अथर्व थिएटर्स ही संस्था पुणेकरांना बर्यापैकी परिचीत आहेच. या संस्थेतर्फे ११ मेला रामकृष्ण सभागृह, पिंप्री येथे एकाच दिवसात ४ नाटके सादर करण्याचा विक्रम घडणार आहे.
रुपरेखा खालील प्रमाणे,
०९.०० सकाळी शांतेचं कार्ट.
१२.३० ला मोरुची मावशी
०४.०० वाजता औपचारिक समारंभ
०५.०० वा तो मी नव्हेच
०९.३० वा तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क
एकाच दिवशी एकाच संस्थेकडून आणि एकाच नाट्य कलाकारातर्फे ४ प्रयोग असा विक्रम घडणार आहे.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
या संस्थेची वाटचाल आणि माहिती दुसर्या सत्रात,
तर चला भेटु या ११ तारखेला रामकृष्ण सभागृहात.
प्रतिक्रिया
13 May 2008 - 10:22 am | विसोबा खेचर
या संस्थेची वाटचाल आणि माहिती दुसर्या सत्रात,
वाट पाहात आहे.... :)
आपला,
(नाटकी!) तात्या.
13 May 2008 - 4:27 pm | कलंत्री
या संस्थेची स्थापना नौकरी व्यवसाय करणार्या लोकांनी २००१ या वर्षी केली.
"झोपी गेलेला जागा झाला" चे ७ प्रयोग.
"शांतेचं कार्ट चालू आहे" चे ११ प्रयोग.
"मोरुची मावशी" चे २१ प्रयोग.
"तरुण तुर्क म्हातारे अर्क" चे १० प्रयोग.
"सौजन्याची ऐशीतैशी" चे ४ प्रयोग.
" तो मी नव्हेच" ची ९ प्रयोग सादर केली आहेत. विशेष म्हणजे प्रभाकर पणशीकरांच्या उपस्थितीत याचा प्रयोग सादर करण्याचे भाग्य अथर्व ला लाभलेले आहे.
वरील विनोदी नाटके आणि प्रहसनाबरोबर अथर्व ने बॅरिस्टर आणि सापळा ही गंभीर नाटकं ही सादर करुन राज्यनाट्य स्पर्धेत पारितोषिकेही मिळविली.
शोकपर्व, अंतिम अन्तर्लपिका, निर्णय, ओळख, पहाट, शिल्प, फक्त पौढासाठी आणि ज्याचं त्याचं अभयारण्य इतकी नाटकेही सादर केलेली आहेत.
११ मेला एकाच दिवशी चार नाटके हा विक्रमही स्थापीत करण्यात आला आहे.
अथर्वला मिपा तर्फे शुभेच्छा.
19 May 2008 - 5:33 pm | डॉ. श्लोक _भातखंडे
अथर्वला शुभेच्छा ....
मागे एकदा सांगलीच्या एका संस्थेने एकाच दिवशी न थांबता सतत एकामागोमाग एक एकाच नाटकाचे (शांतेचं कार्टं चालू आहे) ११ की १२ प्रयोग केले होते...
असो...प्रत्येक जण नाटक का करतो , याची उत्तरे वेगवेगळी...
ज्याचा त्याचा आनंद...