्यात. ;)

अबब

गणपा's picture

10 May 2008 - 3:54 pm | गणपा

डॉन्या जबरा...
मी जर अमरसिंग असतो तर,
जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , =)) =)) खल्लास.
मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ] . असतो तर,
देव करो नी तुमचा न्युज चॅनेल्सवाला होवो. ऊत आणलाय हराम़खोरांनी. ~X( X( ~X(

-(मी जर लहानच असतो तर O:) ) गणापा

देवदत्त's picture

10 May 2008 - 4:13 pm | देवदत्त

देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
आमचेही अनुमोदन तुमच्या कार्यात :)

लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
आजतक नावाचा समाचार कार्यक्रम आधी सुरू होता, त्याची नंतर वृत्तवाहिनी आली. :|
इंडिया टीव्ही ने ब्रेकिंग न्यूज नावाचा एक तासाचा कार्यक्रम सुरू केला. ते किंवा कोणीतरी ब्रेकिंग न्यूज नावाची वाहिनी सुरू करतील. @) 8|
तसेच तुम्ही सांगितले तसे होण्याचा दिवस दूर नाही असे मला वाटते. :S ~X(

शितल's picture

10 May 2008 - 4:14 pm | शितल

=D>
एकदम खतरनाक शुट केले आहे सगळ्या॑ना.
मिपा हा जर पक्ष म्हणुन निवडणुकीत उभा राहिला तर मिपाचे आराखडे तुम्हीच तयार ठेवा.

शितल's picture

10 May 2008 - 4:14 pm | शितल

=D>
एकदम खतरनाक शुट केले आहे सगळ्या॑ना.
मिपा हा जर पक्ष म्हणुन निवडणुकीत उभा राहिला तर मिपाचे आराखडे तुम्हीच तयार ठेवा.

मन's picture

10 May 2008 - 4:28 pm | मन

टोले हाणलेत की सगळ्यांना...

तिच्या मारी, सगळ्यांचा निस्त्या शब्दांनीच "गेम" वाजिवलास की रे डॉन्या.

(बाकी आपल्या [रत्येक कॉमेंट वर उत्तर द्यायची तीव्र इच्छा होतिये, पण हे "काथ्याकुट" नसुन "लेख" म्हणुन आलेलं आहे.त्यामुळे
असहमतीचे प्रतिसाद आणि मतभेद इथे करता येणार नाहित.)
पण एकुणातच , लेखन्शैली भन्नाट,समद्यांचे निस्ती बिनपाण्याने केलेली हाये तुमी.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

छोटा डॉन ,
हे तुझे वैयक्तिक मत आहे हे मान्य पण माझे मत(वैयक्ति़क) जरा वेगळे आहे.
.....मी जर राहुल गांधी असतो तर,
.........दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
जेव्हा कोणी नेता मोठ्मोठाली भाषण देत असतो ,भ्रामक वचने देतो तेव्हा आम्हीच लोक म्हनतो ना की ह्याला काय आहे आलिशान बंगल्यात राहतो,मर्सीडीज मधे फीरतो,ए.सी. मधे असतो २४ तास ,पिझ्झा बर्गर खातो ईथे आमच्याकडे येउन बघ मग खरी परीस्तीथी समजेल
मग कोनी नेता ज्याच्या हाती पावर आहे,सत्ता आहे तो तुमच्याकडे येतो, तुमच्या झोपडीत रात्र घालवतो,तुमच्याबरोबर तुमचे जेवण जेवतो,तुमची प्रेमाने विचारपुस करतो,तुमच्या बरोबर पायदळ ऊन्हात फिरतो तेव्हा आम्हाला तेही चांगले वाटत नाही.
आता तुम्ही म्हणाल मत मागण्यासाठी करतो तर ठीक एकदाचे ते खरे मानलेही तरी तो जे काही करत आहे खुप चांगले आहे ईतर नेता मत मागतात आणी काय करतात हो???
मला वाट्ते तुम्हाला हे नाटक ह्या करीता वाट्त आहे की ज्याप्रमाणे मीडीया ह्याचे चित्रीकरण करत आहे तर माझाही राग मीडीया वर आहे तो जे करत आहे त्याला करु द्या ना का उगाच दीवसभर राहुल ने आज रस्ते पे चाय पी,लोगो के घर खाना खाया म्हणुन ओरडायचे.

बाकी मी जरी गांधी असलो तरी त्या गांधीशी आपला काही संबध नाही बॉ.

---नितिन गांधी

छोटा डॉन's picture

11 May 2008 - 11:07 pm | छोटा डॉन

वर लेखात व्यक्त केलेली मते माझी अगदी वैयक्तीक आहेत. राहूल गांधींचे म्हणाल तर मला मी लिहलेले पटत पण त्यचबरोबर तुम्ही दिलेले स्पष्तीकरण सुध्धा पटले.

पण माझा प्रश्न असा आहे की जर कोणाकडे ऑलरेडी सत्ता असेल तर त्याला असे "नाटक" करण्याची गरजच कशाला पडते ?
होय मी ह्याला नाटकच म्हणेन. कारण जर त्यांना खरच एवढी आत्मीयता असती तर ती आजच का वर आली ? बरं, तुमच्या मताप्रमाणे तो तुमच्या झोपडीत रात्र घालवतो,तुमच्याबरोबर तुमचे जेवण जेवतो,तुमची प्रेमाने विचारपुस करतो,तुमच्या बरोबर पायदळ ऊन्हात फिरतो. आता प्रश्न असा आहे की याची खरेच गरज होती का ? बर असली तरी "दलित" घर का निवडले ? बाकी उच्चावर्णीय लोक गरिब नसतात का ? बरोबर "चापलोस्स मिडीया" का न्हेला ? ४ दिवस स्वताच्या मोठेपणाच डांगोरा का पिटला ? आता हे सर्व पाहून याला नाटक नाही तर अजून काय म्हणायचे ?
माझी थेअरी सांगतो, उ. प्र. मध्ये मायावतीच्या दलीत अनुययामुळ काँग्रेसपासून "दलित वर्ग" केव्हांच दुर गेलाय. आता मायावतींनी "उच्चवर्णींयांना " पण जवळ करयला सुरवात केली आहे. समाजवाद्यांनी आधीच त्यांची दमछाक केली आहे. तिथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आता ही परिस्थीती सुधारण्याची पात्रता नाही. अशा परिस्थीतीत राहुलसारख्या "युवराजाने" जर करिष्मा करून दाखवणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यातल्या त्यात खेड्यातल्या गोरगरिब, भोळ्याभाबड्या व दलित जनतेला थोडा प्रेमाचा चारा घातला की काम सोपे होते. कोणी "युवराज" आपल्याला भेटतो हीच त्यांच्यासाठी मोठी भेटही . मग मते अपुसकच भेटतात ....

असो. ही चर्चा एथे नको. वाटलं तर त्यासाटी वेगळा धागा सुरु करा ...
बाकी आपल्या मताचा मला आदर आहे ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

10 May 2008 - 5:50 pm | इनोबा म्हणे

मस्त हाणलंस रे!

सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते.
=))
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
=D>

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंदयात्री's picture

12 May 2008 - 10:51 am | आनंदयात्री

म्हणतो .. उत्तम लेख .. भारी चिमटे .. अमिताभ च्या दत्तक प्रकरणावर हहपुवा :))

विजुभाऊ's picture

10 May 2008 - 6:18 pm | विजुभाऊ

मी जर राज ठाकरे असतो असतो तर,
यात
महाराष्ट्र बीहार/ यु पी / दील्ली पासुन वाचवण्यासाठी सरळ स्वतन्त्र केला असता
हे ऍड केले असते

स्वाती दिनेश's picture

10 May 2008 - 6:58 pm | स्वाती दिनेश

चिमटे मस्त काढले आहेत,:)
स्वाती

झकासराव's picture

10 May 2008 - 7:07 pm | झकासराव

हाणलय एकेकाला.
लालुची लयीच उतरवली ते बेस केलस. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनस्वी's picture

12 May 2008 - 3:46 pm | मनस्वी

डॉन्या, सह्हीच लिहिले आहेस.

आर्य's picture

12 May 2008 - 4:35 pm | आर्य

काँग्रला चिमटे काढायला केलेली सुरवात ते विषेश वाहिन्यांना घातलेल्या लाथा हा प्रवास झकास झाला आहे. त्यात आलेली लालू, अमरसिंग, गौडा आणि राज -कारण खास रंगलीयत.
महाराष्ट्राच्या पॉवर विषयी पण बोलायला हवे होते. आज काल ते ही फौज फाटा जमा करुन दिल्लीत डेरे दाखल होण्याची (त्यांची जुनीच)स्वप्न नव्याने रंगऊ लागलेत. सरदारांनी तर विडे ऊचलले आहेत म्हणे.
(राजकारणी) आर्य

ऋचा's picture

12 May 2008 - 5:09 pm | ऋचा

तू लै भारी रे डॉन्या ! :O

बट्ट्याबोळ's picture

12 May 2008 - 5:19 pm | बट्ट्याबोळ

खरच जबरा. लै भारी डॉन्या ..

धमाल मुलगा's picture

13 May 2008 - 11:28 am | धमाल मुलगा

धर की आपट...धर की आपट...

आयला, काय खासबागेतून धोबीपछाड शिकून आलास का काय?

लालूची जोकरगिरी जोपर्यंत राजकारणाची सर्कस संपत नाही तोपर्यंत कशी थांबावी?

तू जर अबु आझमी असतात, तर तुझ्या आझमगडाच्या २०,००० जणांच्या ४०,००० तंगड्यांची चिंता तुला जास्त वाटली असती आणि सिमीबरोबर संबंधही ठेवले नसतेस.

तू जर देवेगौडा (थोरले) असतास तर संसदेत बसुन कामकाज चालू असतानाही झोपा कशा काढाव्यात ह्याचे खास वर्ग घेतले असतेस.

तू जर न्युजचॅनेलवाला असतास तर....
बाकी सगळ्या उद्योंगाबरोबर भुताखेतांच्या बातम्यांसाठी एक चॅनल काढलं असतंस का रे भौ? स्पॉन्सरशीप रामसे ब्रदर्स :)

तू जर राज ठाकरे असतास, तर मराठी आणि मराठी माणसाच्या उत्कर्षाबरोबरच आपले कार्यकर्ते आलेल्या संधीचा गैरफायदा तर घेत नाहीत ना? ह्याची योग्य काळजी घेतली असतीस!

बाकी, उरलेल्यांबद्दल काय बोलावं? त्यांच्याबाबतीत आम्ही बोलून स्वतःची जीभ विटाळवण्याची हौस बाळगत नाही.