मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
26 Feb 2008 - 8:49 am

च्यायला आपल्या मिसळपाववर सध्या आपुलकी व कौटुंबिक भावना , अगदी घरच्यासारखा वावर व जशी आपल्याला आपल्या घराशी वाटते तशी पारवारिक ओढ या भावना वाढिस लालल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.....थोडक्यात काय तर , मिपा आता एक कुटुंब बनले आहे....<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />
त्याच धर्तीवर माझा हा 'शेखचिल्लीची स्वप्ने ' पाहण्याचा प्रयत्न. समजा मी मिपा वरची कोणती दुसरी 'व्यक्ती' असतो तर काय केले असते याचे हे पूराण. याची प्रेरणा आम्हाला आमचे गुरु 'शिरीष कणेकर' यांच्या लेखनातून मिळाली. असो ......
यात कोणावरही मुद्दामून , तिरस्काराच्या हेतूने टिका केलेली  नाही , फक्त मज्जा यावी म्हणून हा सगळा खटाटोप . तरी आपण सर्व सुज्ञ, माझा हा 'मुर्खपणा' आपल्या 'मिपा' चे 'धाकटे शेंडेफळ' समजून माफ  करताल अशी अपेक्षा आहे.


  • जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते. 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती.वर्षातून एखादा दिवस तरी 'ह्याला माझा नमस्कार आहे, शतशा वंदन आहे, मी सांष्टांग नमस्कार घालतो' असे म्हणायचे टाळले असते.पण मी 'तात्या' एवढा मोठा नाही ......

 

  • मी जर "प्राजू" असतो तर सगळ्यांनी माझ्या वाढदिवसाला 'विश' केल्याचे लक्षात ठेऊन सगळ्यांना मस्त 'पार्टी' दिली असती [ त्यातल्या त्यात 'मिसळपाव' हा मेनू ठेवला असता] व 'पार्टी' झोडण्यात मग्न असलेल्या गाफील सदस्यांना पकडून 'एकरकमी कमीत्-कमी १० तरी नव्या चारोळ्या ' सुनावल्या असत्या ....पण मी 'प्राजू' एवढा दिलदार व कवीमनाचा नाही.....

 

  • मी जर 'विनायक अनिवसे' असतो तर माझे नाव बदलून 'मी मराठी' ठेवले असते. एका नवीन 'मराठी भाषा पुनर्निमाण सेने' ची स्थापना केली असती. त्या सेनेचा जोरावर 'मुंबई' ही भारताची राजधानी व्हावी व भारताची राष्ट्रभाषा 'मराठी' व्हावी यासाठी अंदोलने केली असती. आपल्या बहूमताच्या जोरावर इथुन पुढे 'अमराठी लोकांना' मुंबईमध्ये प्रवेश करण्यास 'बंदी' असल्याचे विधेयक संमत करून घेतले असते.याला जे लोक [भय्ये] विरोध करतील त्यांची माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत 'टकूरी' फोडण्यास मागे पुढे पाहिले नसते.पण मी 'विनायक' येवढा 'कट्टार मराठीभीमानी' नाही ........

 

  • मी जर 'डांबीसकाका' असतो तर आपल्यामुळे धमाल, छोटा डॉन सारखी पोर बिधडायला लागली हे ऊमजून 'मद्यप्राशन' सोडून दिले असते. 'मद्यप्राशनविरोधी जनजागरण अभियान' चलू केले असते. अख्ख्या अमेरिकेत मी ' मद्यपानाचे तोटे व टाळण्याचे सहजसोपे मार्ग' या विषयावर परिसंवाद आयोजित केले असते.....आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते.त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........पण मी 'डांबिसकाकां' एवढा शौकीन नाही ......

 


  • मी जर 'धमाल मुलगा' असतो तर प्रथम माझे नाव बदलून 'ईब्लिस कार्टे' ठेवले असते. ठिकठिकाणच्या पोरांना पकडून 'जश्न - ए- बहार' चे बेत रचून ते तडीस न्हेले असते. 'डांबिसकाकांनां' च्या दारूबंदी अभियानात सामिल झालो असतो.मी 'मद्य रिचवायच्या उत्तमोत्तम पद्धती' यावर एक 'प्रेझेंटेशन दिले असते. सरकारी हूकूम न मानता 'मार्च' मध्ये 'शिवजयंती' साजरी केली असती.पण मी 'धमाल मुला' एवढा 'दिलखूलास नाही .......

 


  • मी जर 'वरदा' असतो तर 'प्रेम म्हणजे काय?' ह्या वादात कधीतरी 'मुलांच्या' बाजूने विचार केला असता व 'प्रॅक्टिकल लाईफ' चा विचार न करता 'भावनेच्या' आधारे मुलांचे बरोबर आहे असा निर्वाळा दिला असता.मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते व तेच वाचून मस्त ताईमपास केला असता. मी टाईमपास करण्यासाठी माझी बदली 'बेंगलोरला' करून घेतली असती......पण मी 'वरदा' एवढा 'मॅच्युअर' नाही ........

 

  • मी जर सकाळचा 'आपला अभिजीत' असतो तर नियमाने दर आठवड्याला "नव्या नव्या सिनेमांची परीक्षणे" लिहली असती.कोणता सिनेमा कुठे पाहण्याचा लायकीचा आहे याबद्दल स्पष्ट मत व्यक्त करून 'भिकार सिनेमा' थेटरात पाहणार्‍या जनतेचे ऐसे वाचवले असते.मी 'तसल्या नजरा' सारखे लेख लिहून लोकात मस्त चर्चेचा बार ऊडवून मस्त मजा बधत बसलो असतो .....पण मी 'अभिजीत' एवढा 'व्यासंगी व परिपूर्ण' नाही.......

 

  • मी जर 'जुना अभिजीत' असतो तर दर १० दिवसाला माझे नाव 'अभिजीत , मोठा डॉन , जुना अभिजीत ' असे चेंज केले नसते.पुरंदर व लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'मिसळभक्षण यज्ञातून' वेळ काढून मिपा वर नवे नवे साहित्य प्रसवले असते....पण मी 'अभिजीत' येवढा 'कट्टर मिसळप्रेमी' नाही ........

 
 

  • मी जर 'स्वाती राजेश' असतो तर मस्तपैकी 'कूकिंग स्कूल' सुरु करून होतकरू लोकांना त्यांच्या जिभेचे चोचले पूरवण्यास मदत केली असती.आपले 'स्कील' सिध्ध करून 'संजीव कपूरच्या' पोटावर पाय दिला असता. कधीमधी मिपा परिवाराला आमंत्रीत करून मस्त मस्त स्वादिष्ट पदार्थ खाऊ घातले असते.पण मी 'स्वाती राजेश' एवढा 'सिद्धहस्त' नाही .....

 

  • मी जर 'केशवकुमार' असतो तर माझ्या 'विडंबनांचे एक पूस्तक' प्रकाशित केले असते व नंतर त्या पूस्तकातील कवितांचे पून्हा 'विडंबन' केले असते.मी एखादे तरी विडंबन शेवटी 'केश्या , किश्या ' असे नाव न घालता लिहले असते व लोकांच्या आग्रहास्तव पून्हा ते अद्ययावत केले असते.....पण माझ्यावर 'केशवकुमारां' एवधी 'सरस्वतीची कॄपा' नाही .....

 

  • मी जर खरच 'छोटा डॉन' असतो तर मिपाच्या कौतुंबियांचा मनाचा मोठेपणा लक्षात घेऊन लेखाच्या सुरवातीस "कोणाच्या भावना दूखावण्याचा हेतू नाही " अशी सूचना केली नसती.ऊलट आमचे कोण काय बिघडवणार अशी दर्पोक्ती केली असती.

 
आपले नम्र शेंडेफळ
छोटा डॉन .......................
हे ठिकाण

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

26 Feb 2008 - 8:59 am | केशवसुमार

पण माझ्यावर 'केशवकुमारां' एवधी 'सरस्वतीची कॄपा' नाही .....
माझ्यावर पण त्यांच्या एव्हढी सरस्वतीची कृपा नाही.. केशवसुमार
एकंदरीत शेखचिल्लीची स्वप्ने चांगली आहेत..हे सा न ला

छोटा डॉन's picture

26 Feb 2008 - 9:02 am | छोटा डॉन

आपले नाव चूकीचे लिहले आहे ते...पण वेळ हातातून निघून गेली होती ........

प्राजु's picture

26 Feb 2008 - 9:37 am | प्राजु

पण मी 'प्राजू' एवढा दिलदार व कवीमनाचा नाही.....
<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />दिलदार?????छे छे.. कहितरिच... मी काही दिलदार नाहिये बरं !लेख मात्र मस्तच... :)))
 
- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

26 Feb 2008 - 10:51 am | विसोबा खेचर

मी जर प्राजू असतो तर वर्षातनं एक दिवस तरी चारोळी लिहिणे टाळले असते! :)
मी जर सर्वसाक्षी असतो तर "नाही चिरा, नाही पणती" अशी अवस्था असलेल्या, अज्ञात किंवा काळाच्या ओघात नांव पुसले गेलेल्या क्रांतिकारकांबद्दल मिपावरही लिहिले असते!
सध्या इतकेच, बाकी सवडीने..
तात्या.

इनोबा म्हणे's picture

26 Feb 2008 - 5:34 pm | इनोबा म्हणे

मी जर तात्या असतो तर एक तरी दिवस (विनाकारण) चूका काढणे टाळले असते.
||इनोबा म्हणे||

विसोबा खेचर's picture

26 Feb 2008 - 8:04 pm | विसोबा खेचर

मी जर तात्या असतो तर एक तरी दिवस (विनाकारण) चूका काढणे टाळले असते.
हम्म! आता आहे खरा आमचा स्वभाव थोडासा भिकारXX, त्याला काय करणार?! :)
सांभाळून घ्या झालं..!
आपलच,तात्या.
 

धमाल मुलगा's picture

26 Feb 2008 - 11:25 am | धमाल मुलगा

जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते. 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती.हे हे...लय भारी!!! लै लै मज्जा :))आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते.त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........जबरा...डा॑बिसकाका, कधी येऊ "ऊ.कॉ." शिकायला?गाफील सदस्यांना पकडून 'एकरकमी कमीत्-कमी १० तरी नव्या चारोळ्या ' सुनावल्या असत्या ....खि:खि: प्राजुताई, अस॑ पार्टी देऊन छळायच॑ का? वाss :)  (ह्.घ्या.) मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते वा वा!! वरदाताई, पहा, कर विचार..प्रकाशक शोधतो :))एका नवीन 'मराठी भाषा पुनर्निमाण सेने' ची स्थापना केली असती. ...याला जे लोक [भय्ये] विरोध करतील त्यांची माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत 'टकूरी' फोडण्यास मागे पुढे पाहिले नसतेएsss कोण रे तो ? आमच्या इनोबा ठाकरेवर मिडियागिरी करतोय..बघू का तुझ्याकड॑???आपले 'स्कील' सिध्ध करून 'संजीव कपूरच्या' पोटावर पाय दिला असता.स्वातीताई, आता करूनच दाखव अस॑ ! आगे बढो, हम तुम्हारे साथ है|  (आयत॑ खायला कोणाच॑ सुख दुखत॑य :)))मी जर 'केशवखुमार' असतो तर माझ्या 'विडंबनांचे एक पूस्तक' प्रकाशित केले असते व नंतर त्या पूस्तकातील कवितांचे पून्हा 'विडंबन' केले असते.खर्रर्रय बॉ !!! ह्या माणसाचा मे॑दू म्हणजे च्यायला फुल-टू सुपरफाष्ट !   केशवरावा॑ना काव्य-प्रतिभा वाटताना देवाने बहुधा नवा बॉक्स उघडला होता..घे किती हवी तेव्हढी.  मी जर 'धमाल मुलगा' असतो तर प्रथम माझे नाव बदलून 'ईब्लिस कार्टे' ठेवले असतेतेच ठेवणार होतो, पण म्हणल॑ लोक जवळ करायचे नाहित, म्हणून...जश्न - ए- बहार' चे बेत रचून ते तडीस न्हेले असते. हा.हा.हा... बेशक हुजूर!मी 'मद्य रिचवायच्या उत्तमोत्तम पद्धती' यावर एक 'प्रेझेंटेशन दिले असते. जय हो प्रभु !!!सरकारी हूकूम न मानता 'मार्च' मध्ये 'शिवजयंती' साजरी केली असती.हाण तिच्याआयला !!! खल्लास रे भाऊ :))पण मी 'धमाल मुला' एवढा 'दिलखूलास नाही .......कसच॑... कसच॑ ! लाजलो बॉ स्तुती वाचून :)मी जर खरच 'छोटा डॉन' असतो तर... बेट्या तू सगळ्या॑ना ब॑गळूरास बोलावणी धाडली असतीस. आणि भेटल्यावर "मला आलेल्या एव्हढ्या इ-मेल्सच॑ काय करु" म्हणून चावत बसला असतास."जश्न-ए-बहार" आणि "मेहफिल-ए-दोस्ताना" ची वेगळी वार्ता करणे गरजेचे नाही, ती तू आपण होऊन तडीला नेली असतीस. बेष्ट..येकदम बेष्ट लिव्हलयस :)) सगळ्या॑ची माप॑ काढून मोकळा..तात्याबा बघताय ना, घरातल॑ हे शे॑डेफळ कस॑ दिवसे॑दिवस वात्रट होत चाललय ते??

धमाल मुलगा's picture

26 Feb 2008 - 1:47 pm | धमाल मुलगा

च्यामारी, सगळ्या॑चे अनुस्वार कसे व्यवस्थित अक्षरा॑वर स्वार झालेत, माझे मात्र टपल्या मारायला उठल्यासारखे दिसतायत.हा काय घोळ आहे बुवा?

g + a + q = ग॑
g + M = गं
चतुरंग

"सगळ्या॑ची माप॑ काढून मोकळा..तात्याबा बघताय ना, घरातल॑ हे शे॑डेफळ कस॑ दिवसे॑दिवस वात्रट होत चाललय ते??"
आम्ही कसले मापे काढतो बाबा दुसर्‍याची ? ईथे आमचेच आम्हाला झेपत नाही. लहान लेकरू आहे आण्णा , समजून घ्या वाईच ......
अवांतर : यातून 'सुटलेल्या लोकांची' मला ऑफीसच्या कामातून टाईम मिळाल्यावर खबर घेईन. म्हण्जे चांगलेच लिहीन , मापे काढणार नाही...

प्रभाकर पेठकर's picture

26 Feb 2008 - 11:48 am | प्रभाकर पेठकर

जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते. 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती.
आयला..... हे बरंय! आपण स्वतः अनुष्काच्या कुशीत आणि प्रभाकर पेठकर स्वयंपाक घरात काय? अन्याय आहे हा.... घोर अन्याय.थांबा... आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Feb 2008 - 9:15 pm | llपुण्याचे पेशवेll

"आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)"
हेहेहेहेहे सहीच.. पण बल्लवाचार्य जर आपण असे काही केले असते तर मात्र आम्हाला 'अस्सल बेळ्गावी लोणीच(पिठ मिसळलेले का होईना!)' पण आणावे लागले असते. कारण पश्चाततापाची झळ असह्य असते हो.......
(ह.घ्या.)
पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या's picture

26 Feb 2008 - 12:45 pm | सृष्टीलावण्या

आवडली बुवा... 
तुमचा हा लेख ह्या महिन्यात मी मिपावर वाचलेल्या साहित्यापैकी सगळ्यात सुंदर म्हणता येईल...

जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते.
हम्म!
अरे छोटा डॉन,
पुढच्या मिपाकट्ट्याकरता प्रमूख पाहुणी म्हणून येशील का असं बोलावणं करण्याकरता अनुष्काला फोन लावला आहे! :)

हा बघ!

आणि तात्याचं बोलावणं आलं म्हणून ती मिपा कट्ट्याला नक्की जाणार आहे असंही तिने एका समारंभात जाहीर केलं आहे! :)

इथे बघ!

आता तरी खुश? :)
आपला,(अनुष्काचा पागल) तात्या.

जुना अभिजित's picture

26 Feb 2008 - 6:34 pm | जुना अभिजित

मी जर 'जुना अभिजीत' असतो तर दर १० दिवसाला माझे नाव 'अभिजीत , मोठा डॉन , जुना अभिजीत ' असे चेंज केले नसते.पुरंदर व लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'मिसळभक्षण यज्ञातून' वेळ काढून मिपा वर नवे नवे साहित्य प्रसवले असते....पण मी 'अभिजीत' येवढा 'कट्टर मिसळप्रेमी' नाही ........
मी अभिजितचे मोठा डॉन केल्यावर एक नवीन अभिजित 'आपला अभिजित' इथे दाखल झाला होता. तेव्हा तुझा नाद सोडून मला जुना अभिजित नाव घ्यावं लागलं.  ;-)
कट्टर मिसळप्रेमी तर आहेच मी. पुरंदर पायथ्याची झणझणीत मिसळ अहाहा..अजूनही जिभेवर चव रेंगाळते आहे. (आमचे मित्र म्हणाले असते जा तोंड नीट धुवुन ये. )
गेले कित्येक दिवस ट्रेकला बाहेर न पडल्यामुळे लिहिण्यासारखं काही नाही. कविता आजकाल सुचत नाहीत.
 
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रभाकर पेठकर's picture

26 Feb 2008 - 7:34 pm | प्रभाकर पेठकर

'पुरंदर पायथ्याची झणझणीत मिसळ अहाहा....'
जरा नीट पत्ता वगैरे दिलात तर आम्हलाही (तिथे जाऊन) आस्वाद घेता येईल.
धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

26 Feb 2008 - 9:33 pm | सुधीर कांदळकर

नेता असतो तर या धाग्याबद्दल आपणांस पद्मश्री दिली असती. मस्त. असेच नवनवीन धागे आले तर मज्जा येईल.
धन्यवाद. आपणांस तसेच वरील सर्व प्रतिसादकांस.

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2008 - 2:58 am | पिवळा डांबिस

मी जर 'डांबीसकाका' असतो तर आपल्यामुळे धमाल, छोटा डॉन सारखी पोर बिधडायला लागली हे ऊमजून 'मद्यप्राशन' सोडून दिले असते.
मुळीच नाही, "पोरं बिघडली, बिघडू द्या ना!":))
आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते.
आयुष्याच्या संध्येला, शिंच्या, संध्येला?  का रे बाबा माझ्या जीवावर  उठ्लायस? :))
त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........पण मी 'डांबिसकाकां' एवढा शौकीन नाही ......
हां, शौकिन तर आपण जरूर आहोत.  पण एकबाणी रामाप्रमाणे  आम्ही "एकड्रिंकी" आहोत!  आम्ही आमच्या निष्ठा स्कॉचच्या पायी वाहिलेल्या आहेत.  त्या नटरंग्या सटव्या कॉकटेल्स आम्हाला मोहात पाडू शकत नाहीत....:))
स्कॉचपरायण,
पिवळा डांबिस

चतुरंग's picture

27 Feb 2008 - 3:22 am | चतुरंग

अहो 'आयुष्याच्या संध्येला' म्हणजे त्याला 'संध्या करतेवेळी' आचमने घेताना, असे म्हणायचं असेल असं आपण समजूयात, नाही का?
म्हणजे असं - ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः (इथे तात्यांना मनःचक्षूंसमोर आणावे;), ॐ जॉनी वॉकराय नमःएवढं झालं की मग "अस्त्राय फट्" म्हणून डोळ्यांना दोन थेंब लावायचे की झाले, मग खरी सुरुवात!:}}
चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Feb 2008 - 4:11 am | ब्रिटिश टिंग्या

स्मिरनॉफला विसरलात बरे....कमीतकमी मिपावरतरी 'या' बाबतीत भेदभाव नको......कसें? ॐ स्मिरनॉफ् नम :
बाकी डॉन्या लेख एकदम फक्कड जमलाय रे....अजून येउ देत्...पुलेशु.....
- (स्मिरनॉफप्रेमी) छोटी टिंगी

म्हणजे 'महापुरात' पोहणारी मंडळी, आम्ही आपले 'काठाकाठाने' पाय बुडवणारे तेव्हा आमचं नालिज तितपतंच!
चतुरंग

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2008 - 7:09 am | पिवळा डांबिस

ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः (इथे तात्यांना मनःचक्षूंसमोर आणावे;), ॐ जॉनी वॉकराय नमःएवढं झालं की मग "अस्त्राय फट्" म्हणून डोळ्यांना दोन थेंब लावायचे की झाले, मग खरी सुरुवात!:}}
क्या बात है!!!
:)))))

छोटा डॉन's picture

27 Feb 2008 - 7:42 am | छोटा डॉन

अहो डांबिसकाका ,
"अहो 'आयुष्याच्या संध्येला' म्हणजे त्याला 'संध्या करतेवेळी' आचमने घेताना"
असेच म्हणायचे आहे मला ....
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2008 - 7:51 am | पिवळा डांबिस

गुलामा, चावलास तर चावलो म्हण!!
तुला काय मी रागावीन असं वाटलं काय? :)))))

छोटा डॉन's picture

27 Feb 2008 - 8:02 am | छोटा डॉन

"तुला काय मी रागावीन असं वाटलं काय? :)))))"
अहो काका रागवा तुम्ही , तुमचा हक्क आहे तो  पण तुमच रागावणं क्षणिक आहे व तुमचे आमच्या सर्व मिपा परिवरावर प्रेम आहे याची आम्हाला कल्पना आहेच ....त्यामुळे जर राग आला असेल तर तो दूर करण्यासाठी 'मांडवली' करू , या मग 'बेंगलोरला' व येताना 'धमाल मुलाला' पण घेऊन या. आप्ण सगळे मिळून मस्त "जश्न्-ए-बहार" ऊडवून देउ , कसे???
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2008 - 8:25 am | पिवळा डांबिस

अहो काका रागवा तुम्ही , तुमचा हक्क आहे तो
अरे बाबा, एव्हढ्यातेव्हढ्यावरुन रागवायचं असतं तर कशाला इथे मि. पा. वर आलो असतो?
तू लिही तुझ्या मनात येईल ते, आम्ही प्रतिक्रिया द्यायला श्रीसमर्थ आहोत!! :))
तुझ्या बंगलोरला यायचं जमवलंच पाहिजे!  येत्या जानेवारीत मी दिल्लीला येणार आहे, तुमच्या आरोग्यमंत्रालयात काही भेटी ठरलेल्या आहेत, बघू बंगलोरला फ्लाय करायला जमते का ते!!!
आपण वैयक्तिक विरोपातून ठरवूयात!

छोटा डॉन's picture

27 Feb 2008 - 9:00 am | छोटा डॉन

येत्या जानेवारीत म्हणजे अजून १० महिन्यांनी ???ठिक आहे, जमवू नक्की ........
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://hariprasadcoep.blogspot.com"] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विसोबा खेचर's picture

27 Feb 2008 - 8:01 am | विसोबा खेचर

 आम्ही आमच्या निष्ठा स्कॉचच्या पायी वाहिलेल्या आहेत.
आमचेही ब्लेंडेड स्कॉचवर प्रेम आहे परंतु आमच्या निष्ठा मात्र आम्ही सिंगलमाल्ट पद्धतीने बनवलेल्या स्कॉचच्याच पायाशी वाहिलेल्या आहेत! :)
त्या नटरंग्या सटव्या कॉकटेल्स आम्हाला मोहात पाडू शकत नाहीत....:))
हम्म! मोहात पडायला आम्हाला काहीही चालतं! अगदी 'मोहा'ची सुद्धा चालते! :)
आपला,(मोहमयी दुनियेत गुरफटलेला) तात्या.
--
मोह! मला सांग श्याम, मोहात काय वाईट असतं रे?-इति काकाजी (नाटक - तुझे आहे तुजपाशी) 

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2008 - 8:14 am | पिवळा डांबिस

आमचेही ब्लेंडेड स्कॉचवर प्रेम आहे परंतु आमच्या निष्ठा मात्र आम्ही सिंगलमाल्ट पद्धतीने बनवलेल्या स्कॉचच्याच पायाशी वाहिलेल्या आहेत! :)
चालायचंच! तुम्हाला नऊवारी साडी नेसलेली स्कॉच आवडते, आम्हाला पंजाबी ड्रेस घातलेली! :))
मोहात काय वाईट असतं रे?मोहात वाईट काहीच नसतं फक्त मोहाचे परिणाम (कॉन्सिक्वेंसेस) असतात! आणि कधी कधी ते ट्यां ट्यां करून किंचाळतात!! खरं की नाही? :))
अविवाहित तात्यासाठी सल्ला!! :))

छोटा डॉन's picture

27 Feb 2008 - 7:52 am | छोटा डॉन

माझे लिखाण "जास्त मनावर" न घेता 'दिलखूलास' प्रतिसाद दिल्याबद्दल 'महामहिम तात्यासाहेब, केशवसुमार , शेहनशह्-ए-धमालिस्तान , पेठकरसाहेब , डांबिसकाका , विनोबा ठाकरे , चतुरंगशेठ , सॄष्टीलावण्य , धनंजय मिराशी व छोटा टिंगी" यांना धन्यवाद ....भविष्यात सुध्धा माझ्या हातून आपली अशीच 'सेवा (????)' धडत राहील अशी ग्वाही देतो ..........
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2008 - 8:02 am | पिवळा डांबिस

भविष्यात सुध्धा माझ्या हातून आपली अशीच 'सेवा (????)' धडत राहील अशी ग्वाही देतो ..........
कायहो, 'महामहिम तात्यासाहेब, केशवसुमार , शेहनशह्-ए-धमालिस्तान , पेठकरसाहेब , डांबिसकाका , विनोबा ठाकरे , चतुरंगशेठ , सॄष्टीलावण्य , धनंजय मिराशी व छोटा टिंगी"
या डॉन्याचा एन्काऊंटर करायचा का?  :))

सृष्टीलावण्या's picture

27 Feb 2008 - 8:31 am | सृष्टीलावण्या

छोटे, वैसे भी १२ मुल्को की पुलिस डॉन को तलाश रही है.... उनका काम खुद-ब-खुद हो जाएगा...
एन्कौंटरसे पहले तनिक मेरी तरफसे भी दे दो थोडा खर्चा पानी...

छोटा डॉन's picture

27 Feb 2008 - 9:12 am | छोटा डॉन

डॉन का एन्काऊंटर मुश्कील ही नही बल्की नामुमकीन है ...."थोडे करेक्शन ........"डॉन का इंतजार ११ मुक्लोकी पुलीस कर रही और १२ वे मुल्क से बात चल रही है ........""और एक बात जान लो सोनिया , डॉन के दुश्मन की सबसे बडी गलती ये है के , वो डॉन का दुश्मन है ..........."
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

सृष्टीलावण्या's picture

27 Feb 2008 - 9:38 am | सृष्टीलावण्या

जनरल डायर का...

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Feb 2008 - 9:53 pm | llपुण्याचे पेशवेll

याला खरोखरची संध्या करायला लावायची(केशवाय नमः| नारायणाय नमः| वाली संध्या. आणि आचमने पाण्याची घ्यायला लावायची. :) ) आणि सर्वांनी त्याच्या समोर आपापले आवडते पेय चषकात घेऊन त्याच्यासमोर बसून जशन-ए-बहार करायचा.
त्याचा आपोआप एन्काऊन्टर होईल.  :) :) 
पुण्याचे पेशवे

रंजन's picture

29 Feb 2008 - 10:42 pm | रंजन

छोटा डॉन तुझ्या ब्लॉगवर जाता येत नाहि रे. काय करय्चे?

छोटा डॉन's picture

1 Mar 2008 - 11:47 am | छोटा डॉन

झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगीर आहे. नामसाध्र्म्याचा घोळ टाळण्यासाठी "नविन ब्लोग" उघडावा लागला, त्याचा पत्ता खालीलप्रमाणे ..........." http://chhota-don.blogspot.com/ "धन्यवाद ..........
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2008 - 10:33 am | पिवळा डांबिस

हा छोटा डॉन थोडासा "हा" च आहे असे वाटत नाही का तुम्हाला? :))) ह. घ्या.:)))

छोटा डॉन's picture

1 Mar 2008 - 11:53 am | छोटा डॉन

डांबिस काका,असे थेट "हा" म्हणू नका , कारण आपल्या 'प्रचलित मराठीत ' "हा" या शब्दाचा अर्थ वेगळा आहे [  अजून सांगायचे झाल्यास तो लिंगभेदासाठी वापरतात ] त्यामूळे हा म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते सांगा .......छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2008 - 12:01 pm | पिवळा डांबिस

अरे हा म्हणजे मी 'आत्ता गं बया!" या अर्थी 'हा' असं म्हटलं नव्हतं!
मी 'हा' म्हणजे चक्रम या अर्थी म्हटलं होतं. :))))
पण तुला हे रजिष्टर झाल्याचं पाहून आनंद झाला!!  डोकं चालवणारी माणसं आम्हाला नेहमीच आवडतात! :))
 

छोटा डॉन's picture

1 Mar 2008 - 12:17 pm | छोटा डॉन

"मी 'हा' म्हणजे चक्रम या अर्थी म्हटलं होतं. :))))"लहाणपणापासूनच आहे . [ ही पूणेरी मराठीत कुठल्याही अशा प्रकारच्या प्रश्नाला उत्तर देण्याची पद्धत.]च्यायला चांगलाच घोळ घातला की मी. असो ....आम्हाला कायरती येगळचं वाटलं ना राव..... असो... मज्जा आली छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

स्वाती राजेश's picture

5 Mar 2008 - 2:17 am | स्वाती राजेश

आवडले.
आपले 'स्कील' सिध्ध करून 'संजीव कपूरच्या' पोटावर पाय दिला असता.

:)))

वरदा's picture

7 Mar 2008 - 11:08 pm | वरदा

असं कसं झालं चुकून तेवढे १-२ दिवस मी ऑफिसमधे काम करत होते की काय??????
झकास आहे हे एकदम...
मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते
वा वा!! वरदाताई, पहा, कर विचार..प्रकाशक शोधतो :))

अगदी करतेच विचार..तुमच्या सगळ्यांच्या भन्नाट आयडीया एकत्र करुन १०० काय १००१ उपाय लिहेन....(तेवढा वेळ मला असतो हे सांगायला नकोच) :)

वरदा's picture

7 Mar 2008 - 11:11 pm | वरदा

मी जर 'वरदा' असतो तर 'प्रेम म्हणजे काय?' ह्या वादात कधीतरी 'मुलांच्या' बाजूने विचार केला असता व 'प्रॅक्टिकल लाईफ' चा विचार न करता 'भावनेच्या' आधारे मुलांचे बरोबर आहे असा निर्वाळा दिला असता.

मी हेच जर मी प्राजु असते तर केलं असतं...दोन चार चारोळ्यांचही पाहीलंच असतं....