अनाथ लेकरायची माय

उग्रसेन's picture
उग्रसेन in जनातलं, मनातलं
20 Feb 2011 - 2:26 pm

अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ. दोन हजारापेक्षा अनाथ मुलांना सांभाळणारी. घरातून हाकलून दिल्यानंतर वणवण फिरणारी. आपल्या पोटच्या मुलीला दुस-याकडे सोपवून मोठ्या जिद्दीने अनाथ मुलांना सांभाळणारी. अशी ही माय गावोगाव आपले अनुभव सांगत असते. आपण काय जगतो त्या कष्टांचा पाढा वाचते. आयाबायांना जगायची हिम्मत देते. त्यायचे अनुभव ऐकतांना डोळे भरतात. तीन वर्ष भीक मागावी लागली. स्मशानात झोपावं लागलं. काय नी काय अनुभव. वक्तृत्त्व पाहिल्यानंतर बहिणाबायची आठवण येते. आता कितीतरी पुरस्कार आणि कितीतरी मोठं काम चालू आहे. अनुभव कथन संपल्यानंतर लेकरांसाठी जमले तशी मदतीची हाक भरते. अनुभव ऐकायला आलेल्या लोकामधी झोळी फिरवते. जमलेल्या पैशातून मुलांना सांभाळते. त्यायच्यावर ’मी सिंधुताई सपकाळ’ असा सिनेमा बी निघालाय.’सिनेमातलं तुमचं आयुष्य खरं खुरं हाय काय ” असं इचारल्यावर त्या म्हणल्या ”मी नव-याकडे परत जाते तेवढा प्रसंग सोडला तर सारं बरोबर उतरलं हाय” अशी माय म्हणते. ज्याला कोणीच नाय अशा लहानग्या लेकरायला जगवणारी आणि त्यायची माय होणारी अशी माय जगावेगळीच नाय का. त्यायच्या कार्याची चर्चा व्हावी,वळख व्हावी. अजून माहिती असलेले नसलेले गोष्टी कळाव्या म्हणून ह्यो धागा प्रपंच. ह्यो एक आन ह्यो एक व्हिडो पाहा.

संस्कृतीप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिसादअभिनंदन

प्रतिक्रिया

सहज's picture

20 Feb 2011 - 3:17 pm | सहज

चित्र - मुंबईमिरर

लहानपणी मुंबई दूरदर्शनवर त्यांचा कार्यक्रम / मुलाखत पाहील्याची आठवते. त्यानंतर आजवर बरेच मोठे काम केले आहे. त्यांनी अनेक अनाथांना आधार दिला आहे. अनेक निराधार महीलांना त्यांची कथा, अनुभव स्फूर्तीदायक आहेत.

शुचि's picture

20 Feb 2011 - 8:48 pm | शुचि

फार हृदयस्पर्शी चित्रफीती आहेत.

प्राजु's picture

20 Feb 2011 - 9:03 pm | प्राजु

............
काहिही शब्द सुचले नाहीत!!
___/\___

शिल्पा ब's picture

21 Feb 2011 - 3:37 am | शिल्पा ब

मदर तेरेसांसारखीच गाथा आहे. अशा लोकांविषयी काही बोलण्याची माझी लायकी नाही. सिंधुताईंना प्रणाम.

अवांतर: लेखकाची भाषा अगदी ओढुन ताणुन गावरान वाटते.

वेडा कुंभार's picture

21 Feb 2011 - 10:21 am | वेडा कुंभार

सिंधुताईंना प्रणाम.
सिंधुताई सपकाळ बद्द्ल अधिक माहिती तुम्ही ह्या pdf मध्ये वाचू शकता.

खरचं खूप मोठं कार्य करताहेत सिंधूताई.

I think, ही त्यांच्या संस्थेची साइट आहे.

http://sanmatibalniketan.org/mai.php

स्वैर परी's picture

21 Feb 2011 - 11:39 am | स्वैर परी

सिंधुताई सपकाळ यांना माझा सलाम! एक अप्रतिम व्यक्तिमत्त्व!

सिंधुताई सपकाळ यांना माझा सलाम .
त्याना मी महाविद्यालया पाहिले होते.( अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर ) त्यानतर दुरदर्शनव़र " माझी माय" या कार्यक्रमात

उग्रसेन's picture

22 Feb 2011 - 11:02 pm | उग्रसेन

लोक हो तुम्हाला एक गोठ सांगाची राह्यली. अनाथ लेकरायच्या मायला मी म्हणलं 'माय, तुझं काम आता मोठं झालं हाय. पर एक गोठ मला काय पटली नाय. ती म्हंजी, तु तुह्या लेकीला दुस-याला संभाळाला दिलं. मायचं आतडं तव्हा तुटलं न्हाय का. तुह्या लेकीला आता काय वाट्टं ' माय जराशी थबकली. जराशी हबकली. आन म्हणली. माझी लेक आता भेटती तव्हा काय म्हनती म्हाहीत हाय का ? ती म्हंते. '' मला माझ्या आईची आई व्हायचे आहे'' लेक बी ग्रेट आणि तीची मायबी ग्रेट.

माईच्या कामाच्या कौतुक करणा-याचं आन वाचकाचं आभार.

बाबुराव :)