विक्रोळीच्या संपतला मी म्हटले
तु रूळावर काय शी करायला बसतोस?
अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून?
तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस?
अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे
तशी संपत म्हणाला -
साहेब, शी काय म्हंता? सरळ हागाय बसतो म्हणाना
म्हणजे किती मराठी वाटतं, पोट कसं साफ झाल्यासारखं वाटतं
मी त्याला म्हटलं अरे दादरसारख्या ठिकाणी आता किती सुंदर, देखणी, सुलभ शौलालयं निघालीत
तिथे जावं
मग मी सरकारकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला
शौचालयाचा वार्षिक पास दिला मोफत
आता ते सर्वजण गाडीने दादरला येतात - सुलभ शौचालयात !
आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो,
च्यायला सरकारनं जगायची नाय, जगायची नाय
हागायची तर सोय केली!!!
कवितेची खरी मजा घ्यायची असेल तर क्लिप जरूर ऐकाच!!!!!!
************
जे न देखे रवि, ते ते देखे कवि किंवा जे जे न देखे रवि ते ते देखे कवि असं अथवा ते मूळ जसं असेल तसं काहीसं आहे! तर मुद्दा एवढाच की कवीकडे सर्वव्यापी नजर असते. बा.सीं. मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेवर आजही त्या कवितेतून नेमकं, म्हणजे अगदी पक्कं काय व्यक्त होतं त्यावर चर्चा चालू आहेत. काही असो, कवी काहीतरी नेहमीच नवं दाखवून जात असतो. कधी आपल्या ते नजरेत येतं कधी येत नाही. लोकप्रिय, हास्यस्फोट्क, महाराष्ट्राचे अत्यंत लाडके कवी श्री. अशोक नायगावकरांची "सुलभ शौचालय" (खरं म्हणजे नायगावकरांनी तिला शीर्षक दिलेलं नाहीय, नुसताच सकाळच्या वेळचा अनुभव म्हटलंय) ही कविताच पहा ना. अगदी साध्यासुध्या शब्दांत सामान्य माणसाची अतिसामान्य तरिही तेवढी कळीची (!) समस्या त्यांनी या कवितेत मांड्ली आहेच; पण त्याच सामान्य माणसाला झालेली खुशी शासनाला शालजोडीतले मारून मोठ्या समाधानाच्या, अतिशय भोळ्याभाबड्या टोनमध्ये व्यक्त केलीय.
त्यांची शाकाहार ही कविता सर्वप्रथम ऐकली होती तेव्हा मी अक्षरश: जमीनीवर खाली पडून गडाबडा लोळत हसलो होतो आणि रडतानाही डोळ्यात पाणी येणार नाही एवढं पाणी डोळ्यांतुन निघालं होतं. श्री. अशोक नायगावकरांच्या शैलीबद्दल इथल्या शक्य त्या सगळ्यांची मतं वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
15 Dec 2010 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार
नायगांवकर या महान कवीची "सुलभ शौचालय " ही कविता जेव्हा मी कॉलेजमध्ये वाचली तेव्हा अगदी प्रेमात पडलो होतो. मला त्या वेळेस नक्की कळलं नव्हतं की मी इतका मंत्रमुग्ध का झालो होतो पण तेव्हा "The best" वाटली होती, अजूनही वाटते. विचार करता पहिल्यांदा वाटलं की एका शौचालयाच्या निकडीचं, सौंदर्याचं अप्रतिम वर्णन आहे, लक्षवेधी उपमा आहेत म्हणून असेल कदाचित. पण मग मग जशी स्वतःची ओळख होत गेली लक्षात येऊ लागलं की कारण वाटतं तितकं उथळ नाही आहे. "द्वैत आणि संतुलन यांच्या आपल्याला असलेल्या खोल आणि तीव्र आकर्षणामध्ये कुठेतरी या कवितेची गोडी दडलेली आहे.
15 Dec 2010 - 5:54 pm | गवि
खोल बोललात पराभाऊ..
जाणिवेचे लखलखते टोक आणि खोलीसोबतच उंचीही...
15 Dec 2010 - 5:50 pm | चिगो
>>आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो,
च्यायला सरकारनं जगायची नाय, जगायची नाय
हागायची तर सोय केली!!! <<
हगण्याकडून जगण्याकडे जाण्याची कवीची ओढ पाहून पोट गदगदले...
जातो आता..
15 Dec 2010 - 6:19 pm | टारझन
णायगावकर म्हणजे एकदम भारी माणुस ! कविता एकंच नंबर ! सॉरी दोन नंबर :)
लोकं उगाच नको तिथं नाकं मुरडतात :) जणु काही ह्यांना काही विधी नाहीतंच :)
15 Dec 2010 - 6:21 pm | अवलिया
विक्रोळीहून दादरपर्यंत कसा दम धरवतो?
15 Dec 2010 - 6:23 pm | टारझन
स्नायुंना रोज ची प्रॅक्टिस असेल रे :) काय तु पण नाना :) हा आता कुठे काही कारणास्तो गाडी मधे थांबली तर मग प्रश्न आहे :)
15 Dec 2010 - 6:25 pm | अवलिया
स्नायुशक्तिवर्धन आसनांबद्दल अधिक जाणुन घ्यायला आवडेल, कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
15 Dec 2010 - 8:06 pm | संपादक मंडळ
टारझन व अवलिया,
आपण दिलेले प्रतिसाद आक्षेपार्ह आहेत असे संमंकडून सांगण्यात येत आहे.
कृपया संयमित प्रतिसाद यावेत ही अपेक्षा!
15 Dec 2010 - 9:27 pm | टारझन
सॉरी शक्तिमान. :) येथुन पुढे काळजी घेतल्या जाईल .
-(दिलगीर) टारझन
16 Dec 2010 - 12:05 pm | अवलिया
प्रतिसाद आक्षेपार्ह्य असतात किंवा नसतात. आक्षेपार्ह्य प्रतिसाद संमं कडून अप्रकाशित करण्याचे, आणि त्यावर कुठलेही स्पष्टीकरण न करण्याची पद्धत पचनी पडली होती. हल्लीच असे आक्षेपार्ह्य प्रतिसाद अप्रकाशित न करता वरिलप्रमाणे सुचना देण्याची पध्दत संमंकडून अंगिकारण्यात आली आहे असे लक्षात येत आहे. अर्थातच संमंचे म्हणणे न मानणे आमच्यासारख्या सदस्यांना शक्य नाही. त्यामुळे सुचनेचे पालन केले जाईल यात शंका नाही. फक्त हे असेच धोरण सर्वांसाठी आहे की.. हा खुलासा झाला नाही, येत्या काळात तो खुलासा आपोआप होईल यातसुद्धा शंका नाही.
15 Dec 2010 - 6:51 pm | स्पा
विक्रोळीहून दादरपर्यंत कसा दम धरवतो
नाना लोकल मधून जायला सुरुवात करा...
अपोआप जमेल
15 Dec 2010 - 8:11 pm | संपादक मंडळ
असे धागे विनोदी न राहता मर्यादा सोडून प्रतिसाद देणार्यांचे बनून राहतात.
कोणत्याही सदस्यास, खास करून स्री सद्स्यास अश्या धाग्यांवर येणे लाजिरवाणे वाटू शकते याची धागाकर्त्याने नोंद घेणे आवश्यक आहे. मिसळपावर येणारा प्रत्येक धागा हा महिला व पुरुष सदस्यास भाग घेता येण्याजोगा असावा असे संमंकडून सांगण्यात येत आहे.
15 Dec 2010 - 8:19 pm | यकु
मला वाटते आपला या कवितेवर आक्षेप नसावा. श्री. अशोक नायगावकरांच्या सादरीकरणातही महिला मंडळ ऑलरेडी आहे.
धागाकर्त्याने ऐवजी "प्रतिसादकांनी" असा बदल योग्य वाटतो का? कारण कुणी काय प्रतिसाद द्यायचा ते धागाकर्ता (म्हणजे मी टाकलाय धागा म्हणून आता मी) कसे नियंत्रीत करणार?
:)
:(
15 Dec 2010 - 8:37 pm | रेवती
अशोक नायगावकांच्या सादरीकरणात महिला मंडळ असणे नसणे हा मिपाचा प्रश्न नाही.
मिपाच्या वातावरणाशी आपण सुपरिचित आहात.
एखाद्या चांगल्या चर्चाविषयाचा बोजवारा उडाल्यावर तो दोष लेखकाला देता येत नाही पण आपला विषयच असा आहे कि कोणत्याही स्त्री सदस्यास प्रतिसाद देणे लाजिरवाणे वाटू शकते. नाईलाजाने मला हे सांगावे लागत आहे. तरीही आपल्याला म्हणणे मांडायचे असल्यास नीलकांत यांना व्य. नि. द्वारे संपर्क साधावा.
16 Dec 2010 - 10:02 am | स्वानन्द
>>आपला विषयच असा आहे कि कोणत्याही स्त्री सदस्यास प्रतिसाद देणे लाजिरवाणे वाटू शकते.
आपल्या हेतूबद्दल शंका नाही, पण खरंच हा विषय कोणा स्त्री सदस्यास प्रतीसाद देण्यास लाजिरवाणा वाटण्यासारखा असेल असं नाही वाटत. इतर स्त्री सदस्यांची मते जाणुन घ्यायला आवडेल. असो.
बाकी बोर्या उडवणारे कुठल्याही धाग्याचा बोर्या उडवतात. तेव्हा मग असं म्हणावं लागेल की कोणी काहीच मांडू नये!
16 Dec 2010 - 1:22 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
या संकेतस्थळावर एका महिला सदस्येचा प्रवासात वगैरे निसर्गाच्या हाकेमुळे होणारी कुचंबणा या विषयावर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे या विषयात कुचंबणा व्हायचे कारन दिसत नाही.
15 Dec 2010 - 9:33 pm | शाहरुख
नायगांवकर महान पण आम्ही आमच्यासारख्या जनसामान्यांच्या व्यथा मांडायला गेलो तर आमच्यावर मात्र ही&ही चा शिक्का बसतो..
शाकाहार कविता कुठे मिळेल ?
15 Dec 2010 - 9:59 pm | यकु
गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत
क्रुरपणे त्वचा सोलली जातीय दुधी भोपळ्याची
सपास्सप सुरी चालवत कांद्याची कापाकापी चाललीय
डोळ्यांची आग-आग होतोय
शहाळ्या-नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय
हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी
तडतडतेय मोहरी
हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्यांच्या पंखांचा उकळत्या तेलात
आणि तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर डोळ्यात
धारेवर किसली जातायत गाजरं
पिळवणूक चाललीय आंब्याची
सर्वहारा बनलीय कोय
वरवंट्याखाली चिरडतेय मीठमिरची
बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात
फड्क्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय
चक्का बनण्यासाठी
हे भरडले जातायत गहू
लाहीलाही होतीय मक्याची ज्वारीची
भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात
पोलीस नुस्तेच बघतायत
संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्रं
उतरवली जातायत दिवसाढवळ्या
मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी
आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर
हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी
स्रोतः लोकसत्ता ई -पेपर [ दुवा]
अवांतरः महिलांनी आता स्वयंपाक घरात येऊन हा शाकाहारी हिंसाचार थांबवावा
16 Dec 2010 - 1:23 am | अविनाशकुलकर्णी
नायगावकर् इज सिंपली ग्रेट
16 Dec 2010 - 7:44 am | घाशीराम कोतवाल १.२
हास्यकवी मधला बाप माणुस म्हणजे अशोक नायगावकर